संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर भरती 2026 (Sangameshwar College Solapur Recruitment 2026) शैक्षणिक क्षेत्रांमधील हे महाविद्यालय सदैव उच्च स्तरावर असते. येथे सहाय्यक प्राध्यापक, उपशाखा सहाय्यक पद, प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली असून पात्र उमेदवारांकडून या भरतीचा अर्ज तारखेच्या मागून एक आला आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 41 जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे. जर कोणाला महाविद्यालय येथे नोकरी करायची असेल तर त्यांच्यासाठी हे एक सुवर्णसंधी आहे.
या महाविद्यालयांमध्ये शिक्षक आणि प्रशासकीय कामकाजामध्ये अधिक सुसूत्रता आणण्यासाठी 2026 या वर्षामध्ये महाविद्यालयांना रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीचा अर्ज भरण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्र, वयोमर्यादा, पदांचे स्वरूप, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याची सर्व सविस्तर माहिती खालील लेखामध्ये दिली आहे.
पात्रता (Educational Qualification)
संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर भरती 2026 (Sangameshwar College Solapur Recruitment 2026) या भरतीतील पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे याची पूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे.
- सहाय्यक पद : संबंधित विषयांमध्ये पदवी असणे आणि सोबतच पदवी मध्ये 55% गुण असणे अनिवार्य आहे.
- नेट किंवा सेट परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
- प्रयोगशाळा सहाय्यक (Lab Assistant) : या पदासाठी विज्ञान शाखेतील पदवी किंवा तत्सम तांत्रिक पात्रता असणे महत्त्वाचे. काही वेळा संबंधित विषयातील डिप्लोमा किंवा आयटी उत्तीर्ण असणे अनिवार्य असते.
- प्रणाली प्रशासक (System Administrator) : शैक्षणिक पात्रता बी.ई. (B.E. Computer/IT) किंवा बी.टेक. (B.Tech) किंवा एम.सी.ए. (MCA) किंवा बी.एस्सी. (कंप्युटर सायन्स/आयटी) असणे आवश्यक आहे. नेटवर्किंग आणि हार्डवेअर मधील प्रमाणपत्र असेल तर फायद्याचे ठरू शकते.
- कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) : कोणत्याही शाखेमध्ये पदवी असणे. महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान परीक्षा (MS-CIT) प्रमाणपत्र सोबतच मराठी व इंग्रजी टंकलेखन मराठीसाठी 30 आणि इंग्रजीसाठी 40 असणे अनिवार्य आहे.
- उपशाखा सहाय्यक (Lib. Assistant) : पदवी ग्रंथालय आणि माहिती शास्त्रातील पदविका किंवा B.Lib.I.Sc असणे महत्त्वाचे आहे.
- शिपाई (Peon) : या पदासाठी फक्त 10 वी उत्तीर्ण असणे महत्त्वाचे आहे.
आवश्यक कागदपत्रे (Required Document)
संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर भरती 2026 (Sangameshwar College Solapur Recruitment 2026) या भरतीचा अर्ज पाठवण्यासाठी लागणारी शैक्षणिक पत्राची यादी खालील प्रमाणे दिली आहे.
- आधार कार्ड ओळख पटवण्यासाठी आणि पत्त्याचा पुरावा म्हणून.
- जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- १० वी, १२ वी चे गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र.
- पदवी प्रमाणपत्र आणि सर्व वर्षाचे गुणपत्रिका.
- पदव्युत्तर पदवी (Master’s Degree) गुणपत्र आणि प्रमाणपत्र
- नेट (NET) / सेट (SET) उत्तीर्ण प्रमाणपत्र
- पीएच.डी. (Ph.D.) प्रमाणपत्र (झाली असेल तर)
- MS-CIT प्रमाणपत्र
- टायपिंग प्रमाणपत्र
- जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
- नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer)
- अनुभव प्रमाणपत्र (Experience Certificate) (असेल तर)
- रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate)
वयोमर्यादा (Age limit)
संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर भरती 2026 (Sangameshwar College Solapur Recruitment 2026) अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय खालील प्रमाणे असायला हवे.
| प्रवर्ग (Category) | प्रवर्ग (Category) |
| खुला प्रवर्ग | १८ ते ३८ |
| मागासवर्गीय (SC/ST/VJ-A/NT/OBC) | १८ ते ४३ |
| दिव्यांग | १८ ते ४५ |
| माजी सैनिक | १८ ते ४३ |
अर्ज प्रक्रिया (How to Apply)
संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर भरती 2026 (Sangameshwar College Solapur Recruitment 2026) या भरतीचा अर्ज कसा भरायचा याचे संपूर्ण मार्गदर्शन पुढील प्रमाणे आहे.
- सर्वप्रथम महाविद्यालयाने जाहीर केलेल्या अधिकृत वेबसाईटवर https://www.sangameshwarcollege.ac.in/ जाऊन जाहिरातीमधील पदसंख्या आणि आरक्षणाचे नियम सोबतच अंतिम तारीख लक्षपूर्वक वाचा.
- काही वेळा या भरतीचा अर्थ हा महाविद्यालयाच्या वेबसाईट वरून डाऊनलोड करता येतो परंतु काही वेळा स्वतःच्या हाताने किंवा टायपिंग करून अर्ज करावा लागतो.
- भारतामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती नाव, पत्ता, जन्मतारीख, कामाचा अनुभव आणि शैक्षणिक पात्रता अचूक भरा.
- नमूद केलेली सर्व कागदपत्रे शैक्षणिक गुणपत्रिका, पदवी प्रमाणपत्रे, अनुभवाचे दाखले, जातीचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र आणि आधार कार्ड ही सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडा.
- नमूद केलेला अर्ज शुल्क डिमांड ड्राफ्ट किंवा ऑनलाईन पद्धतीने भरावा लागतो याशिवाय अर्ज पूर्ण होणार नाही अनिल कपूर भरल्यानंतर त्याची पावती किंवा डीडी जपून ठेवा, अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे.
- भरलेला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे सोबतच डीडी एका मोठ्या लिफाफ्यामध्ये ठेवा. त्या लिफाफे वर मोठ्या अक्षरांमध्ये अर्ज केलेला पदाचे नाव आणि विषय स्पष्ट अक्षरांमध्ये लिहा.
- हा अर्ज आणि जोडलेले कागदपत्रे नोंदणीकृत पोस्टाने किंवा समक्ष विद्यालयाच्या पत्त्यावर पाठवावा.
वेतन Salary
संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर भरती 2026 (Sangameshwar College Solapur Recruitment 2026) या भरतीतील पदांसाठी वेतन खालील प्रमाणे देण्यात आले आहे.
| पदाचे नाव | श्रेणी | अंदाजित मूळ वेतन |
| सहाय्यक प्राध्यापक | Level 10 | 57,700 – रुपये + भत्ते |
| प्रणाली प्रशासक | Level 10 / 12 | नियमांनुसार निश्चित |
| प्रयोगशाळा सहाय्यक | Level 5 | 29,200 – 92,300 |
| उपशाखा सहाय्यक | Level 5 | 29,200 – 92,300 |
| कनिष्ठ लिपिक | Level 4 | 25,500 – 81,100 |
| शिपाई | Level 1 | 15,000 – 47,600 |

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर भरती 2026 (Sangameshwar College Solapur Recruitment 2026) :- या लेखामध्ये दिलेली भरतीसंदर्भातील माहिती ही संबंधित संस्थेने जाहीर केलेल्या अधिकृत भरती जाहिरातीच्या आधारे तयार करण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित भरतीची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून पात्रता, शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा तसेच इतर सर्व अटी व शर्तींची खात्री करून घ्यावी. भरती प्रक्रियेमध्ये कोणतेही बदल, दुरुस्ती किंवा अद्ययावत सूचना संबंधित संस्थेकडून वेळोवेळी जारी केल्या जाऊ शकतात. त्यामुळे अंतिम व अधिकृत माहितीसाठी संबंधित संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावरील जाहिरातच ग्राह्य धरावी. या लेखातील माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या नुकसानास किंवा गैरसमजास लेखक अथवा संकेतस्थळ जबाबदार राहणार नाही.
तुम्ही येथे “विश्वास को-ऑपरेटिव्ह बँक नाशिक भरती 2026(Vishwas Co-operative Bank Nashik Recruitment)” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/vishwas-co-operative-bank-nashik-recruitment/