India Post GDS Result 2026 जाहीर! 23,757 जागांची निवड यादी येथे पहा आणि PDF डाउनलोड करा | Best Result!

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

India Post GDS Result 2026 : या पदासाठी फक्त दहावी उत्तीर्ण लागते, तर तुम्ही ही परीक्षा दिली आहे का? आणि दिली आहे, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी. भारतीय टपाल विभागाअंतर्गत महाराष्ट्र मधील विविध विभागांमध्ये Branch Postmaster (BPM), Assistant Branch Postmaster (ABPM) आणि Daksevak या पदांच्या भरतीसाठी पहिली निवड यादी (List 1) जाहीर केली आहे.

उमेदवारांचे नाव किंवा रजिस्ट्रेशन नंबर आले आहे त्यांना संबंधित डिफ्युजन ऑफिस मध्ये 27 ऑक्टोबर 2026 या तारखे पूर्वी कागदपत्रे पडताळणीसाठी जावे लागेल. या भरतीचा कट-ऑफ किती लागला आहे? निवड यादीची पीडीएफ कशी डाऊनलोड करायची आणि पडताळणीसाठी कोणते मूळ कागदपत्रे लागणार आहेत याची सविस्तर माहिती तुम्हाला खालील लेखांमध्ये मिळून जाईल.

India Post GDS Result 2026 : पदाबद्दल मुख्य माहिती

तपशील (Details)माहिती (Information)
भरतीचे नाव (Recruitment Name)इंडिया पोस्ट जीडीएस भरती २०२६ (India Post GDS Recruitment – Schedule-II, July-2026)
आयोजक संस्था (Conducting Body)भारतीय टपाल विभाग, भारत सरकार (India Post)
सर्कल (Circle)महाराष्ट्र सर्कल (Maharashtra Circle)
पदाचे नाव (Post Name)ब्राँच पोस्टमास्टर (BPM), असिस्टंट ब्राँच पोस्टमास्टर (ABPM) आणि डाक सेवक
यादीचा प्रकार (List Type)पहिली निवड यादी (Shortlisted Candidates – List 1)
निकाल जाहीर तारीख (Result Date)ऑक्टोबर २०२६
कागदपत्र पडताळणी अंतिम मुदत (DV Last Date)२७ ऑक्टोबर २०२६ (27/10/2026)
स्थान / केंद्र (DV Venue)संबंधित विभागीय टपाल कार्यालय (Respective Divisional Office)
अधिकृत संकेतस्थळ (Official Website)indiapostgdsonline.gov.in

India Post GDS Result 2026 : निवड यादी कशी पहायची?

तुमचे यादी मध्ये नाव आहे का? हे अगदी मोबाईल मध्ये सोप्या पद्धतीने कसे पाहिजे याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे :

  • सर्वप्रथम तुम्ही अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन तुमच्या मोबाईल मधील ब्राउझर वर उघडा आणि इंडियन पोस्ट त्याची अधिकृत वेबसाईट ओपन करा.
  • ‘Candidates Corner’ कडे जा
  • वेबसाइटच्या होमपेजवर आल्यावर डाव्या बाजूला किंवा मेनूमध्ये ‘Candidate’s Corner’ किंवा ‘GDS Online Engagement Schedule-II, July-2026’ असा पर्याय दिसेल.
  • महाराष्ट्र सरकार निवडा त्यावर क्लिक केल्यानंतर विविध राज्यांची लिंक दिसून येतील त्यावेळी तुमच्या राज्याचे नाव शोधा.
  • ‘Shortlisted Candidates’ PDF डाउनलोड करा
  • परंतु अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला हे अधिकृत वेबसाईट वरती जमत नसेल तर तुम्ही खालील दिलेल्या महाराष्ट्रातील निवड यादी समोरील येथे क्लिक करा तिथे पाहिल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट महाराष्ट्रातील निवड यादी मिळून जातील.
महाराष्ट्रातील निवड यादीयेथे क्लिक करा
इतर राज्यातील यादीयेथे क्लिक करा

India Post GDS Result 2026 : कागदपत्र पडताळणी (Document Verification)

महाराष्ट्र सर्कल मध्ये पहिल्या निवड यादी मध्ये ज्या उमेदवारांची नावे आली आहेत तुम्ही लवकरात लवकर कागदपत्र पडताळणी करून घ्या. कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे :

  • शॉर्टलिस्ट केलेल्या सर्व उमेदवारांनी आपले कागदपत्र पडण्यासाठी 27 ऑक्टोंबर 2026 या तारखेपर्यंत पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
  • उमेदवारांना त्यांच्या अर्जामध्ये नमूद केलेल्या किंवा संबंधित विभागीय कार्यालयामध्ये स्वतः उपस्थित राहून कागदपत्रे तपासून घ्यावी लागते.
  • पडताळणीच्या वेळी उमेदवारांनी स्वतःची सर्व मूळ प्रमाणपत्रे सोबत आणणे बंधनकारक आहे.
  • मूळ कागदपत्रांची संक्षेत किंवा साक्षांकित केलेल्या दोन छायांकित प्रतीचे संच सोबत ठेवणे आवश्यक आहे.

कागदपत्र पडळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी

  • १० वीची मूळ गुणपत्रिका आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र (10th Marksheet & Certificate)
  • ​जात प्रमाणपत्र (Caste / Community Certificate)
  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड (Aadhaar Card), पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र (Voter ID) किंवा ड्रायव्हिंग लायसन पैकी कोणतेही एक.
  • वयाचा पुरावा पाहण्यासाठी जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला
  • संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र (Computer Proficiency Certificate)
  • दिव्यांग प्रमाणपत्र (Disability Certificate)
  • पासपोर्ट साईज फोटो
  • ऑनलाइन अर्जाची प्रत (Printed Copy of Online Application)

तुम्ही येथे “हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) भरती 2026“ या भरतीचे संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/hal-recruitment-2026/

India Post GDS Result 2026 – FAQ

  1. India Post GDS Result 2026 जाहीर झाला आहे का?
    होय, India Post GDS भरती 2026 च्या जुलै सत्रातील (Schedule-II) पहिली निवड यादी 12 ऑक्टोबर 2026 रोजी जाहीर झाली आहे.
  2. India Post GDS Result 2026 ची निवड यादी कुठे पाहायची?
    उमेदवार भारतीय डाक विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन निवड यादी पाहू शकतात.
    अधिकृत वेबसाइट: India Post GDS अधिकृत पोर्टल
  3. India Post GDS भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
    जुलै 2026 च्या भरती सत्रामध्ये एकूण 23,757 जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.
  4. GDS निवड यादी कशी तपासायची?
    अधिकृत वेबसाइट उघडा, Shortlisted Candidates: Schedule-II, July-2026 हा पर्याय निवडा आणि आपल्या पोस्टल सर्कलची निवड यादी PDF डाउनलोड करून त्यात आपला नोंदणी क्रमांक तपासा.
  5. GDS भरतीसाठी लेखी परीक्षा घेतली जाते का?
    सामान्य GDS भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा घेतली जात नाही. उमेदवारांची निवड प्रामुख्याने दहावीच्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादीद्वारे केली जाते.
  6. निवड यादीत नाव आल्यावर पुढे काय करावे?
    निवड यादीत नाव किंवा नोंदणी क्रमांक आल्यास अधिकृत सूचनेनुसार कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहावे. आवश्यक मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती सोबत न्याव्यात.
  7. पहिल्या निवड यादीत नाव न आल्यास काय करावे?
    उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर पुढील निवड याद्यांसंबंधी सूचना नियमितपणे तपासाव्यात. पुढील यादी जाहीर होईलच, असे निश्चित समजू नये.
  8. India Post GDS Result 2026 साठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
    दहावीची गुणपत्रिका, ओळखपत्र, लागू असल्यास जात प्रमाणपत्र, जन्मतारखेचा पुरावा आणि अधिकृत सूचनेत नमूद केलेली इतर कागदपत्रे तयार ठेवावीत.
India Post GDS Result 2026 feature image
India Post GDS Result 2026

Disclaimer (अस्वीकरण) : India Post GDS Result 2026 संदर्भातील ही माहिती उमेदवारांच्या माहितीसाठी देण्यात आली आहे. निवड यादी, निकाल, कागदपत्र पडताळणी आणि पुढील भरती प्रक्रियेबाबत अचूक व अद्ययावत माहितीसाठी भारतीय डाक विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. निकालासंबंधी कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी अधिकृत सूचना काळजीपूर्वक वाचावी. या लेखातील माहितीमध्ये काही त्रुटी किंवा बदल आढळल्यास त्यासाठी Total Naukri जबाबदार राहणार नाही.

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!