एसटी चालक-वाहक भरती 2026 (MSRTC Recruitment 2026) आता हजारो तरुणांसाठी एक आनंदाची बातमी एसटी मंडल घेऊन आले आहे. महाराष्ट्र मधील राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या चालक आणि वाहक पदासाठी बेरोजगार उमेदवारांसाठी एक महत्त्वाची संधी आली आहे. एसटी महामंडळामध्ये १७,७४२ जागांसाठी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या भरतीची घोषणा केली आहे. ज्यांना नोकरीची गरज आहे, जो उमेदवार सरकारी नोकरीचे स्वप्न पाहत आहेत त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या भरती अंतर्गत लालपरीच्या प्रवासाला गती देण्यासाठी आणि प्रवाशांना उत्तम सेवा सेनेसाठी आता मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यबळ सज्ज होत आहे.
जर तुम्हाला एसटी वाहक चालक भरती 2026 या भरतीचा अर्ज करायचा आहे तर त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया आणि वयोमर्यादा याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे तुम्ही पाहू शकता.
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
एसटी चालक-वाहक भरती 2026 (MSRTC Recruitment 2026) या भरतीसाठी खालील दिलेली शैक्षणिक पात्रता उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.
चालक पदासाठी
- चालक पदासाठी उमेदवार १० वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
- उमेदवाराकडे जोड वाहने चालवण्याचा वैद्य परवाना (Heavy Vehicle Driving License) असणे आवश्यक आहे.
- परवाना मिळाल्यापासून किमान २-३ वर्षे अवजड वाहने चालविण्याचा अनुभव असायला पाहिजे.
- उमेदवाराच्या नावावर गंभीर अपघातांचा कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसावा.
वाहक पदासाठी
- वाहक पदासाठी उमेदवार किमान १० वी किंवा १२ वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे परंतु काही भरती प्रक्रियेमध्ये १२ वी उत्तीर्ण असणे अट असू शकते.
- उमेदवाराकडे वैद्य वाहक परवाना आणि बिल्ला (Badge) असणे आवश्यक मानले जाते.
टीप : ही माहिती या अगोदर झालेली भरती प्रक्रिया याच्या आधारित आहे. या भरतीचा अर्ज भरण्यापूर्वी २०२६ च्या नवीन मेगा भरती ची अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शैक्षणिक पात्रता स्पष्ट होईल.
आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
एसटी चालक-वाहक भरती 2026 (MSRTC Recruitment 2026) या भरतीसाठी खालील दिलेल्या आवश्यक कागदपत्रे उमेदवाराकडे असणे अनिवार्य आहे.
- ओळखपटवण्यासाठी आधार कार्ड.
- आर्थिक व्यवहार तपासण्यासाठी पॅन कार्ड (असेल तरच)
- महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा – रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate)
- १० वी / १२ वी प्रमाणपत्र व गुणपत्रिका
- पदवी/पदविका (असल्यास)
- ड्रायव्हिंग लायसन्स (चालक पदासाठी)
- बॅच/परवाना (वाहक पदासाठी)
- अनुभव प्रमाणपत्र (जर तुम्हाला कामाचा अनुभव विचारला असेल तर संबंधित कंपनी किंवा संस्थेचे अनुभवाचे प्रमाणपत्र असणे फायदेशीर ठरते)
- जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
- जात वैधता प्रमाणपत्र (Validity Certificate)
- नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer)
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र (EWS)
- वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
टीप : सर्व कागदपत्रे (लायसन्स आणि नॉन-क्रिमीलेयर)) चालू असावीत याची दक्षता घ्या आणि कागदपत्रे स्कॅन करून एका फोल्डरमध्ये जतून करून ठेवा ज्याने करू तुम्हाला अर्ज करताना कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही. आणि अर्जात भरलेली सर्व माहिती तुमच्या येऊ कागदपत्राची जुळत असली पाहिजे, जर यामध्ये काही त्रुटी आढळल्या अर्ज स्वीकारला जाऊ शकत नाही.
वयोमर्यादा (Age limit)
एसटी चालक-वाहक भरती 2026 (MSRTC Recruitment 2026) या भरतीसाठी वयोमर्यादा खालील प्रमाणे दिली आहे. परंतु अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर यामध्ये बदल होऊ शकतो.
| प्रवर्ग | वयोमर्यादा |
| खुला प्रवर्ग (Open) | १८ वर्षे ते ३८ वर्षे |
| मागास प्रवर्ग (SC/ST/OBC/NT) | १८ वर्षे ते ४३ वर्षे |
| माजी सैनिक | १८ वर्षे ते ४५ वर्षे (नियमांनुसार) |
अर्ज प्रक्रिया (How to Apply)
एसटी चालक-वाहक भरती 2026 (MSRTC Recruitment 2026) या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने आहे याची सर्व माहिती खालील प्रमाणे सविस्तर दिली आहे.
- सर्वप्रथम एसटी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या msrtc.gov.in या नंतर तिथे ‘Recruitment’ हा विभाग तपासा.
- जर तुम्ही अगोदर नोंदणी केली नसेल, तर तुम्ही नवीन खाते तयार करा. नवीन खाते तयार करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरा आणि रजिस्ट्रेशन करून घ्या.
- या नंतर तुमची वैयक्तिक माहिती भरा (नाव, पत्ता, जन्मतारीख आणि आधार नंबर), शैक्षणिक पात्रता (१० वी, १२ वीचे गुण) आणि तुमचा चालक किंवा वाहक परवाना.
- त्यानंतर तुमची पासपोर्ट साईज फोटो, स्वाक्षरी आणि सर्व आवश्यक कागदपत्रे योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
- शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरून घ्या, शुल्क भरल्याशिवाय तुमचा अर्ज स्वीकारला जाऊ शकत नाही.
- सर्व माहिती अचूक आहे का याची खात्री करूनच अर्ज सबमिट करा. अरबी सबमिट करून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट काढून ठेवा.
टीप : या योजनेची अधिकृत जाहिरात येण्याअगोदर कुठल्याही प्रकारची लिंक किंवा पोर्टल द्वारे आपली वैयक्तिक माहिती किंवा पैसे देऊ नका.
वेतन
एसटी चालक-वाहक भरती 2026 (MSRTC Recruitment 2026) या भरती अंतर्गत पदांसाठी वेतन खालील प्रमाणे अंदाजी दिली आहे:
| पदाचे नाव | मासिक वेतन |
| चालक (Driver) | ३०,००० प्रति महिना |
| वाहक (Conductor) | ३०,००० प्रति महिना |
निवड प्रक्रिया
एसटी चालक-वाहक भरती 2026 (MSRTC Recruitment 2026) या भरतीची निवड प्रक्रिया खालील प्रमाणे दिली आहे:
- अर्जाची चलनी : ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर अर्जाची आणि अपलोड केलेल्या कागदपत्रांची तपासणी केली जाते.
- कागदपत्र पडताळणी : अर्जासोबत अपलोड केलेले शैक्षणिक प्रमाणपत्र, लायसन्स आणि जातीचा दाखला या सर्व कागदपत्रांमधील माहिती अर्जा सोबत जुळत असल्याची खात्री करण्यात येते.
- ड्रायव्हिंग टेस्ट (फक्त चालक पदासाठी) : चालक पदासाठी चालकांचे प्रत्यक्ष बस चालवून कौशल्य चाचणी घेतली जाते.
- वैद्यकीय चाचणी : एसटी महामंडळाच्या निकषांनुसार उमेदवाराची शारीरिक व दृष्टि क्षमता तपासण्यात येते.
- अंतिम निवड : अंतिम निवड हे तांत्रिक चाचणी आणि शैक्षणिक पात्रतेच्या आधारे करण्यात येते.

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, प्रसिद्ध झालेल्या जाहिराती आणि उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आली आहे. भरतीसंबंधित पदसंख्या, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, वेतन आणि इतर अटींमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित भरतीची अधिकृत जाहिरात व अधिकृत संकेतस्थळावरील माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी. या लेखातील माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या नुकसानासाठी किंवा गैरसमजासाठी Total Naukri जबाबदार राहणार नाही. अधिकृत जाहिरातीतील माहिती अंतिम आणि ग्राह्य धरली जाईल.
तुम्ही येथे “महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2026“ या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/mpsc-group-b-and-c-recruitment-2026/