SSC CHSL Recruitment 2026 : संयुक्त उच्च माध्यमिक स्तर भरती 2026 | Best मार्गदर्शन

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

SSC CHSL Recruitment 2026 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी. कर्मचारी चयन आयोग (SSC) द्वारे घोषित करण्यात आलेली संयुक्त उच्च माध्यमिक स्तर (10+2) परीक्षा, 2026 (CHSL) ही भारतातील लाखो इच्छुक तरुणांसाठी एक आनंदाची महत्त्वाची आणि प्रतिष्ठित संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

देशांमधील विविध शासकीय मंत्रालये, विभाग आणि कार्यालयांमध्ये ‘लोअर डिव्हिजन क्लर्क’ (LDC), ‘जुनियर सचिवालय सहाय्यक’ (JSA) आणि ‘डेटा एंट्री ऑपरेटर’ (DEO) अशा 2,536 पदांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून तरुणांना केंद्र सरकारच्या स्थिर व सन्माननीय सभेत रुजू होण्याची संधी मिळू शकते. 12 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून डायरेक्ट सरकारी नोकरी मिळवून देणारा प्रमुख मार्ग मानला जात आहे. या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील संपूर्ण लेख वाचणे आवश्यक आहे.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात: ०७ सप्टेंबर २०२६
    • ​ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: ०७ ऑक्टोबर २०२६ (रात्री ११:०० वाजेपर्यंत)
    • ​ऑनलाइन फी भरण्याची अंतिम तारीख: ०८ ऑक्टोबर २०२६ (रात्री ११:०० वाजेपर्यंत)
    • ​अर्ज सुधारणा विंडो (Application Form Correction): १४ ऑक्टोबर २०२६ ते १६ ऑक्टोबर २०२६ (रात्री ११:०० वाजेपर्यंत)
    • ​टियर-I परीक्षा: लवकरच जाहीर केली जाईल

SSC CHSL Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

संयुक्त उच्च माध्यमिक स्तर भरती 2026 या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाण आहे:

  • सामान्य पात्रता: उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून १२ वी (Higher Secondary / 10+2) परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
  • ​विशिष्ट पदांसाठी (DEO): कॅग (C&AG) किंवा इतर विशिष्ट मंत्रालयांमधील डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) पदांसाठी विज्ञान शाखेतून गणित हा विषय घेऊन १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

SSC CHSL Recruitment 2026 : वयोमर्यादा – Age limit

प्रवर्गवयोमर्यादा/ सवलत (Age Limit / Relaxation)
सर्वसाधारण वयोमर्यादा१८ ते २७ वर्षे
वयोमर्यादा मोजण्याचा संदर्भ दिनांक०१ ऑगस्ट २०२६
SC / ST५ वर्षे सवलत
OBC३ वर्षे सवलत
PwBD (अनारक्षित)१० वर्षे सवलत
PwBD (OBC)१३ वर्षे सवलत
PwBD (SC / ST)१५ वर्षे सवलत
माजी सैनिक (Ex-Servicemen – ESM)लष्करी सेवेतील सेवाकाळ वजा करून ३ वर्षे सवलत

SSC CHSL Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Document

संयुक्त उच्च माध्यमिक स्तर भरती 2026 या भरतीतील परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करताना आणि कागदपत्रे अपलोड करताना लागणारी आवश्यक कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे आहे :

  • उमेदवाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो रंगीत असावा आणि स्वाक्षरी
  • दहावी (10th) आणि बारावी (12th) उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक (Marksheet) आणि प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पारपत्र (Passport), वाहन परवाना (Driving License) यांपैकी कोणतेही एक असणे आवश्यक आहे.
  • जात/प्रवर्ग प्रमाणपत्र (Category Certificate)
  • दिव्यांग प्रमाणपत्र (PwBD Certificate)
  • माजी सैनिक कागदपत्रे

SSC CHSL Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

संयुक्त उच्च माध्यमिक स्तर भरती 2026 या भरतीतील परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे आहे :

  • सर्वप्रथम या भरतीच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या किंवा मोबाईल वरती my SSC ॲप डाऊनलोड करा.
  • जर तुम्ही या अगोदर नोंदणी केली नसेल तर One-Time Registration या पर्यायावर क्लिक करा आणि तुमची माहिती भरून नोंदणी करा.
  • नोंदणी केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळेल त्याचा वापर करून लॉगिन करा.
  • नंतर मुख्य पानावरील Latest Notifications’ विभागामध्ये जाऊन ‘Combined Higher Secondary (10+2) Level Examination, 2026’ या परीक्षेच्या समोरील Apply या पर्यायावर क्लिक करा.
  • अर्ज उघडला जाईल अर्जामध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, परीक्षा केंद्राची पसंती निवडा आणि माहिती अचूक व काळजीपूर्वक भरा.
  • नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे, स्वाक्षरी, फोटो आणि इतर आवश्यक कागदपत्रे युके साइज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
  • अर्ज सबमिट करण्यास अर्जामधील सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करा. नंतरच अर्ज सबमिट करा.
  • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा युपीआय (UPI) द्वारे भरू शकता.
  • अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट काढून डाऊनलोड करून ठेवा.
Online Registrationयेथे क्लिक करा
Official websiteयेथे क्लिक करा
Notification PDFयेथे क्लिक करा

वेतन श्रेणी (Pay Scale)

पदाचे नाववेतन श्रेणी (Pay Scale)
लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) / जुनियर सचिवालय सहाय्यक (JSA)₹ १९,९०० ते ६३,२००
डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)₹ २५,५०० ते ८१,१०० आणि ₹ २९,२०० ते ९२,३००
डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’₹ २५,५०० ते ८१,१००

परीक्षा स्वरूप

  • टियर-I परीक्षा (कंप्युटर आधारित परीक्षा – CBE)
    • ही परीक्षा वस्तुनिष्ठ प्रकारची ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येते.
    • विषय :
      • इंग्रजी भाषा (बेसिक ज्ञान) – २५ प्रश्न (५० गुण)
      • ​सामान्य बुद्धिमत्ता (General Intelligence) – २५ प्रश्न (५० गुण)
        • ​संख्यात्मक पात्रता (Quantitative Aptitude – बेसिक अंकगणित) – २५ प्रश्न (५० गुण)
      • ​सामान्य जाणीव (General Awareness) – २५ प्रश्न (५० गुण)
    • एकूण प्रश्न 100, 200 गुण आणि परीक्षा सोडवण्यासाठी एकूण 60 मिनिटे दिली जातात.
    • प्रत्येकी चुकीच्या उत्तरासाठी 0.50 काटले जातात निगेटिव्ह मार्किंग यामध्ये असते.
  • टियर-II परीक्षा
    • ​टियर-I मंदे पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी टियर-II परीक्षेसाठी बोलावण्यात येते. यामध्ये गणितीय क्षमता, तर्कशास्त्र आणि बुद्धिमत्ता, इंग्रजी भाषा आणि आकलन, सामान्य जाणीव, संगणक ज्ञान चाचणी तसेच पदानुसार आवश्यक असणारी कौशल्य चाचणी किंवा टायपिंग टेस्ट घेण्यात येते.

SSC CHSL भरती 2026 – FAQ

  1. SSC CHSL भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
    उत्तर: SSC CHSL भरती 2026 मध्ये एकूण 2,536 जागा आहेत.
  2. SSC CHSL भरती 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
    उत्तर: उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. काही पदांसाठी अतिरिक्त विषयाची अट लागू शकते.
  3. SSC CHSL भरतीमध्ये कोणती पदे आहेत?
    उत्तर: या भरतीमध्ये LDC/JSA, DEO आणि DEO Grade ‘A’ यांसारख्या पदांचा समावेश असतो.
  4. SSC CHSL भरती 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?
    उत्तर: सामान्यतः वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे असते. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत मिळते.
  5. SSC CHSL परीक्षा कोण आयोजित करते?
    उत्तर: SSC CHSL परीक्षा कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) आयोजित करते.
  6. SSC CHSL परीक्षेचे स्वरूप काय आहे?
    उत्तर: SSC CHSL परीक्षा मुख्यतः Tier-I आणि Tier-II अशा टप्प्यांमध्ये घेतली जाते.
  7. SSC CHSL भरती 2026 साठी अर्ज कसा करायचा?
    उत्तर: उमेदवारांनी SSC च्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा.
  8. SSC CHSL परीक्षेसाठी अर्ज शुल्क किती आहे?
    उत्तर: अर्ज शुल्क आणि शुल्कातून सूट याबाबतची माहिती अधिकृत जाहिरातीनुसार पाहावी.
  9. SSC CHSL मध्ये निवड कशी केली जाते?
    उत्तर: उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि लागू असलेल्या कौशल्य/टायपिंग चाचणी यांच्या आधारे केली जाते.
  10. SSC CHSL भरती 2026 ची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
    उत्तर: भरतीची अधिकृत जाहिरात, अर्जाची तारीख, परीक्षा तारीख आणि इतर माहिती SSC च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होईल.
SSC CHSL Recruitment 2026 feature image

महत्त्वाची सूचना : SSC CHSL भरती 2026 संदर्भातील जागा, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्जाची तारीख व परीक्षा पद्धती यामध्ये अधिकृत अधिसूचनेनुसार बदल होऊ शकतात. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी कर्मचारी निवड आयोगाची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अधिकृत वेबसाइटवरील माहितीच अंतिम मानावी.

तुम्ही येथे “समर्थ कॉलेज ऑफ कंप्यूटर सायन्स पुणे भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/samarth-college-pune-recruitment-2026/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!