IBPS Recruitment 2026 | सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी! Best मार्गदर्शन | आत्ताच अर्ज तारीख चुकून नका

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

IBPS Recruitment 2026 :- बँकिंग क्षेत्रामध्ये ज्या तरुणांना आपले करिअर घडवायचे आहे त्यांच्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) घेऊन आले आहे सुवर्णसंधी. दरवर्षी IBPS मार्फत भरती परीक्षा जाहीर केली जाते यावर्षीही IBPS अंतर्गत अनेक विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या अंतर्गत निघणाऱ्या विविध पदांच्या तारख्या जाहीर करण्यात आल्या आहेत त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा व यामध्ये यश मिळवा. या भरती अंतर्गत प्रोफेशनरी ऑफिसर (PO), स्पेशलिस्ट ऑफिसर (SO), क्लर्क, कस्टमर सर्विस असोसिएट,आणि ऑफिसर असिस्टंट असे बँकिंग क्षेत्रातील प्रतिष्ठित पदे यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

IBPS सांग तुम्हाला सरकारी नोकरीची महत्वपूर्ण संधी घेऊन आली आहे, सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांचे स्वप्न पूर्ण २०२६ यावर्षी पूर्ण होऊ शकते. जर तुम्हाला या भरतीची संपूर्ण माहिती हवी असेल शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, वेतन आणि अर्ज प्रक्रिया त्याची सर्व माहिती खालील लेखामध्ये पाहू शकता:

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

IBPS Recruitment 2026 या भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे खालील दिलेली शैक्षणिक पात्रता असणे अनिवार्य आहे.

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयामध्ये पदवी असणे अनिवार्य आहे.
  • पदवी मध्ये कमीत कमी गुण ४५% ते ५०% असणे आवश्यक आहे असू शकते किंवा अट असू शकते.
  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे अनिवार्य आहे, जसे ऑपरेटिंग सिस्टिम्स, वर्ड, एक्सेल.
  • संबंधित राज्यातील उमेदवाराला तिथली भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येणे अनिवार्य आहे.
  • स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) पदासाठी : पदवी पूर्ण असणे अनिवार्य आहे आणि सोबतच संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी ही अनिवार्य आहे.
  • इतर तांत्रिक पदासाठी आयटी (IT), कृषी (Agriculture), कायदा (Law) अशा पदांसाठी विशिष्ट शाखेतील पदवी असणे आवश्यक असते.

वयोमर्यादा (Age limit)

IBPS Recruitment 2026 या भरतीसाठी वयमर्यादा ही खालील प्रमाणे दिली आहे.

प्रवर्गवयोमर्यादा (Age Limit)
किमान वय२० वर्षे
कमाल वय (खुला प्रवर्ग – General)३० वर्षे
OBC (नॉन-क्रिमी लेयर)३३ वर्षे (३ वर्षे सवलत)
SC / ST३५ वर्षे
दिव्यांग उमेदवार४० वर्षे (१० वर्षे सवलत)

आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

IBPS Recruitment 2026 या भरतीचा अर्ज करण्यासाठी खालील दिलेली आवश्यक कागदपत्रे उमेदवाराकडे अनिवार्य आहे.

  • पासपोर्ट साईज फोटो (रंगीत)
  • स्वाक्षरी
  • डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा
  • हस्तक्षर घोषणा (Handwritten Declaration)
  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स -कोणतेही एक असेल तरीही चालते.
  • वयाचा पुरावा पटवण्यासाठी 10 चे बोर्ड प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला
  • 10वी, 12 वी आणि पदवीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र
  • विद्यापीठाची मूळ पदवी
  • जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
  • EWS/PwBD
  • नाव बदलणे असेल तर गॅझेट प्रत किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र

नोंद : IBPS Recruitment 2026 या भरतीचा अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिकृत जाहिरात तपासा यामध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतो.

प्राथमिक परीक्षा

  • तर्कक्षमता (Reasoning Ability) : ​सीटिंग अरेंजमेंट (Seating Arrangement – Linear, Circular), पझल्स (Puzzles), सिलोजिझम (Syllogism), ब्लड रिलेशन (Blood Relations), कोडिंग-डिकोडिंग (Coding-Decoding) आणि ​डेटा सफिशियन्सी (Data Sufficiency)
  • संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude/Maths) : डेटा इंटरप्रिटेशन, सिंप्लिफिकेशन/ॲप्रॉक्सिमेशन, नंबर सिरीज (Number Series), क्वाड्रॅटिक इक्वेशन्स (Quadratic Equations) आणि अरथमॅटिक
  • इंग्रजी भाषा (English Language): रेडींग कॉम्प्रिहेन्शन, क्लोज टेस्ट, एरर स्पॉटिंग (Error Spotting), पॅराजंबल्स आणि ​Fill in the blanks

मुख्य परीक्षा

  • सामान्य/बँकिंग जागरूकता (General/Banking Awareness) : चालू घडामोडी (Current Affairs – मागील ६ महिने), बँकिंग आणि आर्थिक क्षेत्रातील संकल्पना, बजेट, सरकारी योजना, पुरस्कार, खेळ, आंतरराष्ट्रीय घडामोडी.
  • संगणक ज्ञान : संगणकाचे मूलभूत ज्ञान, नेटवर्किंग, इंटरनेट, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर.
  • इंग्रजी लेखन : काही परीक्षांमध्ये डिस्क्रिप्टिव्ह पेपर असतो, ज्यामध्ये पत्रलेखन आणि निबंध लेखन असते.

वेतन (Salary)

IBPS Recruitment 2026 या भरतीतील विविध पदासाठी वेतन अंदाजे खालीलप्रमाणे दिले आहे

पद अंदाजित मासिक वेतन
क्लर्क (Clerk)३५,००० ते ४५,०००
प्रोबेशनरी ऑफिसर (PO)६०,००० ते ७५,०००
स्पेशालिस्ट ऑफिसर (SO – Scale I)६५,००० ते ८०,०००
स्पेशालिस्ट ऑफिसर (SO – Scale II)८५,००० ते १,००,०००+

अर्ज प्रक्रिया (How to Apply)

IBPS Recruitment 2026 या भरतीचा अर्ज करण्यासाठी कर्ज प्रक्रिये ही ऑनलाईन असते याची सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिली आहे:

  • सर्वप्रथम तुम्ही या बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या bankofmaharashtra.in
  • जाहिरात काळजीपूर्वक वाचा त्यामधील पात्रता वयोमर्यादा परीक्षा फी आणि अर्जाच्या महत्त्वाच्या तारखा.
  • Click here for New Registration या पर्यायावर क्लिक करा
  • त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाका व नोंदणी करा.
  • नोंदणी झाल्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळेल तो लक्षात ठेवा.
  • मिळालेल्या रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड याचा वापर करून लॉगिन करा.
  • यानंतर तुमची शैक्षणिक माहिती (पदाची गुण आणि उत्तीर्ण वर्ष) आणि वैयक्तिक माहिती काळजीपूर्वक भरा.
  • माहिती भरत असताना सर्व माहिती अचूक पद्धतीने तुमच्या नावाच्या अक्षराची स्पेलिंग हे सर्व गोष्टी लक्षात ठेवून अर्ज भरा.
  • त्यानंतर तुमचा फोटो आणि नमूद केलेली सर्व कागदपत्रे योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
  • अर्ज सबमिट करण्याअगोदर एक पुन्हा एकदा तपासा सर्व माहिती अचूक आहे का?
  • प्रवर्गानुसार अर्जाची शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरा आणि अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर शुल्क भरलेली पावती आणि अर्जाची प्रत काढून जपून ठेवा.
IBPS Recruitment 2026 feature image
IBPS Recruitment 2026

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : भरती प्रक्रियेत वेळोवेळी बदल होऊ शकतात. उमेदवारांना विनंती आहे की, त्यांनी कोणत्याही अर्जासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी आणि अधिकृत जाहिरात (Notification) काळजीपूर्वक वाचावी. या माहितीच्या आधारे घेतलेल्या कोणत्याही निर्णयाची जबाबदारी संबंधित उमेदवाराची असेल.

तुम्ही येथे “DRDO Recruitment 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/drdo-recruitment-2026/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!