SSC CPO Recruitment 2026 : सरकारी नोकरीचे शोधत असणाऱ्या तरुणांसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. कर्मचारी चयन आयोग (SSC) द्वारे आयोजित करण्यात आलेल्या दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) सब-inspector (SI) परीक्षा ही भारतामधील अत्यंत प्रतिष्ठित आणि महत्त्वाची स्पर्धा परीक्षा म्हणून ओळखले जाते.
या परीक्षेच्या माध्यमातून देशाच्या सेवेची आवड असणारे आणि शारीरिक दृष्ट्या बौद्धिक दृष्ट्या सक्षम असणाऱ्या होतकरू तरुणांना केंद्र सरकारच्या सुरक्षा यंत्रणेत अधिकारी म्हणून डायरेक्ट काम करण्याचे सुवर्णसंधी. देशाच्या अंतर्गत सुरक्षेची धुरा सांभाळणाऱ्या दिल्ली पोलिस आणि विविध आणि विविध CAPFs (जसे की CRPF, BSF, ITBP, CISF, SSB) मधील ‘सब-इस्पेक्टर’ (गट ‘ब’) अशा जबाबदारीच्या पदांवर भरती प्रक्रिये जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला खालील लिखामध्ये मिळून जाईल.
- महत्वाच्या तारखा :
- ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: १० सप्टेंबर २०२६
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि वेळ: ३० सप्टेंबर २०२६ (रात्री ११:०० पर्यंत)
- ऑनलाइन शुल्क भरण्याची शेवटची तारीख: ०१ ऑक्टोबर २०२६ (रात्री ११:०० पर्यंत)
- अर्ज दुरुस्ती विंडो (Application Correction Window): ०८ ऑक्टोबर २०२६ ते १० ऑक्टोबर २०२६ (रात्री ११:०० पर्यंत)
- संगणक आधारित परीक्षा (CBE) तारीख: लवकच कळवली जाईल
SSC CPO Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification
दिल्ली पुलिस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) सब-इस्पेक्टर (SI) भरती 2026 या भरतीतील विविध पदासाठी लागणारे शिक्षण पात्रता खालील प्रमाणे आहे.
- सर्वसाधारण पदे (SI GD/Executive): या पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणतीही पदवी किंवा सम कक्षा असणे अनिवार्य आहे.
- CISF मधील SI (Fire) पद: या पदासाठी उमेदवाराकडे विज्ञान शाखेमधून पदवी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) किंवा मेकॅनिकल, सिविल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये तीन वर्षाची पदविका असणे आवश्यक आहे.
- दिल्ली पोलीस (पुरुष) पदासाठी : या पदासाठी अर्ज करणाऱ्या पुरुष उमेदवारांकडे हलक्या मोटार वाहनाचे वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे बंधनकारक आहे.
SSC CPO Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents
दिल्ली पुलिस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) सब-इस्पेक्टर (SI) भरती 2026 या भरतीचा अर्ज करत असताना खालील कागदपत्रांची यादी उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.
- दहावी, बारावी आणि पदवीची (किंवा समकक्षा) गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे.
- विज्ञान शाखेची पदवी किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा चे प्रमाणपत्र व गुणपत्रक असणे बंधनकारक आहे.
- ओळख पटवण्यासाठी पुढीलपैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र असणे आवश्यक आहे : आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट किंवा वाहन परवाना
- ड्रायव्हिंग लायसन्स
- आरक्षण / जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
- उत्पन्न व आर्थिक दुर्बल घटक (EWS) प्रमाणपत्र
- छायाचित्र आणि स्वाक्षरी
- माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज बुक आणि संबंधित कागदपत्रे.
तुम्ही येथे “धुळे महावितरण अप्रेंटीसशीप भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/dhule-mahavitaran-apprenticeship-recruitment/
SSC CPO Recruitment 2026 : वयोमर्यादा – Age limit
| पदाचा प्रकार (Post Type) | वयोमर्यादा (Age Limit) |
| सर्वसाधारण पदे (SI GD आणि Executive) | २० ते २५ वर्षे (उमेदवाराचा जन्म ०२.०८.२००१ ते ०१.०८.२००६ दरम्यान असावा) |
| CISF मधील SI (Fire) पद | १८ ते ३० वर्षे (उमेदवाराचा जन्म ०२.०८.१९९६ ते ०१.०८.२००८ दरम्यान असावा) नियमानुसार लागू |
SSC CPO Recruitment 2026 : निवड प्रक्रिया
दिल्ली पुलिस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) सब-इस्पेक्टर (SI) भरती 2026 या भरतीची निवड प्रक्रिया खालील प्रमाणे आहे :
- पेपर-I (Computer Based Examination):
- हा संगणक आधारित पहिला लेखी पेपर असतो, ज्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी (Reasoning), सामान्य ज्ञान (GK), परिगणनात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude) आणि इंग्रजी भाषा या विषयांवर प्रत्येकी २५ गुणांचे प्रश्न विचारले जातात.
- शारीरिक मानक चाचणी (PST) आणि शारीरिक सहनशक्ती चाचणी (PET): पेपर-I मधील पात्रतेनंतर उमेदवारांची उंची, छाती इत्यादी शारीरिक मापदंड (PST) आणि धावणे, लांब उडी, उंच उडी यांसारख्या शारीरिक सहनशक्तीच्या चाचण्या (PET) घेतल्या जातात.
- पेपर-II (Computer Based Examination):
- शारीरिक चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांसाठी इंग्रजी भाषा आणि आकलन (English Language and Comprehension) या विषयावर आधारित दुसरा संगणक आधारित पेपर घेतला जातो.
- वैद्यकीय तपासणी (DME/RME) आणि कागदपत्र पडताळणी (Document Verification): अंतिम टप्प्यात उमेदवारांची वैद्यकीय तपासणी (Medical Examination) केली जाते आणि त्यांची सर्व मूळ कागदपत्रे पडताळली जातात.
SSC CPO Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply
दिल्ली पुलिस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) सब-इस्पेक्टर (SI) भरती 2026 भरतीची अर्ज प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे :
- सर्वप्रथम पात्र उमेदवारांनी कर्मचारी चयन आयोगाच्या नवीन अधिकृत वेबसाईट द्वारे अर्ज करणे आवश्यक आहे.
- तिथे ‘One-Time Registration’ (OTR) पर्यायावर क्लिक करून स्वतःची वैयक्तिक माहिती भरून नोंदणी करा.
- नोंदणी केल्यानंतर तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल त्याचा वापर करून लॉगिन करा.
- ‘Latest Notifications’ टॅबमध्ये ‘Delhi Police and CAPFs Examination-2026’ या परीक्षेच्या समोरील ‘Apply’ बटनावर क्लिक करा.
- अर्जामध्ये विचारलेली सर्व वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक माहिती अचूक व काळजीपूर्वक भरा.
- अर्जामध्ये नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार उमेदवारांनी कॅमेरा द्वारे लाईव्ह फोटो कॅप्चर करून अपलोड करणे बंधनकारक आहे, सोबतच स्वाक्षरी सुद्धा अपलोड करणे आवश्यक आहे.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरून घेणे आवश्यक आहे अथवा तुमचा अर्ज स्वीकरला जाणार नाही.
- अर्जामधील मधील सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करूनच सबमिट करा.
- यशस्वीरित्या संपन्न झाल्यानंतर शुल्क भरलेली पोचपावती आणि अर्जाची प्रिंट आऊट काढून जखून ठेवा.
| Online apply | येथे क्लिक करा |
| Official website | येथे क्लिक करा |
| Notification PDF | येथे क्लिक करा |

FAQ – दिल्ली पोलीस आणि CAPF SI भरती 2026
- दिल्ली पोलीस आणि CAPF SI भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
उत्तर: या भरतीमध्ये एकूण 1,871 पदे असल्याचे नमूद केले आहे. - या भरतीमध्ये कोणत्या पदांसाठी भरती केली जाते?
उत्तर: या भरतीमध्ये सब-इन्स्पेक्टर (SI) पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाते. - दिल्ली पोलीस SI भरतीसाठी कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे?
उत्तर: उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (Graduation) उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. अधिकृत जाहिरातीतील पदनिहाय अटी तपासणे आवश्यक आहे. - CAPF SI भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: CAPF SI पदासाठी सामान्यतः मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक असते. - या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: सामान्यतः SI पदासाठी 20 ते 25 वर्षे वयोमर्यादा असते. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत मिळू शकते. - दिल्ली पोलीस आणि CAPF SI भरतीची निवड प्रक्रिया काय आहे?
उत्तर: निवड प्रक्रियेत Computer Based Examination (CBE), Physical Standard Test (PST), Physical Endurance Test (PET), Paper-II आणि Medical Examination यांसारख्या टप्प्यांचा समावेश होतो. - या भरतीसाठी शारीरिक चाचणी असते का?
उत्तर: होय. CAPF आणि दिल्ली पोलीस SI पदांसाठी पात्र उमेदवारांना नियमानुसार शारीरिक मापदंड व शारीरिक क्षमता चाचणी द्यावी लागते. - या भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
उत्तर: उमेदवारांनी संबंधित अधिकृत भरती पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. - अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात?
उत्तर: सामान्यतः शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखपत्र, जन्मतारखेचा पुरावा, फोटो, स्वाक्षरी आणि लागू असल्यास जात/आरक्षण प्रमाणपत्र आवश्यक असते. - दिल्ली पोलीस SI आणि CAPF SI साठी परीक्षा एकच असते का?
उत्तर: दोन्ही पदांसाठी भरती प्रक्रिया संबंधित केंद्रीय भरती परीक्षेद्वारे होऊ शकते; मात्र पदनिहाय पात्रता, शारीरिक निकष आणि इतर अटी अधिकृत अधिसूचनेनुसार तपासाव्यात.
महत्त्वाची सूचना : दिल्ली पोलीस आणि CAPF सब-इन्स्पेक्टर (SI) भरती 2026 संदर्भातील जागा, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, परीक्षा पद्धती आणि निवड प्रक्रिया यामध्ये अधिकृत अधिसूचनेनुसार बदल होऊ शकतात. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी SSC च्या अधिकृत वेबसाइटवरील जाहिरात व सूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.