शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रायगड येथे भरती (GMCH Recruitment 2026) रुग्णालयामध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! Best मार्गदर्शन

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय भरती (GMCH Recruitment 2026) येथे विविध पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अभ्यागत अध्यापक या पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे. या भरतीसाठी अर्ज हा 2 जुलै 2026 ते 10 जुलै 2026 या तारखे दरम्यान करायचा आहे. या भरतीसाठी निवड प्रक्रिया मध्ये मुलाखत पण घेतली जाते मुलाखतीची वेळ 14 जुलै 2026 सकाळी 11:00 वाजता आहे. महत्त्वाची सूचना या भरतीचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने स्वीकारला जात नाही, तर अर्ज हा प्रत्यक्ष किंवा नोंदणी लिखित पोस्टाने सादर करावा लागतो.

रायगड जिल्ह्यामधील हे पहिले आणि एकमेव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे याची सुरुवात 2021-22 या वर्षापासून झाली आहे. या महाविद्यालयांमध्ये फक्त भावी डॉक्टरांना उच्च दर्जाची वैद्यकीय शिक्षण दिले जात नाही तर अलिबाग व परिसरातील सर्वसामान्य जनतेसाठी एक मुख्य आरोग्य आधारस्तंभ म्हणून कार्य करत आहे.

या भरतीचा अर्ज करण्यासाठी अर्ज पद्धत, निवड प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा याची सर्व माहिती खालील लेखामध्ये दिली आहे.

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय भरती (GMCH Recruitment 2026) या भरतीचा अर्ज भरण्यासाठी उमेदवाराकडे खालील शैक्षणिक पात्रता असणे अनिवार्य आहे.

  • उमेदवाराकडे संबंधित वैद्यकीय विषयातील पदवी असणे अनिवार्य ठरते, यामध्ये पुढील पदव्यांचा समावेश होतो : MD, MS, DNB, DM किंवा MCH.
  • ॲनाटॉमी (Anatomy), फिजिओलॉजी (Physiology), बायोकेमिस्ट्री (Biochemistry), फार्माकोलॉजी (Pharmacology) आणि मायक्रोबायोलॉजी (Microbiology) या विषयासाठी MSc सोबतच PhD असलेले उमेदवार पात्र आहेत.
  • उमेदवाराचे वरील शिक्षण हे अशा बहु विशिष्ट शिक्षण रुग्णालयामध्ये झालेले असावे जिथे कमीत 500 खटा उपलब्ध आहेत आणि जे विविध पदव्युत्तर किंवा स्पेशलिस्ट शिक्षण कार्यक्रमामध्ये विभागलेले किंवा गुंतलेले आहेत.
  • NMC (National Medical Commission) या नियमानुसार अध्यापकाकडे आवश्यक्य असलेले अध्यापन अनुभव आणि पात्रता असणे अनिवार्य आहे.
  • कामाचा अनुभव : पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर उमेदवाराच्या संबंधित विषयातील कमीत कमी त्यांच्याकडे आठ वर्षाचा अध्यापनाचा किंवा कामाचा अनुभव असणे बंधनकारक आहे.
  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 60 वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • एखादे उमेदवार अगोदरच एखाद्या ठिकाणी शासकीय संस्थेत कार्यरत आहेत तर त्यांना संबंधित संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे.

पदांचे स्वरूप

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय भरती (GMCH Recruitment 2026)

  • कालावधी : नियुक्तीचा कालावधी हा 364 दिवसांसाठी असला जाईल. या 364 दिवसानंतर कामगिरीचे मूल्यमापन करून अनिता खंड देऊन नियमानुसार पुन्हा सेवा वाढ देण्यात येऊ शकते.
  • अधिकार : पटसंख्या कमी किंवा जास्त करण्याचा अधिकार अधिष्ठात्यांनी राखून ठेवलेले असतील.
  • सेवेची समाप्ती : ही नियुक्ती अत्यंत तात्पुरत्या स्वरूपाची असल्याने कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता अभ्यागत सेवा समर्थ करायचा अधिकार फक्त अधिष्ठात्यांकडे असतात. जर उमेदवार जास्त दिवस गैरहजर असेल तर नियुक्ती तात्काळ समाप्त करण्यात येऊ शकते याची दक्षता घ्या.

आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय भरती (GMCH Recruitment 2026) या भरतीसाठी अर्ज करताना खालील आवश्यक कागदपत्रे सोबत असणे अनिवार्य आहे.

  • MBBS मधील सर्व वर्षांच्या गुणपत्रिका, उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि प्रयत्नांचे (Attempt) प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
  • पदव्युत्तर पदवी (MD/MS/DNB/DM/MCH) गुणपत्रिका आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • नूतनीकरण महाराष्ट्र मेडिकल काउंसलिंग किंवा भारतीय वैद्यकीय परिषद मध्ये केलेले कायमस्वरूपी नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक्य आहे.
  • अनुभव प्रमाणपत्र (कमीत कमी आठ वर्षाचा कामाचा अनुभव असणे)
  • एक वर्षाचा वरिष्ठ निवासी कार्यकाळ पूर्ण झालेले प्रमाणपत्र.
  • जर असेल तर मेडिकल एज्युकेशन टेक्नॉलॉजी आणि बायोमेडिकल रिसर्च कोर्स पूर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक ठरते.
  • जाहिरात मधील दिलेल्या अटीनुसार शोधनिबंधांच्या प्रति.
  • वयाचा पुरावा म्हणून जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड
  • जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
  • नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer
  • रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  • पासपोर्ट साईज फोटो

वेतन (Salary)

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय भरती (GMCH Recruitment 2026)

तपशीलमानधन स्वरूप
प्रति सत्र १,०००/
कमाल मासिक२४,०००/-

अर्ज प्रक्रिया (How to Apply)

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय भरती (GMCH Recruitment 2026) या भरतीची अर्ज प्रक्रिया आहे ऑनलाइन पद्धतीने नसून खालील प्रमाणे याची माहिती दिली आहे :

  • सर्वप्रथम महाविद्यालयाच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या www.gmchalibag.in
  • यानंतर जाहिरातीमधून विहीर नमुन्यातील अर्ज डाऊनलोड करून घ्या.
  • अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती (नाव, पत्ता, शैक्षणिक पात्रता, अनुभव) काळजीपूर्वक भरा.
  • नमूद केलेली सर्व कागदपत्रे अर्जा सोबत प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रति जोडा.
  • अर्जावर पासपोर्ट आकाराचा फोटो लावा हे आवश्यक आहे.
  • अर्ज सादर करण्याचे माध्यम
  • अर्ज हा डायरेक्ट कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन किंवा पंजीकृत टपाल आणि अधिष्ठाता कार्यालयाकडे पाठवावा.
  • सर्वात महत्त्वाची सूचना : या भरतीचा अर्थ हा ऑनलाईन पद्धतीने स्वीकारला जात नाही.
  • अर्ज सादर करण्याचा कालावधी : 2 जुलै 2026 ते 10 जुलै 2026
  • सुट्टीच्या दिवशी अर्ज स्वीकारला जाऊ शकत नाही.
  • तुमचा अर्ज पाठवल्यानंतर त्या अर्जाची छाननी केली जाते.
  • निवड झालेल्या उमेदवारांना 14 जुलै 2026 रोजी सकाळी 11:00 वाजता मूळ कागदपत्रासह मुलाखतीसाठी बोलावण्यात येते.
  • जाण्या येण्याचा खर्च हा उमेदवारांनी भरावा लागतो जाण्याचे ठिकाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग-रायगड.
GMCH Recruitment 2026 feature image
GMCH Recruitment 2026

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखामध्ये दिलेली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अलिबाग-रायगड भरती 2026 संबंधी माहिती अधिकृत भरती अधिसूचनेच्या आधारे तयार करण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, शुल्क, आवश्यक कागदपत्रे व इतर सर्व अटींची खात्री करून घ्यावी. भरती प्रक्रियेत वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे अंतिम व अधिकृत माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरील अधिसूचनेलाच प्राधान्य द्यावे.

तुम्ही येथे “चंद्रपूर शहर महानगरपालिका भरती 2026” ची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/chandrapur-city-mahanagarpalika-recruitment/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!