Bombay High Court Aurangabad Bench Recruitment 2026 : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘स्वयंपाकी’ पदांची भरती; उमेदवारांसाठी Best संधी

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Bombay High Court Aurangabad Bench Recruitment 2026 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी. मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद आस्थापनेवर स्वयंपाक या पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 18 रिक्त पदांवर भरती जाहीर करण्यात आली असून, 17 पदे यादीसाठी तर 4 पदे प्रतीक्षा यादीसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. या माती प्रक्रियेसाठी इच्छुक पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आली आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 5:00 पर्यंत राहील. सातव्या वेतन आयोगानुसार या पदासाठी मानधन हे एस-३ श्रेणी अंतर्गत १६,६०० ते ५२,४०० रुपये देण्यात येणार आहे.

या भरतीसाठी उमेदवाराकडे फक्त चौथी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. न्यायालय किंवा शासकीय सेवेत करिअर करू इच्छिणाऱ्या आणि पाककलेमध्ये प्राविण्य असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची ही एक उत्तम संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी आपले अर्ज फक्त स्पीड पोस्टाद्वारे निर्धारित पत्त्यावर पाठवणे अनिवार्य आहे. या भरती बद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी खालील संपूर्ण लेख वाचावा.

  • महत्त्वाच्या तारखा​ :
    • जाहिरात प्रसिद्ध झाल्याची तारीख: १७ ऑगस्ट २०२६
    • ​अर्ज करण्याची अंतिम तारीख: १० सप्टेंबर २०२६ (सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी)

Bombay High Court Aurangabad Bench Recruitment 2026 : पदाची माहिती

पदाचे नावएकूण रिक्त पदेकामाचे स्वरूप
स्वयंपाकी (Cook)18१. माननीय न्यायमूर्तींच्या निवासस्थानी तसेच न्यायालयीन इमारतीत सदर पदासाठी आवश्यक असणारी सर्व प्रकारची कामे करावी लागतील.
२. सर्व प्रकारचे शाकाहारी तसेच मांसाहारी खाद्यपदार्थ बनवणे आवश्यक आहे.

Bombay High Court Aurangabad Bench Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद स्वयंपाकी भरती 2026 या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.

  • कमीत कमी उमेदवाराचे शिक्षण चौथी पर्यंत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • मान्यताप्राप्त संस्थेचे “स्वयंपाक अभ्यासक्रम प्रमाणपत्र” (Cooking Course Certificate) असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.
  • उमेदवाराकडे स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान व त्यासंबंधीत अनुभव असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराला सर्व प्रकारचे शाकाहारी सोबतच मांसाहारी खाद्यपदार्थ बनवतात येणे बंधनकारक करते.
  • उमेदवाराला मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान अनिवार्य आहे, सोबतच लिहिता, वाचता आणि बोलता येणे आवश्यक आहे.

तुम्ही येते “बीड जिल्हा परिषद भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/beed-zilha-parishad-recruitment/

Bombay High Court Aurangabad Bench Recruitment 2026 : वयोमर्यादा- Age limit

प्रवर्गवयोमर्यादा
खुला प्रवर्ग (General)किमान १८ वर्षे आणि कमाल ३८ वर्षे
मागासवर्गीय (Reserved Categories)कमाल वयोमर्यादा ४३ वर्षे
न्यायालयीन किंवा शासकीय कर्मचारीवयाची अट लागू नाही (परंतु त्यांनी त्यांच्या कार्यालयामार्फत अर्ज करणे आवश्यक आहे)

Bombay High Court Aurangabad Bench Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद स्वयंपाकी भरती 2026 या भरतीसाठी अर्ज करताना खालील आवश्यक कागदपत्रांची यादी उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.

  • शैक्षणिक पात्रता (४थी, ७वी, १०वी, १२वी आणि पदवी) प्रमाणपत्रे व गुणपत्रिका असणे आवश्यक आहे.
  • वयाचा पुरावा पाहण्यासाठी जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला असणे बंधनकारक आहे.
  • उमेदवार दिव्यांग असेल तर दिव्यांग प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
  • अनुभव प्रमाणपत्र (Experience Certificate) – असल्यास
  • अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  • विवाहित महिला उमेदवारांचे नाव बदलले असल्यास त्याचे दस्तऐवजसेवायोजन कार्यालयात (Employment Exchange) नोंदणी केली असल्यास – नोंदणी प्रमाणपत्र त्याची झेरॉक्स
  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड
  • अर्जासोबत जोडायचे मूळ दाखले व कागदपत्रे:
    • जाहिरात प्रसिद्धीनंतरची तारीख असलेले, कोणत्याही दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र्य संपन्नतेविषयीचे दोन प्रमाणपत्र
    • लहान कुटुंबाबाबत प्रतिज्ञापन
    • उमेदवार शासकीय कर्मचारी असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याचे ना-हरकत प्रमाणपत्र
    • ​स्वतःचा पत्ता ठळक अक्षरांत लिहिलेले आणि ५ रुपयांचे पोस्टाचे तिकीट लावलेले कोरे पाकीट
    • ​पासपोर्ट आकाराचा स्वतःचा एक फोटो
    • उमेदवाराला बनवता येणाऱ्या खाद्यपदार्थांची यादी

Bombay High Court Aurangabad Bench Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद स्वयंपाकी भरती 2026 या भरतीचे अर्ज प्रक्रिया ही खालील प्रमाणे आहे:

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज करणे बंधनकारक आहे.
  • अर्ज केवळ स्पीड पोस्ट मार्फतच पाठवणे बंधनकारक आहे. इतर कुठल्याही प्रकारे पाठवलेला अर्ज तुम्हा उशिरा आलेला अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
  • अर्ज पाठवत असताना पाकीटावर “स्वयंपाकी या पदाकरिता अर्ज” असं मोठ्या आणि ठळक अक्षरांमध्ये लिहा.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता : ​प्रबंधक (प्रशासन),
  • मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद,
  • जालना रोड, छत्रपती संभाजीनगर – ४३१००९
  • अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख : 10 सप्टेंबर 2026 सायंकाळी 5:00 पर्यंत.
Notification PDFयेथे क्लिक करा
Official Websiteयेथे क्लिक करा

FAQ – मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ स्वयंपाकी भरती 2026

  1. मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ भरती 2026 मध्ये कोणत्या पदासाठी भरती आहे?
    उत्तर: या भरतीमध्ये स्वयंपाकी (Cook) पदासाठी भरती करण्यात येत आहे.
  2. स्वयंपाकी पदासाठी एकूण किती जागा आहेत?
    उत्तर: स्वयंपाकी पदाच्या एकूण 18 जागा आहेत.
  3. ही भरती कोणत्या ठिकाणी आहे?
    उत्तर: ही भरती मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासाठी आहे.
  4. स्वयंपाकी पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
    उत्तर: शैक्षणिक पात्रतेची सविस्तर माहिती अधिकृत जाहिरातीनुसार तपासावी.
  5. या भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
    उत्तर: अर्ज प्रक्रिया आणि अर्ज करण्याची पद्धत अधिकृत भरती जाहिरातीत दिल्याप्रमाणे असेल.
  6. स्वयंपाकी पदासाठी वयोमर्यादा किती आहे?
    उत्तर: वयोमर्यादा आणि आरक्षित प्रवर्गांसाठी सवलतीची माहिती अधिकृत जाहिरातीनुसार लागू असेल.
  7. स्वयंपाकी पदासाठी निवड प्रक्रिया काय आहे?
    उत्तर: निवड प्रक्रिया उच्च न्यायालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत जाहिरातीनुसार केली जाईल.
  8. या पदासाठी अर्ज शुल्क किती आहे?
    उत्तर: अर्ज शुल्काची माहिती अधिकृत जाहिरातीत दिलेली असेल.
  9. या भरतीची अधिकृत जाहिरात कुठे पाहता येईल?
    उत्तर: मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटवर भरतीची जाहिरात आणि संबंधित सूचना पाहता येतील.
  10. स्वयंपाकी पदासाठी पगार किती आहे?
    उत्तर: वेतनश्रेणीची अचूक माहिती अधिकृत भरती जाहिरातीत तपासावी.
Bombay High Court Aurangabad Bench Recruitment 2026 feature image

महत्त्वाची सूचना : या लेखामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील स्वयंपाकी पदाच्या भरतीबाबत उपलब्ध अधिकृत माहितीनुसार माहिती देण्यात आली आहे. भरतीची पात्रता, रिक्त पदे, अर्ज प्रक्रिया, शुल्क, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया व इतर अटींमध्ये अधिकृत सूचनेनुसार बदल होऊ शकतो. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. या लेखातील माहितीच्या आधारे होणाऱ्या कोणत्याही निर्णयासाठी वेबसाइट जबाबदार राहणार नाही.

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!