Nursing Officer Recruitment 2026 : आरोग्य क्षेत्रामध्ये नर्सिंग ऑफिसर या पदासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आरोग्य क्षेत्रामध्ये करिअर घडवण्यासाठी एक सुवर्णसंधी आहे तारखेच्या आत या भरतीचा अर्ज करून घ्या. ही भरती आरोग्य क्षेत्रांमधील सर्वोच्च आणि प्रतिष्ठित संस्थांमधील एक अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), नवी दिल्ली मधील एक प्रतिष्ठित संस्था म्हणून ओळखली जाते. या संस्था द्वारेच या भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या परीक्षेच्या माध्यमातून देशभरातील विविध स्वरूपात यांमधील मोठ्या प्रमाणावर एकूण 2,218 रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या पदाच्या परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया ही 14 जुलै 2026 पासून 13 ऑगस्ट 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत दिली आहे. शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा. या भरती प्रक्रियेची निवडणूक हे परीक्षेवर आधारित असणार आहे. परीक्षा संगणक आधारित असते दोन टप्प्यांमध्ये घेतली जाते प्राथमिक परीक्षा 12 सप्टेंबर 2026 आणि मुख्य परीक्षा 30 सप्टेंबर 2026 रोजी घेण्यात येत आहे.
Nursing Officer Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification
नर्सिंग ऑफिसर रिक्रूटमेंट कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट (NORCET-11) मधील नरसिंग ऑफिसर या पदासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.
- एक : भारतीय किंवा राज्य नर्सिंग कौन्सिल मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून B.Sc. (Hons.) Nursing किंवा B.Sc. Nursing किंवा B.Sc. (Post-Certificate) / Post-Basic B.Sc. Nursing उमेदवार उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. समर्थ उमेदवाराची राज्य किंवा भारतीय नर्सिंग कौन्सिल मध्ये नर्स आणि मिडवाइफ म्हणून नोंदणी असणे आवश्यक ठरते.
- दोन : मान्यता प्राप्त मंडळामधून किंवा कौन्सिल मधून जनरल नर्सिंग मिडवाइफ (GNM) चा डिप्लोमा पूर्ण असावा आणि राज्य किंवा भारतीय नर्सिंग कौन्सिल मध्ये नर्स व नीट वाइफ म्हणून नोंदणी केलेली असणे अनिवार्य असते.
- अनुभव (Experience): जी एन एम (GNM) डिप्लोमा धारक उमेदवारांसाठी वरील शैक्षणिक पात्रता प्राप्त केल्यानंतर कमीत कमी 50 खाटांच्या रुग्णालयामध्ये दोन वर्षाचा अनुभव असणे अनिवार्य आहे.
Nursing Officer Recruitment 2026 : वयोमर्यादा – Age limit
| प्रवर्ग (Category) | कमाल वयोमर्यादेत मिळणारी सूट (Age Relaxation) |
| एससी / एसटी (SC/ST) | ३० वर्षांवतिरिक्त ५ वर्षे सूट |
| ओबीसी (OBC) | ३० वर्षांवतिरिक्त ३ वर्षे सूट |
| दिव्यांग (PwBD) | ३० वर्षांवतिरिक्त १० वर्षे सूट |
| दिव्यांग + ओबीसी (PWBD + OBC) | ३० वर्षांवतिरिक्त १३ वर्षे सूट |
| दिव्यांग + एससी / एसटी (PWBD + SC/ST) | ३० वर्षांवतिरिक्त १५ वर्षे सूट |
| माजी सैनिक (Ex-Servicemen) | ३ वर्षे |
Nursing Officer Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents
NORCET-11 या परीक्षेचा अर्ज करत असताना आणि निवड झाल्यानंतर कागदपत्र्याची पडताळणी करताना आवश्यक कागदपत्रांची यादी उमेदवाराकडे असणे गरजेचे असते, कागदपत्राची यादी खालील प्रमाणे दिली आहे.
- ऑनलाइन अर्ज करत असताना डाउनलोड केलेल्या नोंदणी स्लिप ची प्रत असणे बंधनकारक आहे.
- डाउनलोड केलेल्या प्रवेशपत्राची प्रत असणे अनिवार्य आहे.
- जन्मतारीख दाखवणारा प्रमाणपत्र शाळा सोडवलेला दाखला किंवा जन्म दाखला
- 10वी 12वी आणि बीएससी नर्सिंग झालेले गुणपत्रक आणि प्रमाणपत्र असणे बंधन कारक आहे. (Educational qualification certificates)
- भारतीय किंमत राज्य नर्सिंग कौन्सिलिंग ची नोंदणी केलेले प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
- लागू असेल तर, कमीत कमी 50 खतांच्या रुग्णालयांमधील अनुभवाचे प्रमाणपत्र.
- जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
- उत्पन्न प्रमाणपत्र (Income Certificate)
- रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate)
- दिव्यांग असाल तर (Disability Certificate)
- केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रामधील उपक्रम स्वाद युक्त संस्था किंवा राज्य सरकारच्या नोकरी मधील असाल तर “ना हरकत प्रमाणपत्र” असणे गरजेचे आहे.
- अर्ज करत असताना अपलोड केलेल्या छायाचित्र, स्वाक्षरी आणि डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा मार्गदर्शक सूचनांनुसार योग्य असणाऱ्या प्रति असणे गरजेचे आहे.
Nursing Officer Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply
NORCET-11 या भरतीचा अर्ज करण्यासाठी अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाइन असते याची माहिती खालील प्रमाणे पाहू शकता.
- सर्वप्रथम ऑनलाइन अर्ज करत असताना या भरतीचा अधिकृत वेबसाईट ला भेट द्या www.aiimsexams.ac.in
- यानंतर तुमचा चालू मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरून नोंदणी करा.
- लॉगिन केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड आणि युजर आयडीने त्याचा वापर करून लॉगिन करा.
- यानंतर तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा.
- नमूद केलेली सर्व कागदपत्रे पासपोर्ट साईज फोटो, स्वाक्षरी आणि इतर सर्व कागदपत्रे योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
- कर्ज मधील माहिती अचूक भरा कारण एकदा भरलेला अर्ज किंवा नोंदणीमध्ये ई-मेल किंवा पत्राद्वारे कोणतेही माध्यमांमधून माहिती दुरुस्त करण्याची परवानगी दिली जात नाही त्यामुळे काळजीपूर्वक भरा.
- अर्ज मधील सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करा आणि मगच अर्ज सबमिट करा.
- अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट काढून जपून ठेवा भविष्यासाठी कामाला येऊ शकते.
वेतन (Pay Scale)
| तपशील (Details) | माहिती (Information) |
| पद (Post) | नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer, Group-B) |
| पूर्व-सुधारित पे बँड (Pre-revised Pay Band) | पे बँड-२: ₹९३०० – ३४८००/- |
| ग्रेड पे (Grade Pay) | ₹४६००/- |
| इतर भत्ते (Allowances) | संबंधित शहरांमधील केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या नियमांनुसार मिळणारे इतर सर्व भत्ते लागू |

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अर्ज फक्त अधिकृत ऑनलाइन पोर्टलद्वारेच स्वीकारले जातील. अर्जामध्ये भरलेली सर्व माहिती अचूक असावी. चुकीची किंवा अपूर्ण माहिती आढळल्यास अर्ज रद्द होऊ शकतो. आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अनुभव यांची पूर्तता करणारे उमेदवारच अर्ज करावेत. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी निर्धारित नमुन्यानुसार अपलोड करावीत.
तुम्ही येथे बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026 याची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/bmc-recruitment-2026-2/