MPSC Recruitment 2026 : नमस्कार मित्रांनो, सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही भरती तुमच्यासाठीच आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत रिक्त असलेल्या पदांसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या राज्यातील सर्व तरुणांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक अत्यंत आणि महत्त्वाची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये 2,619 एकूण रिक्त पदांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली असून त्याबाबतचे अधिकृत शुद्धीपत्रक 6 नोव्हेंबर 2026 रोजी जारी करण्यात आले आहे. या भरती बद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी तुम्ही खालील संपूर्ण लेख वाचावा.
या भरती प्रक्रियेमध्ये लिपिक-टंकलेखक (३,१६६ पदे), ग्राम महसूल अधिकारी – तलाठी (१,८४० पदे), अधिपरिचारिका (३,९११ पदे), सहायक कृषि अधिकारी (१,२०३ पदे) तसेच शिल्प निदेशक (१,३८८ पदे) अशा प्रकारच्या महत्त्वाच्या आणि मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या पदांचा समावेश यामध्ये आहे.

MPSC Recruitment 2026: शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
महाराष्ट्रात लोकसेवा आयोग पूर्व परीक्षा 2026 यामधील विविध पदांवर शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे :
- लिपिक-टंकलेखक (Clerk-Typist) / कर सहायक (Tax Assistant):
- या पदासाठी कोणतेही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे सोबतच मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. गतीचे प्रमाणपत्र
- ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) / इतर सामान्य पदे
- या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेमध्ये पदवी असणे आवश्यक आहे.
- सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI):
- माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) उत्तीर्ण.
- ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील ३ वर्षांची पदविका (Diploma) किंवा उच्च अर्हता.
- वैध जड वाहन चालविण्याचा परवाना (Driving Licence).
- अधिपरिचारिका (Staff Nurse):
- या पदासाठी जीएनएम (GNM) डिप्लोमा किंवा बीएससी नर्सिंग (BSc Nursing) किंवा पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग पदवी उमेदवाराकडे असावी सोबतच महाराष्ट्र परिचर या परिषदेकडे नोंदणी केलेली आवश्यक आहे.
- सहायक कृषी अधिकारी / पशुधन पर्यवेक्षक:
- या पदासाठी संबंधित क्षेत्र ट्रेडर नुसार कृषी किंवा पशुसंवर्धन विषयांमधील पदवी/पदविका
- तांत्रिक पदे (उदा. उद्योग निरीक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, कनिष्ठ रसायनी, शिल्प निदेशक इ.):
- या पदासाठी संबंधित शाखेतील अभियांत्रिकी पदवी/पदविका किंवा विज्ञान शाखे मधील पदवी उदाहरणारा रसायनशास्त्र , भौतिकशास्त्र
MPSC Recruitment 2026: आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा साठी आणि सामान्यतः शासकीय भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराकडे खालील प्रमाणे आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक ठरते.
- ओळख पटवण्यासाठी अधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, किंवा इतर कोणतेही मूळ ओळखपत्र.
- वयाचा पुरावा पाहण्यासाठी शाळा सोडण्याचा दाखला किंवा जन्म दाखला.
- पदवी/पदविका प्रमाणपत्रे आणि गुणपत्रके (10 वी, 12वी)
- जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
- जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate)
- नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate)
- अलीकडील पासपोर्ट साईझ फोटो (Passport Size Photo)
- डिजिटल स्वाक्षरी (Scanned Signature)
TIFR मुंबई भरती २०२६ : https://totalnaukri.com/tifr-mumbai-recruitment-2026/
MPSC Recruitment 2026: संयुक्त पूर्व परीक्षा (Combined Prelims Exam):
- एकूण गुण: १०० गुण
- एकूण प्रश्न: १०० वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
- वेळेचा अवधी: १ तास (६० मिनिटे)
- माध्यम: मराठी आणि इंग्रजी (मराठी व्याकरण वगळता)
- नकारात्मक गुणदान (Negative Marking): चुकिच्या उत्तरांसाठी एकूण गुणांच्या १/४ (२५%) गुण वजा केले जातात.
- पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम व विषय:
- चालू घडामोडी (जागतिक व राष्ट्रीय)
- नागरिकशास्त्र (राज्यघटना, पंचायत राज इ.)
- इतिहास (विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास)
- भूगोल (महाराष्ट्राचा भौतिक, सामाजिक व आर्थिक भूगोल)
- अर्थव्यवस्था (भारतीय अर्थव्यवस्था, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, शासकीय योजना इ.)
- सामान्य विज्ञान (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र)
- बुद्धिमत्ता चाचणी व गणित (अंकगणित व तर्कशुद्ध विचार)
- मुख्य परीक्षा
- पेपर १: संयुक्त पेपर (सर्व पदांसाठी):
- विषय: मराठी (५० प्रश्न / १०० गुण) आणि इंग्रजी (५० प्रश्न / १०० गुण).
- एकूण गुण: २०० गुण, वेळेचा अवधी: १ तास.
- पेपर २: पदनिहाय तांत्रिक किंवा सामाईक पेपर:
- विषय: सामान्य बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित आणि संबंधित पदाच्या अर्हतेनुसार तांत्रिक/व्यावसायिक विषय.
- एकूण गुण: २०० गुण, प्रश्न: १०० प्रश्न, वेळेचा अवधी: १ तास.
- टीप: या पेपरमध्येही १/४ नकारात्मक गुणदान लागू असते.
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
MPSC Recruitment 2026: महत्त्वाच्या तारखा:
- शुद्धीपत्रकाचा दिनांक: ६ नोव्हेंबर, २०२६ (ज्याद्वारे रिक्त पदांची संख्या वाढवून १६,७१७ करण्यात आली आहे).
- मूळ जाहिरात प्रसिद्ध झाल्याचा दिनांक: २५ जून, २०२६ (या जाहिरातीद्वारे सुरुवातीला २,६१९ पदे भरण्यात येणार होती).
- यापूर्वीचे पहिले शुद्धीपत्रक: २२ जुलै, २०२६.
MPSC Recruitment 2026: MPSC गट-क भरती 2026 – FAQ
1. MPSC गट-क भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत? या भरतीअंतर्गत एकूण 16,717 पदे जाहीर करण्यात आली आहेत.
2. MPSC गट-क भरतीसाठी अर्ज कधी सुरू झाले? 13 नोव्हेंबर 2026 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे? 27 नोव्हेंबर 2026 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
4. MPSC गट-क भरतीसाठी अर्ज कुठे करायचा? उमेदवारांना MPSC Online या अधिकृत पोर्टलवरून अर्ज करता येईल.
5. या भरतीमध्ये कोणती पदे समाविष्ट आहेत? लिपिक-टंकलेखक, अधिपरिचारिका, तलाठी, शिल्प निदेशक, सहाय्यक कृषी अधिकारी आणि इतर पदांचा समावेश आहे.
टीप: अर्ज करण्यापूर्वी MPSC चे अधिकृत शुद्धिपत्रक वाचून पदसंख्या, पात्रता आणि अर्जाच्या तारखा तपासा.

महत्त्वाची सूचना : MPSC गट-क भरती 2026 संदर्भातील पदसंख्या व इतर तपशील 6 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या शुद्धिपत्रकानुसार देण्यात आले आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेली मूळ जाहिरात व शुद्धिपत्रक काळजीपूर्वक वाचावे. पदांची संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्जासंबंधित नियमांची खात्री करूनच अर्ज करावा.