GMC Recruitment 2026 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई भरती 2026 – 42 जागांसाठी Best भरती | पात्रता व अर्ज प्रक्रिया

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

GMC Recruitment 2026 : मित्रांन तुमच्यासाठी आनंदाची बातमी! मुंबईमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि गोकुळदास तेजपाल रुग्णालयामधील वैद्यकीय क्षेत्रामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये सहाय्यक प्राध्यापक, प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक अशी पदे भरली जाणार आहेत.

इच्छुक व पात्र उमेदवारांकडून योग्य पत्त्यावर अर्ज मागवण्यात आले आहेत. लवकरात लवकर आपली पात्रता पहा आणि अर्ज करायला सुरु करा. अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसाच्या आत अर्ज करणे आवश्यक असून, जाहिरात प्रसिद्ध झालेली तारीख 26 ऑक्टोंबर 2026 अशी आहे.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • जाहिरात प्रसिद्ध झाल्याची दिनांक: २६ ऑक्टोबर २०२६
    • ​अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत: जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत (शासकीय सुट्ट्या वगळून) सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत.
    • ​मुलाखतीचा दिनांक आणि वेळापत्रक: मुलाखतीची तारीख आणि नियुक्तीबाबतची इतर माहिती संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

GMC Recruitment 2026 : पदाचा तपशील

अ.क्र.पदाचे नावएकूण रिक्त पदे
1सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)18
2प्राध्यापक (Professor)10
3सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)14
एकूण पदे—42
  • सहाय्यक प्राध्यापक पदे
    • शरीररचनाशास्त्र (Anatomy): १
    • जीवरसायनशास्त्र (Biochemistry): १
    • औषधनिर्माणशास्त्र (Pharmacology): १
    • शरीर विकृतीशास्त्र (Pathology): १
    • सूक्ष्मजीवशास्त्र (Microbiology): २
    • रोग प्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र (PSM): २
    • औषधवैद्यकशास्त्र (Medicine): १
    • बालरोगचिकित्सा (Pediatrics): १
    • मनोविकृती (Psychiatry): १
    • शल्यचिकित्साशास्त्र (Surgery): २
    • स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र (Gynecology and Obstetrics): १
    • बधिरिकरणशास्त्र (Anesthesia): ३
    • इमर्जन्सी मेडिसीन (Emergency Medicine): १
  • प्राध्यापक पदे
    • शरीरक्रियाशास्त्र (Physiology): १
    • शरीर विकृतीशास्त्र (Pathology): १
    • न्यायवैद्यकशास्त्र (Forensic Science): १
    • रोग प्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र (PSM): १
    • बालरोगचिकित्सा (Pediatrics): १
    • त्वचा व गुप्तरोग (Skin & VD): १
    • कान, नाक, घसाशास्त्र (ENT): १
    • नेत्रशल्यचिकित्सा (Ophthalmology): १
    • बधिरिकरणशास्त्र (Anesthesia): १
    • क्ष-किरणशास्त्र (Radiology): १
  • सहयोगी प्राध्यापक पदे
    • शरीरक्रियाशास्त्र (Physiology): १
    • रोग प्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र (PSM): १
    • औषधवैद्यकशास्त्र (Medicine): २
    • बालरोगचिकित्सा (Pediatrics): २
    • शल्यचिकित्साशास्त्र (Surgery): २
    • अस्थिव्यंगोपचारशास्त्र (Orthopedics): १
    • कान, नाक, घसाशास्त्र (ENT): १
    • नेत्रशल्यचिकित्सा (Ophthalmology): १
    • बधिरिकरणशास्त्र (Anesthesia): १
    • क्ष-किरणशास्त्र (Radiology): १

GMC Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती 2026 या भरतीतील पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आहे खालील प्रमाणे आहे :

  • सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) : या पदासाठी संबंधित विषयांमध्ये MD / MS / DNB पदवी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
  • मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयांमधील संबंधित विषयांमध्ये MD/MS पृथ्वी उत्तीर्ण झाल्यानंतर वरिष्ठ रहिवासी म्हणून एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • प्राध्यापक (Professor) : या पदासाठी मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे संबंधित विषयांमध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून तीन वर्षाचा अनुभव उमेदवाराकडे असावा लागतो.
  • सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) : या पदासाठी राष्ट्रीय आयुर्वेदिक विज्ञान आयोगाच्या नियमावलीनुसार मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयांमधील संबंधित विषयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून चार वर्षाचा अनुभव उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.
  • मान्यताप्राप्त जनरलस मध्ये किमान दोन शोधनिबंध प्रकाशित असणे अनिवार्य ठरते.

तुम्ही येथे “केंद्रीय कपास अनुसंधान संस्थान नागपूर भरती 2026“ या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/icar-cicr-recruitment-2026/

GMC Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती 2026 या भरतीचा अर्ज करण्यासाठी आणि मुलाखतीसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे आहे :

  • संपूर्ण भरलेला विहित नमुन्यातील बायोडेटा (रेझ्युमे)
  • रहिवासी प्रमाणपत्र भारताचे नागरिक असल्याचे व महाराष्ट्राचे
  • शारीरिक दृष्ट्या पात्र असलेले वैद्यकीय प्रमाणपत्र शासकीय हॉस्पिटल मधून मिळालेले.
  • संबंधित पद्धतीची मूळ प्रमाणपत्र व गुणपत्रक
  • महाराष्ट्र वैद्यकीय मंडळ अधिनियम 1965 अंतर्गत कायमस्वरूपी नोंदणी प्रमाणपत्र.
  • सर्व वर्षातील शैक्षणिक गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्रे
  • वयाचा पुरावा पाहण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला
  • अनुभव प्रमाणपत्र (Experience Certificate)

GMC Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती 2026 या भरतीची अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी सर्वप्रथम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई महानगर परिसर या संस्थेच्या अधिकृत वेबसाईट द्वारे विहित नमुन्यातील अर्ज नमुना पाहूनच अर्ज करावा.
  • विहित नमुन्यातील अर्ज पूर्णपणे भरून झाल्यानंतर त्या अर्जासोबत नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे जोडा.
  • अर्जा मधील वैयक्तिक माहिती भरत असताना सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करूनच अर्ज सबमिट करा.
  • अर्ज संपूर्णपणे पाहून झाल्यानंतर खालील पत्त्यावर पाठवावा.
  • पत्ता : ​प्रशासकीय कार्यालय,
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
  • गोकुळदास तेजपाल रुग्णालय आवार,
  • मुंबई – ४००००१.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसाच्या आत.
  • जाहिरात प्रसिद्ध होण्याची तारीख 26 ऑक्टोंबर 2026.
Notification PDF 1 (अधिकृत जाहिरात पीडीएफ 1)येथे क्लिक करा
Notification PDF 2 (अधिकृत जाहिरात पीडीएफ)येथे क्लिक करा
Official website (अधिकृत संकेतस्थळ)येथे क्लिक करा

GMC Recruitment 2026 : वेतन श्रेणी

अ.क्रपदाचे नावदरमहा ठोक मानधन
1प्राध्यापक (Professor)₹ १,८५,०००/-
2सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)प्रचलित शासकीय नियमांनुसार
3सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)₹ १,००,०००/-

GMC Recruitment 2026 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई भरती 2026 – FAQ

प्रश्न 1: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
उत्तर: या भरतीसाठी एकूण 42 जागा असल्याची माहिती देण्यात आली आहे. अधिकृत जाहिरातीतून याची खात्री करावी.

प्रश्न 2: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई भरती 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असू शकते. पात्रतेसंबंधी संपूर्ण माहितीसाठी अधिकृत भरती जाहिरात तपासावी.

प्रश्न 3: या भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
उत्तर: अर्जाची प्रक्रिया आणि अर्ज सादर करण्याची पद्धत जाणून घेण्यासाठी अधिकृत जाहिरातीतील सूचना वाचाव्यात.

प्रश्न 4: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई भरती 2026 साठी निवड प्रक्रिया काय आहे?
उत्तर: निवड प्रक्रिया पदानुसार बदलू शकते. लेखी परीक्षा, मुलाखत किंवा इतर निवड पद्धती लागू आहेत का, हे अधिकृत जाहिरातीत तपासावे.

प्रश्न 5: या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?
उत्तर: अर्ज करण्याची अंतिम तारीख अधिकृत भरती जाहिरातीत नमूद केलेली असते. अर्ज करण्यापूर्वी अंतिम तारखेची खात्री करावी.

प्रश्न 6: या भरतीसाठी वेतन किती मिळेल?
उत्तर: वेतन संबंधित पद आणि शासनाच्या लागू नियमांनुसार ठरते. वेतनश्रेणीची माहिती अधिकृत जाहिरातीत तपासावी.

प्रश्न 7: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई भरती 2026 ची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
उत्तर: महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच संबंधित वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर भरतीविषयक माहिती तपासावी.

GMC Recruitment 2026 feature image
GMC recruitment 2026

Disclaimer ( महत्त्वाची सूचना ) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई भरती 2026 संदर्भातील माहिती उमेदवारांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने या लेखात देण्यात आली आहे. भरतीमधील एकूण जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख यामध्ये बदल होऊ शकतात.

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि सर्व माहितीची खात्री करून घ्यावी. Total Naukri ही अधिकृत सरकारी वेबसाइट नाही. या वेबसाइटचा उद्देश उमेदवारांपर्यंत नोकरी आणि भरतीविषयक माहिती पोहोचवणे हा आहे.

या लेखातील माहितीमध्ये काही त्रुटी किंवा बदल आढळल्यास, अर्ज करण्यापूर्वी अधिकृत स्रोतांद्वारे त्याची पडताळणी करावी. भरतीसंबंधी अंतिम निर्णयासाठी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात आणि सूचना ग्राह्य धराव्यात.

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!