ESIC Pune Recruitment 2026 : वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी. कर्मचारी राज्य विमा महामंडळ रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय, बिबवेवाडी, पुणे येथे भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये विविध विभागांमधील प्राध्यापक (Professor), सह-प्राध्यापक (Associate Professor), सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) आणि वरिष्ठ निवासी (Senior Resident) या जागा भरल्या जाणार , उमेदवाराची निवड हे गुणवत्तेच्या आधारावर कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे.
आरोग्य सेवांच्या विस्तारासाठी आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता करण्यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत द्वारे वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनिल सेवा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान देऊ इच्छिणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांना आणि शिक्षकतज्ज्ञांना मुलाखतीद्वारे एकाच छताखाली उत्तम संधी उपलब्ध करण्यात आली आहे. या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील संपूर्ण लेख वाचणे आवश्यक आहे.
- महत्त्वाच्या तारखा :
- जाहिरात दिनांक: २२ ऑगस्ट २०२६
- मुलाखतीचे दिवस (रोलिंग जाहिरात): २५ ऑगस्ट २०२६ आणि २७ ऑगस्ट २०२६ (२६ ऑगस्ट २०२६ रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने मुलाखती असणार नाहीत).
- मुलाखतीची वेळ: सकाळी ९:३० ते दुपारी ४:०० वाजेपर्यंत (उमेदवारांची नोंदणी व रिपोर्टिंग वेळ: सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत).
ESIC Pune Recruitment 2026 : पद संख्या
| पदाचे नाव | एकूण जागा |
| प्राध्यापक (Professor) | 06 |
| सह-प्राध्यापक (Associate Professor) | 11 |
| सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) | 7 |
| वरिष्ठ निवासी – ३ वर्षे (Senior Resident – 3 Year) | 5 |
| एकूण पदे | 29 |
ESIC Pune Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification
ईएसआयसी (ESIC) वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय भरती 2026 या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे.
- या भरतीतील सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (NMC – पूर्वीची MCI) मार्गदर्शक तत्वाप्रमाणे लागू करण्यात आली आहे.
- उमेदवारांकडे संबंधित वैद्यकीय परिषदेचे वैद्य आणि अद्ययावत नोंदणी केलेले प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
- प्राध्यापक (Professor), सह-प्राध्यापक (Associate Professor), आणि सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) पदांसाठी संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी (जसे की MD / MS / DNB) आणि सोबतच नियमानुसार आवश्यक असणारा अध्यापनाचा अनुभव उमेदवाराकडे असणे अनिवार्य आहे.
- वरिष्ठ निवासी (Senior Resident)
- वरिष्ठ निवासी या पदासाठी तीन वर्षांचा विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी असणे अनिवार्य आहे.
- केंद्रीय रेसिडेन्सी योजनेअंतर्गत (Central Residency Scheme) यापूर्वीच ३ वर्षे वरिष्ठ निवासी म्हणून सेवा पूर्ण केलेले उमेदवार ३ वर्षांच्या योजनेअंतर्गत कंत्राटी पदासाठी पात्र असणार नाहीत.
ESIC Pune Recruitment 2026 : वयोमर्यादा- Age limit
| पदाचे नाव | वयोमर्यादा (दिनांक २५/०८/२०२६ रोजी) |
| प्राध्यापक (Professor) | ६८ वर्षांपेक्षा जास्त नाही |
| सह-प्राध्यापक (Associate Professor) | ६८ वर्षांपेक्षा जास्त नाही |
| सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) | ६८ वर्षांपेक्षा जास्त नाही |
| वरिष्ठ निवासी (Senior Resident – 3 Year / 1 Year) | ४५ वर्षांपेक्षा जास्त नाही |
ESIC Pune Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents
ईएसआयसी (ESIC) वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय भरती 2026 या भरतीचा अर्ज करत असताना उमेदवाराकडे खालील कागदपत्राची यादी असणे आवश्यक आहे.
- वयाचा पुरावा पाहण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला असणे आवश्यक आहे.
- सर्व वर्षांच्या गुणपत्रिका (Marks Sheets), अटेम्प्ट प्रमाणपत्र (Attempt Certificate) आणि एमबीबीएस पदवी प्रमाणपत्र असणे अनिवार्य ठरते.
- MD / MS / DNB किंवा इतर पदव्युत्तर पदवीच्या सर्व वर्षांच्या गुणपत्रिका, अटेम्प्ट प्रमाणपत्र आणि पदवी प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- आरक्षित श्रेणी प्रमाणपत्र
- वैद्यकीय परिषद नोंदणी : वैध आणि अद्ययावत राज्य वैद्यकीय परिषद
- संशोधन प्रकाशनांचे (Publications) पुरावे (लागू असल्यास).
- अनुभव प्रमाणपत्र
- छायाचित्र
- ना हरकत / कार्यमुक्त प्रमाणपत्र (NOC/Relieving Certificate)
- ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
टीप : मुलाखतीसाठी बोलावल्या नंतर वेळेपूर्वी सर्व कागदपत्रे व्यवस्थित तपासून एक सेट सोबत ठेवणे आवश्यक आहे.
ESIC Pune Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया
ईएसआयसी (ESIC) वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय भरती 2026 या भरतीची अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.
- या भरतीचा अर्ज हा विहित नमुन्यात जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणेच करणे अनिवार्य आहे. अर्जामधील माहिती अचूक भरणे अनिवार्य आहे, आणि आसाम मधील चुकीच्या स्वरूपात भरलेली माहिती किंवा अर्जुना करण्यात येईल.
- या भरतीची मुलाखत ही डायरेक्ट असल्याने उमेदवारांनी ठरलेल्या तारखेला २५ आणि २७ ऑगस्ट २०२६ सकाळी 9:30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत उपस्थित राहणे आवश्यक आहे.
- मुलाखतीसाठी येत असताना सर्वप्रथम मूळ कागदपत्रासह व स्वयंप्रमाणित प्रतिंसह उपस्थित राहणे बंधन कारक आहे.
- अर्ज शुल्क ही एससी/एसटी, ईएसआयसी कंत्राटी कर्मचारी, महिला, माजी सैनिक आणि अपंग उमेदवारांना कुठल्याही प्रकारची नाही.
- इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹500 शुल्क अर्जासाठी भरावी लागणार आहे.
- अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे; १० वीचे प्रमाणपत्र, वैद्यकीय पदव्या (MBBS, MD/MS/DNB), नोंदणी प्रमाणपत्र (NMC/State Medical Council), जात प्रमाणपत्र (लागू असल्यास), अनुभव प्रमाणपत्र, प्रकाशने आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या स्वयंप्रमाणित छायाप्रती.
| Notification PDF | येथे क्लिक करा |
| Official Website | येथे क्लिक करा |
ESIC वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय भरती 2026 – FAQ
- ESIC वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
उत्तर: ESIC वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय भरती 2026 मध्ये एकूण 29 जागा आहेत. - ESIC भरती 2026 साठी अर्ज कसा करायचा?
उत्तर: पात्र उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीत दिलेल्या सूचनांनुसार अर्ज करावा. अर्जाची पद्धत पदानुसार वेगळी असू शकते. - ESIC भरती 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: शैक्षणिक पात्रता संबंधित पदानुसार वेगवेगळी आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात तपासावी. - ESIC भरती 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: वयोमर्यादा पदानुसार वेगळी असू शकते. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयाची सवलत मिळू शकते. - ESIC भरती 2026 मध्ये कोणत्या पदांसाठी भरती आहे?
उत्तर: भरतीमधील पदांची सविस्तर माहिती अधिकृत जाहिरातीत दिलेली आहे. उमेदवारांनी पदनिहाय पात्रता आणि रिक्त जागा तपासाव्यात. - ESIC भरती 2026 ची निवड प्रक्रिया काय आहे?
उत्तर: निवड प्रक्रिया संबंधित पदाच्या नियमांनुसार केली जाते. त्यामध्ये मुलाखत, लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी किंवा कागदपत्र पडताळणी यापैकी टप्पे असू शकतात. - ESIC भरती 2026 साठी अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: अर्ज शुल्क उमेदवाराचा प्रवर्ग आणि संबंधित पदानुसार वेगळे असू शकते. अधिकृत जाहिरातीत शुल्काची माहिती तपासावी. - ESIC भरती 2026 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्जाची अंतिम तारीख अधिकृत भरती जाहिरातीत नमूद केलेली असते. उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. - ESIC भरती 2026 मध्ये पगार किती मिळेल?
उत्तर: संबंधित पदाच्या वेतनश्रेणीनुसार वेतन दिले जाईल. पदनिहाय वेतनाची माहिती अधिकृत जाहिरातीत पाहता येईल. - ESIC भरती 2026 ची अधिकृत जाहिरात कुठे पाहता येईल?
उत्तर: ESIC च्या अधिकृत संकेतस्थळावर भरतीची जाहिरात, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि इतर आवश्यक माहिती उपलब्ध असते.

तुम्ही येथे भारतीय सागरी विद्यापीठ नवी मुंबई भरती 2026 या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/indian-maritime-university-recruitment/