MahaPareshan Pimpri-Chinchwad Apprenticeship Recruitment 2026 : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. मित्रांनो महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (महापरेषण) ही राज्यांमधील वीज पारेषण क्षेत्रांमधील एक अग्रगण्य आणि अत्यंत महत्त्वाची कंपनी म्हणून ओळखली जाते.
ही कंपनी वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि तांत्रिक चाळे बळकट करण्यासाठी सातत्याने काम करत असते. याच उद्देशाची पूर्ती करण्यासाठी, पिंपरी-चिंचवड येथील बहुदा संवसु विभागाअंतर्गत शिका व उमेदवारी कायदा 1961 नुसार एक नवीन भरती प्रक्रिया राबविण्यात आली असून, सन 2026 27 या कालावधीसाठी ‘वीजतंत्री’ (Electrician) या ट्रेडमध्ये शिकवू उमेदवारांच्या एकूण 23 जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.
या माध्यमातून पात्र व होतकरू तरुणांना महावितरण आणि महापरेषणसारख्या नामांकित क्षेत्रांमध्ये तांत्रिक प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया तंत्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी व्यावसायिक कौशल्य वाढवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. या भरतीचा अर्ज हा शासनाच्या अधिकृत पोर्टल द्वारे ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांकडून भरून घेण्यात येणार आहे. उमेदवारांच्या गुणांच्या आधारे आणि पारदर्शक कागदपत्राचे नवीन प्रक्रियेमध्ये उमेदवारांची निवड करण्यात येईल. या भरतीबद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी तुम्ही खालील संपूर्ण लेख वाचू शकता.
- महत्त्वाच्या तारखा :
- ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत: १६ ऑक्टोबर २०२६ (या तारखेनंतर आलेल्या ऑनलाईन अर्जांचा विचार केला जाणार नाही.)
- कागदपत्रे छाननी व मुलाखत दिनांक: शनिवार, २४ ऑक्टोबर २०२६ (सकाळी ११.०० ते संध्याकाळी ०४.०० वाजेपर्यंत)
MahaPareshan Pimpri-Chinchwad Apprenticeship Recruitment 2026 : पदाची माहिती
| पदाचे नाव (ट्रेड) | एकूण जागा |
| वीजतंत्री (Electrician) | 23 |
शैक्षणिक पात्रता – Educational Qualification
महापरेषण पिंपरी-चिंचवड भरती 2026 या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे :
- उमेदवार हा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
- राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक शिक्षण संस्थेमधून (ITI) ‘वीजतंत्री’ (Electrician) या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे अनिवार्य ठरते.
MahaPareshan Pimpri-Chinchwad Apprenticeship Recruitment 2026 : वयोमर्यादा – Age limit
| प्रवर्ग | वयोमर्यादा |
| खुला / सामान्य प्रवर्ग | १८ ते ३० वर्षे |
| मागासवर्गीय प्रवर्ग | १८ ते ३५ वर्षे (५ वर्षे शिथिलक्षम) |
MahaPareshan Pimpri-Chinchwad Apprenticeship Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Docuements
महापरेषण पिंपरी-चिंचवड भरती 2026 या भरतीचा अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी खालील प्माणे आहे :
- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत (१० वी ) किंमतच सम परीक्षा उत्तीर्ण असलेले गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र.
- राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) मान्यताप्राप्त औद्योगिक शिक्षण संस्थेमधून (ITI) ‘वीजतंत्री’ या ट्रेडमधील चारही सेमिस्टरची उत्तीर्ण गुणपत्रके व प्रमाणपत्र.
- ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड असणे बंधनकारक आहे.
- मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी वैध जातीचे प्रमाणपत्र.
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (EWS) उमेदवारांसाठी संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले EWS प्रमाणपत्र.
तुम्ही येथे “GMC चंद्रपूर भरती 2026“ या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/gmc-chandrapur-recruitment-2026/
MahaPareshan Pimpri-Chinchwad Apprenticeship Recruitment 2026 : निवड प्रक्रिया व इतर नियम:
महापरेषण पिंपरी-चिंचवड भरती 2026 या भरतीसाठी असणारी निवड प्रक्रिया व खालीलप्रमाणे आहेत :
- आरक्षण: नियमानुसार लागू राहील. राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) तसे प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.
- निवड पद्धत: उमेदवारांच्या SSC आणि ITI च्या गुणांच्या टक्केवारीनुसार तसेच सामाजिक आरक्षणाधीन राहून कागदपत्ररांची प्रत्यक्ष छाननी केली जाईल व त्यानुसार अंतिम निवड केली जाईल. अंतिम निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.
- इतर अटी:
- शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेत राजकीय किंवा अन्य अधिकाऱ्यांचा दबाव आणल्यास संबंधित उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल.
- शिकाऊ उमेदवारीचा प्रशिक्षण काळ पूर्ण झाल्यामुळे कंपनीमध्ये नोकरी मिळण्याचा कोणताही अधिकार प्राप्त होत नाही.
- पदसंख्या कमी-जास्त करण्याचे किंवा भरती प्रक्रियेबाबतचे सर्व अधिकार व्यवस्थापनाकडे राखीव आहेत.
MahaPareshan Pimpri-Chinchwad Apprenticeship Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply
महापरेषण पिंपरी-चिंचवड भरती 2026 या भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे आहे :
- पात्र व इच्छुक उमेदवारांनी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे.
- अर्ज करताना महापरेषण, अऊदा संवसु विभाग, पिंपरी-चिंचवडचा आस्थापना रजिस्ट्रेशन क्रमांक E10202700049 नमूद करणे आवश्यक आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 ऑक्टोंबर 2026 अशी आहे.
- अर्जामध्ये उमेदवाराची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक माहिती अचूक व काळजीपूर्वक भरावी.
- ऑनलाइन अर्ज भरताना शैक्षणिक प्रमाणपत्र आणि गुणपत्रक सोबतच आयटीआय गुणपत्रके वरून आधार कार्ड वर नमूद केलेल्या नावाची तंतोतंत जुळत असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा.
- नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे योग्य साईज मध्ये स्थान करून अपलोड करावीत.
- अर्ज शुल्क असेल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरून, शुल्क भरल्याची पावती जतन करून ठेवा.
- अर्ज यशस्वीरीत्या असेल तर झाल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट काढून ठेवा.
| Official website (अधिकृत संकेतस्थळ) | येथे क्लिक करा |
| Online Registration (ऑनलाइन अर्ज) | येथे क्लिक करा |
| Notification PDF (अधिकृत जाहिरात पीडीएफ) | येथे क्लिक करा |
MahaPareshan Pimpri-Chinchwad Apprenticeship Recruitment 2026 : महापरेषण पिंपरी-चिंचवड भरती 2026 – FAQ
प्रश्न 1: महापरेषण पिंपरी-चिंचवड भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
उत्तर: या भरतीमध्ये एकूण 23 रिक्त जागा आहेत.
प्रश्न 2: महापरेषण पिंपरी-चिंचवड भरती 2026 साठी अर्ज कसा करायचा?
उत्तर: पात्र उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीत दिलेल्या सूचनेनुसार ऑनलाइन/ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा.
प्रश्न 3: या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असू शकते. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत भरती जाहिरात तपासावी.
प्रश्न 4: महापरेषण पिंपरी-चिंचवड भरती 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: पदानुसार वयोमर्यादा वेगवेगळी असू शकते. अधिकृत जाहिरातीमध्ये दिलेली वयोमर्यादा ग्राह्य राहील.
प्रश्न 5: या भरतीची निवड प्रक्रिया काय आहे?
उत्तर: पदानुसार निवड प्रक्रिया बदलू शकते. उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीत दिलेली निवड प्रक्रिया पाहावी.
प्रश्न 6: अर्जाची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: अर्जाची अंतिम तारीख अधिकृत भरती जाहिरातीनुसार निश्चित केली जाते. अर्ज करण्यापूर्वी अंतिम तारीख नक्की तपासा.
प्रश्न 7: महापरेषण पिंपरी-चिंचवड भरती 2026 ची अधिकृत जाहिरात कुठे मिळेल?
उत्तर: अधिकृत भरती जाहिरात संबंधित महापरेषणच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल.

महत्वाची सूचना / Disclaimer : ही माहिती उमेदवारांच्या माहितीसाठी देण्यात आली आहे. भरतीतील जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, शुल्क, निवड प्रक्रिया, अंतिम तारीख व इतर अटींमध्ये बदल होऊ शकतो. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी महापरेषणची अधिकृत भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचून अधिकृत संकेतस्थळावरून माहितीची खात्री करावी. चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी totalnaukri.com जबाबदार राहणार नाही.