CCRUM Bharti 2026: शिपाई, लिपिक आणि चालक पदांसाठी सरळसेवा भरती जाहीर करण्यात आली असून सरकारी नोकरीच्या shoat असलेल्या उमेदवारांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या Central Council for Research in Unani Medicine (CCRUM) मार्फत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे शिपाई, लिपिक, चालक तसेच इतर विविध पदांच्या एकूण १७९ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती सुवर्णसंधी ठरणार आहे.
या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना ३१ जुलै २०२६ पर्यंत अर्ज सादर करण्याची संधी उपलब्ध असणार आहे. भरती प्रक्रियेमध्ये विविध शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांसाठी पदांचा समावेश करण्यात आला असून दहावी, बारावी, पदवीधर तसेच संबंधित क्षेत्रातील अनुभव असलेल्या उमेदवारांनाही अर्ज करता येणार आहे. त्यामुळे देशभरातील मोठ्या संख्येने उमेदवार या भरतीकडे लक्ष ठेवून आहेत.
CCRUM Recruitment 2026 Notification Out
Central Council for Research in Unani Medicine (CCRUM) ही संस्था Ministry of Ayush च्या अखत्यारीत कार्यरत असून युनानी वैद्यकीय संशोधन क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावते. संस्थेने Vacancy Advertisement No. 1/2026 अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत Notification प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीत Age Limit, Educational Qualification, Application Fee आणि Selection Process याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
भरतीचा संक्षिप्त गोषवारा (Overview)
- Organization Name (संस्थेचे नाव): Central Council for Research in Unani Medicine (CCRUM)
- Ministry (मंत्रालय): Ministry of Ayush, Government of India
- Advertisement No (जाहिरात क्रमांक): 01/2026
- Total Vacancies (एकूण पदे): 179 Posts (१७९ जागा)
- Application Mode (अर्जाची पद्धत): Online Only (फक्त ऑनलाईन)
- Job Location (नोकरीचे ठिकाण): All India (संपूर्ण भारत)
- महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
- Online Application Start Date: 01 July 2026 (०१ जुलै २०२६ – सकाळी १०:०० वाजल्यापासून)
- Last Date to Apply Online: 31 July 2026 (३१ जुलै २०२६ – रात्री २३:५९ वाजेपर्यंत)
- Correction Window (अर्जात दुरुस्ती): 03 August 2026 to 05 August 2026
पदांचा तपशील आणि जागा (Vacancy Details)
या भरतीमध्ये Group A, Group B आणि Group C अंतर्गत एकूण २३ प्रकारच्या पदांच्या १७९ जागा भरल्या जाणार आहेत. मुख्य पदे खालीलप्रमाणे आहेत:
Popular Posts (मुख्य पदे):
- Multi-Tasking Staff (MTS / शिपाई): 43 Vacancies (यामध्ये Messenger, Ward Boy, Female Attendant, Ayah, Lab Attendant आणि Pharmacy Attendant समाविष्ट आहेत).
- Lower Division Clerk (LDC / लिपिक): 26 Vacancies
- Upper Division Clerk (UDC): 31 Vacancies
- Staff Car Driver (चालक): 04 Vacancies
- Stenographer Grade-III: 07 Vacancies
- Staff Nurse: 07 Vacancies
- Pharmacist: 06 Vacancies
Other Technical & Research Posts:
- Research Officer (Unani, Pathology, Physiology): 19 Vacancies
- Assistant Research Officer (Pharmacology, Botany): 03 Vacancies
- Medical Laboratory Technologist (MLT): 12 Vacancies
- Research Assistant (Chemistry, Botany): 05 Vacancies
- Investigator (Statistics): 03 Vacancies
- Library & Information Assistant: 03 Vacancies
- Accounts Officer, Proof Reader, Hindi Assistant, Social Worker, Radiographer, Compounder: 10 Vacancies
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
- MTS (शिपाई): Matriculation (10th Pass) उत्तीर्ण किंवा संबंधित ट्रेडमध्ये ITI कोर्स पास असावा.
- LDC (लिपिक): 12th Pass (बारावी उत्तीर्ण) असणे आवश्यक आहे. सोबत संगणकावर English Typing 35 wpm किंवा Hindi Typing 30 wpm चा वेग असावा.
- UDC: Recognition University मधून कोणत्याही शाखेतील Graduate Degree (पदवी) उत्तीर्ण.
- Staff Car Driver (चालक): 10th Pass, सोबत Valid Driving License (LMV) आणि किमान 3 वर्षांचा Driving Experience असावा.
- Stenographer Grade-III: 10th Pass, सोबत Shorthand स्पीड 80 wpm आणि Typing स्पीड 40 wpm असावा.
- Pharmacist: 12th Science पास आणि 2 वर्षांचा Diploma in Pharmacy (D.Pharm) आवश्यक.
वयोमर्यादा (Age Limit)
उमेदवारांचे वय 31 July 2026 रोजी खालीलप्रमाणे असावे:
- MTS, Pharmacist, Driver Posts: 18 to 25 Years.
- LDC & UDC Posts: 18 to 27 Years.
- Other Group B Posts: 28 to 35 Years (पदांनुसार).
- Group A Posts: Maximum 40 Years.
- Age Relaxation (वयात सवलत): OBC उमेदवारांना 03 वर्षे तर SC/ST उमेदवारांना 05 वर्षे वयात सवलत दिली जाईल.
सविस्तर जाहिरात व अर्जाची लिंक :
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
| सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
अर्ज शुल्क (Application Fee)
| पद संवर्ग | General / OBC | SC / ST / PwBD / EWS / Women / Ex-SM |
|---|---|---|
| Group ‘A’ Posts | ₹500 (Processing) + ₹1500 (Exam) = ₹2000 | ₹500 (Processing) = ₹500 |
| Group ‘B’ Posts | ₹500 (Processing) + ₹1000 (Exam) = ₹1500 | ₹500 (Processing) = ₹500 |
| Group ‘C’ Posts | ₹500 (Processing) + ₹800 (Exam) = ₹1300 | ₹500 (Processing) = ₹500 |
निवड प्रक्रिया (Selection Process)
- Online Computer Based Test (CBT): सर्व पदांसाठी ऑनलाईन CBT परीक्षा घेतली जाईल. Group B आणि C साठी १०० गुणांची परीक्षा होईल.
- Negative Marking: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 Marks वजा केले जातील. विशेष नोंद: MTS (शिपाई) पदाच्या परीक्षेसाठी कोणतीही Negative Marking असणार नाही.
- Skill Test / Typing Test: LDC (लिपिक), Stenographer आणि Driver पदांसाठी टायपिंग किंवा ड्रायव्हिंग टेस्ट घेतली जाईल, जी फक्त Qualifying स्वरूपाची असेल.
ऑनलाईन अर्ज कसा करावा? (How to Apply)
- सर्वप्रथम CCRUM च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन New Registration पूर्ण करा.
- Login ID आणि Password चा वापर करून Application Form मध्ये आपली माहिती अचूक भरा.
- आवश्यक कागदपत्रे, Passport Size Photo (50-100 KB) आणि Signature अपलोड करा.
- ऑनलाईन पेमेंट गेटवेद्वारे Application Fee भरा आणि अर्जाची Printout काढून ठेवा.
