JSPM Recruitment 2026 : शैक्षणिक क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी. पुणे व सांगली परिसरामधील नामांकित शैक्षणिक संस्था जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ (JSPM) आणि द शेतकरी शिक्षण मंडळ (TSSM) यांच्या वतीने विविध प्रशासकीय, शैक्षणिक, ऑडीट, टेक्निकल आणि इतर साहाय्यक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीच्या संस्थेच्या कात्रज, पुणे येथील कॉर्पोरेट कार्यालयासह विविध विभागांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.
या भरती प्रक्रियेमध्ये पुढील पदे समाविष्ट आहेत : जुनिअर/सिनिअर प्रशासक, पेरोल तज्ज्ञ, पीआरओ, सिनिअर अकाउंटंट, चार्टर्ड अकाउंटंट (CA), ऑडिट असिस्टंट, सिस्टम प्रशासक, ग्राफिक डिझायनर, व्हिडिओ एडिटर, सिव्हिल सुपरवायझर, हाउसकीपिंग सुपरवायझर, ड्रायव्हर आणि शिपाई. या भरतीसाठी उमेदवारांकडून जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसाच्या आत (28 ऑक्टोबर 2026) ऑनलाइन पद्धतीने आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करणे बंधनकारक ठरते. बीए भरती बद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी तुम्ही खाली संपूर्ण लेख वाचावा.
- महत्त्वाच्या तारखा :
- अर्जाची अंतिम मुदत: ही जाहिरात ज्या तारखेला प्रसिद्ध झाली आहे, त्या दिनांकपासून १५ दिवसांच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे.
JSPM Recruitment 2026 : पदाची माहिती
| अ. क्र. | पदाचे नाव | एकूण जागा |
| 1 | ज्युनिअर / सिनिअर प्रशासक आणि पेरोल स्पेशालिस्ट (Jr/Sr. Administrator & Payroll Specialist) | 10 |
| 2 | पीआरओ (Public Relation Officer – PRO) | 10 |
| 3 | सोशल मीडिया मॅनेजर (Social Media Manager) | 02 |
| 4 | सिनिअर अकाउंटंट (Senior Accountant) | 10 |
| 5 | चार्टर्ड अकाउंटंट (Chartered Accountant – CA) | 03 |
| 6 | ऑडीट असिस्टंट (Audit Assistant) | 20 |
| 7 | सिस्टम अॅडमिनिस्ट्रेटर (System Administrator) | 03 |
| 8 | ग्राफिक डिझायनर (Graphic Designer) | 02 |
| 9 | व्हिडिओ एडिटर (Video Editor) | 02 |
| 10 | सिव्हिल सुपरवायझर (Civil Supervisor) | 03 |
| 11 | हाउसकीपिंग आणि मेंटेनन्स सुपरवायझर (House Keeping & Maintenance Supervisor) | 10 |
| 12 | ड्रायव्हर (Driver – LMV / HMV) | 15 |
| 13 | शिपाई (Peon) | 10 |
| एकूण | एकूण पदसंख्या | 90 |
JSPM Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification
जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ पुणे भरती 2026 या भरतीचे विविध पदांसाठी असणारे शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे :
- जुनिअर/सिनिअर प्रशासक आणि पेरोल स्पेशालिस्ट (Jr/Sr. Administrator & Payroll Specialist): या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठांमधील एमबीए (MBA) / मानवी संसाधन व्यवस्थापन (HRM) मधील पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा किंवा समतुल्य पात्रता असणे आवश्यक आहे. कोणत्याही शाखेची पदवी आणि संबंधित या चार अनुभव असलेला उमेदवारांचाही विचार करण्यात येईल.
- पीआरओ (Public Relation Officer): या पदासाठी कोणतेही पदवी; सोबतच जनसंपर्क, पत्रकारिता किंवा मास कम्युनिकेशन ला प्राधान्य दिले जाऊ शकते.
- सोशल मीडिया मॅनेजर (Social Media Manager): कोणतीही पदवी. डिजिटल मार्केटिंग सोशल मीडिया मॅनेजमेंट किंवा मास कम्युनिकेशन ला प्राधान्य देण्यात.
- सिनिअर अकाउंटंट (Senior Accountant) : मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून कमीत कमी 50% गुणांसह बीकॉम किंवा एम कॉम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- चार्टर्ड अकाउंटंट (Chartered Accountant): आयसीआय आयसीएआय (ICAI) ची वैध सदस्यता असलेले सीए (CA).
- ऑडिट असिस्टंट (Audit Assistant): या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून विकून किंवा एमकॉम आणि समर्थन जे पात्रता असणे आवश्यक ठरते.
- सिस्टम अॅडमिनिस्ट्रेटर (System Administrator): कॉम्प्युटर इंजीनियरिंग मधील डिप्लोमा किंवा बीई पूर्ण असावे लागते.
- ग्राफिक डिझायनर (Graphic Designer): या पदासाठी कोरेल ड्रॉ (CorelDRAW), अडोबी फोटशॉप आणि इलस्ट्रेटरमधील प्राविण्यास प्राधान्य.
- व्हिडिओ एडिटर (Video Editor): या पदासाठी व्हिडिओ एडिटिंग, फिल्म मेकिंग किंवा मल्टिमिडिया; अडोबी प्रिमीयर प्रो, आफ्टर इफेक्ट्स किंवा तत्सम एडिटिंग सॉफ्टवेअरला प्राधान्य देण्यात येईल.
- सिव्हिल सुपरवायझर (Civil Supervisor): या पदासाठी बीई सिव्हिल किंवा एमई सिव्हील(BE Civil / ME Civil).
- हाउसकीपिंग आणि मेंटेनन्स सुपरवायझर (House Keeping & Maintenance Supervisor): तांत्रिक किंवा व्यावसायिक शाळेतून डिप्लोमा किंवा कोणतीही पदवी (विशेष प्राधान्य).
- ड्रायव्हर (Driver): आरटीओ (RTO) बॅजसह वैध एलएमव्ही/एचएमव्ही (LMV/HMV) ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक.
- शिपाई (Peon): १० वी किंवा १२ वी उत्तीर्ण. स्थानिक भाषा आणि साधी इंग्रजी किंवा हिंदी भाषा वाचता व समजता येणे आवश्यक असते.
तुम्ही येथे “उत्तर पश्चिम रेल्वे अप्रेंटिस भरती 2026“ या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/north-western-railway-recruitment-2026/
JSPM Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents
जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ पुणे भरती 2026 या भरतीतील विविध पदांचा अर्ज करण्यासाठी खालील आवश्यक कागदपत्रांची यादी देण्यात आली आहे :
- शैक्षणिक वर्षातील सर्व वर्षाचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
- जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
- अनुभव प्रमाणपत्र (Experience Certificate)
- दोन पासपोर्ट साईझचे रंगीत फोटो (Two Passport size color photographs)
JSPM Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply
जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ पुणे भरती 2026 या भरतीची अर्ज प्रक्रिया ही खालील प्रमाण आहे :
- सर्वप्रथम पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरतीच्या अधिकृत संकेत स्थळाला जाऊन विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज डाउनलोड करणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जा सोबत प्रमाणपत्रांच्या साक्षांची छाया प्रती जोडणे बंधनकारक ठरते; ज्यामध्ये पासिंग सर्टिफिकेट म्हणजे शैक्षणिक प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र आणि दोन पासपोर्ट साईज चे फोटो असणे आवश्यक असतील.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसाच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता : जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ (कॉर्पोरेट ऑफिस)
- “सावंत कॉर्नर”, सर्व्हे नं. ८४/२ई/१/५, कात्रज, पुणे – ४११०४६
| Official website (अधिकृत संकेतस्थळ) | येथे क्लिक करा |
| Notification PDF (अधिकृत जाहिरात पीडीएफ) | येथे क्लिक करा |
JSPM Recruitment 2026 : जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ, पुणे भरती 2026 – FAQ
- जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ, पुणे भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
या भरतीअंतर्गत एकूण 90 जागा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. - जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ भरती 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असू शकते. उमेदवारांनी अधिकृत भरती जाहिरात तपासावी. - या भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
अर्ज करण्याची पद्धत आणि अर्जाचा नमुना जाणून घेण्यासाठी अधिकृत जाहिरात वाचावी. त्यामध्ये दिलेल्या सूचनांनुसार अर्ज करावा. - जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
वयोमर्यादा संबंधित पदाच्या पात्रतेनुसार आणि भरतीच्या अधिकृत नियमांनुसार निश्चित केली जाईल. - या भरतीसाठी निवड प्रक्रिया कशी असेल?
निवड प्रक्रिया पदानुसार मुलाखत, शैक्षणिक पात्रता किंवा इतर निकषांवर आधारित असू शकते. अचूक माहितीसाठी अधिकृत जाहिरात तपासावी. - जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ भरती 2026 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
अर्जाची अंतिम तारीख अधिकृत भरती जाहिरातीत तपासावी. - या भरतीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
साधारणपणे शैक्षणिक प्रमाणपत्रे, गुणपत्रिका, आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि लागू असल्यास जात प्रमाणपत्र आवश्यक असू शकते. - जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ भरती 2026 ची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
भरतीसंबंधी अधिकृत माहिती, पदांचा तपशील आणि अर्ज प्रक्रियेसाठी संबंधित संस्थेची अधिकृत वेबसाइट किंवा भरती जाहिरात तपासावी.

Disclaimer (अस्वीकरण) : जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ, पुणे भरती 2026 संदर्भातील ही माहिती उमेदवारांच्या माहितीसाठी देण्यात आली आहे. भरतीतील एकूण जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया आणि अर्जाची अंतिम तारीख यामध्ये बदल होऊ शकतो. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित संस्थेची अधिकृत भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरातीतील माहिती अंतिम मानावी. या लेखातील माहितीमध्ये काही त्रुटी किंवा बदल आढळल्यास त्यासाठी Total Naukri जबाबदार राहणार नाही.