बँक ऑफ बडोदा भरती (Bank of Baroda Recruitment 2026) ही बँक भारतातील एक अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रतील बँक आहे. ही बँक प्रशिक्षण कार्यसंस्कृतीसाठी आणि वैविध्यपूर्ण करिअर संधीमुळे ओळखली जाते. प्रत्येक वर्षी या बँकेतर्फे विविध पदांसाठी (माहिती तंत्रज्ञान, वित्त, एमएसएमई बँकिंग आणि इतर तांत्रिक विभाग) भरती प्रक्रिया राबवली जाते. जे तर बँकिंग क्षेत्रामध्ये आपले करिअर घडवू इच्छित आहेत त्यांच्यासाठी बँक ऑफ बडोदा सुवर्णसंधी घेऊन आली आहे. पात्र उमेदवारांनी या बँकिंग क्षेत्रामध्ये भविष्य उज्वल करण्यासाठी आत्ताच अर्ज करा.
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
बँक ऑफ बरोडा भरती 2026 (Bank of Baroda Recruitment 2026) या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे दिली आहे.
- सामान्य श्रेणीतील पदे (Clerical/Officer Cadre) : कोणत्याही शाखेमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे आवश्यक आहे.
- काही पदांसाठी पदवी मध्ये किमान ६०% गुण असणे अनिवार्य असते.
- ऑपरेटिंग आणि वर्किंग नॉलेज उमेदवारांकडे असणे आवश्यक ठरते.
- स्पेशलिस्ट ऑफिसर (Specialist Officer – SO) : .ई. (B.E.)/बी.टेक (B.Tech) किंवा एम.सी.ए. (M.C.A.), Finance/Accounting, Agricultural/Law
- अतिरिक्त आवश्यक पात्रता
- स्पेशलिस्ट पदांसाठी संबंधित क्षेत्रातील कमीत कमी २ ते ५ वर्षाचा अनुभव असणे फायदेशीर ठरते.
- तुमच्या राज्यासाठी अर्ज करत आहात त्या राज्याची भाषा वाचता बोलता आणि लिहिता येणे अनिवार्य असते.
आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
बँक ऑफ बरोडा भरती 2026 (Bank of Baroda Recruitment 2026) या भरतीचा अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे दिली आहे.
- दहावी आणि बारावीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
- पदवी प्रमाणपत्र (Degree Certificate) मार्च आणि पदवीची मूळ प्रत असणे अनिवार्य असते.
- पोस्ट-ग्रॅज्युएशन (असेल तर)
- ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड (PAN Card)
- कामाचा अनुभव असलेले प्रमाणपत्र.
- सध्याच्या नोकरीचे पगार पत्र (Salary Slips)
- जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
- अपंगत्व प्रमाणपत्र (PWD Certificate)
- पासपोर्ट साईज फोटो
- स्वाक्षरी (Signature)
वयोमर्यादा (Age limit)
| पदाची श्रेणी | वयोमर्यादा |
| लिपिक (Clerical) | १८ वर्षे ते २८ वर्षे |
| प्रवेश स्तर अधिकारी (PO/SO) | २० वर्षे ते ३० वर्षे |
| व्यवस्थापन पदे (Management) | २१ वर्षे ते ३५ ते ४० वर्षे |
| प्रवर्ग (Category) | वयोमर्यादा सवलत |
| SC / ST | ५ वर्षे |
| OBC (Non-Creamy Layer) | ३ वर्षे |
| PWD (दिव्यांग) | १० वर्षे |
| माजी सैनिक (Ex-Servicemen) | नियमांनुसार अतिरिक्त सवलत |
अर्ज प्रक्रिया (How to Apply)
बँक ऑफ बरोडा भरती 2026 (Bank of Baroda Recruitment 2026) या भरतीचा अर्ज करण्यासाठी अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाइन आहे आणि याची सर्व माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
- सर्वात अगोदर तुम्ही या बँकेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या www.bankofbaroda.in
- यानंतर Current Opportunities या पर्यायवर क्लिक करा. तिथे तुम्हाला सध्या चालू असलेल्या भरतीच्या जाहिराती दिसतील. तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या जाहिरातीची लिंक उघडा.
- Apply Online या पर्यायवर क्लिक करा. आणि जर तुम्ही नवीन असाल तर New Registration निवडा व तुमची प्राथमिक माहिती म्हणजेच नाव, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरा व नोंदणी करून घ्या.
- नोंदणी केल्यानंतर तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल त्याचा वापर करून लॉगिन करून घ्या.
- लोगिन केल्यानंतर तुमची शैक्षणिक तपशील आणि कामाचा अनुभव, पत्ता इत्यादी काळजीपूर्वक भरून घ्या.
- नमूद केलेली सर्व कागदपत्रे योग्य साइज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
- यानंतर प्रवर्गानुसार अर्जाची शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरून घ्या आणि त्याची पावती जतन करून ठेवा.
- अर्जामध्ये भरलेली सर्व माहिती अचूक आहे याची खात्री करून घ्या आणि नंतर अर्ज सबमिट करून घ्या. कारण, एकदा अर्ज सबमिट केला यानंतर अर्जामध्ये भरलेली माहिती दुरुस्त करता येत नाही आणि माहिती मध्ये त्रुटी निघाल्यानंतर अर्ज रद्द होऊ शकतो.
टीप : अर्जामध्ये तुम्हाला तुमची चालू असलेली ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर देणे गरजेचे आहे कारण बँकेकडून येणारे अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील.
अभ्यासक्रम (Syllabus)
बँक ऑफ बरोडा भरती 2026 (Bank of Baroda Recruitment 2026) या भरतीसाठी अभ्यासक्रम खालील प्रमाणे पाहू शकता:
- तार्किक क्षमता (Reasoning Ability) : कोडी (Puzzles), बैठक व्यवस्था (Sitting Arrangement), दिशा ज्ञान (Direction Sense), रक्त संबंध (Blood Relations), कोडिंग-डिकोडिंग आणि तार्किक निष्कर्षावर आधारित प्रश्न विचारले जातात.
- संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude) : डेटा इंटरप्रिटेशन (DI), संख्या मालिका (Number Series), साधे व चक्रवाढ व्याज, नफा-तोटा, गुणोत्तर आणि प्रमाण, काळ-काम-वेग आणि सरासरी
- इंग्रजी भाषा (English Language) : व्याकरण (Grammar), शब्दसंग्रह (Vocabulary), वाचन आकलन (Reading Comprehension), वाक्य दुरुस्ती आणि परिच्छेद पूर्ण करणे (Cloze Test).
- सामान्य जागरूकता (General Awareness) : बँकिंग आणि आर्थिक घडामोडी, चालू घडामोडी (Current Affairs), सरकारी योजना, अर्थशास्त्र, आणि बँकेशी संबंधित जनरल नॉलेज
- व्यावसायिक ज्ञान (Professional Knowledge) : जर तुम्ही स्पेशलिस्ट ऑफिसर (SO) पदासाठी अर्ज करत असाल, तर तुमच्या संबंधित क्षेत्रातील (उदा. IT, कायदा, किंवा कृषी) तांत्रिक प्रश्न विचारले जातात.
टिप : या परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळवायचे असतील तर मागील सहा महिन्यातील बँकिंग क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या आणि RBI चे धोरण एकदा नजरेखालून घाला.
पदानुसार वेतन
| पदाची श्रेणी | मूळ वेतन श्रेणी (Pay Scale) |
| लिपिक (Clerical Staff) | २४,०५० – ६४,४८० |
| प्रवेश स्तर अधिकारी (Scale I – PO) | ४८,४८० – ८५,९२० |
| व्यवस्थापक (Scale II – Manager) | ६४,८२० – ९३,९६० |
| वरिष्ठ व्यवस्थापक (Scale III – Sr. Manager) | ८५,९२० – १,०५,२८० |
| मुख्य व्यवस्थापक (Scale IV – Chief Manager) | १,०२,३०० – १,२०,९४० |
| कार्यालयीन सहाय्यक (Peon/Subordinate) | १९,५०० – ३७,८१५ |

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : ही भरतीविषयक माहिती उमेदवारांच्या सोयीसाठी उपलब्ध अधिकृत अधिसूचना व इतर सार्वजनिक स्रोतांच्या आधारे तयार करण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची अंतिम तारीख, शुल्क, निवड प्रक्रिया आणि इतर सर्व अटींची खात्री संबंधित अधिकृत जाहिरात व अधिकृत वेबसाइटवरून करून घ्यावी. भरती प्रक्रियेत होणाऱ्या कोणत्याही बदलांसाठी किंवा नुकसानीसाठी Total Naukri जबाबदार राहणार नाही.
तुम्ही येथे “महाराष्ट्र आयोग सेवा भरती 2026” याची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/mpsc-group-c-recruitment-2026/