Kolhapur Urban Co Op Bank Bharti 2025 : कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या आणि १८ शाखांद्वारे सुमारे १३२० कोटींचा व्यवसाय करणाऱ्या ‘दि कोल्हापूर अर्बन को-ऑप. बँक लि.’ मध्ये लिपिक पदांच्या ५० जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
महत्वाच्या तारखा
- अर्ज भरण्यास सुरुवात: १५ डिसेंबर २०२५ (सकाळी १०:०० पासून).
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: २९ डिसेंबर २०२५ (संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत).
पात्रता आणि अटी
- शैक्षणिक पात्रता :
- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा. तसेच उमेदवाराकडे MS-CIT किंवा समतुल्य संगणक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवाराला मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे.
- वयोमर्यादा :
- उमेदवाराचे वय २२ ते ३५ वर्षांच्या दरम्यान असावे (जहिरात प्रसिद्धीच्या दिनांकापर्यंत).
- प्राधान्य :
- बँकिंग क्षेत्रातील अनुभव असलेल्या, इंग्रजी/मराठी टायपिंग आणि JAIIB/CAIIB/GDC&A उत्तीर्ण उमेदवारांना निवडीत प्राधान्य दिले जाईल.
सविस्तर जाहिरात व अर्जाची लिंक :
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
| सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
परीक्षा शुल्क आणि निवड प्रक्रिया
- परीक्षा शुल्क :
- ७५० रुपये + १८% GST आणि बँक चार्जेस. हे शुल्क ‘न-परतावा’ (Non-refundable) स्वरूपाचे आहे.
- निवड पद्धती :
- ९० गुणांची ऑनलाईन वस्तुनिष्ठ परीक्षा आणि १० गुणांची तोंडी मुलाखत अशी एकूण १०० गुणांची ही प्रक्रिया असेल.
- अभ्यासक्रम :
- तर्कक्षमता (Reasoning), गणित, मराठी आणि इंग्रजी व्याकरण, संगणक साक्षरता आणि बँकिंग.
अर्ज कसा करावा?
- इच्छुक उमेदवारांनी केवळ अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत.
- अर्जासोबत उमेदवाराचे अलीकडील रंगीत छायाचित्र आणि स्वाक्षरी (प्रत्येकी २० KB पर्यंत, JPEG फॉरमॅट) अपलोड करणे अनिवार्य आहे.
- विशेष सूचना:
- परीक्षेसाठी प्रवेश पत्र (Hall Ticket) पोस्टाने पाठवले जाणार नाही, ते उमेदवारांनी संकेतस्थळावरूनच डाऊनलोड करायचे आहे.
- परीक्षेच्या वेळी ओळखपत्रासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे.
- अधिक माहितीसाठी आणि सविस्तर अटी व शर्तींसाठी बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
