पोस्ट ऑफिस (Gramin Dak Sevak) या पदासाठी फक्त १० वी उत्तीर्ण लागते, आणि पोस्ट ऑफिस पदाचित निवड १० वी च्या गुणावर होते. भारतीय टपाल विभागांमध्ये प्रत्येक वर्षी या पदासाठी हजारो फॉर्म भरली जातात. या पदाच्या परीक्षेसाठी कुठल्याही प्रकारची लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जात नाही. उमेदवाराची निवड थेट त्यांच्या दहावीच्या गुणाच्या आधारे केली जाते. यामुळे ज्या तरुणांना सरकारी नोकरीची संधी हवी असते त्या तरुणांना लवकरात लवकर सरकारी नोकरी मिळवता येते. ग्रामीण डाक सेवक हे पद मिळवणे अनेक तरुणाचे स्वप्न असते. यापदासाठी कुठही अभ्यास करायची गरज नसते. हे पद अत्यंत लोकप्रिय आणि बहुप्रतिक्षित पद मानले जाते.
ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevak) या पदासाठी लागणारी पात्रता, अभ्यासक्रम, शैक्षणिक पात्रता, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया याची सर्वस माहिती खालील लेखकामध्ये लिहिली आहे.
पोस्ट ऑफिस GDS म्हणजे काय?
Gramin Dak Sevak (GDS) म्हणजे भारतीय टपाल विभागांमधून ग्रामीण भागातील टपाल सेवा आणि बँकिंग व्यवहार सुरळीत चालण्यासाठी ग्रामीण डाक सेवक या पदाची नियुक्ती करण्यात येते.
GDS अंतर्गत प्रामुख्याने खालील ३ पदांचा समावेश होतो:
- शाखा पोस्ट मास्तर ( (Branch Post Master) : शाखा पोस्ट मास्टर ग्रामपंचायतीच्या किंवा गावातील मुख्य पोस्ट ऑफिस चे व्यवस्थापन करणे आणि तिथला व्यवहार सांभाळणे यांच्याकडे असते.
- Assistant Branch Post Master (ABPM): पोस्ट मास्टर यांना कामात मदत करणे आणि तिकीट व स्टेशनरी विक्री करणे या कर्मचाऱ्याचे काम असते.
- Dak Sevak (डाक सेवक): गावातील नागरिकांच्या घरापर्यंत पत्र, पार्सल आणि मनीऑर्डर पोहोचवणे या कर्मचाऱ्याचे काम असते.
- टीप : वरील कुठल्याही पदासाठी लेखी किंवा मुलाखत परीक्षा घेतली जात नाही फक्त उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा.
पदाची प्रमुख कामे
ग्रामीण डाक सेवक Gramin Dak Sevak:-
शाखा पोस्ट मास्तर (Branch Post Master (BPM)) : कार्यालयीन व्यवस्थापन करणे, आर्थिक व्यवहार सांभाळणे, विमा सेवा आणि डिवाइस हाताळणी करणे हे काम शाखा पोस्ट मास्टर चे असते.
सहाय्यक शाखा पोस्ट मास्तर (Assistant Branch Post Master (ABPM)) : तिकीट व स्टेशनरी विक्री करणे, टपाल हाताळणी करणे, पत्रे किंवा पार्सल वितरण करणे व इतर कामे संयुक्त शाखा पोस्ट मास्टर चे हे काम असते.
शाखा पोस्ट मास्तर (Branch Post Master (BPM)) : कार्यालयीन व्यवस्थापन करणे, आर्थिक व्यवहार सांभाळणे, विमा सेवा आणि डिवाइस हाताळणी करणे हे काम शाखा पोस्ट मास्टर चे असते.
सहाय्यक शाखा पोस्ट मास्तर (Assistant Branch Post Master (ABPM)) : तिकीट व स्टेशनरी विक्री करणे, टपाल हाताळणी करणे, पत्रे किंवा पार्सल वितरण करणे व इतर कामे संयुक्त शाखा पोस्ट मास्टर चे हे काम असते.
डाक सेवक (Dak Sevak) : टपाल वितरण करणे, बँकिंग आणि विमा सेवा करणे, गावातील पोस्ट बॉक्स व्यवस्थापन करणे हे डॉग सेवक या कर्मचाऱ्यांचे काम असते.
शैक्षणिक पात्रता (Educatoinal Qualification)
ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevak) या पदासाठी खालील शैक्षणिक पात्रता आणि अटी सविस्तर दिले आहेत:
- उमेदवार १० वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
- उमेदवारांनी १० वी मध्ये गणित (Mathematics), स्थानिक भाषा (Local Language) आणि इंग्रजी या विषयाचा अभ्यास दहावी मध्ये केलेला असावा.
- उमेदवार ज्या राज्यासाठी किंवा विभागासाठी अर्ज करत आहे तिथल्या स्थानिक भाषेचे ज्ञान असणे बंधनकारक आहे.
- सर्वात महत्त्वाचे उमेदवाराला कम्प्युटर किंवा स्मार्टफोन हातळण्याचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यकते आहे.
- उमेदवाराला सायकल चालवता येणे आवश्यक आहे.
टीप : उमेदवाराला कुठल्याही प्रकारचे प्राधान्य दिले जात नाही उमेदवार १० वी असो किंवा १२ वी उत्तीर्ण असो उमेदवाराची निवड ही १० वीच्या गुणावरच केली जाते.
वयोमर्यादा (Age limit)
ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevak) या पदाचा अर्थ करण्यासाठी उमेदवाराचे वय हे खालील दिलेल्या कटिंग मध्ये असावे.
किमान वय : १८ वर्षे
कमाल वय : ४० वर्षे
| प्रवर्ग (Category) | वयोमर्यादेत मिळणारी सवलत | कमाल वयोमर्यादा |
| SC / ST | ५ वर्षे | ४५ वर्षे |
| OBC (इतर मागासवर्ग) | ३ वर्षे | ४३ वर्षे |
| PwD (दिव्यांग उमेदवार) | १० वर्षे | ५० वर्षे |
| PwD + OBC | १३ वर्षे | ५३ वर्षे |
| PwD + SC/ST | १५ वर्षे | ५५ वर्षे |
| EWS (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) | कोणतीही सवलत नाही |
निवड प्रक्रिया
ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevak) या पदाची निवड प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि डिजिटल असतो. खालील प्रमाणे सविस्तर माहिती पाहूया.
ऑनलाइन अर्ज
- उमेदवाराला सर्वप्रथम इंडिया पोस्टच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी लागते.
- अर्ज करत असताना उमेदवाराला त्याच्या १० विचार गुणाची नोंदणी ही अचूक पद्धतीने करावी लागते.
- यानंतर उमेदवाराला आपल्या आवडीचा विभाग किंवा राज्य निवडायचा असतो.
- तुम्ही जितके जास्त पर्याय निवडाल नोकरी मिळण्याची शक्यता तितकीच जास्त होईल.
- या पदाचे वेळोवेळी अपडेट पाहण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी पुढील लिंक पहावी : indiapostgdsonline.gov.in
संगणकीय गुणवत्ता यादी (Automated Merit List)
- अर्ज भरल्यानंतर उमेदवारांनी भरलेल्या १० वीच्या गुणाच्या टक्केवारी वर कॉम्प्युटर द्वारे स्वयंचलित मेरिट लिस्ट लागते.
- १० वी मध्ये ज्या उमेदवारांना जास्त गुण मिळाले आहेत त्यांना प्राधान्य दिले जाते.
- एखाद्या वेळ दोन उमेदवारांना सारखे मार्क्स असतील तर या स्थितीमध्ये जो उमेदवार वयाने मोठा आहे त्याला प्राधान्य दिले जाते.
कागदपत्र पडताळणी (Document Verification – DV)
- १० वीचे गुणपत्रिका आणि बोर्ड प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला
- जातीचे प्रमाणपत्र Caste Certificate – लागू असेल तर
- ईडब्ल्यूएस (EWS) प्रमाणपत्र – लागू असेल तर
- संगणक साक्षरता प्रमाणपत्र
- दिव्यांग प्रमाणपत्र (दिव्यांग उमेदवारांसाठी)
अंतिम निवड आणि नियुक्ती (Final Selection & Appointment)
- कागदपत्रे पडतानी करून झाल्यानंतर उमेदवाराला वैद्यकीय तपासणी आणि इतर औपचारिकता पूर्ण करणे अनिवार्य आहे.
- सर्व प्रक्रिया यशस्वी रित्या पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराला नियुक्ती पत्र देण्यात येते ठराविक ट्रेनिंग नंतर कामावर रुजू करून घेण्यात येते.
पगार
ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevak) या पदासाठी लागणारा पगार हा खालील प्रमाणे अंदाजे देण्यात आला आहे.
| पद (Post) | किमान मासिक वेतन (४ तास काम) | कमाल मासिक वेतन (५ तास काम) |
| BPM (Branch Post Master) | १२,००० | २९,३८० |
| ABPM (Assistant Branch Post Master) | १०,००० | २४,४७० |
| Dak Sevak (डाक सेवक | १०,००० | २४,४७० |
परीक्षेसाठी तयारी कशी करावी ?
ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevak) या पदासाठी अभ्यास सोबतच इतर महत्त्वाच्या गोष्टी खालील प्रमाणे आहेत.
- १० वी मध्ये चांगले गुण मिळवावेत कारण या पदाची निवड पूर्णपणे मेरीटवर असते.
- अर्ज करताना 10 वीचे गुण जे आहे तेच लिहावे.
- तुमच्या आजूबाजूच्या विभागांमध्ये मागील वर्षी किती टक्केवारीला निवड झाली होती हे पहा.
- तुमच्या प्रवर्गानुसार कोणत्या पोस्ट ऑफिस मध्ये जागा आहे ते पाहून तिथे अर्ज भरा.
- विभागाची निवड करताना एक किंवा दोन पर्याय न निवडता जास्तीत जास्त गावाचे नाव द्या ज्यामुळे निवड होण्याची शक्यता वाढून येते.
- लागणारी सर्व कागदपत्रे काढून घ्या. (१० वीची गुणपत्रिका, जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate) आणि नॉन क्रिमीलेअर (Non-Creamy Layer)
- संगणकाचे ज्ञान या परीक्षेसाठी काही ठिकाणी महत्त्वाचे मानले जाते.
- महाराष्ट्रातून अर्ज करत असाल तर १० वीमध्ये तुमची मराठी भाषा असणे अनिवार्य आहे मराठी भाषा तुम्हाला लिहिता वाचता आणि बोलता येणे अनिवार्य आहे.
- या पदासाठी विशेष 10 गावागावांत जाऊन पत्र किंवा पार्सल वितरण करावे लागतो त्यामुळे उमेदवाराला सायकल चालवता येणे बदलकारक आहे.

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : सध्या नवीन पोस्ट ऑफिस GDS भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. या लेखामधील माहिती ही मागील भरती प्रक्रिया, अधिकृत नियम आणि उपलब्ध माहितीनुसार मार्गदर्शनाच्या उद्देशाने देण्यात आली आहे.
पात्रता, वयोमर्यादा, पगार, निवड प्रक्रिया आणि इतर नियमांमध्ये भविष्यात बदल होऊ शकतात. त्यामुळे कोणतीही भरती जाहीर झाल्यानंतर अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.
भारतीय टपाल विभागाकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात GDS पदांची भरती केली जाते. त्यामुळे येत्या काही महिन्यांत रिक्त पदांनुसार नवीन भरती प्रक्रिया जाहीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर सविस्तर माहिती स्वतंत्रपणे अपडेट करण्यात येईल.
तुम्ही येथे “अंगणवाडी सेविका 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/anganwadi-worker-2026/