Central Railway Mumbai Division Recruitment 2026 : केंद्रीय रेल्वे मुंबई विभाग अंतर्गत शिक्षक या पदासाठी भरती 2026 | Best मार्गदर्शन

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Central Railway Mumbai Division Recruitment 2026 : शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये केंद्रीय रेल्वे मुंबई विभागांतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या भरतीमध्ये शिक्षक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.

एकूण पदे हे 17 असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून या भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत, शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करून घ्या. या भरतीचा अर्ज करण्यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया याची संपूर्ण माहिती खालील लेखांमध्ये देण्यात आली आहे.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • अधिसूचनेची तारीख: ०३ ऑगस्ट २०२६
  • मुलाखतीचे वेळापत्रक:
    • ​पोस्ट ग्रॅज्युएट टीचर (PGT): १९ ऑगस्ट २०२६ (सकाळी १०:०० ते दुपारी १:०० वा.)
    • ​प्रशिक्षित स्नातक शिक्षक (TGT): २० ऑगस्ट २०२६ (सकाळी १०:०० ते दुपारी १:०० वा.)
    • ​प्रायमरी टीचर (PRT): २१ ऑगस्ट २०२६ (सकाळी १०:०० ते दुपारी १:०० वा.)
    • ​(टीप: निश्चित केलेल्या दिवशी मुलाखत पूर्ण न झाल्यास ती पुढील दिवशी घेतली जाईल.)
    • ​मुलाखतीचे ठिकाण:
    • प्रधानाचार्य यांचे कक्ष, केंद्रीय रेल्वे माध्यमिक शाळा (इंग्रजी माध्यम) आणि ज्युनियर कॉलेज, कल्याण.

Central Railway Mumbai Division Recruitment 2026 : एकूण जागा

पदाचे नावरिक्ती जागांची संख्या
पीजी शिक्षक – इंग्रजी (PGT English)01
पीजी शिक्षक – अर्थशास्त्र (PGT Economics)01
पीजी शिक्षक – व्यवसाय अभ्यास (PGT Business Studies)01
पीजी शिक्षक – लेखाशास्त्र (PGT Accountancy)01
पीजी शिक्षक – रसायनशास्त्र (PGT Chemistry)01
पीजी शिक्षक – जीवशास्त्र (PGT Biology)01
टीजी शिक्षक – हिंदी (TGT Hindi)01
टीजी शिक्षक – सामाजिक विज्ञान (TGT Social Science)02
टीजी शिक्षक – इंग्रजी (TGT English)02
टीजी शिक्षक – कॉम्प्युटर सायन्स (TGT Computer Science)01
टीजी शिक्षक – गणित (TGT Maths)01
प्राइमरी शिक्षक – इंग्रजी आणि हिंदी (Primary Teacher – PRT)04
एकूण सर्व पदे17

Central Railway Mumbai Division Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता Educational

केंद्रीय रेल्वे, मुंबई विभाग भरती 2026 या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे.

  • पीजीटी (PGT – पदव्युत्तर शिक्षक)
    • इंग्रजी, अर्थशास्त्र, व्यवसाय अभ्यास, लेखाशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र: या पदासाठी संबंधित विषयामधील पदवी उत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
  • टीजीटी (TGT – प्रशिक्षित स्नातक शिक्षक):
    • हिंदी : या विषयासाठी संबंधित विषयांमधील तिन्ही वर्षे मुख्य विषय म्हणून बी.ए. (B.A.), बी.एड (B.Ed) आणि सीटीईटी (CTET) उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
    • सामाजिक विज्ञान : इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र किंवा राज्यशास्त्र यांपैकी कोणतेही दोन विषय घेऊन बी.ए. (B.A.), बी.एड (B.Ed) आणि सीटीईटी (CTET) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
    • इंग्रजी: इंग्रजी विषयासह बी.ए. (B.A.), बी.एड (B.Ed) आणि सीटीईटी (CTET) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
    • गणित : पीसीएम (PCM) सह बीएससी (B.Sc), बी.एड (B.Ed) आणि सीटीईटी (CTET) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
    • क्युपुटर सायन्स : मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ई./बी.टेक (कॉम्प्युटर सायन्स/IT) किंवा मान्यताप्राप्त विषयातील बी.एस.सी. (कॉम्प्युटर सायन्स)/बीसीए किंवा समतुल्य पदवी आणि संबंधित विषयात पीजी पदवी; किंवा डीओईएसीसीचे ‘B’ किंवा ‘C’ लेव्हल आणि पदव्युत्तर पदवी.

Central Railway Mumbai Division Recruitment 2026 : वयोमर्यादा Age limit

तपशीलवयोमर्यादा
वयाची अटअधिसूचनेच्या तारखेनुसार (०३ ऑगस्ट २०२६) उमेदवाराचे वय १८ ते ६५ वर्षांच्या दरम्यान असावे.
नियमही वयोमर्यादा केव्हीएस (KVS) नियमांनुसार निर्धारित करण्यात आली आहे.

Central Railway Mumbai Division Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

केंद्रीय रेल्वे, मुंबई विभाग भरती 2026 या भरतीसाठी लागणारे शैक्षणिक व इतर आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.

  • जन्म दाखला किंवा शाळा सोडलेला दाखला असणे अनिवार्य आहे.
  • वर्तमान नियोक्त्याकडून ना-हरकत प्रमाणपत्र (NOC)
  • जर अनुभव असेल तर अनुभव प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड दोन्हीपैकी एक असेल तरीही चालते.
Official websiteयेथे क्लिक करा
Notification PDFयेथे क्लिक करा

Central Railway Mumbai Division Recruitment 2026 : मानधन – Salary

पदाचे नावप्रति महिना पारिश्रमिक
पीजी शिक्षक – इंग्रजी (PGT English)27,500/-
पीजी शिक्षक – अर्थशास्त्र (PGT Economics)27,500/-
पीजी शिक्षक – व्यवसाय अभ्यास (PGT Business Studies)27,500/-
पीजी शिक्षक – लेखाशास्त्र (PGT Accountancy)27,500/-
पीजी शिक्षक – रसायनशास्त्र (PGT Chemistry)27,500/-
पीजी शिक्षक – जीवशास्त्र (PGT Biology)27,500/-
टीजी शिक्षक – हिंदी (TGT Hindi)26,250/-
टीजी शिक्षक – सामाजिक विज्ञान (TGT Social Science)26,250/-
टीजी शिक्षक – इंग्रजी (TGT English)26,250/-
टीजी शिक्षक – कॉम्प्युटर सायन्स (TGT Computer Science)26,250/-
टीजी शिक्षक – गणित (TGT Maths)26,250/-
प्राइमरी शिक्षक – इंग्रजी आणि हिंदी (Primary Teacher – PRT)21,250/-

Central Railway Mumbai Division Recruitment 2026 : मुलाखत – Interview

केंद्रीय रेल्वे, मुंबई विभाग भरती 2026 या भरती प्रक्रियेसाठी कुठल्याही प्रकारची अर्ज प्रक्रिया नसून डायरेक्ट मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.

  • या भरतीसाठी कुठल्याही प्रकारचे पूर्व अर्ज किंवा ऑनलाईन अर्ज करण्याची गरज नसून, उमेदवारांनी डायरेक्ट ठरलेल्या तारखेला मुलाखतीसाठी योग्य ठिकाणी उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
  • मुलाखतीचे वेळ व ठिकाण : मुलाखती सकाळी १०:०० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत प्राचार्य यांचे कक्ष, केंद्रीय रेल्वे माध्यमिक शाळा (इंग्रजी माध्यम) आणि ज्युनियर कॉलेज, कल्याण
  • मुलाखतीसाठी जात असताना उमेदवारांनी मुंबईमध्ये कमीत कमी तीन दिवस राहण्याची तयारी करून यावे कारण आवश्यकतेनुसार आणि सर्व औपचारिकता पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दिवस लागू शकतो.
  • मुलाखतीसाठी येत असताना पुढील कागदपत्रे सोबत असावीत : जन्म दाखला किंवा शाळा सोडलेला दाखला, वर्तमान नियोक्त्याकडून ना-हरकत प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र असेल तर,​सर्व शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेची गुणपत्रिका व प्रमाणपत्रे, आधार कार्ड
Central Railway Mumbai Division Recruitment 2026 feature image
Central Railway Mumbai Division Recruitment 2026

महत्वाची सूचना : वरील लेखात प्राथमिक माहिती दिलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, जेणेकरून कोणताही गैरसमज किंवा नुकसान होणार नाही. अन्यथा माहितीतील त्रुटींमुळे नुकसान होण्याची शक्यता असू शकते.

तुम्ही येथे सातारा अंगणवाडी मदतनीस भरती 2026 या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/anganwadi-helper-satara-recruitment-2026/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!