Mumbai Port Authority Sports Club Recruitment 2026 : मुंबई पोर्ट अथॉरिटी स्पोर्ट्स क्लब भरती 2026 | खेळाडूंसाठी Best संधी

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Mumbai Port Authority Sports Club Recruitment 2026 : मुंबई पोर्ट अथॉरिटी स्पोर्ट्स क्लब कडून खेळाडूंसाठी एक अत्यंत सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. भारत देशांमधील होतकरू आणि गुणवान क्रीडाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या क्रीडा कौशल्याला योग्य चालना देण्यासाठी ही एक महत्त्वाची संधी आहे. ॲथलेटिक्स, क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, कबड्डी, व्हॉलीबॉल यांसारख्या विविध प्रमुख खेळांमध्ये स्पोर्ट्स ट्रेनिज या पदासाठी कंत्राटी भरती निघाली असून.

इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज मागवण्यात आली आहेत. या भरती प्रक्रियामुळे क्रीडा क्षेत्रामधील तरुणांना व्यावसायिक वातावरणामध्ये प्रशिक्षण घेण्याची आणि आपल्या खेळाचा स्तर उंचावण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्र, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया याची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे आहे.

  • महत्त्वाच्या तारखा आणि एकूण जागा
    • ​अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३१ ऑगस्ट २०२६
    • ​कामाच्या दिवशी अर्ज स्वीकारण्याची वेळ: सकाळी ११:०० ते संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंत
    • एकूण जागा : 54

Mumbai Port Authority Sports Club Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

मुंबई पोर्ट ऑथॉरिटी स्पोर्ट्स क्लबच्या भरती 2026 या भरतीसाठी लागणारे शैक्षणिक पात्रतेचा भागांचे पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत:

  • आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व.
  • ​राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व.
  • ​राज्य स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व.
  • ​राष्ट्रीय किंवा विद्यापीठ स्पर्धेत संयुक्त विद्यापीठ संघाचे प्रतिनिधित्व.
  • ​विद्यापीठ क्रीडा नियंत्रण मंडळाद्वारे आयोजित आंतर-विद्यापीठ स्पर्धेत विद्यापीठाचे प्रतिनिधित्व.
  • ​क्रिकेटसाठी: ‘अ’ डिव्हिजन स्पर्धेत किमान मैदानावर (Maidan) किंवा कॉर्पोरेट क्लबचे प्रतिनिधित्व.
  • ​हॉकी, फुटबॉल, कबड्डी आणि व्हॉलीबॉलसाठी: किमान सुपर किंवा एलिट डिव्हिजनमध्ये प्रतिनिधित्व.

Mumbai Port Authority Sports Club Recruitment 2026 : वयोमर्यादा

तपशीलवयोमर्यादा
किमान वय१ सप्टेंबर २०२६ रोजी किमान १८ वर्षे पूर्ण
कमाल वय३० जून २०२७ रोजी जास्तीत जास्त २५ वर्षे
वयात सवलतकोणतीही उच्च किंवा निम्न वयोमर्यादा शिथिलता (Age Relaxation) दिली जाणार नाही

Mumbai Port Authority Sports Club Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

मुंबई पोर्ट अथॉरिटी स्पोर्ट्स क्लब भरती 2026 या भरतीसाठी अर्ज करत असताना उमेदवारांकडे खालील कागदपत्रांची यादी असणे फायदेशीर ठरू शकते.

  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
  • पॅन कार्ड
  • संबंधित क्रीडा प्रकारातील सहभागाची आणि कामगिरीची प्रमाणपत्रे (आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य, जिल्हा, विद्यापीठ किंवा संबंधित विभाग स्तरावरील सहभागाची प्रमाणपत्रे)

मानधन – Salary

सुविधारक्कम
विद्यावेतन (Stipend)दरमहा २०,०००/- रुपये
किट आणि गियर (Kit & Gear)१०,०००/- रुपये (एकदाच दिली जाईल)
निवासव्यवस्था (Accommodation)पोर्ट क्वार्टरमध्ये मोफत (शेअरिंग आधारावर)
वैद्यकीय आणि अपघात विमा (Mediclaim & Accident Insurance)वार्षिक ७,५००/- रुपये

अर्ज प्रक्रिया – How to Apply

मुंबई पोर्ट ऑथॉरिटी स्पोर्ट्स क्लब भरती 2026 या भरतीची अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.

  • सर्वप्रथम अर्ज मुंबई पूर्ण अथॉरिटी स्पोर्ट्स क्लबच्या कार्यालयांमधून (तिसरा मजला, इम्पीरियल चेंबर्स, एस.एस. टॅलोनी मार्ग, न्यू कस्टम हाऊसच्या समोर, बॅलार्ड स्टेट, मुंबई – ४०० ००१) कामाच्या दिवशी सकाळी ११:०० ते संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंत २००/- रुपये शुल्क भरून मिळवता येईल.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येतो. http://www.mumbaiport.gov.in
  • अर्जुन शुल्क २००/- रुपयांचा डिमान्ड ड्राफ्ट (Demand Draft) “Mumbai Port Trust Sports Club” या नावाने काढणे अनिवार्य असते.
  • अर्ज पूर्णपणे व्यवस्थित भरलेला २००/- रुपयांचा डिमान्ड ड्राफ्ट आणि सर्व आवश्यक कागदपत्रे एका फाईलमध्ये लिफाफा मधून वरील पत्त्यावर किंवा कार्यालयामध्ये कामाच्या दिवशी सकाळी 11:00 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत 31 ऑगस्ट 2026 या दिवशी किंवा या अगोदर जमा करणे अनिवार्य आहे.
  • महत्त्वाच्या टीपा:
  • ​अर्जासोबत आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या स्वयंप्रमाणित छायाप्रती जोडणे बंधनकारक आहे.
  • ​अपूर्ण अर्ज, डिमान्ड ड्राफ्ट नसलेले अर्ज किंवा ३१ ऑगस्ट २०२६ नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
Notification PDFयेथे क्लिक करा
Official websiteयेथे क्लिक करा

वारंवार विचारली जाणारी प्रश्न

  1. मुंबई पोर्ट ऑथॉरिटी स्पोर्ट्स क्लब भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
  2. या भरतीमध्ये कोणकोणत्या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत?
  3. मुंबई पोर्ट ऑथॉरिटी स्पोर्ट्स क्लब भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
  4. या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
  5. मुंबई पोर्ट ऑथॉरिटी स्पोर्ट्स क्लब भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
  6. अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
  7. या भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
  8. निवड प्रक्रिया कशी राबविण्यात येणार आहे?
  9. या भरतीमध्ये क्रीडा क्षेत्रातील उमेदवारांसाठी कोणत्या संधी आहेत?
  10. मुंबई पोर्ट ऑथॉरिटी स्पोर्ट्स क्लब भरतीची अधिकृत जाहिरात कुठे पाहता येईल?
  11. या भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत?
  12. मुंबई पोर्ट ऑथॉरिटी स्पोर्ट्स क्लब भरती 2026 साठी अर्ज करण्याची अधिकृत लिंक कोणती आहे?
  13. या भरतीसाठी महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकतात का?
  14. मुंबई पोर्ट ऑथॉरिटी स्पोर्ट्स क्लब भरतीमध्ये वेतन किती मिळणार आहे?
  15. या भरतीबाबत अधिकृत माहिती आणि अपडेट्स कुठे मिळतील?
Mumbai Port Authority Sports Club Recruitment 2026 feature image
Mumbai Port Authority Sports Club Recruitment 2026

महत्वाची सूचना : वरील लेखात प्राथमिक माहिती दिलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, जेणेकरून कोणताही गैरसमज किंवा नुकसान होणार नाही. अन्यथा माहितीतील त्रुटींमुळे नुकसान होण्याची शक्यता असू शकते.

तुम्ही येथे SBI क्लर्क भरती 2026 या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/sbi-clerk-backlog-vacancy-2026/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!