10th After Career: १० वी ची परीक्षा झाली निकाल ही लागला परंतु आता करावे काय? (10th After Carrer) विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी सर्वात मोठा प्रश्न आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे 10 वी नंतर करावे काय? कोणता मार्ग निवडावा? १०० % पालक आणि विद्यार्थ्यासमोर येणारा प्रश्न. सर्वात जास्त विद्यार्थी या टप्प्यावर एक मोठी चूक करतात. ती चूक म्हणजे 10 वी नंतर योग्य करिअर कसे निवडावे ?
नुकतीच दहावी संपलेली असते. कोणत्या गोष्टीचे ज्ञान नसते. कोणता मार्ग निवडावा?, आपल्यासाठी कोणते करिअर बेस्ट राहील, याची जाणीव ही नसते. कोणी मार्क्स बघून ठरवत, तर कोण पालक, नातेवाईक किंवा मित्र यांच ऐकून ठरवतात तर कोणी स्वतःच. याबद्दल सर्व माहिती खालील लेखा मध्ये आहे.
निकाल लागला, पण पुढे काय?
- दहावीचा निकाल लागल्यानंतर नातेवाईक घरी येतात, शेजारीच कशी करतात आणि प्रत्येकाचा सल्ला विद्यार्थ्यांना देऊन जातात मग विद्यार्थ्यांच्या मनात मोठा गोंधळ निर्माण होतो. 1.”तुला चांगले मार्क्स आहेत तू सायन्स करू शकतो, तू सायन्सच घे!” 2.”त्या मुलाने कॉमर्स केले आणि तो आता चांगल्या पोस्ट वर आहे, तू ही तेच कर.” 3.”आर्ट्समध्ये काही स्कोप नाही. आणि ते घेऊन काय करणार?”
- आशा भरपूरल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात गोंधळ निर्माण होतो. मित्र जे करतो तेच आपल्याला करावे वाटते आणि विद्यार्थी घाई करून तिथे प्रवेश घेतो. परंतु लक्षात ठेवा, इतरांचे ऐकून चुकीचा निर्णय घेतल्याने भविष्यात तुमच्या करिअरवर आणि मानसिक स्वास्थ्यावर वाईट परिणाम पडण्याची शक्यता असते.
९०% विद्यार्थी नेमकी कोणती चूक करतात?
- माझा खास मित्र सायन्स घेतोय मलाही तेच घ्यायचे आहे. मित्र काही विचार करून घेऊ शकतो आणि त्याची शिकण्याची क्षमता वेगळी असू शकते आणि तुमची वेगळी असू शकते. हा निर्णय घेणे सर्वात मोठी चूक.
- स्वतःची क्षमता काय आहे? आपली आवड कशामध्ये आहे? याचा विचार न करता, किंवा पालकांच्या दबावाखाली येऊन प्रवेश घेणे.
- आपल्या समाजामध्ये असा गैरसमज आहे की 80 च्या पुढे मार्क्स पडले सायन्स घ्यावे, त्याहून खाली पडले कॉमर्स घ्यावी, आणि सर्वात कमी पडले आर्ट्स घ्यावे परंतु खरे असे आहे की प्रत्येक शाखेत यशाच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत.
निर्णय घेण्यापूर्वी स्वतःला हे प्रश्न विचारा
- दहावी झाल्यानंतर (10th After Career) तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा, मला कशाची आवड आहे विज्ञान गणित सोडवताना मज्जा येते, इतिहास भूगोल वाचायला आवडतो? भाषेची आवड आहे की नाही?
- ज्या विषयाची तुम्हाली आवड आहे ते विषय शिकणे मध्ये मज्जा येते पुढे चालून ते सोपे जाते. जर तुम्हाला सायन्स आवडत असेल आणि तुम्ही दबावाखाली येऊन गणित घेतले, तर तुम्हाला पुढे जाऊन त्या विषयांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकते.
- स्वतःला विचारा मला कलेची आवड आहे का? मी कोणत्या गोष्टींमध्ये चांगला आहे, मला कोणती गोष्ट करायला आवडते? माझे कम्युनिकेशन कसे आहे?
- अनेकदा आवड असणे आणि क्षमता असणे यामध्ये मोठा फरक असतो. तुमच्या क्षमतेला साजेल असे क्षेत्र निवडलास त्या विषयांमध्ये यश मिळण्याची जास्त शक्यता असते.
- स्वतःला विचारा मला भविष्यामध्ये नोकरी करायची आहे की स्वतःचा व्यवसाय (Business) तयार करायचा आहे?
- तुम्हाला डॉक्टर व्हायला आवडते की इंजिनियर व्हायला आवडते, तुम्हाला वाटत असेल माझी रनिंग चांगली आहे तर तुम्ही पोलीस होऊ शकता.
- स्वतःला विचारा मला स्वतःला या क्षेत्रेमध्ये आवडत आहे? की फक्त माझे मित्र आहे आणि पालक नातेवाईक म्हणतात म्हणून घेतोय?
- दुसऱ्याच्या सांगण्यावरून घेतलेला निर्णय हा फक्त त्या क्षणापुरता आनंद देऊन जातो. पण काही वर्षानंतर त्या विषयांमध्ये यश मिळवणे कठीण होत जाते.
- आयुष्य तुमचं आहे, करियर तुमचा आहे त्यामुळे निर्णय तुमचा असायला हवा.
दहावीनंतर उपलब्ध असलेले प्रमुख पर्याय
10th After Career दहावीनंतर करिअर काय निवडावे पाहूया
- विज्ञान शाखा (Science Stream) : ज्या विद्यार्थ्यांना डॉक्टर तांत्रिक किंवा संशोधन क्षेत्रामध्ये आवड आहे त्यांच्यासाठी विज्ञान शाखा ही उत्तम पर्याय आहे. विज्ञान शाखेमध्ये आता पुढे PCM (physics, Chemistry, Math) किंवा PCB (Biology) किंवा PCMB असे तीन पर्याय असतात.
- वाणिज्य शाखा (Commerce Stream): जर विद्यार्थ्यांना आकडेमोड, बिझनेस, अर्थकारण, बँकिंग किंवा व्यवस्थापन (Management) यात आवड असेल, तर तुमच्यासाठी कोमल शाखा पूर्णपणे योग्य ठरल.
- कॉमर्स मध्ये करिअर संधी: CA (Chartered Accountant), सीएस (Company Secretary), बँकिंग, फायनान्शियल अनालिस्ट, स्टॉक मार्केट, एमबीए (MBA), आणि बिझनेस मॅनेजमेंट
- कला शाखा (Arts Stream): ज्या विद्यार्थ्यांना भाषा, इतिहास, समाजशास्त्र, कला, किंवा प्रशासकीय सेवा यामध्ये आवड आहे त्यांच्यासाठी आर्ट्स हा सर्वोत्तम पर्याय आहे.
- कला शाखेत करिअर संधी: परीक्षा (UPSC/MPSC), वकिली (Law/LL.B), पत्रकारिता (Journalism), हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग, मानसशास्त्र (Psychology), आणि शिक्षक/प्राध्यापक कला शाखा निवडली तर तुम्हाला यामधील नोकरी मिळून जाईल.
- इंजिनिअरिंग डिप्लोमा (Polytechnic): 10 वी नंतर थेट इंजिनिअरिंग बनायचं असेल डिप्लोमा करणे सोयीचे ठरेल. इंजिनीयर बनायचा चलत मार्ग आहे, आणि हा कोर्स ३ वर्षाचा असतो.
- डिप्लोमा करून फायदा काय?: डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर डायरेक्ट डिग्री इंजिनिअरिंग च्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळतो आणि जर तुम्हाला नोकरी करायची असेल तर तुम्ही जूनियर इंजिनियर म्हणून नोकरी ही करू शकता.
- डिप्लोमा मधील शाखा: कॉम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, आणि आयटी (IT).
- आय.टी.आय (Industrial Training Institute): अगदी कमी वेळात आणि कमी खर्चामध्ये डायरेक्ट नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही आयटीआय कोर्स करू शकता.
- आयटीआय मध्ये प्रमुख शाखा: इलेक्ट्रिशियन, फिटर, मेकॅनिक, वेल्डर, कोपा (Computer Operator), आणि वायरमन.
- कृषी क्षेत्र (Agriculture): जर तुम्हाला शेती आणि निसर्गाची आवड असेल तर तुम्ही या क्षेत्रामध्ये तुमचे करिअर बनवू शकता.
- कृषी क्षेत्रांमधील प्रमुख शाखा: कृषी अधिकारी (Agri Officer), कृषी केंद्र किंवा बियाणे व्यवसाय, डेअरी फार्मिंग, आणि सेंद्रिय शेती तज्ज्ञ.
सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी
10वी नंतर करिअर (10th After Career) निवडण्यासाठी तुम्ही काय कराल? जर तुम्हाला सरकारी नोकरीची अवघड असेल तर पुढील माहिती पहा.
- शाखा कोणती निवडावी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी
- सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग), UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग), स्टाफ सिलेक्शन (SSC) यासारख्या परीक्षा द्याव्या लागतात.
- या परीक्षा देण्यासाठी तुम्ही कोणतीही शाखा निवडली तरी चालेल उदा. सायन्स, कॉमर्स किंवा आर्ट्स.
- आर्ट्स शाखा इटली तर तुम्हाला फायदेशीर ठरेल कारण तुम्हाला इतिहास भूगोल राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास करायला मिळतो. हेच अभ्यास स्पर्धा परीक्षेतही विचारला जातो.
- दहावी आणि बारावीच्या बेसिसवर मिळणाऱ्या सरकारी नोकऱ्या
- महाराष्ट्रात प्रत्येक वर्षी पोलीस शिपाई पदासाठी मेगा भरती निघते. त्यासाठी पात्रता फक्त 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असते.
- 10वी आणि 12 वी नंतर तुम्ही अग्निवीर योजनेअंतर्गत सैन्यात भरती होऊ शकता.
- SSC MTS (Multi Tasking Staff) या पदासाठी फक्त 10वी उत्तीर्ण लागते. ही केंद्र सरकारची परीक्षा असते.
- 10वी नंतर तुम्ही रेल्वे भरती (Railway Recruitment Board – RRB) करू शकता.
- तलाठी ग्रामसेवक आणि लिपिक या परीक्षा देण्यासाठी तुम्हाला 12 वी उत्तीर्ण आणि पदवी असणे आवश्यक असते. परंतु या परीक्षेचा अभ्यास हा शालेय स्तरावरील असतो.
- ३. ‘आयटीआय’ (ITI) चा सुवर्णमार्ग
- रेल्वे महावितरण एसटी मंडळ आणि ऑर्डनन्स
- फॅक्टरीज यासारख्या मोठ्या सरकारी विभागांमध्ये हजारो जागा निघतात.
- ४. आतापासूनच कोणती तयारी सुरू करावी?
- मराठी आणि इंग्रजी व्याकरण, गणित आणि बुद्धिमत्ता, चालू घडामोडी आणि संगणक साक्षरता.
वर्ष २०२६ मध्ये सर्वाधिक मागणी असलेली क्षेत्रे (Trending Fields)
10 वी नंतर काय करावे (10th After Career). सध्याच्या काळातील सर्वाधिक मागणी असणारे क्षेत्र पुढील प्रमाणे आहेत:
१. आर्टिफिशियल इंटेलिजन्स
- करिअर पर्याय: AI इंजिनिअर, प्रॉम्प्ट इंजिनिअर (Prompt Engineer), रोबोटिक्स तज्ज्ञ सध्याच्या काळातील मागणी असणारे क्षेत्र
- लागणारा मार्ग: 10 वी नंतर पीसीएम ग्रुप निवडावा कम्प्युटर सायन्स किंवा एआई मध्ये इंजिनिअरिंग कराल.
२.सायबर सिक्युरिटी (Cyber Security)
- करिअर पर्याय: सायबर सिक्युरिटी अनालिस्ट, एथिकल हॅकर (Ethical Hacker), नेटवर्क सिक्युरिटी कन्सल्टंट सायबर सेक्युरिटी मधील क्षेत्र.
- लागणारा मार्ग: 12 वी मध्ये सायन्स किंवा डिप्लोमा करावा कॉम्प्युटर किंवा आयटी मध्ये त्यानंतर सायबर सेक्युरिटी मधील पदवी किंवा सर्टिफिकेशन कोर्स करावे.
३. डेटा ॲनालिटिक्स आणि बिग डेटा
- करिअर पर्याय: डेटा सायंटिस्ट (Data Scientist), डेटा अनालिस्ट, बिझनेस इंटेलिजन्स मॅनेजर डेटा ॲनालिटिक्स मधील क्षेत्र.
- लागणारा मार्ग: या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी तुम्ही सायन्स, कॉमर्स किंवा आर्ट्स यापैकी कोणतीही शाखा निवडू शकता
४. डिजिटल मार्केटिंग आणि कंटेंट क्रिएशन (Digital Marketing & Content)
- करिअर पर्याय: डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट, सोशल मीडिया मॅनेजर, कंटेंट स्ट्रॅटेजिस्ट, एसइओ तज्ज्ञ डिजिटल मार्केटिंग मधील क्षेत्र
- लागणारा मार्ग: या क्षेत्रासाठी पदवीपेक्षा स्किल असणे महत्त्वाचे आहे. तुम्ही 10 वी नंतर किंवा बारावीनंतर शॉर्ट टर्म कोर्सेस आणि प्रॅक्टिकल चा अनुभव घेतला तर तुम्ही या क्षेत्रांमध्ये प्रवेश करू शकता.
पालकांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
10वी नंतर करियर (10th After Career) निवडण्यासाठी अगोदरस मुले गोंधळून जातातत्यात नातेवाईक मित्र आणि पालकांकडून भर जातो. पण त्यांनी खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
- अनेकदा पालक जे स्वतः बनू शकले नाही जे स्वतःचे स्वप्न अर्धवट राहिले ते मुलं पूर्ण करतील यामुळे ते मुलांना तिकडे नेण्याचा प्रयत्न करत असतात. महत्त्वाचे म्हणजे मुलाला कोणत्या विषयांमध्ये आवड आहे ते जाणून घ्या, तुमच्या इच्छाचे ओझे त्याच्यावर टाकू नका.
- तुझ्या मित्राला तेवढे मास मिळालेत मंग तुला कमी का ? किंवा आपल्या घरामध्ये सगळे सायन्सचं केले तर तू ही सायन्सस कर. पालकांसाठी टीप : 10वी चे मार्क्स फक्त एका परीक्षेचा रिझल्ट आहे, ते तुमच्या मुलाचे पूर्ण भविष्य ठरवू शकत नाही.
- सर्वांचा गैरसमाज असा आहे की हुशार मुलांनी सायन्स घेतले पाहिजे आणि कमी मार्क्स मिळालेल्या मुलांनी आर्ट्स किंवा कॉमर्स घेतले पाहिजे. परंतु सध्याचे वास्तव्य खूप बदललेले आहे. आज आर्ट्स आणि कॉमर्स क्षेत्रातील मूल्य लाखो करोड रुपये पर्यंत पैसे कमवत आहेत.