MES College of Nursing Recruitment 2026 : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी एम इ एस कॉलेज ऑफ नर्सिंग, रत्नागिरी येथे विविध पदांची भरती प्रक्रिया राबवली जात असून, पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 20 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत आहे. वैद्यकीय आणि नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर घडवू इच्छिणाऱ्या आणि उच्च शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सुशिक्षित व अनुभवी तरुणांसाठी रत्नागिरी येथे नोकरीची सर्वोत्तम संधी आहे.
या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांसाठी रिक्त जागा निघाल्या आहेत पदांची नावे प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर तसेच क्लिनिकल इन्स्ट्रक्टर यासारख्या पदांचा समावेश यावरती प्रक्रियेमध्ये आहे. जर तुम्हालाही नर्सिंग क्षेत्रामध्ये आपले करिअर घडवायचे असेल तर या भरतीचा लवकरात लवकर अर्ज करा. अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्र, वयमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया याची संपूर्ण माहिती खालील लेखकांमध्ये दिली आहे.
- महत्त्वाच्या तारखा आणि एकूण जागा :
- एकूण जागा
- प्रोफेसर कम उपप्राचार्य (Professor Cum Vice Principal): ०१ जागा
- प्रोफेसर (Professor): ०२ जागा
- असोसिएट प्रोफेसर / रीडर (Associate Professor / Reader): ०३ जागा
- असिस्टंट प्रोफेसर / लेक्चरर (Assistant Professor / Lecturer): ०३ जागा
- क्लिनिकल इन्स्ट्रक्टर (Clinical Instructor): १३ जागा
- एकूण पदे: २२ जागा
- महत्त्वाच्या तारखा
- जाहिरात प्रसिद्ध झाल्याची तारीख: ४ ऑगस्ट २०२६
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० ऑगस्ट २०२६ (संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत)
MES College of Nursing Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी रत्नागिरी येथे भरती भरती प्रक्रियेसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे दिली आहे.
- प्रोफेसर / असोसिएट प्रोफेसर (Professor / Associate Professor/ Reader): या पदासाठी संबंधित विषयांमध्ये एम.एस्सी. नर्सिंग (M.Sc. Nursing) पदविका आणि उच्च शिक्षणात अनुभव असणे गरजेचे आहे.
- असिस्टंट प्रोफेसर / लेक्चरर (Assistant Professor / Lecturer) : या पदासाठी कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून संबंधित नर्सिंग विषयांमधील पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
- क्लिनिकल इन्स्ट्रक्टर (Clinical Instructor) : एम.एस्सी. नर्सिंग (M.Sc. Nursing) किंवा बी.एस्सी. नर्सिंग (B.Sc. Nursing) / पोस्ट बेसिक बी.एस्सी. नर्सिंग पदवीधारक आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची कायदेशीर नोंदणी केलेले असलेले उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरतात.
MES College of Nursing Recruitment 2026 : वयोमर्यादा – Age limit
| तपशील | माहिती |
| किमान वयोमर्यादा | जाहिरातीत दिलेली नाही (सर्वसाधारणपणे २१ किंवा २३ वर्षे पूर्ण असावी). |
| कमाल वयोमर्यादा | जाहिरातीत कोणतीही कमाल वयोमर्यादा नमूद केलेली नाही. |
| आरक्षण व शिथिलता | राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सूट मिळू शकते. |
| सविस्तर माहिती स्त्रोत | वयोमर्यादा, अनुभव आणि इतर अटींच्या अचूक माहितीसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या www.muhs.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. |
MES College of Nursing Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी एमईएस कॉलेज ऑफ नर्सिंग , रत्नागिरी भरती 2026 या भरतीची अर्ज कर्जत प्रक्रिया ऑनलाइन नसून प्रत्यक्ष जाऊन सादर करणे गरजेचे आहे.
- सर्वप्रथम पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज स्वतः करायचा आहे.
- अर्जामधील सर्व माहिती स्पष्ट दिसेल अशी यांनी योग्य असणे अनिवार्य आहे. माहितीमध्ये त्रुटी आढळून आल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो.
- नमूद केलेली सर्व कागदपत्रे अर्चा सोबत जोडणे बंधनकारक आहे.
- अर्जाचा विहित नमुना, आवश्यक कागदपत्रे, अनुभव आणि इतर तपशील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे उपलब्ध आहे तिथून घ्यावे.
- कर्ज सादर करण्याची तारीख 20 ऑगस्ट 2026 सायंकाळी पाच वाजेपर्यंत असून, नंतर अर्ज केलेला ग्राह्य धरण्यात येणार नाही.
| Official Website | येथे क्लिक करा |
| Notification PDF | येथे क्लिक करा |
आवश्यक कागदपत्रे – Required Documents
एमईएस कॉलेज ऑफ नर्सिंग भरती 2026 या भरतीचा अर्ज सादर करण्यासाठी खालील कागदपत्रे अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहेत.
- संबंधित पदवी पदव्युत्तर पदवी गुणपत्रक व प्रमाणपत्र.
- महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल किंवा संबंधित राज्याच्या कौन्सिलचे कायदेशीर वैद्य नोंदणी प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
- पदानुसार आवश्यक असणाऱ्या अध्यापन किंवा क्लिनिकल अनुभव प्रमाणपत्र बंधनकारक आहे.
- ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा जन्म दाखला यापैकी कोणतेही एक.
- राखीव प्रवर्गासाठी जात प्रमाणपत्र (Caste Certificate) आणि जात वैधता (Caste Validity)
- पासपोर्ट साईज फोटो आणि रेझ्युमे
निवड प्रक्रिया
एमईएस कॉलेज ऑफ नर्सिंग (MES College of Nursing) भरती 2026 या भरतीची निवड प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.
- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि शासनाच्या नियमानुसार ही निवड प्रक्रिया पार पडत असते.
- पात्र झालेल्या अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते आणि कौशल्य चाचणीसाठी आमंत्रित करण्यात येऊ शकते.
- निवडीची अचूक पद्धत आणि निकषांवर विद्यापीठा अधिकृत संख्या स्थानाला भेट देणे अनिवार्य आहे.

महत्वाची सूचना : वरील माहिती अपलोड केलेल्या अधिकृत जाहिरातीवर आधारित आहे. जाहिरातीत या पानावर शैक्षणिक पात्रता, वेतन किंवा वयोमर्यादेची सविस्तर माहिती दिलेली नाही. त्यामुळे ती माहिती उपलब्ध नसल्याने येथे समाविष्ट केलेली नाही.
तुम्ही येथे IBPS क्लर्क बॅग भरती 2026 या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/ibps-bank-clerk-recruitment-2026/