How to Become a Gramsevk ? ग्रामसेवक भरतीची तयारी कशी करावी? 2026 Best मार्गदर्शक

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

How to Become a Gramsevk? :- ग्रामीण भागातील सुधारणा करण्यात आणि शासनाकडून सुरू झालेल्या योजना ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचवण्यात सर्वात मोठी भूमिका हे ग्रामसेवकाची असते. जर तुम्हाला २०२६ मध्ये ग्रामसेवक या पदाचा अभ्यास करायचा असेल योग्य पुस्तके, योग्य अभ्यासासाठी मार्गदर्शक, पेपर कोणत्या प्रकारचा असतो कोणते प्रश्न विचारले जातात याची सर्व माहिती खालील लेखकामध्ये दिली आहे. आजच्या काळात स्पर्धा परीक्षेच्या तयारीला योग्य दिशा मिळाली तर यश मिळवणे अवधी सोपे होते. ग्रामसेवक के ग्रामीण भागातील अत्यंत महत्त्वाचे आणि मानाचे पद मानले जाते. जर तुमचे शालेय शिक्षण मराठी मधून झाले असेल तर या पदाची परीक्षा पास करणे तुमच्यासाठी सोपे जाईल. जे तुम्हाला ही ग्रामसेवक या पदाची तयारी करायची असेल खालील माहिती तुमच्यासाठीच आहे:

गावाचा कारभार चालवण्यासाठी आणि गावातील सरपंचाला गावाचा विकास करण्यासाठी मदत करणे हे ही ग्रामसेवकाचे काम असते. ग्रामसेवकाची नियुक्ती जिल्हा परिषदे मार्फत केली जाते ग्रामसेवक हा Class 3 – वर्ग ३ चा कर्मचारी म्हणून ओळखला जातो.

ग्रामसेवक होण्यासाठी पात्रता

  • कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठातून ५५% गुणांसह पदवी उत्तीर्ण असणे. किंवा
  • शासन मान्य संस्थेची तीन वर्षाची कृषी पदविका अथवा B.Sc. Agriculture / B.Tech Agriculture कृषी पदवी असणे आवश्यक आहे
  • तीन वर्षाची सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
  • संगणक क्षेत्रातील MS-CIT चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे
  • मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य आहे
  • 10वी किंवा 12 वीच्या परीक्षेत मराठी हा विषय असणे अनिवार्य आहे
  • खुला प्रवर्ग (General/Open) : १८ वर्षे ३८ वर्षे
  • मागासवर्गीय (OBC/SC/ST/VJNT/SBC) : १८ वर्षे ४३ वर्षे (५ वर्षांची सवलत)
  • खेळाडू/दिव्यांग/अनाथ उमेदवार : १८ वर्षे ४५ वर्षांपर्यंत सवलत
  • माजी सैनिक (Ex-Servicemen) : १८ वर्षे सेवा काळ + ३ वर्षे

ग्रामसेवक भरती प्रक्रिया

How to Become a Gramsevk? :- ग्रामसेवक भरती हे जिल्हा परिषद निवड मंडळामार्फत राबविण्यात येते. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडते, संपूर्ण प्रक्रिया खालील टप्प्यांमध्ये दिलेली आहे:

  • १. सर्वात अगोदर तुम्ही जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अधिकृत पोर्टल द्वारे जाहिरात प्रसिद्ध केली जाते.
  • पात्र उमेदवारांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करावा लागतो.
  • अर्ज ऑनलाइन अपलोड करतानी उमेदवाराचा फोटो, स्वाक्षरी आणि शिक्षण पात्रता स्कॅन करून अपलोड करावी लागतात.
  • प्रवर्गानुसार ठरवून दिलेल्या परीक्षा शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावी लागते.
  • २. परीक्षेची पद्धत ही पूर्णतः ऑनलाइन संगणकावर असते.
  • सर्व प्रश्न हे MCQs स्वरूपाचे असतात.
  • एकूण परीक्षेचे गुण 200 असतात. (प्रत्येक प्रश्न २ गुणाचा असतो)
  • परीक्षेत विचारले जाणारे विषय: मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बुद्धिमत्ता व अंकगणित आणि तांत्रिक घटक असे असतात
  • ३. कागदपत्राची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर जिल्हा निवड समिती अंतिम निवड यादी आणि परीक्षा यादी जाहीर करते.
  • निवड झालेल्या प्रत्येक उमेदवारांना गुणाच्या क्रमांकानुसार आणि त्यांच्या आवडीक्रमानुसार संबंधित जिल्हा परिषदेत अंतर्गत गावामध्ये ग्रामसेवक होण्यासाठी नियुक्ती पत्र पाठवण्यात येते.

टीप: ग्रामसेवक पदासाठी कुठल्याही प्रकारची मुलाखत (Interview) घेण्यात येत नाही फक्त लेखी परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवणे हा एकमेव मार्ग आहे.

ग्रामसेवक परिक्षेसाठी अभ्यासक्रम (Syllabus)

ग्रामसेवक परीक्षा पास करण्यासाठी परीक्षेचा अभ्यासक्रम हा ५ विभागांमध्ये विभागलेला असतो: मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता व अंकगणित आणि तांत्रिक घटक:

  • मराठी: व्याकरण (शब्दांच्या जाती (नाम, सर्वनाम, विशेषण इ.), काळ व काळाचे प्रकार, संधी, प्रयोग, समास, अलंकार)
  • शब्दसंग्रह (समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, लिंग व वचन बदलणे, शब्दसमूहाबद्दल एक शब्द)
  • प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक (मराठी साहित्यातील महत्त्वाचे ग्रंथ, पुस्तके आणि त्यांचे लेखक/कवी.)
  • म्हणी व वाक्प्रचार आणि उतारा
  • इंग्रजी : ​Grammar (Parts of Speech, Tenses, Active & Passive Voice, Direct & Indirect Speech, Degree, Clauses, Punctuation)
  • Vocabulary (Synonyms, Antonyms, One-word Substitutions, Spelling Check)
  • Idioms & Phrases (Meaning and usage of common idioms)
  • Sentence Structure (Common Errors, Sentence Correction, Fill in the blanks)
  • Comprehension (Questions based on an English passage)
  • सामान्य ज्ञान : चालू घडामोडी (राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि विशेषतः महाराष्ट्रातील महत्त्वाच्या चालू घडामोडी, क्रीडा, पुरस्कार आणि शासकीय योजना)
  • महाराष्ट्राचा इतिहास
  • महाराष्ट्राचा भूगोल (नदीप्रणाली, हवामान, मृदा, पिके, जिल्हे, खनिज संपत्ती आणि राष्ट्रीय उद्याने)
  • भारतीय राज्यघटना (घटनेची मूलभूत वैशिष्ट्ये, मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्वे, राष्ट्रपती, संसद)
  • पंचायतराज (७३ वी घटनादुरुस्ती, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांची रचना, अधिकार व कार्ये)
  • बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित : अंकगणित (संख्या व संख्यांचे प्रकार, अपूर्णांक, सरासरी, टक्केवारी, नफा-तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, काळ-काम-वेग)
  • बुद्धिमत्ता चाचणी (सांकेतिक भाषा (Coding-Decoding), नातेसंबंध (Relations), दिशा ज्ञान (Direction Sense), विसंगत घटक ओळखणे, कोडी (Puzzles) आणि आकृत्यांवर आधारित प्रश्न)
  • तांत्रिक घटक (Technical Subject – कृषी व समाजशास्त्र) : कृषी विद्या (विविध पिके, पिकांचे वाण (Varieties), फलोत्पादन (Horticulture), आणि शेतीची अवजारे)
  • ​मृदा व जलसंधारण (मातीचे प्रकार, जमिनीची धूप, खते (सेंद्रिय व रासायनिक), आणि सिंचनाच्या पद्धती (ठिबक, तुषार सिंचन))
  • पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय (गाई, म्हशी, शेळ्या-मेंढ्यांच्या प्रमुख जाती आणि त्यांचे संगोपन.)
  • ग्रामीण अर्थव्यवस्था व समाजशास्त्र (ग्रामीण भागातील समस्या, विविध ग्रामीण विकास योजना (उदा. मनरेगा, घरकुल योजना), आणि समाजशास्त्र विषयक मूलभूत ज्ञान.)
  • एकूण प्रश्न १०० असतात
  • एकूण गुण २०० असतात
  • प्रत्येकी प्रश्न २ गुणाचा असतो
  • एकूण वेळ ९० ते १२० मिनिटे (१.५ ते २ तास)

ग्रामसेवक पदासाठी पुस्तके (Books)

ग्रामसेवक कसे व्हायचे ? ( How to Become a Gramsevk ?) पुढील पुस्तकांचा अभ्यास करा तुम्ही लवकरात लवकर ग्रामसेवक म्हणून लागू शकतात:

  • मराठीसाठी : मो. रा. वाळंबे आणि बाळासाहेब शिंदे
  • इंग्रजीसाठी : बाळासाहेब शिंदे आणि एम. जे. शेख
  • बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित : पंढरीनाथ राणे आणि अनिल अंकलगी किंवा सचिन ढवळे
  • सामान्य ज्ञान आणि पंचायतराज : एकनाथ पाटील आणि परिक्रमा मासिक किंवा ‘सिम्पलीफाईड’ चालू घडामोडी (युवा अकॅडमी).
  • तांत्रिक घटक : ज्ञानदीप अकॅडमी (महेश शिंदे) आणि डॉ. हरीदास भदाणे , विकास शिंगाडे ( कृषी सेवक / ग्रामसेवक तांत्रिक डायरी)

ग्रामसेवक भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

जर तुम्हाला ग्रामसेवक व्हायचे असेल तर (How to Become a Gramsevk) खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे

  • आधार कार्ड
  • मतदार ओळखपत्र नसेल तर शासकीय ओळखपत्र
  • रहिवासी दाखला (Domicile Certificate)
  • १० वी व १२ वीची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र
  • पदवी प्रमाणपत्र (Degree Certificate)
  • पदवीची अंतिम गुणपत्रिका (Mark sheet)
  • कृषी किंवा तांत्रिक पदविका (असेल तर)
  • MS-CIT प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
  • नॉन-क्रीमी लेयर (Non-Creamy Layer Certificate)
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS प्रवर्गातून अर्ज करत असाल, तर त्याचे वैध प्रमाणपत्र)
  • एक कागदपत्रे असेल तर द्यावित : दिव्यांग प्रमाणपत्र, खेळाडू प्रमाणपत्र, ​माजी सैनिक प्रमाणपत्र, अनाथ प्रमाणपत्र, नाम बदल असल्यास
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • स्वाक्षरी (Signature
How to Become a Gramsevk feature image
How to Become a Gramsevk ? पूर्ण माहिती

ग्रामसेवक ला किती पगार मिळतो ?

वेतनाचा घटकअंदाजे रक्कम
पे बँड (Pay Matrix)२५,५०० ते ८१,१००
मूळ पगार (Basic Pay)२५,५०० (Starting)
महागाई भत्ता (DA)१३,५००+ (सध्याच्या शासकीय दरानुसार)
प्रवास व इतर भत्ते१,५०० ते २,५००
घरभाडे भत्ता (HRA)२,५०० ते ६,०००
एकूण ढोबळ वेतन४३,००० ते ४८,०००+

ग्रामसेवकाचे कामे

  • केंद्र आणि राज्य सरकारने ग्रामीण भागातील नागरिकांसाठी तयार केलेल्या योजना हा प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचवणे.
  • गावात जन्म मृत्यू आणि विवाह या सण गोष्टीची अधिकृत नोंदी ठेवणे आणि त्याचे प्रमाणपत्र देणे.
  • गावातील ग्रामसभा आणि मासिक बैठकीचे आयोजन करणे.
  • गावातील सर्व गोष्टींचा हिशोब ठेवणे म्हणजेच घरपट्टी, पाणीपट्टी आणि ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचा व खर्चाचा हिशोब ठेवणे.
  • गावातील रस्ते करणे,दिवे, पाणीपुरवठा याची पाहणी करणे आणि अशा विकासकामांचा अहवाल गट विकास अधिकारी यांच्याकडे सादर करणे.

पुढील दिलेल्या लिंकमध्ये ग्रामसेवक पदाची संपूर्ण माहिती मिळवून जाते: rdd.maharashtra.gov.in

येथे तुम्ही “तलाठी कसे व्हायचे” त्याची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/how-to-become-a-talathi/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!