महाराष्ट्र शासन वन विभाग मध्ये भरती 2026 । Maharashtra Bamboo Vikas Bharti

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

MahaForest Bamboo Vikas Board Recruitment 2026: महाराष्ट्र शासनाच्या वन विभाग अंतर्गत येणाऱ्या ‘महाराष्ट्र बांबू विकास मंडळ, नागपूर’ मध्ये सरकारी नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. मंडळाच्या अंतर्गत ‘बांबू क्लस्टर समन्वयक’ (Bamboo Cluster Coordinator) आणि ‘वनवृत्त समन्वयक’ (Circle Coordinator) या पदांसाठी नवीन भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ही पदे संपूर्णपणे कंत्राटी व मानधन तत्त्वावर ११ महिन्यांच्या कालावधीसाठी भरण्यात येत आहेत. जे उमेदवार कृषी किंवा वनविद्या शाखेतील पदवीधर आहेत, त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या भरतीबाबतची सविस्तर माहिती, जिल्ह्यानुसार जागा, आवश्यक पात्रता आणि अर्ज करण्याची सोपी पद्धत खालीलप्रमाणे आहे.

Table of Contents

भरतीचा संक्षिप्त गोषवारा (MahaForest Bharti 2026 Overview)

तपशीलमाहिती
विभाग / संस्थामहाराष्ट्र बांबू विकास मंडळ, नागपूर (वन विभाग, महाराष्ट्र शासन)
पदांची नावे1) बांबू क्लस्टर समन्वयक 2) वनवृत्त समन्वयक
एकूण रिक्त पदे४२ जागा (अंदाजित – ३९ बांबू क्लस्टर समन्वयक + ३ वनवृत्त समन्वयक)
कंत्राटी कालावधी११ महिने
अर्जाची पद्धतऑफलाइन (थेट कार्यालयात) किंवा अधिकृत ईमेलद्वारे
अर्ज करण्याची शेवटची तारीख०२ जुलै २०२६ (सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत)

पदांचा सविस्तर तपशील आणि मानधन (Post Wise Vacancy & Salary)

या भरतीअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा आकर्षक मानधनासोबतच प्रवास भत्ता देखील दिला जाणार आहे.

  • बांबू क्लस्टर समन्वयक (Bamboo Cluster Coordinator)
    • एकूण जागा: ३९ जागा (अंदाजित).
    • मासिक मानधन: रुपये २०,००0/- (मूळ मानधन) + रुपये ५,०००/- (प्रवास भत्ता) = एकूण २५,००0/- रुपये प्रतिमहिना.
  • वनवृत्त समन्वयक (Circle Coordinator)
    • एकूण जागा: ०३ जागा.
    • मासिक मानधन: रुपये ३५,००0/- (मूळ मानधन) + रुपये ५,०००/- (प्रवास भत्ता) = एकूण ४०,००0/- रुपये प्रतिमहिना.

जिल्ह्यानुसार आणि वनवृत्तानुसार रिक्त जागा (District Wise Vacancies)

बांबू क्लस्टर समन्वयक पदाच्या जागा (तालुका स्तरावर):

जिल्हारिक्त जागा
यवतमाळ१०
अमरावती
जालना
परभणी
अकोला
पालघर
बुलढाणा
वाशिम
नाशिक
अहिल्यानगर
नांदेड
नंदूरबार
गडचिरोली
एकूण४२

वनवृत्त समन्वयक पदाच्या जागा (वनवृत्त स्तरावर):

  • नागपूर वनवृत्त (नागपूर, वर्धा, गोंदिया व भंडारा क्षेत्र) – ०२ जागा.
  • कोल्हापूर वनवृत्त (कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व रत्नागिरी क्षेत्र) – ०१ जागा.

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा (Eligibility Criteria)

  • बांबू क्लस्टर समन्वयक पात्रता:
    • शैक्षणिक पात्रता: B.Sc/ Forestry किंवा B.Sc/ Agriculture किंवा बांबू तंत्रज्ञान पदविका (BRTC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
    • इतर अट: उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे. संबंधित जिल्ह्यातील स्थानिक रहिवासी असलेल्या उमेदवारांना निवडीमध्ये प्राधान्य दिले जाईल.
    • वयोमर्यादा: दि. ०२ जुलै २०२६ रोजी उमेदवाराचे वय १८ ते ४५ वर्षांच्या दरम्यान असावे (४५ वर्षांपेक्षा जास्त नसावे).
  • वनवृत्त समन्वयक पात्रता:
    • शैक्षणिक पात्रता: B.Sc/ Forestry / M.Sc/ Forestry / B.Sc/ Agriculture / M.Sc/ Agriculture किंवा वनविभागातील सेवानिवृत्त राजपत्रीत अधिकारी अर्ज करू शकतात.
    • इतर अट: संगणकाचे ज्ञान (MS-CIT, Word, Excel, PowerPoint व ऑनलाईन पोर्टलचे काम) असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.

सविस्तर जाहिरात व अर्जाची लिंक :

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
सविस्तर जाहिरातयेथे क्लिक करा
ऑफलाइन अर्जयेथे क्लिक करा

कामाचे स्वरूप काय असेल? (Job Profile)

  • क्लस्टर समन्वयक: शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहित करणे. लागवड केलेल्या बांबू रोपवनांचे मूल्यांकन करणे, रोपांचे योग्य नियोजन व पुरवठा करणे, तसेच शासनाच्या संगणकीय प्रणालीमध्ये माहिती वेळोवेळी अपडेट करणे. या पदासाठी उमेदवाराला दिलेल्या तालुका किंवा गाव स्तरावरील मुख्यालयी मुक्कामी राहणे बंधनकारक आहे.
  • वनवृत्त समन्वयक: बांबू लागवडीबाबत शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करणे, बांबू क्षेत्रातील कामांसाठी इतर शासकीय विभागांशी समन्वय साधणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कामकाज पाहणे.

अर्जासोबत जोडायची आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

उमेदवारांनी अर्जासोबत खालील प्रमाणपत्रांच्या स्व-साक्षांकित (Self-Attested) प्रती जोडणे आवश्यक आहे:

  • पदवी / पदविका (BRTC) प्रमाणपत्र व गुणपत्रिका.
  • आधार कार्ड.
  • MS-CIT किंवा संगणक उत्तीर्ण प्रमाणपत्र.
  • जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला (वयाचा पुरावा).
  • कामाचा अनुभव असल्यास त्याबाबतची माहिती (A4 साईझच्या पानावर दिलेली टिप्पणी).

अर्ज कसा करावा? (How to Apply?)

या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने किंवा थेट ईमेलद्वारे अर्ज करता येईल.

  • पायरी १: अधिकृत जाहिरातीमध्ये दिलेल्या प्रपत्रानुसार (Form) आपली सर्व माहिती जसे की नाव, पत्ता, शैक्षणिक पात्रता, मोबाईल नंबर, ईमेल आणि आधार क्रमांक अचूक लिहून घ्यावा.
  • पायरी २: अर्जावर स्वतःचा अलीकडचा पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो लावून त्यावर स्वाक्षरी करावी.
  • पायरी ३ (अर्ज सादर करणे): तुम्ही तुमचा अर्ज खालील दोनपैकी एका पद्धतीने पाठवू शकता:
  • ईमेलद्वारे: अर्ज आणि सर्व आवश्यक कागदपत्रे स्पष्ट स्कॅन करून mahabamboo@mahaforest.gov.in या अधिकृत ईमेलवर पाठवावीत.
    • थेट कार्यालयात: अर्ज पूर्ण भरून “महाराष्ट्र बांबू विकास मंडळ कार्यालय, नवीन काटोल नाका चौक, गोरेवाडा रोड, नागपूर – ४४००१३” या पत्त्यावर स्वतः नेऊन द्यावा किंवा पोस्टाने पाठवावा.
  • पायरी ४: तुमचा अर्ज दि. ०२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपूर्वी पोहोचणे बंधनकारक आहे. पात्र उमेदवारांची यादी तयार करून त्यांना पुढील मुलाखतीसाठी (Interview) आमंत्रित केले जाईल.
Maharashtra Bamboo Vikas Bharti
Maharashtra Bamboo Vikas Bharti

महत्वाची सूचना : वरील लेखात प्राथमिक माहिती दिलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, जेणेकरून कोणताही गैरसमज किंवा नुकसान होणार नाही. अन्यथा माहितीतील त्रुटींमुळे नुकसान होण्याची शक्यता असू शकते.

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!