SECR Recruitment 2026 – रेल्वेमध्ये अप्रेंटिस साठी 1079 जागांसाठी निघाली आहे भरती! Best संधी! आत्ताच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

रेल्वे अप्रेंटिस भरती २०२६ (SECR Recruitment 2026) या पदासाठी १० वी आणि ITI झालेली असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणारे तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आली आहे. भारतीय रेल्वे ही एक जीवन माहिती नसून, तरुणांसाठी एक सुवर्ण स्वप्न पूर्ण करण्याचे मोठे व्यासपीठ बनले आहे.

अप्रेंटिस भरती ही दरवर्षी रेल्वे विभागामार्फत राबवली जाते. या पदाच्या परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा नसते, थेट गुणवत्ता यादीच्या आधारे या भरतीची निवड प्रक्रिया होत असते. तंत्रज्ञान आणि रेल्वेच्या कामकाजात प्रत्यक्ष अनुभव या भरती द्वारे घेता येतो.

जर तुम्ही 10 वी उत्तीर्ण आहात आणि तांत्रिक क्षेत्रात करिअर घडवायचे आहे. तर ही भरती तुमच्यासाठी एक उत्तम संधी बनू शकते. भरती नेमकी कशी चालते?, यासाठी कशाची तयारी करावी लागते? या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि या पदासाठी पगार किती असतो? याची सविस्तर माहिती खालील लेखांमध्ये तुम्ही पाहू शकता.

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

रेल्वे अप्रेंटिस भरती २०२६ (SECR Recruitment 2026) या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही खालील प्रमाणे दिली आहे.

  • कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.
  • १० वी मध्ये कमीत कमी ५०% गुण असणे अनिवार्य आहे.
  • उमेदवाराकडे संबंधित ट्रेड मधले प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे (NCVT (National Council for Vocational Training) किंवा SCVT)
  • उमेदवाराची ITI पूर्ण असावे लागते.

टीप : रेल्वेमध्ये अप्रेंटिस भरतीसाठी कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जात नाही यामुळे निवड प्रक्रिया ही दहावीवर आणि ITI मधील गुणांच्या आधारे निवड केली जाते.

आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

रेल्वे अप्रेंटिस भरती २०२६ (SECR Recruitment 2026) या भरतीसाठी उमेदवाराकडे खालील दिलेली आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य.

  • १० वी चे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र
  • ITI प्रमाणपत्र
  • ITI गुणपत्रके
  • नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट (NTC)
  • जन्म दाखला / १० वी चे प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
  • अपंगत्व प्रमाणपत्र (PWD Certificate) (असाल तर)
  • माजी सैनिक प्रमाणपत्र (असल्यास)
  • अर्ज भरताना सर्व कागदपत्रे मूळ असले फायदेशीर ठरेल.

टीप : कागदपत्रे पडताळणी करताना तुमच्याकडे सर्व कागदपत्रे मूळ आणि त्यांची स्वयं-साक्षांकित प्रती सोबत असणे बंधनकारक आहे.

वयोमर्यादा (Age limit)

रेल्वे अप्रेंटिस भरती २०२६ (SECR Recruitment 2026) या पदासाठी वयोमर्यादा ही खालील प्रमाणे दिली आहे.

  • सामान्य (UR) = १५ वर्षे २४ वर्षे
  • OBC (Non-Creamy Layer) = १५ वर्षे २७ वर्षे (३ वर्षे सवलत)
  • SC / ST = १५ वर्षे २९ वर्षे (५ वर्षे सवलत)
  • PWD (दिव्यांग) = १५ वर्षे ३४ वर्षे (१० वर्षे सवलत)

अर्ज प्रक्रिया (How to Apply)

रेल्वे अप्रेंटिस भरती २०२६ (SECR Recruitment 2026) या पदासाठी अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने असते. अर्ज प्रक्रिया ही खालील प्रमाणे सविस्तर दिली आहे.

  • सर्वप्रथम रेल्वे विभाग विभागाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या https://secr.indianrailways.gov.in/
  • यानंतर Apply Online किंवा New Registration या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमची वैयक्तिक माहिती भरा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी याद्वारे नोंदणी करून घ्या.
  • One Time Registration करावे लागते ते पूर्ण करून घ्या.
  • नोंदणीकृत आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करून घ्या.
  • त्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती, (नाव, पत्ता आणि जन्मतारीख, आधार कार्ड नंबर) शैक्षणिक पात्रता आणि गुण ही सर्व माहिती अचूक भरा.
  • नमूद केलेली सर्व कागदपत्रे स्कॅन करून योग्य साईज मध्ये अपलोड करून द्या.
  • वर्गानुसार अर्जाची शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरून घ्या.
  • SC/ST, महिला आणि दिव्यांग उमेदवारांसाठी या भरतीचा अर्ज मोफत असतो.
  • संपूर्ण माहिती पुन्हा एकदा तपासा माहिती चुकीची असल्यास अर्ज रद्द होऊ शकतो. माहिती स्तंपासून झाल्यानंतर सबमिट करा.
  • सबमिट झाल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट काढून ठेवा.

टीप : अर्ज एकदा सबमिट केल्यानंतर बदलता येत नाही यामुळे सर्व माहिती भरत असताना काळजीपूर्वक भरा.

निवड प्रक्रिया

रेल्वे अप्रेंटिस भरती २०२६ (SECR Recruitment 2026) या भरतीसाठी निवड प्रक्रिया ही कशी असते याचे स्वरूप खालीलप्रमाणे दिली आहे.

गुणवत्ता यादी

  • रेल्वे प्रशासन अगोदर तुमच्या १० वी आणि ITI मध्ये गुणांच्या आधारे यादी तयार करतो.
  • 10 वी तील गुण आणि ITI मधील ट्रेडमधील गुण समान ५०-५०% दिले जाते.
  • दोघांमध्ये गुणांची सरासरी काढून अंतिम यादी तयार केली जाते.

कागदपत्र पडताळणी (Document Verification)

  • गुणाच्या आधारे अंतिम यादी तयार होते त्यामध्ये उमेदवाराची निवड होते त्यांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात येते.
  • पडताळणीसाठी बोलवल्या नंतर तुम्हाला तुमची सर्व कागदपत्रे मूळ घेऊन यावी लागतात.

वैद्यकीय तपासणी (Medical Examination)

  • कागदपत्र यशस्वी पूर्ण तपासून झाल्यानंतर उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करण्यात येते.
  • रेल्वेच्या निकषानुसार उमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट असणे बंधनकारक असते.

अंतिम निवड (Final Selection)

  • कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी मध्ये उत्तीर्ण उमेदवाराला प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्त करण्यात येते.
SECR Recruitment 2026 feature image
रेल्वे अप्रेंटिस भरती २०२६ (SECR Recruitment 2026)

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : लेखामध्ये दिलेली भरतीसंबंधी माहिती अधिकृत जाहिरात, अधिसूचना व उपलब्ध स्रोतांच्या आधारे देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात (Official Notification) काळजीपूर्वक वाचावी. भरती प्रक्रियेत वेळोवेळी बदल होऊ शकतात. कोणत्याही प्रकारच्या त्रुटी, बदल किंवा नुकसानीसाठी Total Naukri जबाबदार राहणार नाही.

तुम्ही येथे “अधीनस्थ सेवा निवड मंडळ भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/sssb-recruitment-2026/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!