Gramin Dak Sevak (GDS) Recruitment 2026 : ग्रामीण डाक सेवक भरती 2026; 20,000+ जागांसाठी Best संधी! पात्रता, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Gramin Dak Sevak (GDS) Recruitment 2026 : सरकारी नोकरीची बँकिंग क्षेत्रामध्ये सुवर्णसंधी. भारत सरकारच्या संचार मंत्रालयात अंतर्गत दान विभागातर्फे ग्रामीण डाक सेवक या पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रिया अंतिम देशांमधील विविध वर्तुळामध्ये आणि विभागांमध्ये रिक्त असलेल्या ग्रामीण डाक सेवक पदासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेत द्वारे ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), सहाय्यक ब्रँच पोस्टमास्टर (ABPM) आणि डाक सेवक या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, या भरती प्रक्रियेमध्ये 20,000+ जागा भरल्या जाणार आहेत.

या भरतीसाठी उमेदवाराचे शिक्षण 10 वी उत्तीर्ण आणि सोबतच असलेली शैक्षणिक पात्रता खालील लेखामध्ये पाहू शकता. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून या भरतीसाठी 31 ऑगस्ट 2026 ते 21 सप्टेंबर 2026 या तारखेपर्यंत अधिकृत वेबसाईट वरून अर्ज करणे बंधनकारक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या भरतीतील पदासाठी उमेदवाराला सायकल चालवता येणे आवश्यक आहे. या भरती बद्दल अधिक माहिती जसे की, शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, मानधन, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया याची माहिती तुम्हाला खालील लेखामध्ये मिळून जाईल.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • ऑनलाईन नोंदणी (One-Time Registration): ३१ ऑगस्ट २०२६ ते १९ सप्टेंबर २०२६ (संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत)
    • ​ऑनलाईन अर्ज भरणे व फी भरण्याची मुदत: ०२ सप्टेंबर २०२६ ते २१ सप्टेंबर २०२६ (संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत)
    • ​अर्जात दुरुस्ती (Edit/Correction Window): २३ सप्टेंबर २०२६ ते २४ सप्टेंबर २०२६ (संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत)
    • ​कागदपत्र पडताळणीची मुदत (Document Verification): निवड यादी (Merit List) जाहीर झाल्यापासून १५ दिवसांच्या आत
    • ​भरती प्रक्रिया पूर्ण होण्याची अंतिम तारीख: ३१ डिसेंबर २०२६

Gramin Dak Sevak (GDS) Recruitment 2026 : एकूण जागांची माहिती

पदाचे नाव (Name of Post)एकूण जागा (No. of Posts)
ब्रँच पोस्टमास्टर (Branch Postmaster – BPM)सुमारे १०,००० ते १५,०००+ जागा
सहाय्यक ब्रँच पोस्टमास्टर (Assistant Branch Postmaster – ABPM)सुमारे १५,००० ते २०,०००+ जागा
डाक सेवक (Dak Sevak)सुमारे ५,००० ते १०,०००+ जागा
सर्व पदे मिळूनसुमारे ३०,००० ते ४०,०००+ जागा (अंदाजे)

Gramin Dak Sevak (GDS) Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

ग्रामीण डाक सेवक भरती 2026 या भरती मधील विविध पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.

  • उमेदवार हा भारत सरकार, राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेशांच्या कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण मंडळांमधील गणित आणि इंग्रजी विषय घेऊन दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेला असणे आवश्यक आहे.
  • या भरतीसाठी इतर कोणतेही बोर्डाची समकक्ष पात्रता असलेले उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र ठरणार नाही.
  • उमेदवाराने मान्यता प्राप्त बोर्डा मधून कमीत कमी 10 वी पर्यंत स्थानिक भाषा शिकलेली असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराकडे संगणकाचे ज्ञान (Knowledge of computers), सायकल चालवण्याचे ज्ञान (Knowledge of cycling) आणि सोबतच उपजीविकेचे पर्याप्त साधन (Adequate means of livelihood) असणे आवश्यक आहे.

Gramin Dak Sevak (GDS) Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

ग्रामीण डाक सेवक भरती 2026 या भरती दरम्यान कागदपत्र पडताळणीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे आहे.

  • १० वी वर्गाची मूळ गुणपत्रिका (Marks sheet)
  • ओळख पटवण्यासाठी ओळखीचा वैद्य पुरावा असणे आवश्यक आहे (उदा. आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र)
  • जातीचे प्रमाणपत्र (Caste certificate)
  • दिव्यांग प्रमाणपत्र
  • आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र
  • ट्रान्सजेंडर प्रमाणपत्र
  • जन्माचा पुरावा पाहण्यासाठी शाळा सोडलेला दाखला किंवा जन्म दाखला असणे आवश्यक आहे.
  • वैद्यकीय प्रमाणपत्र
  • स्थानिक भाषेचे प्रमाणपत्र

Gramin Dak Sevak (GDS) Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

ग्रामीण डाक सेवक भरती 2026 या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.

  • या भरतीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया दोन भागांमध्ये विभागलेली असून त्याची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे आहे. ((अ) वन-टाइम रजिस्ट्रेशन (OTR) आणि (ब) ऑनलाईन )
  • पायरी १ – वन-टाइम रजिस्ट्रेशन (OTR):
    • उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन एकदाच नोंदणी करणे अनिवार्य आहे. https://indiapost.gov.in/gdsonlineengagement
    • नोंदणीसाठी स्वतःचा सक्रिय मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी आवश्यक आहे ज्यांची ओटीपी द्वारे पडताळणी करण्यात येईल.
    • वैयक्तिक माहिती नाव, जन्म तारीख, आई-वडीलांचे नाव अचूक आणि योग्य भरा.
    • नोंदणीनंतर युनिक नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड मिळेल त्याचा वापर करून तुम्ही लॉगिन करा.
  • ​पायरी २ – ऑनलाईन अर्ज फॉर्म भरणे:
    • लॉगिन करून झाल्यानंतर वैयक्तिक तपशील, शैक्षणिक माहिती (१० वीचे गुण/बोर्ड) आणि पसंतीचे मंडळ (Circle) व विभाग (Division) निवडा
    • एका विभागात उपलब्ध असलेल्या पदांसाठी पसंतीक्रम (Preferences) द्यावा लागतो.
    • तुमचा अलीकडचा पासवर्डचा साईज फोटो आणि स्वाक्षरी योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
    • अर्ज शुल्क पात्र उमेदवारांसाठी ₹100 असणार आहे हे अर्ज शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरून घ्या. याशिवाय तुमचा अर्ज संपूर्ण मानला जाणार नाही.
    • अर्ज सबमिट करण्यास सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करून घ्या, नंतरच अर्ज सबमिट करा.
    • अर्ज सबमिट झाल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट काढून भविष्यातील कामासाठी जपून ठेवा.
Official websiteयेथे क्लिक करा
Online applyयेथे क्लिक करा
Notification PDFयेथे क्लिक करा

Gramin Dak Sevak (GDS) Recruitment 2026 : वयोमर्यादा – Age limit

श्रेणी (Category)तपशील / वयोमर्यादा
किमान वय१८ वर्षे
कमाल वय४० वर्षे
अनुसूचित जाती / जमाती (SC / ST)४० वर्षांपेक्षा जास्त
इतर मागासवर्गीय (OBC)४० वर्षांपेक्षा जास्त
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS)४० वर्षे
दिव्यांग (PwBD)४० वर्षांपेक्षा जास्त
दिव्यांग (PwBD) + OBC४० वर्षांपेक्षा जास्त
दिव्यांग (PwBD) + SC / ST४० वर्षांपेक्षा जास्त

वेतन श्रेणी

पदाचे नाव (Category)वेतन श्रेणी / टीआरसीए स्लॅब (TRCA Slab)
ब्रँच पोस्टमास्टर (BPM)₹१२,०००/- ते ₹२९,३८०/-
सहाय्यक ब्रँच पोस्टमास्टर / डाक सेवक (ABPM / Dak Sevak)₹१०,०००/- ते ₹२४,४७०/-

Gramin Dak Sevak (GDS) Recruitment 2026 : ग्रामीण डाक सेवक भरती 2026 – FAQ

प्रश्न 1: ग्रामीण डाक सेवक भरती 2026 मध्ये किती जागा आहेत?
उत्तर: ग्रामीण डाक सेवक भरती 2026 मध्ये 20,000 पेक्षा अधिक पदे उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर पदांची अचूक संख्या स्पष्ट होईल.

प्रश्न 2: ग्रामीण डाक सेवक भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: उमेदवाराने साधारणपणे 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक असते. तसेच स्थानिक भाषेचे ज्ञान आवश्यक असते.

प्रश्न 3: ग्रामीण डाक सेवक भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: सामान्यतः वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे असते. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत मिळते.

प्रश्न 4: ग्रामीण डाक सेवक भरतीसाठी परीक्षा घेतली जाते का?
उत्तर: GDS भरतीमध्ये साधारणपणे लेखी परीक्षा घेतली जात नाही. 10वीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाते.

प्रश्न 5: ग्रामीण डाक सेवक भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
उत्तर: उमेदवारांना India Post च्या अधिकृत GDS भरती पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा लागतो.

प्रश्न 6: ग्रामीण डाक सेवक भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: अर्ज शुल्क प्रवर्गानुसार वेगवेगळे असू शकते. अधिकृत भरती जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शुल्काची अचूक माहिती मिळेल.

प्रश्न 7: GDS भरतीमध्ये कोणती पदे असतात?
उत्तर: ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये प्रामुख्याने Branch Postmaster (BPM), Assistant Branch Postmaster (ABPM) आणि Dak Sevak या पदांचा समावेश असतो.

प्रश्न 8: GDS भरतीसाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते?
उत्तर: साधारणपणे आधार कार्ड/ओळखपत्र, 10वीची गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास), रहिवासी प्रमाणपत्र, फोटो आणि स्वाक्षरी यांसारखी कागदपत्रे आवश्यक असतात.

प्रश्न 9: ग्रामीण डाक सेवक भरतीची निवड प्रक्रिया काय आहे?
उत्तर: निवड प्रक्रिया प्रामुख्याने 10वीच्या गुणांवर आधारित मेरिट लिस्ट आणि त्यानंतर आवश्यक कागदपत्र पडताळणी अशा पद्धतीने केली जाते.

प्रश्न 10: ग्रामीण डाक सेवक भरती 2026 ची अधिकृत जाहिरात कुठे पाहता येईल?
उत्तर: भरतीची अधिकृत जाहिरात, अर्जाची तारीख आणि इतर माहिती India Post च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाते.

Gramin Dak Sevak (GDS) Recruitment 2026 feature image
Gramin Dak Sevak (GDS) Recruitment 2026

तुम्ही येथे “पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/pune-mahanagarpalika-aarogy-recruitment/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!