Zilla Parishad Ahilyanagar Recruitment 2026 : जिल्हा परिषद अहिल्यानगर शिक्षक भरती 2026 | Best संधी!

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Zilla Parishad Ahilyanagar Recruitment 2026 : जिल्हा परिषद अहिल्यानगर अंतर्गत शिक्षक पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये करिअर घडवण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. वरील भरती नुसार शिक्षण अधिकारी प्राथमिक कल्याण नगर यांच्या व्यवस्थापनाखाली शाळांमधील मराठी आणि उर्दू माध्यमासाठी रिक्त पदांची पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

या भरती प्रक्रियेमध्ये शाळेमधील इयत्ता पहिली ते पाचवी (Under Graduate Teacher) आणि इयत्ता सहावी ते आठवी (Graduate Teacher) या गटांमधील शिक्षकांची या भरती प्रक्रियेसाठी निवड करण्यात येणार असून, यामध्ये विविध प्रवर्गासाठी आरक्षणनिहाय पदे आणि दिव्यांग तसेच अनाथ उमेदवारांसाठी देखील आरक्षण समाविष्ट करण्यात आले आहेत. भरती प्रक्रियेचा असा हा पूर्णपणे ऑनलाइन पवित्र पोर्टल द्वारे करायचा आहे.

या भरती प्रक्रियेसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया याची संपूर्ण माहिती तुम्हाला खालीलकांमध्ये दिली आहे.

  • महत्त्वाच्या तारखा
    • अर्ज सुरू तारीख : 6 ऑगस्ट 2026
    • अर्ज अंतिम तारीख : 13 ऑगस्ट 2026

Zilla Parishad Ahilyanagar Recruitment 2026 : पदाचे स्वरूप

मराठी माध्यम

पदाचे नावएकूण जागा
अंडर ग्रॅज्युएट टीचर (इ. १ ली ते ५ वी)मराठी माध्यम ७५
अंडर ग्रॅज्युएट टीचर (इ. १ ली ते ५ वी)इंग्रजी माध्यम ३५
ग्रॅज्युएट टीचर (इ. ६ वी ते ८ वी)मराठी माध्यम (गणित-विज्ञान) ७३
ग्रॅज्युएट टीचर (इ. ६ वी ते ८ वी)इंग्रजी माध्यम (भाषा – इंग्रजी) ५८
एकूण२४१

उर्दू माध्यम

पदाचे नावएकूण जागा
अंडर ग्रॅज्युएट टीचर (इ. १ ली ते ५ वी)उर्दू माध्यम १३
अंडर ग्रॅज्युएट टीचर (इ. १ ली ते ५ वी)इंग्रजी माध्यम ७
ग्रॅज्युएट टीचर (इ. ६ वी ते ८ वी)उर्दू माध्यम (गणित-विज्ञान) ५
ग्रॅज्युएट टीचर (इ. ६ वी ते ८ वी)उर्दू माध्यम (विशेष इंग्रजी) २
एकूण२७

Zilla Parishad Ahilyanagar Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

जिल्हा परिषद अहिल्यानगर शिक्षक भरती 2026 त्या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही खालीलप्रमाणे आहे.

  • अंडर ग्रॅज्युएट टीचर (इ. १ ली ते ५ वी)
    • या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
    • व्यावसायिक शैक्षणिक पात्रता हे डिप्लोमा पूर्ण असावा लागतो.
    • टी.ई.टी. (TET) पेपर १ किंवा सी.टी.ई.टी. (CTET) पेपर १ उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
  • ग्रॅज्युएट टीचर (इ. ६ वी ते ८ वी)
    • या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही संबंधित विषयांमधील पदवी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
    • व्यावसायिक पात्रता ही डिप्लोमा किंवा पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
    • टी.ई.टी. (TET) पेपर २ (गणित-विज्ञान) किंवा सी.टी.ई.टी. (CTET) पेपर २ (गणित-विज्ञान) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

टीप : उमेदवारांनी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दिलेली असणे अनिवार्य ठरते. अधिक माहितीसाठी आणि अचूक माहितीसाठी .उमेदवारांनी पवित्र प्रणालीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

वयोमर्यादा

प्रवर्गवयोमर्यादा व नियम
किमान वयोमर्यादाशासन नियमांनुसार किमान वयोमर्यादा लागू राहते.
मालमत्तावयोमर्यादा आणि सवलत महाराष्ट्रातील शासकीय व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय उमेदवारांसाठी आरक्षण अधिनियम, दि. 26/02/2024 नुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांसाठी आरक्षण व कमाल वयोमर्यादेचे निकष लागू आहेत.
इतर अटी वयोमर्यादा

Zilla Parishad Ahilyanagar Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

जिल्हा परिषद अहिल्यानगर शिक्षक भरती 2026 या भरतीचा अर्ज भरण्यासाठी तुमच्याकडे खालील आवश्यक कागदपत्रांची यादी असणे आवश्यक आहे.

  • 12 वी उत्तीर्ण असलेले, पदवी आणि पदवीत्तर उत्तीर्ण असलेले गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
  • व्यावसायिक प्रमाणपत्रे : डी.एड. (D.El.Ed.), बी.एड. (B.Ed.) किंवा संबंधित डिप्लोमा/पदवीची प्रमाणपत्रे.
  • टीईटी (TET) किंवा सीटीईटी (CTET) उत्तीर्ण असल्याचे गुणपत्रक/प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड किंवा इतर अधिकृत ओळखपत्र कोणतेही एक चालते.
  • जात प्रमाणपत्र (Caste Certificate) लागू असेल तरच
  • रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate)

Zilla Parishad Ahilyanagar Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

जिल्हा परिषद अहिल्यानगर शिक्षक भरती 2026 या भरतीचा अर्ज कसा करावा याची संपूर्ण माहिती तुम्हाला खालील प्रमाणे देण्यात आली आहे.

  1. उमेदवारांचे TAIT-२०२५ परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
  2. पोर्टलवर तुम्ही तुमचे स्वयं प्रमाणपत्र पूर्ण केलेले असणे आवश्यक ठरते.
  3. शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्रा सोबतच आरक्षणाचे प्रमाणपत्र सोबत ठेवावी.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया :

  • सर्वप्रथम तुम्ही अधिकृत पोर्टलला भेट द्या
  • त्यानंतर मुख्य पानावर असलेला पर्याय Candidate Login वर क्लिक करा.
  • नोंदणी करण्यासाठी तुम्हाला वैयक्तिक माहिती भरावी लागेल, वैयक्तिक माहिती भरून नोंदणी करू शकता.
  • नोंदणी केल्यानंतर तुम्हाला यूजर आयडी आणि पासवर्ड मिळेल त्याचा वापर करून तुम्ही लॉगिन करून घ्या.
  • लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाइल पूर्णपणे बनलेली दिसेल आणि स्व प्रमाणपत्र आणि उपलब्ध रिक्त पदांची माहिती दिसून येईल.
  • तुमची पात्रता आणि पदानुसार तुम्ही पसंतीचे शाळांचे प्राधान्यक्रम काळजीपूर्वक निवडू शकता.
  • तुम्ही तुमची पसंती योग्य प्रकारे भरल्यानंतर Lock Preference या पर्यायावर क्लिक करा.
Online applyयेथे क्लिक करा
Official websiteयेथे क्लिक करा
Notification PDFयेथे क्लिक करा

मानधन

मराठी16,000/- प्रतिमहिना
उर्दू16,000/- प्रतिमहिना
Zilla Parishad Ahilyanagar Recruitment 2026 feature image

तुम्ही येथे भारत-तिब्बत पोलीस बल भरती 2026 या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/itbp-mo-recruitment-2026/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!