सुरक्षा रक्षक 2026 (Security Guard 2026) पात्रता, निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्र, वयोमर्यादा सर्व एकाच ठिकाणी |नोकरीची Best संधी

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

सुरक्षा रक्षक 2026 (Security Guard 2026) या पदासाठी उमेदवार फक्त १०वी किंवा १२वी उत्तीर्ण असावा लागतो. तुमचे शिक्षण १०वी किंवा १२वी झाले असेल आम्ही तुम्हाला नोकरी हवी असेल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे! वाढत्या लोकसंख्येमुळे सुरक्षा रक्षक दलात मोठ्या रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. सुरक्षारक्षक हा फक्त पैसे कमावण्याचा मार्ग नाही तर स्वाभिमानी करियर घडविण्याची संधी आहे. तुमचे शिक्षण हे १० वी किंवा १२ वी झाले आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर नोकरी हवी आहे, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. जर तुम्हाला सुरक्षा रक्षक 2026 मध्ये नोकरी पाहिजे असेल तर पात्रता, आवश्यक्य कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, अर्ज प्रक्रिया आणि सुरक्षा रक्षक होण्याचे फायदे त्याची सर्व माहिती सविस्तरपणे खालील लेखांमध्ये देण्यात आली आहे.

सुरक्षा रक्षक म्हणजे काय?

सुरक्षा रक्षक (Security Guard 2026) म्हणजे पहारेकरी, सुरक्षारक्षक हा एखाद्या ठिकाणी प्रवेश रोखण्यासाठी, त्या ठिकाणच्या सर्व हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी काम करत असतो.

  • कामे : प्रवेशद्वारावर उभे राहून येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींशी चौकशी करून नोंदणी ठेवत असतो.
    त्या ठिकाणी सर्व परिसरात फेरी मारून सर्व सुरक्षित आहे याची खात्री करणे.
    CCTV फुटेज पाहणी करणे, सुरक्षा अलार्म सिस्टम वर लक्ष ठेवणे आणि इंटरनेटद्वारे आपल्या मालकाशी संपर्क साधणे.
    आपत्तीकालीन परिस्थितीमध्ये म्हणजेच आग लागली चोरी होणे भांडण किंवा वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी लवकरात लवकर कारवाई करणे त्या घटना स्थळावर जाऊन पाहणी करणे आणि पोलिसांना कळवणे

सुरक्षा रक्षक कुठे असतो?

  • निवासी संकुले (Housing Societies), बँका आणि एटीएम (Banks & ATMs), मॉल्स आणि सिनेमागृहे, हॉस्पिटल्स आणि शैक्षणिक संस्था, कारखाने आणि आयटी कंपन्या आणि सरकारी कार्यालये या ठिकाणी सुरक्षा रक्षक (Security Guard 2026) काम करत असतो.

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

सुरक्षा रक्षक (Security Guard) या पदासाठी अर्ज करायचा असेल तर खालील शैक्षणिक पात्रता उमेदवाराकडे असणे अनिवार्य आहे.

  • सुरक्षा रक्षक म्हणून काम करण्यासाठी उमेदवार हा १०वी किंवा १२वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
  • काही ठिकाणी १२वी उत्तीर्ण असल्यास प्राधान्य दिले जाते.
  • उमेदवाराला शिक्षणासोबतच त्या ठिकाणची भाषा वाचता लिहिता आणि बोलता येणे अनिवार्य असते. जर तुम्ही मोठ्या शहरात मोठ्या कंपन्यांमध्ये काम करत असाल तर थोड्या प्रमाणात हिंदी किंवा इंग्रजी भाषा येणे फायदेशीर ठरले जाते.
  • फक्त पैसे कमावण्याचा मार्ग म्हणून या क्षेत्राकडे न पाहता एक जबाबदारी म्हणून या क्षेत्राकडे पाहिले तर कायदेशीर ठरेल.
  • वयोमर्यादा : किमान वय १८ वर्षे
  • कमाल वय ४५ वर्षे

निवड प्रक्रिया

सुरक्षा रक्षक (Security Guard 2026) या पदासाठी निवड प्रक्रिया खालील प्रमाणे टप्प्याटप्प्यात दिली आहे.

  • अर्ज प्रक्रिया (Application Process) : उमेदवाराला या पदाचा संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो maharojgar.gov.in किंवा संबंधित सुरक्षा एजन्सीच्या कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागतो. आणि अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात.
  • कागदपत्रांची पडताळणी (Document Verification) : आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, 10वी 12वी गुणपत्रक, रहिवासी पुरावा, पासपोर्ट साईज फोटो
  • मुलाखत (Interview) : सुरक्षारक्षक या पदासाठी मुलाखत हा निवड प्रक्रिया मधील सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो. तुमची उपस्थिती, कौशल्य, सतर्कता, उपस्थिती आणि कठीण प्रसंगात निर्णय घेण्याची क्षमता तपासली जाते.
  • शारीरिक तपासणी : सुरक्षा रक्षकाचे काम हे पूर्णतः बलावर आधारित असते त्यामुळे काही ठिकाणी तुमची उंची, वजन आणि शारीरिक तंदुरुस्ती मोजण्यात येते.
  • प्रशिक्षण (Training – PSARA) : निवड झाल्यानंतर उमेदवाराला शेवटच्या टप्प्यावर काही नामांकित संस्था उमेदवारांना Private Security Agencies Regulation Act अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येते.
  • सुरक्षा उपकरणांचा वापर (CCTV, मेटल डिटेक्टर),​आग विझवण्याची प्राथमिक कौशल्ये, ​कायदा आणि सुरक्षेचे नियम,​प्राथमिक उपचार (First Aid).

वेतन

सुरक्षा रक्षक (Security Guard 2026) या पदासाठी असलेला पगार खालील प्रमाणे दिला आहे.

  • नवोदित उमेदवार (Entry-level) १०,००० ते १८,०००
  • अनुभवी सुरक्षा रक्षक (Experienced) १५,००० ते ३०,०००
  • भविष्य निर्वाह निधी निवृत्तीनंतरच्या सुरक्षिततेसाठी
  • कामगार राज्य विमा आरोग्यविषयक खर्चासाठी
  • निवास व भोजन काही ठिकाणी राहण्याची आणि खाण्याची सोय दिली जाते.
  • ओव्हरटाइम (Overtime) पूर्ण केल्यानंतर जास्त पैसे दिले जातात.

टीप : पगारांमध्ये न्यूनतम वेतन कायदा यानुसार बदलू होऊ शकते. इतर सर्व भत्यांची स्पष्ट कल्पना करून घेणे फायदेशीर ठरेल.

आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

  • आधार कार्ड
  • १०वी किंवा १२वी उत्तीर्ण असल्याचा शाळा सोडल्याचा दाखला
  • रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  • पोलिस पडताळणी प्रमाणपत्र (Police Verification Certificate)
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • बँक खाते तपशील
  • अनुभव प्रमाणपत्र (असेल तर)

टिप : सुरक्षा रक्षक (Security Guard) या पदासाठी अर्ज करताना सर्व कागदपत्रे सोबत ठेवा एक व्यवस्थित फाईल तयार ठेवा. सर्व कागदपत्रे बरोबर आहेत याची दक्षता घ्या. कागदपत्रांमध्ये अचूक माहिती मिळाल्यानंतर अर्ज हा स्वीकारला जात नाही.

तयारी कशी करावी ?

  • Security Guard 2026 :- शारीरिक तंदुरुस्ती असणे आवश्यक आहे कारण सुरक्षारक्षकाला तासनतास उभे राहावे लागते आणि परिसरात शेरी मारावी लागते. यासाठी नियमित व्यायाम करणे फायदेशीर ठरेल.
  • सुरक्षा रक्षकाला तासनतास उभे राहावे लागते आणि परिसरात फेरी मारावी लागते, यासाठी नियमित व्यायाम करणे फायदेशीर ठरेल.
  • येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्ती संवाद चांगल्या पणे आणि बोलण्यात खनक असायला हवी.
  • परिसरामध्ये लहान हालचालीकडे दुर्लक्ष न करता बारकाईने लक्ष देण्याची सवय असायला हवी.
  • तांत्रिक उपकरणांची माहिती उमेदवाराकडे असणे जास्त फायदेशीर ठरते.
Security Guard 2026 feature image
सुरक्षा रक्षक (Security Guard 2026) १० वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी!

सूचना (Disclaimer) : सध्या सुरक्षा रक्षक पदासाठी कोणतीही एकत्रित किंवा अधिकृत राष्ट्रीय भरती प्रक्रिया सुरू नाही. विविध सरकारी विभाग, खासगी सुरक्षा कंपन्या, बँका, उद्योग आणि संस्थांमार्फत वेळोवेळी भरती केली जाते. वरील माहिती ही करिअर मार्गदर्शनाच्या उद्देशाने देण्यात आली आहे. पात्रता, वयोमर्यादा, वेतन आणि निवड प्रक्रिया संस्थेनुसार बदलू शकते. नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित संस्थेची अधिकृत अधिसूचना तपासणे आवश्यक आहे. भविष्यात विविध संस्थांकडून सुरक्षा रक्षक पदांसाठी भरती निघण्याची शक्यता आहे.

तुम्ही येथे “कृषी उत्पन्न बाजार समिती भरती 2026” याची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/apmc-recruitment-2026/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!