अंगणवाडी सेविका (Anganwadi Worker 2026) पात्रता, वयोमर्यादा, पगार, निवड प्रक्रिया आणि संपूर्ण मार्गदर्शन | Best मार्गदर्शक

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

अंगणवाडी सेविका (Anganwadi Worker 2026) बालकांचे पाया मजबूत करण्याचे काम करतात. देशाचा विकास बालकांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर अवलंबून असतो, यात सर्वात जास्त भूमिका म्हणजे अंगणवाडी सेविका यांची असते. अंगणवाडी सेविका ही एक फक्त कर्मचारी नसून शासन आणि सामान्य नागरिक जनता यांच्यामधील दुवा आहे. अंगणवाडी सेविका गावातील किंवा स्थानिक परिसरातील महिलांचे आरोग्य, लहान मुलांचे पूर्व प्राथमिक शिक्षण असे महत्त्वपूर्ण काम अंगणवाडी सेविका करत असते. लहान मुलांनाप्राथमिक शिक्षण देणे आणि महिलांच्या आरोग्याची सुरक्षितता घेणे हे चांगलं काम आहे, यामुळे महिला अंगणवाडी सेविका भरती ची वाट पाहत असतात.

अंगणवाडी सेविका कसे म्हणायचे?, यासाठी पात्रता काय?, अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा अशा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला खालील माहितीमध्ये मिळवून जातील. महिलांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.

अंगणवाडी सेविकेची (Anganwadi Worker 2026) मुख्य कामे:

  • पूर्वप्राथमिक शिक्षण : लहान मुलांचे प्राथमिक शिक्षण म्हणजेच ३ ते ६ वर्षातील मुलांचे प्राथमिक शिक्षण हे अंगणवाडी सेविका घेत असते, एवढेच नव्हे तर लहान मुलांना शिक्षणाची ओढ लावण्यात सर्वात महत्त्वाचे योगदान म्हणजे अंगणवाडी सेविकांचे असते.
  • पोषण आहार: लहान मुले, गर्भवती महिला आणि स्तनदा महिला यांच्याकडील लक्षणे म्हणजेच यांना कुपोषणमुक्त करणे शासनाकडून मिळणाऱ्या पोषणाच्या आधारे करणे.
  • आरोग्य तपासणी व लसीकरण: लहान मुलांचे आणि गर्भवती महिलेचे लसीकरण मिळवळ करणे. आणि गावातील आरोग्य केंद्राच्या मदतीने लहान मुलाचे वजन आणि त्यांच्या आरोग्याची नोंदणी करून ठेवणे.
  • शासकीय योजनांची माहिती: सरकारद्वारे नवीन योजनेची माहिती स्थानिक नागरिकांपर्यंत पोहोचवणे.
  • गृहभेट (Home Visit): ग्रामीण भागातील नवजात बालकांच्या मातांना भेटून त्यांच्या आरोग्याची चौकशी आणि आहाराची चौकशी करून त्यांना आरोग्यासाठी योग्य मार्गदर्शन करणे.

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

अंगणवाडी सेविका (Anganwadi Worker 2026) “होण्यासाठी खालील शैक्षणिक पात्रता आणि खालील प्रमाणे दिलेले नियम मान्य असावी लागतात:

  • महिला उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून १२ वी उत्तीर्ण केलेली असणे अनिवार्य आहे.
  • काही ठिकाणी उमेदवारांची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी झालेली असेल तर त्यांना निवड प्रक्रियेत अधिक गुण किंवा प्राधान्य दिले जाऊ शकते.
  • उमेदवार ज्या अंगणवाडी केंद्रासाठी अर्ज करणार आहे, तो उमेदवार त्या गावचा किंवा प्रभाभागाचा असणे अनिवार्य आहे.
  • उमेदवाराकडे MS-CIT किंवा संगणक प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.

वयोमर्यादा (Age limit)

  • १८ वर्षे पूर्ण असावी लागतात.
  • ३८ ते ४० वर्षापर्यंत अर्ज करू शकतात (General/Open Category)
  • मागासवर्गीय उमेदवार (SC / ST / OBC): ४३ ते ४५ वर्षांपर्यंत अर्ज करू शकतात
  • जर एखादी महिला अगोदरच अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करत असेल आणि आता सेविकानासाठी अर्ज करायचा असेल तर त्यांना वयोमर्यादित विशेष प्राधान्य दिले जाते‌. नियमानुसार ४५ ते ५० वर्षांपर्यंत असू शकते

आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

अंगणवाडी सेविका (Anganwadi Worker 2026) ” म्हणून काम करायचे असेल तर खालील कागदपत्रे उमेदवाराकडे असणे अनिवार्य आहे.

  • १२ वी उत्तीर्ण प्रमाणपत्र/गुणपत्रिका
  • पदवी किंवा पदव्युत्तर झाले असेल तर गुणपत्रिका
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट – ओळख पटवण्यासाठी.
  • ​रहिवासी दाखला (Domicile Certificate)
  • जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
  • नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (Income Certificate)
  • संगणक प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
  • विवाह नोंदणी प्रमाणपत्र (Marriage Certificate)
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर (चालू असलेला)

अर्ज प्रक्रिया (How to Apply)

अंगणवाडी सेविका (Anganwadi Worker 2026) या भरतीचा अर्ज हा दोन्ही पद्धतीने भरता येतो ऑनलाइन आणि ऑफलाइन. अर्ज प्रक्रिया जाणून घेण्यासाठी खालील माहिती वाचा.

ऑनलाईन पद्धत (Online)

  • सर्वप्रथम ‌ महिला व बालविकास विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या rdd.maharashtra.gov.in
  • यानंतर वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि पत्ता हा अचूक भरावा.
  • त्यानंतर सांगितलेली आवश्यकता कागदपत्रे स्कॅन करून योग्य ते साईजमध्ये अपलोड करावीत.

ऑफलाईन पद्धत (Offline)

  • महिला व बालविकास विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिराती सोबतच अर्ज नमुना दिला जातो, तो डाऊनलोड करून घ्या
  • अर्जातील सर्व माहिती अचूक भरा.
  • अर्जासोबत सांगितलेली आवश्यकता कागदपत्रे त्याची छायाप्रत काढून अर्जा सोबत जोडा.
  • हा अर्ज ठरवून दिलेल्या पत्त्यावर जमा करा.

टीप: अर्जातील कोणतीही माहिती अपूर्ण असल्यास किंवा कागदपत्रे जोडलेली चुकीची किंवा त्यातील माहिती चुकीची असल्यास अर्ज स्वीकारला जात नाही. जाहिरातीत दिलेल्या तारखेपूर्वी अर्ज जमा करा.

परीक्षा घेण्यात आली तर विचारले जाणारे प्रश्न

अभ्यासक्रम (Syllabus)

  • योजनांवर आधारित ICDS योजनेची सुरुवात कधी झाली., आरोग्य व पोषण, लसीकरण
  • सामान्य ज्ञान (General Knowledge) : स्थानिक माहिती, भूगोल व इतिहास, आरोग्य विज्ञान
  • मराठी भाषा (Marathi Language) : व्याकरण (समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, लिंग बदला, वचन बदला)
  • वाक्यप्रचार (प्रसिद्ध मराठी म्हणी आणि वाक्प्रचारांचा अर्थ स्पष्ट करणे)
  • शुद्धलेखन (दिलेल्या पर्यायांतून शुद्ध शब्द ओळखणे)
  • अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी (Maths & Reasoning) : अंकगणित (बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, टक्केवारी (Percentage) आणि सरासरी (Average) काढणे)
  • बुद्धिमत्ता (संख्या मालिका पूर्ण करणे, विसंगत घटक ओळखणे, नातेसंबंध (Blood Relations) किंवा दिशांवर आधारित सोपे)

अंगणवाडी सेविकेचा (Anganwadi Worker 2026) पगार

पदअंदाजे मासिक मानधन
अंगणवाडी सेविका (Anganwadi Worker)१०,००० ते १३,००० प्रतिमहिना
अंगणवाडी मदतनीस (Anganwadi Helper)५,५०० ते ७,००० प्रतिमहिना
मिनी अंगणवाडी सेविका (Mini Anganwadi Worker)७,५०० ते ९,००० प्रतिमहिना

अंगणवाडी सेविकेचे (Anganwadi Worker 2026) फायदे

1.सन्मानाचा आणि सुरक्षित रोजगार

  • अंगणवाडी सेविका महिलांना स्वतःच्या गावात त्याच परिसरात काम करण्याची संधी मिळते यामुळे ससा खर्च आणि त्रास होत नाही आणि सोबतच घर सांभाळणे ही सोपे जाते.
  • अंगणवाडी सेविकेचे काम अत्यंत सोपे आणि सोयीस्कर मानले जाते कारण महिलांना फक्त स्थानिक महिला आणि लहान मुलं संबंधित असलेले कमी करायचे असतात.

​2. समाजसेवेची सुवर्णसंधी

  • लहान मुलांचे भवितव्य घडवायची संधी महिलांना मिळते आणि लहान मुलांचे प्राथमिक शिक्षण हे अंगणवाडी सेविका महिला देते.
  • ग्रामीण भागातील किंवा परिसरातील गरीब गरज कुटुंबांतील मुलांना आणि गर्भवती महिलांना योग्य पोषण आहार मिळवून देणे आणि कुपोषण मुक्त करणे.

3.आर्थिक स्थैर्य आणि भत्ते

  • अंगणवाडी सेविका महिला हा स्वतः कमवू शकतात कारण दर महा निश्चित मानधन हे महिन्याच्या खात्यात जमा होते. त्यामुळे महिला स्वतःचा खर्च स्वतः आणि सोबतच घरचा खर्च हे भागवू शकतात
  • शासनाकडून नवीन लागू होणारे विमा योजना यासारखे शासकीय विमा योजनेचे संरक्षण करणे अंगणवाडी सेविका या महिलांकडे असते.

4.भविष्यात बढतीची (Promotion) संधी

  • जर एखादी महिला अगोदरच अंगणवाडी मध्ये मदतनीस म्हणून काम करत असेल तर त्या अनुभवाच्या जोरावर त्या महिला सेविका पदावर बढती मिळते.
  • अंगणवाडी सेविका म्हणून आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत यांच्यासोबत काम करायला मिळते हे काम केल्यामुळे प्रशासकीय कामाचा अनुभव ही मिळतो.
  • अंगणवाडी सेविकेला गावात किंवा प्रभागात शासकीय योजनेचे प्रतिनिधित्व करत असल्यामुळे समाजात एक आदराचे स्थान निर्माण होते.
Anganwadi Worker 2026 feature image
अंगणवाडी सेविका भरती (Anganwadi Worker 2026) महिलांसाठी सुवर्णसंधी

महत्त्वाची सूचना (Disclaimer)

सध्या अंगणवाडी सेविका भरतीची कोणतीही नवीन अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. या लेखामधील माहिती ही मागील भरती प्रक्रिया, उपलब्ध नियम आणि विविध अधिकृत स्त्रोतांवरील माहितीनुसार मार्गदर्शनासाठी देण्यात आलेली आहे.

पात्रता, वयोमर्यादा, मानधन, निवड प्रक्रिया आणि इतर अटींमध्ये भविष्यात बदल होऊ शकतो. त्यामुळे कोणतीही भरती जाहीर झाल्यानंतर संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.विविध माध्यमांमधून मिळणाऱ्या माहितीनुसार येत्या काही महिन्यांमध्ये रिक्त पदांनुसार अंगणवाडी सेविका भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भरतीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाल्यानंतर सविस्तर माहिती स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.

तुम्ही येथे वनरक्षक भरती 2026 पूर्ण माहिती पाहू शकता: https://totalnaukri.com/maharashtra-vanrakshak-bharati-2026/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!