Arogya Vibhag Bharti 2026 : आरोग्य विभागामध्ये मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. नागरिकांनाचे आरोग्य हे राज्यातील विकासामध्ये एक महत्वाची भूमिका बजावत असते. ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि वेळेवर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे हा कोणत्याही कल्याणकारी शासनाचा मुख्य उद्देश असतो
प्रत्येक वेळी. याच दिशेला बळ देण्यासाठी, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्य मधील आरोग्य यंत्रणा अधिक मजबूत आणि सक्षम करण्यासाठी एका विशाल मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागात गट क आणि गट ड प्रवर्गातील 7,195 रिक्त पदे भरली जाणार असून, राज्यातील 269 नवीन आणि श्रेणी सुधारित रुग्णालयांसाठी 5,223 नवीन नियमित पदे निर्माण करण्यासही मान्यता मिळाली आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्य करू इच्छिणाऱ्या आणि सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या सुशिक्षित तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. यावरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील संपूर्ण लेख वाचावा.
- महत्त्वाचा तारखा :
- पॉइंट लिस्ट पडताळणी: १३ जुलै २०२६ रोजी ही प्राथमिक प्रक्रिया पार पडली आहे.
- ऑनलाइन अर्ज भरण्याची तारीख: अद्याप सुरू झालेली नाही. (सध्या ऑगस्ट २०२६ सुरू असून, शासनाकडून लवकरच याची घोषणा होण्याची शक्यता आहे.)
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: ऑनलाइन अर्ज सुरू झाल्यानंतर काही आठवड्यांनी शेवटची तारीख जाहीर केली जाईल.
- परीक्षा तारीख: अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आरोग्य विभागाकडून परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले जाईल.
Arogya Vibhag Bharti 2026 : पदांची आणि रिक्त जागांची विभागणी
| पदाचा गट | एकूण जागा |
| गट ‘क’ (Group C) | 5,307 |
| गट ‘ड’ (Group D) | 1,888 |
| एकूण | 7,195 |
Arogya Vibhag Bharti 2026: शैक्षणिक पात्रता – Educational Qualification
महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती 2026 या भरती मधील विविध पदांसाठी असणारे शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.
- वैद्यकीय अधिकारी किंवा तज्ज्ञ पदे : या पदासाठी उमेदवारांकडे एमबीबीएस (MBBS), एमडी (MD), एमएस (MS) किंवा इतर कोणतीही संबंधित वैद्यकीय पदवी असणे अनिवार्य असते.
- नर्स किंवा हेड नर्स पदे : या पदासाठी जीएनएम (GNM) किंवा बीएससी नर्सिंग (B.Sc Nursing) ही पात्रता असणे अनिवार्य आहे. सोबतच उमेदवाराची महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडे झालेली असावी लागते.
- तंत्रज्ञ पदे : या पदांसाठी संबंधित विषयामध्ये डिप्लोमा किंवा संबंधित प्रमाणपत्र कोर्स पूर्ण केलेला असणे महत्त्वाचे आहे.
- लिपिक किंवा टंकलेखक पदे : या पदासाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी 12 वी पर्यंत झालेले असणे अनिवार्य आहे. सोबतच, एमएससीआयटी (MS-CIT) प्रमाणपत्र आणि टायपिंग प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
- गट ‘ड’ पदे या पदासाठी किमान १० वी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सोबतच चालक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स असावेच लागते.
- या भरतीमध्ये विशेष सवलत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये ५% सवलत दिली जाते.
Arogya Vibhag Bharti 2026: आवश्यक कागदपत्रे – Required Documents
महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती २०२६ या भरतीया अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्राची यादी उमेदवारांकडे नसणे आवश्यक आहे.
- ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतीही एक.
- १० वी आणि १२ वीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र.
- संबंधित पदवी किंवा डिप्लोमाची गुणपत्रके आणि अंतिम पदवी प्रमाणपत्र
- एमएससीआयटी (MS-CIT) प्रमाणपत्र, टायपिंग प्रमाणपत्र किंवा संबंधित तांत्रिक क्षेत्रातील कौशल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- नर्स पदासाठी ‘महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल’ (Maharashtra Nursing Council) कडे नोंदणी असल्याचे वैध प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
- जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate)
- नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate)
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र (EWS Certificate)
- दिव्यांग प्रमाणपत्र (PwBD Certificate)
- अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
- पासपोर्ट साईझ फोटो आणि स्वाक्षरी
- चालक पदासाठी अर्ज असल्यास वैध ड्रायव्हिंग लायसन्स
Arogya Vibhag Bharti 2026: अर्ज प्रक्रिया – How to Apply
महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती २०२६ या भरतीची अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असते. याची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहेत.
- सर्वप्रथम या भरतीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- नवीन करण्यासाठी मुख्य पेजवर तुमची वैयक्तिक माहिती (नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी इ.) टाका.
- नोंदणी केल्यानंतर तुम्हाला ईमेल आयडी आणि पासवर्ड मेल त्याचा वापर करून लॉगिन करा.
- अर्जामध्ये विचारलेली सर्व शैक्षणिक, व्यक्तिगत आणि इतर माहिती अचूक आणि काळजीपूर्वक भरा
- पासपोर्ट साईझ फोटो, सही आणि आवश्यक असलेली प्रमाणपत्रे (शैक्षणिक, जात प्रमाणपत्र इ.) ठरवलेल्या आकारात स्कॅन करून अपलोड करावी लागतील.
- अर्ज शुल्क प्रवर्गानुसार असेल ते ऑनलाईन पद्धतीने भरून घ्या त्याशिवाय अर्ज संपूर्ण मानला जात नाही.
- अर्ज सबमिट करण्यापूर्वी अर्जा मधील सर्व माहिती अचूक कसल्याची खात्री करून अर्ज सबमिट करा.
- अर्ज सबमिट केल्यानंतर अर्लाचे प्रिंट आऊट काढून भविष्य साठी जतन करून ठेवा.
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
Arogya Vibhag Bharti 2026 : वयोमर्यादा – Age limit
| प्रवर्ग | वयोमर्यादा |
| सर्वसाधारण (General) प्रवर्ग | १८ ते ३८ वर्षे (अधिकृत जाहिरातीत अंतिम स्पष्टीकरण येईल) |
| इतर मागासवर्गीय (OBC) सर्वसाधारण | वयोमर्यादेत ३ वर्षे सवलत |
| अनुसूचित जाती / जमाती (SC/ST) सर्वसाधारण | वयोमर्यादेत ५ वर्षे सवलत |
| दिव्यांग (PwBD) | सर्वसाधारण सर्वसाधारण वयोमर्यादेत १० वर्षे सवलत |
वेतनश्रेणी
| पदाचा स्तर | वेतनश्रेणी (Pay Level / Salary Range) |
| वैद्यकीय अधिकारी (Medical Officer / Specialist) | ₹ ५६,१०० – ₹ २,०८,७०० |
| वर्ग-४ (परिचर, सफाईगार इ.) | ₹ १५,००० – ₹ ४७,६०० |
| वर्ग-३ (लिपिक, तंत्रज्ञ इ.) | ₹ १९,९०० – ₹ १,१२,४०० |
| नर्स (Nurse / Head Nurse) | ₹ ३५,४०० – ₹ १,२२,८०० |

तुम्ही येते असिस्टंट प्रोफेसर जळगाव भरती 2026 या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/assistant-professor-jalgaon-recruitment/