भारतीय सैन्य क्रीडा कोटा भरती 2026 (Indian Army Sports Quota Recruitment) ही भरती प्रक्रिया भारतातील सैन्य दलाने क्रीडा संस्कृतीला महत्व देण्यासाठी आणि देशातील हुशार खेळाडूंना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्पोर्ट्स कोटा भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.
ही भरती प्रक्रिया राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवणाऱ्या खेळाडूंसाठी महत्त्वाचे व्यासपीठ आहे कारण हवलदार आणि नायक सुभेदार या पदांसाठी ही भरती आहे. या भीतीचे अर्ज हे 10 जुलै 2026 या तारखेपर्यंत मागवले जाणार आहे.
या भरती मधून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळव खेळाडूंसाठी वर्दी परिधान करण्याची ही एक सुवर्णसंधी चालून आली आहे. जर तुम्हाला या भरतीचा अर्थ करायचा असेल तर यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा, वेतन, अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रिया त्याची सर्व सविस्तर माहिती खालील लेखामध्ये दिली आहे.
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
भारतीय सैन्य क्रीडा कोटा भरती 2026 (Indian Army Sports Quota Recruitment) या योजनेचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे खालील दिलेल्या शैक्षणिक पात्रता असणे अनिवार्य आहे.
हवालदार पदासाठी
- उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी 10 वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
- बोर्डाने मान्यता दिलेल्या मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून 10 वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
नायब सुभेदार पदासाठी
- उमेदवाराचे शिक्षण 10 वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
- या पदासाठी 10 उत्तीर्ण असेल तरीही उमेदवारांची क्रीडा कामगिरी (Sports Achievements) तपासणी जाते.
वयोमर्यादा (Age) हवालदार आणि नायब सुभेदार पदासाठी १७½ ते २५ वर्षे
आवश्यक कागदपत्रे (Required Documets)
भारतीय सैन्य क्रीडा कोटा भरती 2026 (Indian Army Sports Quota Recruitment) या योजनेचा अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या आवश्यक कागदपत्रे उमेदवाराकडे असणे अनिवार्य आहे.
- 10 वी उत्तर असलेले गुणपत्रक आणि प्रमाणपत्र
- पदवी किंवा पदव्युत्तर पूर्ण असेल तर त्याचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र.
- तुमच्या स्पर्धेमध्ये जिंकला आहात त्याची पदके आणि मूळ प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
- स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याचे अधिकृत प्रमाणपत्र असणे फायदेशीर ठरते.
- तुमच्या खेळाच्या कामगिरीचे प्रमाणित रेकॉर्ड असणे आदर्श आहे
- ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स.
- रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate):
- जन्म दाखला (Birth Certificate) पाहण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला किंवा दहावीचे प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- अविवाहित प्रमाणपत्र (Unmarried Certificate)
- चारित्र्य प्रमाणपत्र (Character Certificate) (सरपंच किंवा स्थानिक पोलीस प्रशासनाकडून सहा महिन्या खालचे प्रमाणपत्र)
- पोलीस पडताळणी अहवाल (Police Verification Report)
वेतन (Salary)
भारतीय सैन्य क्रीडा कोटा भरती 2026 (Indian Army Sports Quota Recruitment) या भरतीतील विविध पदांसाठी वेतन खालील प्रमाणे देण्यात आली आहे.
| पदाचे नाव | पे लेव्हल | मूळ वेतन श्रेणी |
| हवालदार (Havildar) | लेव्हल ५ / ६ | 29,200– 92,300 |
| नायब सुभेदार (Naib Subedar) | लेव्हल ६ | 35,400-1,12,400 |
इतर सुविधा :
इतर दरापेक्षा स्वस्त दरामध्ये जीवनावश्यक वस्तू मिळतील.
स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी ECHS (Ex-Servicemen Contributory Health Scheme) या अंतर्गत मोफत उपचार मिळेल.
अरे मी ग्रुप इन्शुरन्स फंड या अंतर्गत विमा संरक्षण भेटेल.
निवृत्तीनंतरही नियमानुसार अजीवन पेन्शन मिळत राहील.
अर्ज प्रक्रिया (How to Apply)
भारतीय सैन्य क्रीडा कोटा भरती 2026 (Indian Army Sports Quota Recruitment) या योजनेचे अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑफलाइन आहे याची सर्व माहिती खालील प्रमाणे पाहू शकता:
- सर्वप्रथम भारतीय सैन्याच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या joinindianarmy.nic.in यानंतर या भरतीचे अधिकृत जाहिरात आणि अर्ज नमुना डाऊनलोड करून घ्या.
- त्यानंतर अर्जाचा नमुना ए ४ आकाराच्या कागदावर प्रिंट करा आणि सर्व माहिती नाव, जन्मतारीख, आधार नंबर, पत्ता, क्रीडा प्रकार आणि शैक्षणिक पात्रता अचूक पद्धतीने भरा.
- प्रशांत मध्ये नमूद केलेली सर्व कागदपत्रे योग्य आकारामध्ये आणि स्पष्ट दिसतील अशी जोडा आणि सोबत पासपोर्ट साईज फोटो पण जोडा.
- टीप : अर्जासोबत मूळ कागदपत्रे जोडू नका ची फक्त निवड प्रक्रियेच्या वेळी सोबत ठेवावी लागतात.
- तुमचं पूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर एका लिफाफ्यामध्ये टाका.
- लिफाफ्याच्या वर मोठ्या अक्षरांमध्ये APPLICATION FOR SPORTS QUOTA RECRUITMENT – 2026 असं स्पष्ट दिसेल असं लिहा.
- हा अर्ज नंदिनी कृत पोस्टर द्वारे किंवा स्पीड पोस्ट द्वारे संबंधित पदावर पाठवावा लागतो.
- पत्ता : जाहिरातीमध्ये दिलेल्या ‘आर्मी स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड’ (Army Sports Control Board) किंवा संबंधित रेजीमेंटल सेंटरच्या पत्त्यावर अर्ज पाठवावा लागेल.
महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखामध्ये दिलेली भारतीय सैन्य क्रीडा कोटा भरती 2026 संबंधी माहिती ही अधिकृत भरती अधिसूचना व उपलब्ध अधिकृत स्रोतांच्या आधारे तयार करण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पात्रता, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, क्रीडा पात्रता, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि इतर सर्व अटी अधिकृत जाहिरात व अधिकृत संकेतस्थळावरून काळजीपूर्वक तपासाव्यात. भरती प्रक्रियेत वेळोवेळी बदल होऊ शकतात. अशा कोणत्याही बदलांसाठी किंवा माहितीतील त्रुटींसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. अंतिम व अधिकृत माहितीला प्राधान्य द्यावे.
तुम्ही येथे “GMCH रायगड मध्ये भरती 2026 ” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/gmch-recruitment-2026/