Amravati Anganwadi Sevika Recruitment 2026 : अमरावती शहर अंगणवाडी मदतनीस भरती 2026; महिलांसाठी नोकरी करण्याची Best संधी

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Amravati Anganwadi Sevika Recruitment 2026 : महिलांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी. बालविकास प्रकल्प अधिकारी अमरावती शहर पूर्व यांच्या कार्यालयात अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये अमरावती शहर पूर्व प्रकल्प क्षेत्र अंतर्गत अंगणवाडी सेविका ची दोन पदे, अंगणवाडी मदतनीस ची 10 पदे आणि अंगणवाडी मदतनीस ची एक पद अशा एकूण तेरा रिक्त पदांची भरती प्रक्रिया जाहीर केली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाचे दिनांक 2 फेब्रुवारी 2023 ते 30 जानेवारी 2025 रोजीच्या शासन निर्णया अंतर्गत तसेच आयुक्त कांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी महिलांचे शिक्षण फक्त 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे असून, पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिनांक 2 सप्टेंबर 2026 ते 17 सप्टेंबर 2026 या तारखेच्या अंतर्गत अर्ज करणे अनिवार्य आहे. या भरती बद्दल अधिक माहिती खालील लेखामध्ये देण्यात आली आहे.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • जाहिरात प्रसिद्ध दिनांक: २५ ऑगस्ट २०२६
    • ​अर्ज स्वीकारण्याचा सुरुवातीचा दिनांक: २ सप्टेंबर २०२६
    • ​अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक: १७ सप्टेंबर २०२६ (सकाळी १०:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत)
    • ​प्राथमिक यादी प्रसिद्ध करण्याचा कालावधी: अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापासून १५ दिवसांच्या आत कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केली जाईल.

Amravati Anganwadi Sevika Recruitment 2026 : पदांची माहिती

पदाचे नावभाषाएकूण जागा
अंगणवाडी मदतनीस (मानधनी सेवा)मराठी भाषिक10
अंगणवाडी मदतनीस (मानधनी सेवा)उर्दू भाषिक01
अंगणवाडी सेविका उर्दू02
एकूण रिक्त पदे13

Amravati Anganwadi Sevika Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

अमरावती शहर अंगणवाडी मदतनीस भरती 2026 या भरतीसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे.

  • महिला उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी 12 वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
  • जर उमेदवार बारावीची परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झालेला नसेल, निवड प्रक्रियेमध्ये त्याची शैक्षणिक गुण सरासरी 35% धरण्यात येईल.
  • उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. सोबतच उमेदवाराने 10 वी या शालेय वर्षामध्ये किंवा समकक्ष परीक्षा मराठी विषय असह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराला उर्दू भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • उमेदवार पदवी उत्तीर्ण असेल किंवा त्यांच्याकडे शासकीय मान्यता प्राप्त संस्थेचे संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र असेल, तर अशा उमेदवारांना शासन निर्णयानुसार अतिरिक्त गुण देण्यात येतील.

Amravati Anganwadi Sevika Recruitment 2026 : वयोमर्यादा – Age limit

प्रवर्गवयोमर्यादा
सर्वसाधारण उमेदवार१८ ते ३५ वर्षे
विधवा उमेदवारकमाल ४० वर्षे

Amravati Anganwadi Sevika Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

अमरावती शहर अंगणवाडी मदतनीस भरती 2026 या भरती चा अर्ज भरत असताना जोडण्याची कागदपत्रे खालील प्रमाणे आहे.

  • वयाचा पुरावा पाहण्यासाठी जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला असणे आवश्यक आहे.
  • इयत्ता १० वी, १२ वी, पदवी किंवा पदव्युत्तर पदवी, डी.एड., बी.एड. यांचे गुणपत्रक व बोर्ड/पदवी प्रमाणपत्र.
  • शासकीय मान्यताप्राप्त संस्थेचे संगणक परीक्षा उत्तीर्ण असलेले प्रमाणपत्र असेल तर अतिरिक्त गुण देण्यात येते.
  • रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  • रहिवासी स्वयंघोषणापत्र व लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र (विहित नमुन्यातील).
  • विवाहित महिलांसाठी नावातील बदल झाला असेल तर शासनाचे राजपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा प्रतिज्ञापत्र असणे आवश्यक आहे.
  • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग संवर्गाचे सक्षम प्राधिकारी यांच्या जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराला अगोदरच अंगणवाडी येथे कामाचा अनुभव असेल, तर अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

Amravati Anganwadi Sevika Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

अमरावती शहर अंगणवाडी मदतनीस भरती 2026 या भरतीची अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.

  • सर्वप्रथम उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या भेद नमुन्यात अर्ज करणे बंधनकारक आहे. अन्यथा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करायचे असल्यास, प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करणे अनिवार्य ठरते.
  • अर्जासोबत आवश्यक असणाऱ्या सर्व शैक्षणिक, वयाचे, वास्तव्याचे आणि आरक्षणाच्या प्रमाणपत्रांच्या स्व-साक्षांकित (Self-attested) प्रती अर्जा सोबत जोडणे बंधनकारक आहे.
  • अर्ज करत असताना अर्जामध्ये कुठल्याही प्रकारची खडा-खोड, गिरवागिरव करण सक्त मनाई आहे.
  • अर्ज हा दिलेला तारखे मध्येच करणे अनिवार्य आहे अन्यथा अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
  • अर्ज सादर करण्याचा कालावधी : 2 सप्टेंबर 2026 ते 17 सप्टेंबर 2026 सकाळी 10:30 ते 5:30 वाजेपर्यंत.
  • पत्ता : अर्ज बालविकास प्रकल्प अधिकारी, नागरी अमरावती शहर पूर्व, दत्त पॅलेस, पहिला मजला, गांधी चौक, अमरावती या कार्यालयाच्या पत्त्यावर प्रत्यक्ष सादर करावा.
Official websiteयेथे क्लिक करा
Notification PDFयेथे क्लिक करा

अमरावती शहर अंगणवाडी मदतनीस भरती 2026 – FAQ

प्रश्न 1: अमरावती शहर अंगणवाडी मदतनीस भरती 2026 मध्ये किती जागा आहेत?
उत्तर: या भरतीमधील पदसंख्या अधिकृत जाहिरातीनुसार निश्चित केली जाते. उमेदवारांनी अधिकृत जाहिरात तपासावी.

प्रश्न 2: अंगणवाडी मदतनीस पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता अधिकृत भरती जाहिरातीत नमूद केलेली असते. जाहिरातीनुसार पात्रता तपासूनच अर्ज करावा.

प्रश्न 3: अंगणवाडी मदतनीस भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: वयोमर्यादा शासनाच्या नियमानुसार आणि अधिकृत जाहिरातीत दिलेल्या अटींनुसार असते. आरक्षित प्रवर्गाला नियमानुसार सवलत मिळू शकते.

प्रश्न 4: अंगणवाडी मदतनीस भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
उत्तर: अधिकृत जाहिरातीत दिलेल्या सूचनांनुसार अर्ज करावा. अर्जाची पद्धत आणि अर्जाचा नमुना जाहिरातीत स्पष्ट केला जातो.

प्रश्न 5: या भरतीसाठी अर्ज शुल्क आहे का?
उत्तर: अर्ज शुल्क लागू आहे किंवा नाही, तसेच शुल्काची रक्कम याची माहिती अधिकृत जाहिरातीत दिली जाते.

प्रश्न 6: अंगणवाडी मदतनीस पदासाठी निवड प्रक्रिया काय आहे?
उत्तर: निवड प्रक्रिया संबंधित शासन नियम व अधिकृत जाहिरातीनुसार केली जाते. गुणवत्ता यादी, कागदपत्र पडताळणी इत्यादी प्रक्रिया लागू होऊ शकतात.

प्रश्न 7: अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
उत्तर: शैक्षणिक प्रमाणपत्रे, आधार कार्ड/ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास), फोटो आणि इतर आवश्यक कागदपत्रे मागितली जाऊ शकतात.

प्रश्न 8: अमरावती शहर अंगणवाडी मदतनीस भरतीची अंतिम तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्जाची अंतिम तारीख अधिकृत जाहिरातीत नमूद केली जाते. उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.

प्रश्न 9: अंगणवाडी मदतनीस पदावर कोणती कामे करावी लागतात?
उत्तर: अंगणवाडी केंद्रातील दैनंदिन कामकाजात मदत करणे, बालकांच्या देखभालीसाठी मदत करणे आणि अंगणवाडी सेविकेला विविध कामांमध्ये सहकार्य करणे ही प्रमुख कामे असतात.

प्रश्न 10: अमरावती शहर अंगणवाडी मदतनीस भरतीची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
उत्तर: भरतीची अधिकृत जाहिरात, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखांसाठी संबंधित महिला व बाल विकास विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारी माहिती तपासावी.

Amravati Anganwadi Sevika Recruitment 2026 feature image
Amravati Anganwadi Sevika Recruitment 2026

महत्वाची सूचना : अमरावती शहर अंगणवाडी मदतनीस भरती 2026 संदर्भातील पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, शुल्क व महत्त्वाच्या तारखांमध्ये बदल होऊ शकतो. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.

तुम्ही येथे “मालेगाव महानगरपालिका भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/malegaon-mahanagar-palika-recruitment/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!