Mahavitaran Hingoli Recruitment 2026 : महावितरण हिंगोली मंडळ शिकाऊ उमेदवार भरती 2026 | १०वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ! Best मार्गदर्शन

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Mahavitaran Hingoli Recruitment 2026 : हिंगोली येथे महावितरणच्या मंडळ कार्यालया अंतर्गत 2026 या वर्षासाठी शिकाऊ उमेदवार या पदासाठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून 7 ऑगस्ट 2026 या तारखेच्या आत अर्ज मागवण्यात आले आहेत. या जाहिरातीनुसार आयटीआय किंवा 10 वी उत्तीर्ण असलेल्या स्थानिक तरुण या भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरतात.

थोडक्यात सांगायचे तर ज्या उमेदवारांचे आयटीआय किंवा 10 वी पूर्ण असेल असे तरुण या भरतीचा अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेमधील वीजतंत्री आणि तारतंत्री ट्रेड साठी एकूण 80 खतांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. फक्त हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या आणि निर्धारित पात्र पूर्ण करणाऱ्या अशा उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करून घ्यावा. या भरतीची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील लेख वाचणे आवश्यक आहे.

महत्त्वाच्या तारखा आणि जागा :

  • एकूण जागा : ८०
  • वीजतंत्री (Electrician): ४० पदे
  • तारतंत्री (Wireman): ४० पदे
  • ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: ०३.०८.२०२६
  • ​ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: ०७.०८.२०२६ (रात्री ००.०० वाजेपर्यंत)
  • ​कार्यालयामध्ये कागदपत्रे सादर करण्याचा कालावधी: ०३.०८.२०२६ ते ०७.०८.२०२६ (सकाळी १०.३० ते १७.०० वाजेपर्यंत)

Mahavitaran Hingoli Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

महावितरण हिंगोली मंडळ शिकाऊ उमेदवार भरती 2026 या भरतीसाठी उमेदवारांकडे खालील शैक्षणिक पात्रता असणे अनिवार्य आहे.

  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे माध्यमिक शाळांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
  • राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (ITI) वीजतंत्री / तारतंत्री किंवा स्वतंत्र व्यवसायामध्ये उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.

Mahavitaran Hingoli Recruitment 2026 : वयोमर्यादा – Age limit

प्रवर्गवयोमर्यादा
किमान वय१८ वर्षे
कमाल वय (खुला प्रवर्ग)२७ वर्षे
कमाल वय (मागासवर्गीय प्रवर्ग)५ वर्षे शिथिलक्षम

Mahavitaran Hingoli Recruitment 2026 :आवश्यक कागदपत्रे – Required Documents

महावितरण हिंगोली मंडळ शिकाव उमेदवार भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करत असताना आणि कार्यालयामध्ये कागदपत्रे तपासणीच्या वेळी आवश्यक असणारी कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.

  • एसएससी (SSC) गुणपत्रिका व प्रमाणपत्राची झेरॉक्स.
  • आयटीआय (ITI) गुणपत्रिका आणि आयटीआय उत्तीर्ण प्रमाणपत्र.
  • वयाचा पुरावा पाहण्यासाठी शाळा सोडलेला दाखला (School Leaving Certificate) शैक्षणिक हत्तीचे इतर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
  • रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  • आधार कार्ड
  • उमेदवाराच्या स्वतःची स्वाक्षरी आणि पासपोर्ट साईज फोटो.
  • लक्षात घ्या ऑनलाइन अर्ज करत असताना चालू असलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाका.

Mahavitaran Hingoli Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

महावितरण हिंगोली मंडळ शिकाऊ उमेदवार भरती 2026 या भरतीचा अर्ज कसा भरावा याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे.

  • सर्वप्रथम या भरतीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या www.apprenticeshipindia.org उमेदवारांनी याच अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करणे बंधनकारक आहे अथवा अर्ज स्वीकारला जाऊ शकत नाही.
  • अर्ज करताना E०२१७२७०००५७ हा स्थापना कोड वापरणे अनिवार्य आहे.
  • अर्ज करण्याची तारीख ०३.०८.२०२६ ते ०७.०८.२०२६
  • अर्जामधील विचारलेली वैयक्तिक माहिती (नाव, पत्ता आणि जन्मतारीख), शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक माहिती योग्य आणि काळजीपूर्वक भरा.
  • नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे एसएससी गुणपत्रिका व प्रमाणपत्र, आयटीआय गुणपत्रिका (४ सेमिस्टर / वार्षिक), आयटीआय उत्तीर्ण प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र (मागासवर्गीयांसाठी), रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, उमेदवाराची सही आणि फोटो योग्य साइज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
  • अर्थ शुल्क असेल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरून घ्या. अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज पूर्ण मांडला जात नाही.
  • अर्जामध्ये विचारल्यानंतर तुमची चालू ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर टाका कारण पुढील माहिती तुम्हाला मोबाईल किंवा ईमेल द्वारे कळविण्यात येते.
Official Websiteयेथे क्लिक करा
Notification PDFयेथे क्लिक करा
Online Applyयेथे क्लिक करा

मानधन – Salary

तपशीलमाहिती
भरती संस्थामहावितरण मंडळ कार्यालय, विद्युत भवन, हिंगोली
प्रशिक्षण कालावधी१ वर्ष
विद्यावेतन (Stipend / वेतन)निवड झालेल्या शिकाऊ उमेदवारास प्रशिक्षण कालावधीत नियमप्रमाणे विद्यावेतन अदा करण्यात येईल. (टीप: जाहिरातीमध्ये विशिष्ट अचूक आकडा दिलेला नाही, परंतु शासकीय नियमांनुसार Apprenticeship कायद्यांतर्गत निश्चित केलेले विद्यावेतन दिले जाते).
Mahavitaran Hingoli Recruitment 2026 feature image
Mahavitaran Hingoli Recruitment 2026

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : अर्ज करण्यापूर्वी महावितरण हिंगोली मंडळाची अधिकृत भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचा. शिकाऊ उमेदवार (Apprentice) पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर अटी पूर्ण होत असल्याची खात्री करा. ऑनलाइन अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरावी आणि आवश्यक कागदपत्रे योग्य स्वरूपात अपलोड करावीत. अर्ज करण्याची अंतिम तारीख लक्षात ठेवून मुदतीपूर्वी अर्ज पूर्ण करावा.

चुकीची, अपूर्ण किंवा दिशाभूल करणारी माहिती दिल्यास अर्ज रद्द केला जाऊ शकतो. अर्ज सादर केल्यानंतर अर्जाची प्रत व आवश्यक पावत्या भविष्यातील संदर्भासाठी सुरक्षित ठेवाव्यात. निवड प्रक्रिया, कागदपत्र पडताळणी आणि इतर सूचना अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी तपासत राहाव्यात.

तुम्ही येथे सहाय्यक प्राध्यापक भरती 2026 या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/jilha-mvp-smaj-recruitment/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!