जिल्हा परिषद (Zilla Parishad) भरतीची संपूर्ण माहिती 2026: पात्रता, पगार आणि संपूर्ण माहिती (Apply Now)

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

जिल्हा परिषद (Zilla Parishad) म्हणजे ग्रामीण भागाचा मुख्य कणा, ग्रामीण भागातील शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा आणि शेतीचा विकास या सर्व गोष्टी जिल्हा परिषद बघतो. ग्रामीण भागाचा विकास होण्यामागे सर्वात मोठा जिल्हा परिषद चा असतो. लोकशाहीचे केंद्र भारतातील सर्व काना-कोपरापर्यंत पोहोचल्या आहे अगदी ग्रामीण भागात सुद्धा. लोकशाहीचे केंद्र ग्रामीण भागापर्यंत येण्यामागे “पंचायत राज” व्यवस्थेची पायाभरणी करण्यात आली आहे.

“जिल्हा परिषद भरती”(Zilla Parishad Bharati) महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकासा मार्फत घेतली जाते. ग्रामीण भागामध्ये राहुन .समाज सेवेची संधी देणारी आणि सरकारी नोकरी देणारी भरती नेमकी आहे तरी काय? यासाठी पात्रता काय लागते, परीक्षेचे स्वरूप कसे असते आणि या पदांमधील यश आपले कसे करावे? अशोक सर्व प्रश्नांचे उत्तर तू मला खालील लिखामध्ये भेटून जाईल..

जिल्हा परिषद भरती कोण घेते?

  • प्रत्येक जिल्ह्यातील भरतीची जबाबदारी ही जिल्हा निवड समिती करते, जिल्हा निवड समिती ही त्या जिल्ह्याची असते.
  • IBPS IBPS (Institute of Banking Personnel Selection) किंवा TCS (Tata Consultancy Services) या कंपन्या मार्फत संगणक आधारित घेण्यात येते. ही परीक्षा पारदर्शक आणि ऑनलाईन पद्धतीने शासन स्तरावरून नामांकित कंपन्या नियुक्त केल्या जातात त्यामध्ये वरील दोन कंपन्या येतात.

जिल्हा परिषद अंतर्गत कोणकोणती पदे असतात

जिल्हा परिषद (Zilla Parishad) म्हणजे काय त्या अंतर्गत कोणकोणते पदे असतात पुढीलप्रमाणे सविस्तर लिहिले आहे:

१. ग्रामविकास व पंचायत विभाग

  • ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी: ग्रामसेवक हा गावाच्या विकासाची महत्त्वाची भूमिका बजावणारा शासकीय कर्मचारी म्हणून ओळखला जातो.
  • विस्तार अधिकारी (पंचायत): विस्तार अधिकारी म्हणजे पंचायत समिती स्तरावर ग्रामपंचायतीच्या कामावर देखरेख ठेवणारे पद असते.

२. आरोग्य विभाग (Health Department)

  • आरोग्य सेवक (पुरुष): ग्रामीण भागामध्ये आरोग्यसेवा आणि विविध शासकीय मार्फत आरोग्य योजना नागरिकांपर्यंत पोहोचवणे.
  • आरोग्य सेविका (महिला / ANM): माता आणि बाल संगोपन आणि लसीकरण हे काम आरोग्य सेविका कडे असते.
  • औषध निर्माण अधिकारी (Pharmacist): जिल्हा परिषद मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये औषध पुरवठा आणि वाटप पाहणारे हे पद असते.
  • आरोग्य पर्यवेक्षक (Health Supervisor): हे वरिष्ठ पण नसते आरोग्य सेविकांच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी.

​३. बांधकाम आणि पाणीपुरवठा विभाग

  • कनिष्ठ अभियंता (Junior Engineer – JE): गावातील रस्ते इमारती विहिरी आणि पाणीपुरवठा या योजनेंचे तांत्रिक काम आणि देखरीत पाहणारे अधिकार
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (Civil Engineering Assistant): तांत्रिक कामात आणि साईट सर्वेक्षणात मदत करणारे अधिकारी.

४. कृषी व पशुसंवर्धन विभाग

  • कृषी सहाय्यक (Agriculture Assistant): शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक शेती तंत्रज्ञान बियाणे आणि शासकीय योजना चे माहिती पोहोचवणारे पद
  • पशुधन पर्यवेक्षक (Livestock Supervisor): पशूंचा डॉक्टर म्हणजेच ग्रामीण भागातील जनावरांचे आरोग्य, लसीकरण आणि पशुवैद्यकीय दवाखान्याचे काम पाहणारे पद.
५. शिक्षण विभाग (Education Department)
  • प्राथमिक शिक्षक (Primary Teacher): प्राथमिक शाळेमध्ये अध्यापन करणारे शिक्षक, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये
  • विस्तार अधिकारी (शिक्षण): तालुक्यामधील सर्व शाळांच्या गुणवत्तेवर आणि प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याचे काम विस्तार अधिकारी यांच्याकडे असते.
  • ​केंद्रप्रमुख : जिल्ह्यातील ठराविक शाळेंच्या केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून काम पाहणारे पद.
६. सामान्य प्रशासन व वित्त विभाग (Administration & Finance)
  • वरिष्ठ सहाय्यक (Senior Assistant): कार्यालयामधील मुख्य लिपीची आणि प्रशासकीय काम संभाळणे या पदाकडे.
  • कनिष्ठ सहाय्यक (Junior Assistant / Clerk): आवक-जावक टायपिंग आणि दैनंदिन निस्ती व्यवस्थापन पाहणारे पद लिपिक.
  • ७. महिला व बालविकास आणि समाजकल्याण विभाग
  • मुख्य सेविका / पर्यवेक्षिका (Supervisor) आणि विस्तार अधिकारी (समाजकल्याण)

शैक्षणिक पात्रता

  • १. १० वी / १२ वी पास उमेदवारांसाठी पदे : आरोग्य सेवक, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ आरेखक
  • २. पदविका (Diploma) धारकांसाठी पदे : ग्रामसेवक (कनिष्ठ ग्राम विकास अधिकारी), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (CEA), औषध निर्माण अधिकारी (Pharmacist), आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician)
  • ​३. पदवीधरांसाठी (Graduates) पदे : वरिष्ठ सहाय्यक (प्रशासन), विस्तार अधिकारी (पंचायत), कृषी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता (JE – स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी), आणि मुख्य सेविका / पर्यवेक्षिका (केवळ महिलांसाठी)
  • ४. शिक्षण विभागासाठी पदे : प्राथमिक शिक्षक (१२ वी उत्तीर्ण, सोबतीला D.El.Ed. (D.Ed.) किंवा B.Ed. आणि TAIT परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे).
  • MS-CIT / संगणक ज्ञान आणि मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान हे सर्व जिल्हा परिषद अंतर्गत सर्व पदांसाठी असणे अनिवार्य आहे.

जिल्हा परिषद भरतीची माहिती पाहण्यासाठी ही लिंक तपासा : rdd.maharashtra.gov.in

वयोमर्यादा

​खुला प्रवर्ग (Open)१८ ते ३८ वर्षे.
​मागासवर्गीय उमेदवार (OBC/SC/ST/EWS)१८ ते ४३ वर्षे
​माजी सैनिक व दिव्यांग उमेदवारशासनाच्या नियमानुसार वयात अधिक सूट

जिल्हा परिषद (Zilla Parishad) भरतीचा अभ्यासक्रम

१.मराठी

  • व्याकरण: वर्णमाला, शब्दांच्या जाती (नाम, सर्वनाम, विशेषण इ.), संधी, काळ व काळाचे प्रकार, प्रयोग, समास.
  • शब्दसंग्रह: समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, लिंग, वचन, शुद्ध-अशुद्ध शब्द, एका शब्दाबद्दल शब्दसमूह.
  • वाक्प्रचार व म्हणी: प्रसिद्ध म्हणी आणि वाक्प्रचार यांचा अर्थ व वाक्यात उपयोग.

२. इंग्रजी

  • Grammar: Parts of Speech, Tenses, Voice (Active/Passive), Direct & Indirect Speech, Articles, Prepositions, Punctuation.
  • ​Vocabulary: Synonyms, Antonyms, One-word Substitutions, Idioms and Phrases, Spelling Check.
  • ​Sentence Structure: Spotting the Errors, Fill in the blanks, Sentence Rearrangement (Para Jumbles).
  • Comprehension: Reading unseen passages and answering questions

३. सामान्य ज्ञान (General Knowledge – GK)

  • इतिहास: भारताचा इतिहास आणि विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास व समाजसुधारक.
  • ​भूगोल: भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल (नद्या, पर्वत, जिल्हे, हवामान, प्रमुख पिके).
  • भारतीय संविधान व राज्यव्यवस्था: मूलभूत हक्क, कर्तव्ये, राष्ट्रपती, संसद, आणि विशेषतः पंचायत राज व्यवस्था (ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि संबंधित समित्या).
  • सामान्य विज्ञान: भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि हायजीन (आरोग्यशास्त्र).
  • चालू घडामोडी: राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या चालू घडामोडी, क्रीडा, पुरस्कार, शासकीय योजना.

४. बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित (Reasoning & Aptitude)

  • अंकगणित (Maths): संख्या आणि संख्यांचे प्रकार, लसावी-मसावी, अपूर्णांक, टक्केवारी, नफा-तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, सरासरी, काळ-काम-वेग, गुणोत्तर व प्रमाण.
  • ​बुद्धिमत्ता (Reasoning): अक्षरमालिका, संख्यामालिका, कोडिंग-डीकोडिंग (सांकेतिक भाषा), नातेसंबंध, दिशा ज्ञान, रांगेतील स्थान, आकृत्यांची जोडणी/मोजणी, तार्किक युक्तिवाद.
​५. तांत्रिक विषय (Technical Subject)
  • केवळ तांत्रिक पदांसाठी: उदा. आरोग्य सेवक: १० वी स्तरावरील विज्ञान (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) आणि मानवी आरोग्यशास्त्र.

महत्वाची टिप: परीक्षेत सर्व प्रश्न हे MCQs असतात प्रत्येकी प्रश्न हा दोन गुणांचा असतो या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसते. या परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न हे मराठीची प्रश्न मराठी मधून असतात आणि इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि गणित या विषयाची प्रश्न इंग्रजीमध्ये किंवा मराठीमध्ये पण असू शकतात.

पगार किती मिळतो?

पदअंदाजे पगार
ग्रामसेवक25,500 – 81,100
आरोग्य सेवक21,700 – 69,100
कृषी सहाय्यक25,500 – 81,100
कनिष्ठ अभियंता38,600 – 1,22,800
लिपिक19,900 – 63,200
Zilla Parishad 2026 feature image
जिल्हा परिषद भरती 2026 (Zilla Parishad) अंतर्गत सर्व तरुणांसाठी सुवर्णसंधी

जिल्हा परिषद (Zilla Parishad) भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • ओळखपत्र (पॅन कार्ड, लायसन्स, मतदार ओळखपत्र किंवा पासपोर्ट)
  • शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला (वयाच्या पुरावा साठी)
  • रहिवासी दाखला (Domicile Certificate) (उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा)
  • १० वी आणि १२ वी गुणपत्रिका
  • पदवी / पदविका (Degree / Diploma) (सर्व वर्षातील मुख्य प्रमाणपत्र)
  • तांत्रिक प्रमाणपत्र (Technical Qualification)
  • MS-CIT प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
  • नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer – NCL)
  • EWS प्रमाणपत्र

तुम्ही येथे ग्रामसेवक कसे व्हायचे याची संपूर्ण माहिती हे पाहू शकता : https://totalnaukri.com/how-to-become-a-gramsevk/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!