शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव (Government Medical College Jalgaon Recruitment 2026) येथे भरती प्रक्रिया राबवण्यात आली असून. एकूण 16 महत्त्वाच्या जागा भरल्या जाणार आहेत त्या म्हणजे महाविद्यालय मध्ये प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक अशा असू शकतात. शिक्षण क्षेत्रामध्ये करिअर घडवणाऱ्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक सर्वोत्तम संधी आहे. ज्या उमेदवारांना या भरतीचा अर्ज भरायचा आहे या भरतीची अंतिम तारीख ची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज भरून घ्यावा.
जळगाव येथे ही भरती प्रक्रिया रघुनाथ आली असून, या भरतीचा अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्र, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, वेतन आणि निवड प्रक्रिया त्याची संपूर्ण माहिती खालील लेखामध्ये पाहू शकता:
पदाचे स्वरूप
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव भरती (Jalgaon Recruitment 2026) त्या भरतीतील विविध पदांचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.
- जळगाव येथे सुरू असलेली भरती प्रक्रिया वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील वरिष्ठ शिक्षक पदांसाठी सुरू आहेत.
- या भरती प्रक्रियेमध्ये प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक अशा दोन प्रमुख संवर्गातील पदांचा समावेश होतो.
- विविध वैद्यकीय शाखांमधील तज्ज्ञांची नियुक्ती करण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
- या भरतीमध्ये एकूण 16 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव भरती (Jalgaon Recruitment 2026) या भरतीतील पदांसाठी अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे पाहू शकता:
- या पूर्वीतील सर्व पदे उच्च वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित असल्याने उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही नॅशनल मेडिकल कमिशन या नियमानुसार असणे आवश्यक आहे.
- उमेदवारांना ज्या विषयासाठी अर्ज करायचा आहे त्या विषयातील मान्यता प्राप्त पदवी (MD, MS किंवा DNB) असणे अनिवार्य आहे.
- प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक या पदांसाठी संबंधित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचा अनुभव असणे बंधनकारक आहे.
- प्रत्येक विषयासाठी आवश्यक असलेले विशेष अहर्ता आणि अनुभव असणे अनिवार्य आहे.
- टीप : वरील पात्रता आणि नियम अर्ज करण्यापूर्वी या भरतीच्या अधिकृत जाहिरातीमध्ये लक्षपूर्वक वाचा.
आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव भरती (Jalgaon Recruitment 2026) या गोष्टीचा अर्ज करण्यासाठी खालील आवश्यक कागदपत्रांची यादी दिली आहे.
- उमेदवाराकडे संबंधित विषयातील पदवी मधील सर्व वर्षाचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र.
- प्राध्यापक आणि सहयोगी अध्यापक पदासाठी आवश्यक असलेला अध्यापनाचा अनुभव असलेले प्रमाणपत्रे अनिवार्य आहे.
- उमेदवाराची वैद्य महाराष्ट्र वैद्यकीय परिषद किंवा संबंधित परिषदेची नोंदणी प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
- आधार कार्ड
अर्ज प्रक्रिया (How to Apply)
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव भरती (Jalgaon Recruitment 2026) या गोष्टीचा अर्ज करण्यासाठी खालील अर्ज प्रक्रिया देण्यात आली आहे.
- सर्वात अगोदर तुम्ही या भरतीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या https://mahasarkar.co.in/gmc-jalgaon-bharti/
- यानंतर जाहिरात वाचा शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, नियम व अटी हे सर्व गोष्टी काळजीपूर्वक वाचा.
- जाहिरातीमध्ये दिलेल्या सूचनेनुसार अर्ज विहित नमुन्यात तयार करा.
- अर्जामध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती (नाव,पत्ता जन्म दिनांक आणि आधार नंबर), शैक्षणिक पात्रता ही सर्व माहिती काळजीपूर्वक आणि अचूक भरा.
- अर्जामध्ये नमूद केलेले सर्व कागदपत्रे (शैक्षणिक प्रमाणपत्रे अनुभवाचा तपशील आणि वैद्यकीय नोंदणी प्रमाणपत्र सोबतच ओळखपत्र) योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
- या भरतीची अंतिम तारीख 21 जुलै 2026 असून तारखेचा आज तुमचा अर्ज भरून घ्या.
वेतन – Salary
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव भरती (Jalgaon Recruitment 2026) :-
| पदाचे नाव | मासिक वेतन |
| प्राध्यापक (Professor) | 1,84,000 |
| सहयोगी प्राध्यापक (Associate Professor | 1,70,000 |
निवड प्रक्रिया
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव भरती (Jalgaon Recruitment 2026) :-
- या भरतीचे उमेदवारांची निवड हे शासनाने नेमलेल्या निवड समितीद्वारे करण्यात येते.
- पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे घेतली जाईल.
- मुलाखतीमध्ये उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, संबंधित विषयातील अध्यापनात अनुभव आणि वैद्यकीय क्षेत्रातील नैपुण्य त्याचा विचार केला जातो यावरूनच गुणवत्ता यादी तयार करण्यात येते.
- मुलाखतीनंतर निवड झालेल्या उमेदवारांना अंतिम यादी देण्यात येते आणि त्यानंतर नियुक्ती पत्र देण्यात येते.

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखातील माहिती वाचकांच्या सोयीसाठी अधिकृत भरती अधिसूचनेच्या आधारे संकलित करण्यात आली आहे. माहिती अचूक ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला असला तरी, जाहिरातीत किंवा नियमांमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित अधिकृत अधिसूचना व संकेतस्थळावरील अद्ययावत माहितीची स्वतः पडताळणी करावी. कोणत्याही विसंगतीच्या बाबतीत अधिकृत अधिसूचनेतील तरतुदींनाच अंतिम व बंधनकारक मानले जाईल.
तुम्ही येथे संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर भरती 2026 (Sangameshwar College Solapur Recruitment 2026) या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/solapur-recruitment/