Central Warehousing Corporation Recruitment 2026 : स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणाऱ्या आणि सरकारी नोकरीची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी. केंद्रीय भण्डारण निगम (Central Warehousing Corporation – CWC) हे भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयात अंतर्गत येणारे एक प्रतिष्ठित नवरत्न सार्वजनिक क्षेत्रांमधील उपक्रम म्हणून ओळखले जाते.
देशामध्ये कृषी उत्पन्न, औद्योगिक साहित्य आणि इतर मालाची वैज्ञानिक साठवणूक, गोदाम व्यवस्थापन तसेच आयात-निर्यातीसाठी आवश्यक असणारी लॉजिस्टिक्स पायाभूत सुविधा (CFSs/ICDs/Air Cargo Complexes) पुरवण्यात सीडब्ल्यूसी ही एक अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाते. CWC सध्या जाहिरात क्रमांक CWC/I-Manpower/DR/Rectt/2026/01 द्वारे विविध विभागांमधील सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) आणि कनिष्ठ कार्यकारी (Junior Executive) या महत्त्वाच्या पदांसाठी एकूण ३०७ रिक्त जागांवर थेट भरती प्रक्रियेत जाहीर केली आहे.
या भरती प्रक्रिया अंतर्गत जनरल, टेक्निकल, फायनान्स, सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग अशा विविध क्षेत्रांतील पदवीधर व पदव्युत्तर उमेदवारांना केंद्र सरकारच्या अंतर्गत एका मिनीरत्न/नवरत्न कंपनीत आकर्षक वेतन आणि चांगल्या करियरसाठी सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. योग्य शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा पूर्ण असणाऱ्या उमेदवारांने 17 ऑक्टोबर 2026 ते 15 नोव्हेंबर 2026 या तारखे दरम्यान अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून घ्यावे.
- महत्त्वाच्या तारखा :
- ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: १७ ऑक्टोबर २०२६
- ऑनलाइन अर्ज करण्याची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख: १५ नोव्हेंबर २०२६
- परीक्षेचे प्रवेशपत्र (Call Letter) डाउनलोड करणे: परीक्षेच्या सुमारे २१ दिवस अगोदर
- ऑनलाइन परीक्षा (संभाव्य तारीख): लवकच कळवली जाईल.
Central Warehousing Corporation Recruitment 2026 : पदाचे नाव आणि एकूण जागा
| पदाचे नाव | एकूण रिक्त जागा |
| सहाय्यक व्यवस्थापक (जनरल) – Assistant Manager (General) | 70 |
| सहाय्यक व्यवस्थापक (टेक्निकल) – Assistant Manager (Technical) | 60 |
| सहाय्यक व्यवस्थापक (फायनान्स) – Assistant Manager (Finance) | 10 |
| सहाय्यक व्यवस्थापक (इंजिनिअरिंग – सिव्हिल) – Assistant Manager (Engineering – Civil) | 22 |
| सहाय्यक व्यवस्थापक (इंजिनिअरिंग – इलेक्ट्रिकल) – Assistant Manager (Engineering – Electrical) | 05 |
| सहाय्यक व्यवस्थापक (इंजिनिअरिंग – मेकॅनिकल) – Assistant Manager (Engineering – Mechanical) | 04 |
| कनिष्ठ कार्यकारी (जनरल) – Junior Executive (General) | 78 |
| कनिष्ठ कार्यकारी (टेक्निकल) – Junior Executive (Technical) | 78 |
| सर्व पदे मिळून | 307 |
Central Warehousing Corporation Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
केंद्रीय भण्डारण निगम भरती 2026 या भरतीसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे :
- सहाय्यक व्यवस्थापक (जनरल): कोणत्याही शाखेची दोन वर्षांची पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा (अनुभव नाही – NIL).
- सहाय्यक व्यवस्थापक (टेक्निकल): कृषी (Agriculture) / अन्न तंत्रज्ञान (Food Technology) / अन्न विज्ञान / बायोटेक्नोलॉजी मध्ये B.Tech किंवा संबंधित विषयात B.E. (अनुभव नाही).
- सहाय्यक व्यवस्थापक (फायनान्स): कॉमर्समध्ये ग्रॅज्युएट + फायनान्स आणि अकाउंटिंगमध्ये ३ वर्षांचा कामाचा अनुभव किंवा CA इंटरमिजिएट / CMA इंटरमिजिएटसह कोणत्याही शाखेतील पदवी.
- सहाय्यक व्यवस्थापक (इंजिनिअरिंग – सिव्हिल): सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये B.E. किंवा B.Tech (अनुभव नाही).
- सहाय्यक व्यवस्थापक (इंजिनिअरिंग – इलेक्ट्रिकल): इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये B.E. / B.Tech (अनुभव नाही).
- सहाय्यक व्यवस्थापक (इंजिनिअरिंग – मेकॅनिकल): मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये B.E. किंवा B.Tech (अनुभव नाही).
- कनिष्ठ कार्यकारी (जनरल): कोणत्याही शाखेतील पदवी + संगणक अनुप्रयोग (Computer applications, MS Office इ.) चे कार्यसाधक ज्ञान (अनुभव नाही).
- कनिष्ठ कार्यकारी (टेक्निकल): B.Sc. (कृषी / वनस्पतिशास्त्र / प्राणीशास्त्र / बायोटेक्नोलॉजी / सूक्ष्मजीवशास्त्र / बायोकेमिस्ट्री / फूड सायन्स / रसायनशास्त्र) + संगणकाचे ज्ञान (अनुभव नाही).
Central Warehousing Corporation Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents
केंद्रीय भण्डारण निगम भरती 2026 या भरतीतील मुलाखतीसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे आहे :
- ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखत पडताळणीसाठी डाउनलोड केलेले वैद्य प्रवेश पत्र- ज्यावर ४.५ सेंमी × ३.५ सेंमी आकाराचा फोटो चिकटवलेला असावा
- CWC च्या ऑनलाइन अर्जाची प्रणालीद्वारे व्युत्पन्न झालेली वैध प्रत असणे बंधनकारक आहे.
- वयाचा पुरावा पाहण्यासाठी जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला असणे आवश्यक आहे.
- ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड किंवा इतर कोणतेही वैद्य ओळखपत्र असणे बंधनकारक आहे.
- 10वी पासूनच्या सर्व शैक्षणिक पात्रतेच्या गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे असणे अनिवार्य आहे.
- जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
- दिव्यांग प्रमाणपत्र (PwBD)
- माजी सैनिक कागदपत्रे (Ex-Servicemen)
तुम्ही येथे “हिंदुस्तान को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2026“ या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/hindustan-co-operative-bank-recruitment-2026/
Central Warehousing Corporation Recruitment 2026 : वेतनश्रेणी
| अ.क्र. | पदाचे नाव | वेतनश्रेणी (IDA) |
| 1. | सहाय्यक व्यवस्थापक (जनरल, टेक्निकल, फायनान्स, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल) [पद कोड ०१ ते ०६] | ₹ ४०,००० – १,४००,००० (E-1 श्रेणी) |
| 2. | कनिष्ठ कार्यकारी (जनरल, टेक्निकल) [पद कोड ०७ आणि ०८] | ₹ २९,००० – ९३,००० (S-V श्रेणी) |
Central Warehousing Corporation Recruitment 2026 : निवड प्रक्रिया (Selection Process)
- सहाय्यक व्यवस्थापक पदे (कोड ०१ ते ०६): ऑनलाइन परीक्षा + कागदपत्र पडताळणी (Document Verification) आणि मुलाखत (Interview).
- कनिष्ठ कार्यकारी पदे (कोड ०७ आणि ०८): ऑनलाइन परीक्षा + कागदपत्र पडताळणी (मुलाखत नाही).
- चुकीच्या उत्तरांसाठी नकारात्मक गुण (Negative Marking): वस्तुनिष्ठ चाचणीतील चुकीच्या उत्तरांसाठी प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे १/४ (०.२५) गुण वजा केले जातील.
Central Warehousing Corporation Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply
केंद्रीय भण्डारण निगम भरती 2026 या भरतीची अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे आहे :
- सर्वप्रथम पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरतीचा अर्ज हा 15 नोव्हेंबर 2026 या तारखेचा आत करणे आवश्यक आहे.
- अर्ज हा अधिकृत वेबसाइटवरून करणे अनिवार्य आहे कारण इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज केल्यानंतर तो ग्राह्य धरला जाणार नाही.
- अर्जामध्ये आवश्यक माहिती, शैक्षणिक माहिती आणि सर्व वैयक्तिक माहिती अचूक व काळजीपूर्वक भरावी.
- नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करावे.
- अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरून घ्यावे, अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज संपूर्ण मानला जात नाही.
- एसटी, एससी, महिला, दिव्यांग (PwBD) आणि आजीम पूर्व-सैनिक (Ex-Servicemen): अर्ज शुल्क नाही, परंतु केवळ ₹५००/- इंटीमेशन चार्ज (Intimation Charges) भरावा लागेल.
- इतर प्रवर्ग (UR, EWS, OBC): अर्ज शुल्क ₹८५०/- + इंटीमेशन चार्ज ₹५००/- मिळून एकूण ₹१,३५०/- शुल्क ऑनलाइन भरावे लागेल.
- अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट काढायला विसरू नका.
| Notification PDF (अधिकृत जाहिरात पीडीएफ) | येथे क्लिक करा |
| Online apply (ऑनलाइन अर्ज) | येथे क्लिक करा |
| Official website (अधिकृत संकेतस्थळ) | येथे क्लिक करा |

केंद्रीय भण्डारण निगम भरती 2026 – महत्त्वाचे FAQ
प्रश्न 1: केंद्रीय भण्डारण निगम भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
उत्तर: या भरतीमध्ये एकूण 307 पदे असल्याची माहिती दिली आहे.
प्रश्न 2: केंद्रीय भण्डारण निगम भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
उत्तर: उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन भरतीची जाहिरात वाचावी आणि दिलेल्या सूचनांनुसार ऑनलाइन अर्ज करावा.
प्रश्न 3: या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असू शकते. अधिकृत जाहिरात तपासावी.
प्रश्न 4: केंद्रीय भण्डारण निगम भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: वयोमर्यादा पदानुसार व भरतीच्या नियमांनुसार ठरवली जाते. अचूक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.
प्रश्न 5: अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्जाची अंतिम तारीख जाणून घेण्यासाठी अधिकृत भरती जाहिरात तपासावी.
प्रश्न 6: या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे?
उत्तर: निवड प्रक्रिया संबंधित पदाच्या अधिकृत जाहिरातीत दिल्याप्रमाणे असेल.
Disclaimer (महत्त्वाची सूचना): या लेखातील माहिती उमेदवारांच्या माहितीसाठी दिली आहे. भरतीसंबंधित जागा, पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची अंतिम तारीख व इतर तपशील अधिकृत जाहिरातीतून तपासून घ्यावेत. कोणताही अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.