MAFSU Recruitment 2026 : शैक्षणिक क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आणि नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची संधी. महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्या उच्च शिक्षण संशोधनाला चालना देण्यासाठी भरती प्रक्रियेत जाहीर करण्यात आली आहे. या विद्यापीठांतर्गत येणाऱ्या पशुवैद्यकीय, डेअरी तंत्रज्ञान आणि मत्स्य विज्ञान विद्या शाखांमध्ये सहाय्यक प्राध्यापक आणि समतुल्य पदांसाठी एकूण 193 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक परिषद 2026 27 मधील या महत्त्वपूर्ण जाहिरातीनुसार पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी 15 सप्टेंबर 2026 ते 14 ऑक्टोंबर 2026 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. पशु आणि मत्स्य विज्ञान क्षेत्रात मधील उच्च शिक्षण, प्राध्यापक वर्ग आणि संशोधनाला सक्षम बनवण्याच्या दृष्टीने या भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवाराची निवड ही महत्त्वाची मानली जात असून, यामध्ये विविध सामाजिक व समांतर आरक्षणाच्या नियमाने निवड करण्यात येणार आहे. या भरतीबद्दल अधिक माहिती खालील प्रमाणे आहे.
- महत्त्वाच्या तारखा :
- ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: १५ सप्टेंबर २०२६
- ऑनलाइन अर्ज आणि कागदपत्रे अपलोड करण्याची अंतिम तारीख: १४ ऑक्टोबर २०२६ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत)
- अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख: १४ ऑक्टोबर २०२६ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत)
MAFSU Recruitment 2026 : पदाची माहिती
| पदाचे नाव | एकूण जागा |
| पशू आणि मत्स्य विज्ञान विद्याशाखा (विविध विषयांचे सहायक प्राध्यापक, वैज्ञानिक, विषय तज्ज्ञ व हॉस्टेल वार्डन) | 142 |
| डेअरी तंत्रज्ञान विद्याशाखा (सहायक प्राध्यापक व हॉस्टेल वार्डन) | 10 |
| मत्स्य विज्ञान विद्याशाखा (सहायक प्राध्यापक) | 22 |
| कॉलेज लायब्ररीयन (College Librarian) | 9 |
| सहायक प्राध्यापक, शारीरिक शिक्षण / क्रीडा अधिकारी | 10 |
| एकूण पदे | 193 |
MAFSU Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification
महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ (MAFSU) भरती २०२६ या भरतीतील पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.
- सहायक प्राध्यापक व समतुल्य पदे (पशू व मत्स्य विज्ञान आणि डेअरी तंत्रज्ञान):
- या पदासाठी कृषी किंवा पशुवैद्यकीय विद्यापीठांमधून संबंधित विषयांमध्ये कमीत कमी ७.०२ CGPA/OGPA किंवा ७०% गुण असणे पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराकडेसंबंधित विद्या शाखेतील पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे.
- UGC, CSIR, ICAR किंवा ASRB द्वारे घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) किंवा महाराष्ट्र SET/SLET उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे, किंवा नियमांनुसार संबंधित विषयात पीएच.डी. (Ph.D.) पदवीधारक असावे.
- हॉस्टेल वार्डन (Hostel Warden):
- या पदासाठी संबंधित शाखे मधील पदवी आणि संबंधित विषयात पदवी उत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
- NET/SET/SLET परीक्षा उत्तीर्ण किंवा संबंधित विद्याशाखेत पीएच.डी. पदवी असणे आवश्यक आहे.
- कॉलेज लायब्ररीयन (College Librarian):
- या पदासाठी उमेदवार लायब्ररी लायसन्स, इंफॉर्मेशन ऑफ सायन्स किंवा डॉक्युमेंटेशन सायन्स मध्ये कमीत कमी 50 टक्के गुणांसह पदवी उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.
- संग्रहालय संगणकीकरणाच्या ज्ञानासह उत्तम शैक्षणिक रेकॉर्ड आणि NET/SET/SLET उत्तीर्ण किंवा पीएचडी पदवी आवश्यक आहे.
- सहायक प्राध्यापक, शारीरिक शिक्षण / क्रीडा अधिकारी:
- शारीरिक शिक्षण आणि क्रीडा किंवा क्रीडा विज्ञानात किमान ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी.
- विद्यापीठ किंवा महाविद्यालयीन स्तरावर आंतर-विद्यापीठ/आंतर-महाविद्यालयीन स्पर्धा किंवा राज्य/राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत प्रतिनिधित्व केलेले असावे.
- NET/SET/SLET उत्तीर्ण किंवा संबंधित विषयात पीएच.डी. पदवी आणि विद्यापीठाचे शारीरिक सौष्ठव चाचणी निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.
तुम्ही येथे “दिल्ली पुलिस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) सब-इस्पेक्टर (SI) भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/ssc-cpo-recruitment-2026/
MAFSU Recruitment 2026 : वेतन श्रेणी
| पदाचे नाव | वेतन श्रेणी (Pay Scale & Level) |
| सहायक प्राध्यापक आणि समतुल्य पदे (Assistant Professor & equivalent) | लेव्हल-१०, वेतन श्रेणी: ₹ ५७,७०० – १,८२,४०० |
| कॉलेज लायब्ररीयन (College Librarian) | लेव्हल-१०, वेतन श्रेणी: ₹ ५७,७०० – १,८२,४०० |
| सहायक प्राध्यापक, शारीरिक शिक्षण / क्रीडा अधिकारी (Physical Education / Sports Officer) | लेव्हल-१०, वेतन श्रेणी: ₹ ५७,७०० – १,८२,४०० |
MAFSU Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents
महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ (MAFSU) भरती २०२६ या भरतीच्या ऑनलाईन अर्ज करत असताना खालील कागदपत्र आवश्यक आहे.
- पदवी आणि पदव्युत्तर पदवीची गुणपत्रिका (Mark Sheets) आणि प्रमाणपत्रे असणे अनिवार्य आहे.
- राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) किंवा SET/SLET उत्तीर्ण असल्याबाबतचे प्रमाणपत्र, अथवा संबंधित विषयातील पीएच.डी. (Ph.D.) पदवी प्रमाणपत्र.
- वयाचा पुरावा पाहण्यासाठी जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला असणे आवश्यक आहे.
- अधिवास पुरावा (Domicile Certificate)
- जाती व आरक्षण प्रमाणपत्र (Caste Certificate)
- जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate)
- नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रमाणपत्र
- दिव्यांग (Divyang) प्रमाणपत्र
- क्रीडा (Sports) प्रमाणपत्र
- अनाथ (Orphan) प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
MAFSU Recruitment 2026 : वयोमर्यादा – Age limit
| प्रवर्ग (Category) | कमाल वयोमर्यादा (Maximum Age) |
| खुला प्रवर्ग (Unreserved) | ३८ वर्षे |
| मागासवर्गीय (SC/ST/VJ/NT/SBC/OBC/SEBC) / EWS | ४३ वर्षे |
| अनाथ / क्रीडा व्यक्ती (Orphan / Sports person) | ४३ वर्षे |
| दिव्यांग (Divyang) | ४५ वर्षे |
| माजी सैनिक (Ex-Servicemen) – खुला प्रवर्ग | ३८ वर्षे + सैन्यातील सेवा + ३ वर्षे |
MAFSU Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply
महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ (MAFSU) भरती २०२६ या भरतीची अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे देण्यात आली आहे.
- सर्वप्रथम उमेदवारांनी विद्यापीठाच्या अधिक स्थळाला भेट द्या.
- जाहिरात मधील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा.
- अर्जुन हा फक्त ऑनलाईन पद्धतीने केलेला स्वीकारण्यात येणार आहे इतर कोणत्याही माध्यमातून पाठवलेला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
- संकेत स्थळावर केल्यानंतर नोंदणी करण्यासाठी तुमची वैयक्तिक माहिती भरा.
- नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल त्याचा वापर करून तुम्ही लॉगिन करून घ्या.
- अर्जामध्ये सर्व वैयक्तिक माहिती, शैक्षणिक अहर्ता आणि इतर आवश्यक माहिती अचूक आणि काळजीपूर्वक भरा.
- नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्र, अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी योग्य साईज मध्ये अपलोड करा.
- मी मराठी ऑनलाईन एक्झाम मधून स्कोर कार्ड विभागांमध्ये आपल्या मागील कामगार नुसार अचूक माहिती भरून स्व-आकलन गुण (Self-Assessment Score) तपासावेत.
- अर्जित सिंग कोण फक्त ऑनलाईन स्वीकारले जाणार आहे त्यासाठी खुला प्रवर्गासाठी अर्ज शुल्क हे ₹1500 आणि राखी प्रवर्गासाठी ₹1000 असणार आहे.
- अर्थ यशस्वीरीत्या सुरू झाल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट काढून केव्हा आणि सोबतच अर्थ शुल्क भरल्याची पावती जतन करून ठेवा.
| Official website | येथे क्लिक करा |
| Online apply | येथे क्लिक करा |
| Notification PDF | येथे क्लिक करा |
MAFSU भरती 2026 – FAQ
प्रश्न 1: MAFSU भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
उत्तर: महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ (MAFSU) भरती 2026 मध्ये एकूण 193 पदे आहेत.
प्रश्न 2: MAFSU भरती 2026 साठी अर्ज कसा करायचा?
उत्तर: पात्र उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीत दिलेल्या सूचनांनुसार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
प्रश्न 3: MAFSU भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. उमेदवारांनी संबंधित पदाची अधिकृत जाहिरात तपासावी.
प्रश्न 4: MAFSU भरती 2026 मध्ये कोणकोणती पदे आहेत?
उत्तर: भरतीमध्ये विविध प्रशासकीय, तांत्रिक व इतर पदांचा समावेश आहे. पदनिहाय माहिती अधिकृत जाहिरातीत दिलेली असते.
प्रश्न 5: MAFSU भरतीची निवड प्रक्रिया काय आहे?
उत्तर: पदानुसार लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी/मुलाखत किंवा इतर निवड पद्धती लागू होऊ शकतात.
प्रश्न 6: MAFSU भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
उत्तर: अंतिम तारीख पदाच्या अधिकृत भरती जाहिरातीनुसार निश्चित केली जाते. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात तपासणे आवश्यक आहे.
प्रश्न 7: MAFSU भरतीची अधिकृत वेबसाइट कोणती आहे?
उत्तर: महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठाची अधिकृत वेबसाइट MAFSU आहे. अधिकृत वेबसाइटवर भरतीसंबंधी सूचना पाहता येतात.

महत्त्वाची सूचना : या वेबसाइटवर MAFSU भरती 2026 संदर्भातील माहिती उमेदवारांच्या माहितीसाठी देण्यात आली आहे. पदांची संख्या, शैक्षणिक पात्रता, अर्जाची तारीख, शुल्क, निवड प्रक्रिया आणि इतर अटींमध्ये अधिकृत सूचनेनुसार बदल होऊ शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठाची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अधिकृत वेबसाइटवरील माहितीची खात्री करावी. चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानीसाठी वेबसाइट जबाबदार राहणार नाही.