जे. जे. रुग्णालय मुंबई भरती २०२६: ७ वी, १० वी आणि १२ वी उत्तीर्ण उमेदवारांना थेट मुलाखतीद्वारे नोकरीची संधी! | JJ Hospital Mumbai Recruitment 2026

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

JJ Hospital Mumbai Recruitment 2026: ‘ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी. समुह रुग्णालये’ (Grant Govt. Medical College & Sir J.J. Group of Hospitals, Mumbai) येथे नवीन सरळ सेवा भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत ही कंत्राटी पदे भरली जाणार आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भरतीसाठी कोणतीही परीक्षा होणार नसून उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे (Walk-in Interview) केली जाईल.

जर तुम्ही ७ वी, १० वी किंवा १२ वी उत्तीर्ण असाल आणि मुंबईत सरकारी रुग्णालयात नोकरी करण्याची सुवर्णसंधी शोधत असाल, तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. या भरतीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार आणि अर्ज करण्याची सोपी पद्धत खालीलप्रमाणे सविस्तर दिली आहे.

JJ Hospital Mumbai Recruitment 2026 Overview

वैशिष्ट्येमाहिती
संस्थेचे नावग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी. समुह रुग्णालये, मुंबई
योजनेचे नाव (Scheme Name)महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना
पदांची नावे१) डेटा एन्ट्री ऑपरेटर (DEO)
२) शिपाई (Peon)
एकूण जागा१२ पदे (कंत्राटी स्वरूप)
निवड पद्धतथेट मुलाखत (परीक्षा नाही)
ईमेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख२१ जून २०२६ (रात्री १२:०० वाजेपर्यंत)
मुलाखतीची तारीख२४ जून २०२६

JJ Hospital Data Entry Operator & Peon Educational Qualification

या भरतीमध्ये एकूण २ प्रकारच्या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यांची सविस्तर पात्रता खालीलप्रमाणे आहे:

  1. डेटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator – DEO)
    • एकूण जागा (Total Posts): १० पदे
    • शैक्षणिक पात्रता (Education):
      • उमेदवार किमान १२ वी उत्तीर्ण असावा. कोणत्याही शाखेतील पदवी (BA, B.Com, B.Sc, BPMT) उत्तीर्ण असलेल्या उच्च शैक्षणिक अर्हता धारक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
      • MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
      • मराठी टंकलेखन (Marathi Typing) किमान ३० श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन (English Typing) किमान ४० श.प्र.मि. चे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र (GCC) किंवा समकक्ष प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
    • वयोमर्यादा (Age Limit): ३१ मे २०२६ रोजी उमेदवाराचे वय ३८ वर्षांपर्यंत असावे.
    • निश्चित वेतन (Salary): रु. १०,०००/- प्रति महिना (Fixed Pay).
  2. शिपाई (Peon / Staff)
    • एकूण जागा (Total Posts): २ पदे
    • शैक्षणिक पात्रता (Education): उमेदवार किमान ७ वी उत्तीर्ण आणि कमाल १० वी उत्तीर्ण असावा.
    • वयोमर्यादा (Age Limit): ३१ मे २०२६ रोजी उमेदवाराचे वय ३८ वर्षांपर्यंत असावे.
    • निश्चित वेतन (Salary): रु. ६,०००/- प्रति महिना (Fixed Pay).

Important Terms and Conditions (महत्त्वाच्या अटी)

  • वयोमर्यादा (Age Limit): दोन्ही पदांसाठी ३१ मे २०२६ रोजी उमेदवाराचे वय ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
  • नोकरीचे स्वरूप: ही पदे निव्वळ तात्पुरत्या कंत्राटी स्वरूपाची आहेत. ही राज्य शासनाची नियमित पदे नसल्याने भविष्यात कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याचा कोणताही हक्क सांगता येणार नाही.
  • कामाच्या पाळ्या (Duty Shifts): निवड झालेल्या उमेदवारांना तीन शिफ्ट्समध्ये काम करावे लागेल.
    • पहिली शिफ्ट (Morning): सकाळी ०८:०० ते दुपारी ०५:००
    • दुसरी शिफ्ट (Afternoon): दुपारी ०२:०० ते रात्री १०:००
    • तिसरी शिफ्ट (Night): रात्री १०:०० ते सकाळी ०८:००
  • कामाचा कालावधी (Tenure): सुरुवातीला १२० दिवसांसाठी नियुक्ती आदेश दिले जातील. काम समाधानकारक असल्यास १ दिवसाचा खंड देऊन जास्तीत जास्त ३६४ दिवसांपर्यंत कार्यकाळ वाढवला जाऊ शकतो.

सविस्तर जाहिरात व अर्जाची लिंक :

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
सविस्तर जाहिरातयेथे क्लिक करा
ऑफलाइन अर्जयेथे क्लिक करा

How to Apply for JJ Hospital Recruitment 2026 (अर्ज कसा करावा?)

या भरतीसाठी उमेदवारांना दोन टप्प्यांत आपली अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. आधी ईमेलने पीडीएफ अर्ज पाठवायचा आहे आणि नंतर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचे आहे.

  • टप्पा १: ईमेलद्वारे पीडीएफ (PDF) अर्ज पाठवणे
    • उमेदवारांनी एका कोऱ्या कागदावर किंवा विहित नमुन्यात आपला अर्ज (Application Form) तयार करावा.
    • अर्जात खालील माहिती इंग्रजी किंवा मराठीत स्पष्टपणे लिहावी:
      • अर्ज करीत असलेल्या पदाचे नाव (Post Name)
      • पूर्ण नाव आणि पत्ता (Full Name & Address)
      • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी (Mobile & Email ID)
      • जन्मतारीख (Date of Birth – शाळा सोडल्याच्या दाखल्याप्रमाणे)
      • शैक्षणिक पात्रता (Education Details – संस्थेचे/विद्यापीठाचे नाव, उत्तीर्ण वर्ष, मिळालेले गुण आणि टक्केवारी)
      • कामाचा अनुभव (Work Experience – अनुभव असल्यास पद, वर्षे/महिने आणि पूर्वी मिळणारे मानधन)
    • हा भरलेला अर्ज आणि सर्व आवश्यक कागदपत्रे एकत्र करून त्याची एक PDF फाईल बनवावी.
    • ही PDF फाईल २१ जून २०२६ रोजी रात्री १२:०० वाजेपर्यंत खालील अधिकृत ईमेल आयडीवर पाठवणे बंधनकारक आहे.
    • अधिकृत ईमेल आयडी (Official Email): mjpjayrecruitment2026@gmail.com
  • टप्पा २: थेट मुलाखत (JJ Hospital Walk-in Interview Details)
    • ईमेलद्वारे अर्ज पाठवल्यानंतर उमेदवारांनी थेट खालील तारखेला आणि पत्त्यावर मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे.
    • मुलाखतीची तारीख (Interview Date): २४ जून २०२६ (मंगळवार)
    • मुलाखतीची वेळ (Interview Time): सकाळी ११:०० ते सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत
    • मुलाखतीचे ठिकाण (Venue): लेखा कक्ष, महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत, तळमजला, सर ज.जी. समुह रुग्णालये, मुंबई – ४००००८.
  • महत्त्वाची टीप: मुलाखतीला जाताना उमेदवारांनी स्वतःचा भरलेला अर्ज, सर्व मूळ कागदपत्रे (Original Documents), कागदपत्रांच्या साक्षांकित केलेल्या प्रती (Attested Copies), पासपोर्ट आकाराचे दोन फोटो आणि कामाचे अनुभव प्रमाणपत्र सोबत घेऊन जाणे अत्यंत आवश्यक आहे. अधिकृत जाहिरातीचा संदर्भ तुम्ही वर दिलेल्या जाहिरातीमध्ये मध्ये पाहू शकता.
JJ Hospital Mumbai Recruitment 2026
JJ Hospital Mumbai Recruitment 2026

महत्वाची सूचना : वरील लेखात प्राथमिक माहिती दिलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, जेणेकरून कोणताही गैरसमज किंवा नुकसान होणार नाही. अन्यथा माहितीतील त्रुटींमुळे नुकसान होण्याची शक्यता असू शकते.

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!