ESIC Advocate Advertisement 365 Vacancy 2026 – कर्मचारी राज्य विमा महामंडळात (ESIC) वकिलांसाठी 365 जागांची संधी!

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC), महाराष्ट्र विभागाकडून 2026 ते 2029 या कालावधीसाठी वकिलांचे पॅनेल तयार करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कोर्ट आणि ट्रिब्युनलमध्ये ESIC ची बाजू मांडण्यासाठी पात्र वकिलांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. ही जाहिरात 10 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या जाहिरातीमध्ये किती जागा आहेत, कोण अर्ज करू शकतं, पात्रता आणि अनुभव किती हवा, कोर्टनुसार किती जागा आहेत, निवड कशी होणार, अर्ज कसा करायचा, कोणती कागदपत्रे लागतील आणि शेवटची तारीख काय आहे, ही सगळी माहिती आपण सोप्या भाषेत पाहणार आहोत.
त्यामुळे माहिती अर्धवट वाचून निर्णय घेऊ नका. संपूर्ण माहिती आणि अटी समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

नेमकी संधी काय आहे?

ESIC म्हणजेच Employees’ State Insurance Corporation, जे भारत सरकारच्या Labour & Employment Ministry अंतर्गत काम करते. ESIC च्या वतीने महाराष्ट्रातील High Court, EI Court, CAT, MM Court, District & Sessions Court, Magistrate Court, Labour Court, Consumer Forum तसेच इतर न्यायालयीन आणि अर्ध-न्यायालयीन ठिकाणी प्रकरणे लढण्यासाठी वकिलांचे पॅनेल तयार केले जाणार आहे.

कोर्टनुसार जागांची संपूर्ण माहिती

क्र.कोर्ट / ट्रिब्युनल|ठिकाणजाग
1High Court of BombayMumbai47
2CAT – Mumbai BenchMumbai3
3District & Sessions CourtMumbai1
4E.I. CourtMumbai60
5M.M. CourtMumbai9
6C.G.I.TMumbai1
7NCLTMumbai1
8High Court of Bombay– Aurangabad BenchAurangabad5
9E.I. CourtAurangabad3
10M.M. CourtAurangabad5
11E.I. CourtDhule1
12M.M. CourtDhule1
13E.I. CourtJalgaon1
14M.M. CourtJalgaon1
15M.M. CourtJalgaon (Shirpur)1
16E.I. CourtJalna1
17M.M. CourtJalna1
18E.I. CourtE.I. Court Nanded1
19M.M. CourtNanded1
20E.I. CourtOsmanabad (Dharashiv)1
21E.I. CourtParbhani1
22High Court of Bombay – Kolhapur BenchKolhapur1
23E.I. CourtKolhapur1
24M.M. CourtKolhapur1
25E.I. CourtPune37
26M.M. CourtPune4
27District & Sessions CourtPune1
28E.I Court – Khed RajgurunagarPune4
29M.M. Court– Khed RajgurunagarPune2
30E.I. CourtSatara2
31M.M. CourtSatara1
32E.I. CourtSangli4
33M.M. CourtSangli1
34E.I. Court – Peth VadgaonKolhapur1
35M.M. Court – Peth VadgaonKolhapur1
36E.I. Court – RadhanagariKolhapur1
37M.M. Court – RadhanagariKolhapur1
38E.I. CourtSolapur2
39M.M. CourtSolapur1
40M.M. Court – AkurdiPune1
41M.M. Court Ichalkaranji1
42M.M. Court – ShirurPune1
43M.M. CourtBarshi1
44M.M. CourtKadegaon1
45M.M. CourtIslampur1
46E.I. CourtNashik20
47M.M. CourtNashik8
48E.I. CourtAhmednagar1
49M.M. CourtAhmednagar1
50District & Sessions CourtThane1
51E.I. CourtThane37
52M.M. CourtThane3
53High Court of Bombay – Nagpur BenchNagpur13
54CAT – Nagpur BenchNagpur1
55Consumer CourtNagpur5
56E.I. CourtNagpur13
57M.M. CourtNagpur27
58District & Sessions CourtNagpur1
59E.I. CourtBuldhana1
60M.M. CourtBuldhana1
61E.I. CourtChandrapur1
62M.M. CourtChandrapur1
63E.I. CourtAmravati1
64M.M. CourtAmravati1
65E.I. CourtBhandara1
66M.M. CourtBhandara1
67E.I. CourtAkola2
68M.M. CourtAkola1
69E.I. CourtGondia1
70M.M. CourtGondia1
71E.I. CourtHinganghat1
72M.M. CourtHinganghat1
73E.I. CourtYavatmal1
74M.M. CourtYavatmal1

वरील जाहिरातीतील जागांची एकूण बेरीज: 365.
मात्र ESIC ने स्पष्ट केले आहे की ही vacancy position अंदाजे आहे आणि गरजेनुसार त्यात बदल होऊ शकतो.

पात्रता काय पाहिजे?

तुमच्याकडे भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची Law मधील Bachelor Degree असणे आवश्यक आहे.

तसेच तुम्ही Bar Council of India / State Bar Council मध्ये Advocate म्हणून enrolled/registered असणे गरजेचे आहे.

कोर्टनुसार अनुभव

ज्या कोर्टसाठी अर्ज करणारकिमान अनुभव
High Court10 वर्षे
EI Court5 वर्षे
CAT व इतर Courts/Tribunals5 वर्षे
MM Court5 वर्षे

हा अनुभव 01 जुलै 2026 रोजी पूर्ण झालेला असणे अपेक्षित आहे. मात्र Regional Director, ESIC RO-Maharashtra यांना अनुभवामध्ये सूट देण्याचा किंवा अतिरिक्त पात्रता/अट ठरवण्याचा अधिकार आहे.

पॅनेलचा कालावधी किती?

साधारणपणे हे पॅनेल 3 वर्षांसाठी म्हणजे 2026 ते 2029 तयार केले जाणार आहे.

मात्र काही कारणामुळे नवीन पॅनेल आधी तयार झाले तर जुने पॅनेल बंद केले जाऊ शकते. नवीन पॅनेल तयार होईपर्यंत चालू प्रकरणांमध्ये अडचण येऊ नये म्हणून विद्यमान पॅनेलचा कालावधी वाढवण्याचीही तरतूद आहे.

फी किती मिळणार?

वकिलांना मिळणारी फी ESIC ने ठरवलेल्या Fee Schedule प्रमाणे दिली जाईल.

ही फी 25 मार्च 2026 रोजीच्या ESIC च्या संबंधित Office Memorandum नुसार असेल.

महत्त्वाचे म्हणजे, फक्त ESIC च्या पॅनेलवर निवड झाली म्हणून वेगळी Retainer Fee मिळणार नाही.

अर्ज कसा करायचा?

ESIC ने दिलेल्या ठराविक Application Form मध्येच अर्ज करायचा आहे. दुसऱ्या कोणत्याही Format मध्ये अर्ज स्वीकारला जाणार नाही.

अर्जांची संख्या आणि ESIC ची गरज पाहून उमेदवारांना Shortlist केले जाऊ शकते आणि त्यांना Interaction साठी बोलावले जाऊ शकते.

फक्त पात्रता पूर्ण आहे म्हणून Interaction किंवा Selection मिळेलच असे नाही. Selection आणि Shortlisting बाबत ESIC चा निर्णय अंतिम असेल.

कुठल्याही प्रकारचे Canvassing केल्यास उमेदवारी रद्द होऊ शकते. Interaction ची तारीख, वेळ, ठिकाण आणि पद्धत साधारणपणे Email किंवा Letter द्वारे कळवली जाईल.

अर्जासोबत कोणती कागदपत्रे द्यायची?

1. Law Degree आणि इतर शैक्षणिक पात्रतेची प्रत
2. Bar Council Registration Certificate
3. Bar Association Identity Card
4. ID Proof
5. इतर सरकारी विभाग/PSU/संस्थेने दिलेली Empanelment Letter असल्यास त्याची प्रत
6. Resume — अनुभव, शिक्षण, Clients आणि केलेल्या Cases ची माहिती
7. अलीकडील 2 Colour Passport Size फोटो
8. मागील 2 आर्थिक वर्षांचे Income Tax Returns
9. Aadhaar Card
10. PAN Card
11. Conflict of Interest बाबत Undertaking आणि Declaration

ही कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

वकिलांच्या निवडीसाठी Committee मध्ये:

– Regional Director, ESIC RO-Maharashtra
– Legal Field मधील दोन बाहेरील अनुभवी सदस्य

असे एकूण सदस्य असतील.

पॅनेलवर निवड झाल्यानंतर काय काम करावे लागेल?

ESIC कडून केस मिळाल्यानंतर वकिलाने वेळेवर कोर्टात हजर राहणे आवश्यक आहे.

ESIC कडून Email द्वारे केसची माहिती दिल्यानंतर संबंधित कार्यालयातून Brief, Petition ची Copy आणि Assignment Letter घेणे ही वकिलाची जबाबदारी असेल.

प्रत्येक Hearing नंतर केसची Status Report देणे आवश्यक आहे. ESIC ला केसची प्रगती, पुढील तारीख, कोर्टाचा Order/Judgment याबद्दल माहिती देत राहावे लागेल.

गरज पडल्यास Special किंवा Senior Advocate सोबतही काम करावे लागेल. तसेच काही प्रकरणांमध्ये मुंबईच्या बाहेरही ESIC ची बाजू मांडण्यासाठी काम दिले जाऊ शकते.

जर ESIC च्या बाजूने केसचा निकाल आला नाही, तर संबंधित वकिलाने त्या निकालाचे कारण आणि Appeal करणे योग्य आहे का याबाबत आपले मत Certified Copy मिळाल्यापासून 5 Working Days च्या आत द्यावे लागेल. तसेच दर महिन्याला हाताळलेल्या Cases आणि त्यांच्या निकालाची माहिती द्यावी लागेल.

  • Private Practice करता येईल का?

हो, वकिलाला Private Practice करण्याचा अधिकार राहील.

पण Private Practice मुळे ESIC च्या कामावर परिणाम होता कामा नये.

तसेच ESIC च्या Empanelment च्या काळात ESIC विरुद्ध कोणत्याही पक्षाचा Case स्वीकारता किंवा त्याला Legal Advice देता येणार नाही.

आणखी महत्त्वाच्या अटी

  • ज्या ठिकाणी Empanelment मागितले आहे, त्या ठिकाणी Advocate चे Office असणे अपेक्षित आहे.
  • Office, Chamber, Library आणि आवश्यक Manpower अशी योग्य Infrastructure असणे अपेक्षित आहे.
  • Communication Skills चांगले असणे आवश्यक आहे.
  • ESIC च्या नावाचा किंवा Logo चा वापर स्वतःच्या Letterhead, Board, Name Plate किंवा Pamphlet वर करता येणार नाही.
  • स्वतःला “Legal Advisor of ESIC”, “Advocate of ESIC” किंवा Standing Advocate म्हणून दाखवता येणार नाही, जोपर्यंत ESIC ने तसे स्पष्टपणे सांगितलेले नाही.
  • ESIC च्या Cases ची माहिती बाहेरच्या व्यक्तीला किंवा Media ला सांगता येणार नाही.
  • ESIC च्या परवानगीशिवाय केसबाबत कोणतीही कारवाई करता येणार नाही.
  • ESIC च्या कामातील कागदपत्रे आणि Records आवश्यकतेनुसार परत करावे लागतील.
  • कोणत्या कारणामुळे Empanelment रद्द होऊ शकते?
  • खोटी माहिती देणे, कोर्टाच्या Hearing ला विनाकारण गैरहजर राहणे, ESIC च्या सूचनांचे पालन न करणे, ESIC च्या अधिकारी/कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करणे, केसची गोपनीय माहिती बाहेर देणे, चुकीची माहिती देणे, वारंवार Adjournment घेणे किंवा Court Proceedings ला वारंवार गैरहजर राहणे अशा कारणांमुळे Empanelment रद्द होऊ शकते.

तसेच ESIC ला Performance खराब असल्यास Empanelment समाप्त करण्याचा अधिकार आहे. ESIC एक महिन्याची Written Notice देऊन Empanelment समाप्त करू शकते; Advocate ला स्वतःहून Empanelment सोडायचे असल्यास 3 महिन्यांची Notice द्यावी लागेल.

नवीन अर्जदारांनी Form मध्ये कोणती माहिती भरायची?

Fresh Applicant Advocates साठी Annexure-II मध्ये खालील माहिती मागितली आहे:

– नाव
– वडिलांचे नाव
– कोणत्या Court साठी अर्ज केला आहे — EI Court / High Court / MM Court / CAT
– जन्मतारीख
– Nationality
– Correspondence Address, PIN आणि Phone Number
– Permanent Address
– Office/Chamber चा Address
– Mobile Number
– Email ID
– Educational Qualification
– LLB/Law Graduate ची माहिती
– Post-Graduation
– इतर Professional Qualification
– इतर Government Department/PSU/Statutory/Autonomous Body च्या Panel वर असल्यास त्याची माहिती
– Junior Advocates ची माहिती
– यापूर्वी हाताळलेल्या ESIC Cases ची माहिती
– Landmark Case मध्ये Vakalatnama द्वारे काम केले असल्यास त्याची माहिती
– Bank Account आणि IFSC
– PAN
– Aadhaar
– Bar Council Disciplinary Proceedings असल्यास माहिती
– Criminal Complaint/FIR/Criminal Proceeding असल्यास माहिती
– कोणत्याही ESIC Employee शी संबंध असल्यास माहिती.

Existing Panel Advocates साठी

आधीपासून ESIC महाराष्ट्राच्या Panel वर असलेले Advocates सुद्धा नवीन Panel तयार झाल्यानंतर जुन्या Panel वर राहणार नाहीत. त्यामुळे त्यांनाही या नवीन जाहिरातीनुसार पुन्हा अर्ज करावा लागणार आहे.

Existing Panel Advocates साठी Annexure-III मध्ये सध्याच्या Panel ची माहिती, ज्या Court साठी सध्या Empanelled आहेत ती माहिती, नवीन कोणत्या Court साठी अर्ज करायचा आहे, वैयक्तिक माहिती, शिक्षण, इतर Government Panel, Junior Advocates, ESIC Cases, Landmark Cases, Bank/PAN/Aadhaar, Disciplinary/Criminal Proceedings आणि ESIC Employee शी संबंध यांची माहिती मागितली आहे.

Undertaking मध्ये काय सांगावे लागेल?

अर्जदाराने दिलेली सर्व माहिती खरी आणि पूर्ण असल्याचे सांगावे लागेल.

माहिती चुकीची किंवा खोटी आढळल्यास उमेदवारी रद्द होऊ शकते.

ESIC च्या Cases बाबत पूर्ण गोपनीयता ठेवण्याचे आणि ESIC ने मागितल्यास Case Files व Records परत करण्याचे Undertaking द्यावे लागेल.

तसेच ESIC ने ठरवलेला Fee Schedule मान्य असल्याचेही सांगावे लागेल.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

Regional Director
Ministry of Labour & Employment, Government of India
Employees’ State Insurance Corporation
Regional Office – Maharashtra
5th Floor, M.G.M. Hospital
Dr. S.S. Rao Road, Parel
Mumbai – 400012

अर्जाच्या पाकिटावर संबंधित “Application for the Empanelment of Advocates…” असा उल्लेख करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

📅 28 ऑगस्ट 2026

⏰ सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत

या वेळेपर्यंत ESIC Regional Office–Maharashtra येथे अर्ज पोहोचलेला असणे आवश्यक आहे.

शेवटी एक महत्त्वाची गोष्ट

ही थेट सरकारी नोकरीची भरती नाही. ही ESIC च्या वतीने काम करण्यासाठी Advocate Empanelment प्रक्रिया आहे.

पॅनेलवर निवड झाली म्हणजे ESIC कडून प्रत्येक वकिलाला काम मिळेलच, अशी कोणतीही हमी नाही. Cases कोणत्या Advocate ला द्यायचे हे ESIC च्या अधिकृत अधिकाऱ्यांच्या निर्णयावर असेल.

ESIC कोणताही अर्ज कारण न देता Reject करू शकते आणि गरज पडल्यास संपूर्ण Empanelment प्रक्रिया पुढे ढकलू किंवा रद्दही करू शकते. निवड झालेल्या Advocates ची यादी ESIC च्या अधिकृत Website वर उपलब्ध करून दिली जाईल आणि निवड झालेल्या Advocates ना स्वतंत्रपणे पत्र/ई-मेलद्वारे माहिती दिली जाऊ शकते.

अधिकृत वेबसाइट: ESIC Regional Office Maharashtra → Recruitment List

अधिकृत जाहिरात दिनांक: 10 ऑगस्ट 2026

अर्जाची शेवटची तारीख: 28 ऑगस्ट 2026, सायं. 5:00 वाजता

महत्त्वाची सूचना: अर्ज करताना उमेदवाराने खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचून नंतरच अर्ज करावा.

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

रेणुकामाता मल्टीस्टेट सोसायटी भरती 2026 ही एक नवीन जाहिरात आलेली आहे ती पाहण्यासाठी तुम्ही येथे क्लिक करू शकता 👇
https://totalnaukri.com/renukamata-multistate-society-recruitment/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!