Bank of Baroda Bharati 2026 : बँक ऑफ बडोदा भरती 2026; 1,100 जागांसाठी Best भरती, पात्रता व अर्ज प्रक्रिया

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Bank of Baroda Bharati 2026 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी आणि बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर घडू इच्छिणारे तरुणांसाठी बडोदा बँक घेऊन आली आहे नोकरीची सुवर्णसंधी. भारताच्या अग्रेसर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खाती असलेला सार्वजनिक क्षेत्रांपैकी बँक पैकी एक, आपल्या विविध विभागांच्या कामकाजाच्या विस्तार करण्यासाठी आणि बळकटी आणण्यासाठी ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

बँक ऑफ बडोदाच्या मानव संसाधन विभागांतर्गत ही नियमित भरती प्रक्रिया राबवली जात असून, या भरती प्रक्रियेत द्वारे बँकिंग क्षेत्रात करिअर करू शकणारा तरुणांना एका नामांकित संस्थेमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भरती प्रक्रिया अंतर्गत देशभरात एकूण 1,100 जागा भरल्या जाणार आहेत.

बँक ऑफ बडोदा भरती मधील विविध पदे ​वेल्थ एक्झिक्युटिव्ह (Wealth Executive – JMG/S-I) या पदासाठी एकूण १००० जागा आणि ​क्रेडिट अनालिस्ट (Credit Analyst – C&IC – MMG/S-II) या पदासाठी एकूण 100 जागा भरल्या जाणार असून, अर्ज करण्याची मुदत ही 24 सप्टेंबर 2026 असणार आहे. या भरती बद्दल अधिक माहिती अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, पदानुसार वेतन श्रेणी आणि अर्ज प्रक्रिया याची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.

  • महत्त्वाच्या तारखा
  • ऑनलाइन अर्ज आणि शुल्क भरण्याची सुरुवात: ०४ सप्टेंबर २०२६
  • अर्ज करण्याची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख: २४ सप्टेंबर २०२६

Bank of Baroda Bharati 2026 : पदाची माहिती

पदाचे नावएकूण जागा
वेल्थ एक्झिक्युटिव्ह (Wealth Executive) 1000
क्रेडिट अनालिस्ट – सी आणि आयसी (Credit Analyst – C&IC)100

Bank of Baroda Bharati 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

बँक ऑफ बडोदा भरती 2026 या भरतीतील विविध पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे:

  • वेल्थ एक्झिक्युटिव्ह (Wealth Executive – JMG/S-I)
    • या पदासाठी उमेदवाराकडे कोणत्याही शाखेमधील पदवी असणे अनिवार्य आहे.
    • पुढीलपैकी कुठलेही एक वैद्य प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे:
      • इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे IC 38 प्रमाणपत्र.
      • ​NISM Series V A: म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर्स सर्टिफिकेशन परीक्षा.
      • ​NISM Series XXI-A: पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस (PMS) डिस्ट्रिब्युटर्स सर्टिफिकेशन परीक्षा.
      • ​NISM Series V-D: म्युच्युअल फंड- स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड डिस्ट्रिब्युटर्स सर्टिफिकेशन परीक्षा.
      • व्यवस्थापना मधील दोन वर्षाचा पूर्ण वेळ पोस्ट ग्रॅज्युएट पदवी किंवा डिप्लोमा, एमबीए केले असेल तर प्राधान्य देण्यात येईल.
  • क्रेडिट अनालिस्ट – सी आणि आयसी (Credit Analyst – C&IC – MMG/S-II)
    • या पदासाठी उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे अनिवार्य आहे.
    • किंवा चार्टर्ड अकाउंटंट
    • कॉपरेट क्रेडिट चा अनुभव असेल तर उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

Bank of Baroda Bharati 2026 : वयोमर्यादा – Age limit

पदाचे नाववयोमर्यादा(१ सप्टेंबर २०२६ रोजी)
वेल्थ एक्झिक्युटिव्ह (Wealth Executive) JMG/S-I२२ वर्षे ते कमाल ३२ वर्षे
क्रेडिट अनालिस्ट – सी आणि आयसी (Credit Analyst – C&IC) MMG/S-IIकिमान २१ वर्षे ते कमाल ३३ वर्षे
  • वयामध्ये सवलत (Age Relaxation):
    • ​अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती (SC/ST): ५ वर्षे
    • ​इतर मागासवर्गीय (OBC – Non-Creamy Layer): ३ वर्षे
    • ​दिव्यांग (PwBD): सामान्य/EWS साठी १० वर्षे, OBC साठी १३ वर्षे, आणि SC/ST साठी १५ वर्षे
    • ​माजी सैनिक आणि इतर पात्र उमेदवारांसाठी: नियमांनुसार ५ ते १० वर्षांपर्यंत सवलत

तुम्ही येथे “कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2026” या भरतीच्या संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/kokan-railway-corporation-limited-recruitment/

Bank of Baroda Bharati 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

बँक ऑफ बडोदा भरती 2026 या भरतीचा अर्ज भरण्यासाठी आणि मुलाखतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत:

  • ऑनलाइन भरलेल्या अर्जाची प्रिंट आउट असणे आवश्यक आहे.
  • मुलाखतीसाठी वैध जीडी/मुलाखत कॉल लेटरची प्रिंटआउट.
  • ओळख पुरावा म्हणून पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड यापैकी कोणतेही एक असणे अनिवार्य आहे.
  • वयाचा पुरावा म्हणून जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला असणे अनिवार्य आहे.
  • पदवी पूर्ण असलेले सर्व सेमिस्टर वर्षानुसार शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि डिप्लोमा किंवा पदवीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
  • घोषित केलेल्या कामाच्या अनुभवाच्या पुराव्यासाठी नियुक्ती पत्र, सॅलरी स्लिप, रिलिव्हिंग लेटर आणि अनुभवाचे प्रमाणपत्र.
Online applyयेथे क्लिक करा
Official websiteयेथे क्लिक करा
Notification PDFयेथे क्लिक करा

Bank of Baroda Bharati 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

बँक ऑफ बडोदा भरती 2026 या भरतीसाठी अर्ज करण्याची खालील प्रमाणे आहे.

  • सर्वप्रथम पात्र उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देणे आवश्यक आहे.
  • नोंदणी करण्यासाठी वैयक्तिक माहिती भरा आणि नोंदणी करून घ्या.
  • नोंदणी केल्यानंतर तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल याचा वापर करून तुम्ही लॉगिन करा.
  • अर्जामध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती, शैक्षणिक अहर्ता आणि इतर आवश्यक माहिती अचूक आणि काळजीपूर्वक भरा.
  • नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे (बायोडाटा (Resume), वयाचा पुरावा (१० वीचे गुणपत्रक/प्रमाणपत्र), शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे, कामाचा अनुभव, जात/आरक्षण प्रमाणपत्र आणि दिव्यांग प्रमाणपत्र ( लागू असल्यास)) योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
  • पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी योग्य साईज मध्ये अपलोड करणे बंधनकारक आहे.
  • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने डेबिट कार्ड किंमत क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग किंवा यूपीआय द्वारे तुम्ही अर्ज शुल्क भरू शकता.
  • अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट आणि शुल्क भरलेली पावती डाउनलोड करून जपून ठेवा.

बँक ऑफ बडोदा भरती 2026 – FAQ

प्रश्न 1: बँक ऑफ बडोदा भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
उत्तर: बँक ऑफ बडोदा भरती 2026 मध्ये एकूण 1,100 जागा आहेत.

प्रश्न 2: बँक ऑफ बडोदा भरती 2026 साठी अर्ज कसा करायचा?
उत्तर: पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.

प्रश्न 3: या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असू शकते. उमेदवारांनी संबंधित पदाची अधिकृत जाहिरात तपासावी.

प्रश्न 4: बँक ऑफ बडोदा भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: वयोमर्यादा पदानुसार वेगळी असू शकते. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयाची सवलत मिळते.

प्रश्न 5: या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे?
उत्तर: निवड प्रक्रिया संबंधित पदाच्या नियमांनुसार होईल. त्यामध्ये ऑनलाइन परीक्षा, मुलाखत किंवा इतर टप्पे असू शकतात.

प्रश्न 6: अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: अर्ज शुल्क उमेदवाराच्या प्रवर्गानुसार आणि पदानुसार वेगळे असू शकते. अधिकृत जाहिरातीत दिलेले शुल्क तपासावे.

प्रश्न 7: बँक ऑफ बडोदा भरती 2026 ची अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्जाची अंतिम तारीख अधिकृत भरती जाहिरातीत नमूद केलेली असेल. उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा.

प्रश्न 8: बँक ऑफ बडोदा भरती 2026 मध्ये पगार किती मिळेल?
उत्तर: पगार संबंधित पदाच्या वेतनश्रेणी आणि बँकेच्या नियमांनुसार निश्चित केला जाईल.

प्रश्न 9: बँक ऑफ बडोदा भरतीची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
उत्तर: भरतीची अधिकृत जाहिरात, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि इतर माहिती बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइटवर पाहता येईल.

Bank of Baroda Bharati 2026 feature image

अस्वीकरण: या लेखातील माहिती उमेदवारांच्या माहितीसाठी देण्यात आली आहे. पदांची संख्या, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्जाची अंतिम तारीख, निवड प्रक्रिया व इतर नियमांमध्ये बदल होऊ शकतो. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी बँक ऑफ बडोदाची अधिकृत जाहिरात व वेबसाइट तपासावी. चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी totalnaukri.com जबाबदार राहणार नाही.

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!