IBPS RRB Recruitment 2026 : बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) प्रादेशिक ग्रामीण बँकेमधील ग्रुप A आणि ग्रुप B या पदांच्या नियुक्तीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये स्थिरावल्या उमेदवारांसाठी अखिल भरती प्रक्रिया अधिक महत्त्वाची असून, या भरतीच्या परीक्षेच्या तयारीसाठी आतापासूनच नियोजन करणे अधिक फायदेशीर ठरेल.
या भरती प्रक्रियेसाठी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवाराची निवड करण्यात येईल. या भरती प्रक्रियेची अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाइन असून, अर्ज करण्याची तारीख ही 1 सप्टेंबर 2026 या तारखेपासून 21 सप्टेंबर 2026 या तारखेपर्यंत असणार आहे. शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करून घ्या. या भरतीची अधिक माहिती पाहण्यासाठी तुम्हाला खालील संपूर्ण लेख वाचणे आवश्यक आहे.
- महत्त्वाच्या तारखा :
- ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज शुल्क भरणी: ०१.०९.२०२६ ते २१.०९.२०२६
- अर्ज दुरुस्ती विंडो (Edit Window): नोंदणी प्रक्रिया संपल्यानंतर (IBPS च्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले जाईल)
- पूर्व-परीक्षा प्रशिक्षण (PET): नोव्हेंबर २०२६
- ऑनलाइन पूर्व परीक्षा (Officers/OA): नोव्हेंबर / डिसेंबर २०२६
- पूर्व परीक्षेचा निकाल: डिसेंबर २०२६ / जानेवारी २०२७
- मुलाखती (Officers Scale-I, II & III): जानेवारी / फेब्रुवारी २०२७
IBPS RRB Recruitment 2026 : पदाची माहिती
| पदाचे नाव | एकूण जागा |
| ऑफिस असिस्टंट (मल्टिपर्पज) / Office Assistant (Multipurpose) | 8,183 |
| ऑफिसर स्केल-I (सहाय्यक व्यवस्थापक) / Officer Scale-I (Assistant Manager) | 4,256 |
| ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) / Officer Scale-II (GBO) | 666 |
| ऑफिसर स्केल-II (आयटी ऑफिसर) / Officer Scale-II (IT Officer) | 182 |
| ऑफिसर स्केल-II (चार्टर्ड अकाउंटंट) / Officer Scale-II (CA) | 81 |
| ऑफिसर स्केल-II (लॉ ऑफिसर) / Officer Scale-II (Law Officer) | 46 |
| ऑफिसर स्केल-II (ॲग्रिकल्चर ऑफिसर) / Officer Scale-II (Agriculture Officer) | 38 |
| ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) / Officer Scale-II (Treasury Manager) | 18 |
| ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) / Officer Scale-II (Marketing Officer) | 16 |
| ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर) / Officer Scale-III (Senior Manager) | 220 |
| एकूण जागा (Total Vacancies) | 13,706 |
IBPS RRB Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification
IBPS RRB भरती 2026 या भरतीसाठी विविध पदानुसार शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.
- ऑफिस असिस्टंट (मल्टिपर्पज) / Office Assistant (Multipurpose):
- उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणतीही पदवी असणे अनिवार्य आहे.
- उमेदवाराचा राजासाठी अर्ज करणार आहे तेथील स्थानिक भाषा त्यांना येणे महत्त्वाचे आहे.
- संगणकाचे मूलभूत ज्ञान (Desirable).
- ऑफिसर स्केल-I (सहाय्यक व्यवस्थापक) / Officer Scale-I (Assistant Manager):
- उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणतीही पदवी असणे अनिवार्य आहे.
- कृषी, बागविद्या, वनीकरण, पशुसंवर्धन, विधी, व्यवस्थापन किंवा अर्थशास्त्र इत्यादी विषयांपैकी एका विषयात पदवी असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाते.
- ऑफिसर स्केल-II
- ऑफिसर स्केल-II (विशेष अधिकारी / जनरल बँकिंग ऑफिसर):
- उमेदवाराला कमीत कमी कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- सोबतच दोन वर्षाचा अनुभव असणे या पदासाठी अनिवार्य आहे.
- आयटी ऑफिसर (IT Officer): इलेक्ट्रॉनिक्स / कम्युनिकेशन / कॉम्प्युटर सायन्स / आयटी विषयात किमान ५०% गुणांसह पदवी आणि १ वर्षाचा अनुभव.
- चार्टर्ड अकाउंटंट (CA): इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ची CA सनद आणि १ वर्षाचा अनुभव.
- लॉ ऑफिसर (Law Officer): किमान ५०% गुणांसह कायद्याची पदवी (LLB) आणि १ वर्षाचा वकिली/व्यवसायाचा अनुभव.
- ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर) / Officer Scale-III (Senior Manager):
- उमेदवाराला कमीत कमी कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- सोबतच पाच वर्षाचा अनुभव असणे या पदासाठी अनिवार्य आहे.
IBPS RRB Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents
IBPS RRB भरती 2026 या भारतीचा ऑनलाईन अर्ज करत असताना खालील कागदपत्रांची यादी आवश्यक आहे.
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- अर्ज भरताना वेबकॅम किंवा मोबाईलद्वारे थेट फोटो कॅप्चर करून अपलोड करावा लागतो. लाईव्ह फोटो घेण्यासाठी
- स्वाक्षरी (Signature)
- डाव्या हाताचा अंगठ्याचा छाप (Left Thumb Impression)
- हस्तलिखित घोषणापत्र (Handwritten Declaration)
- १० वी आणि १२ वीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
- पदवीची प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका (Graduation Marksheets & Certificate)
- ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स यांपैकी कोणतेही एक
- जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
IBPS RRB Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply
IBPS RRB भरती 2026 या भरतीची अर्ज प्रक्रिया पूर्णपणे आणायला याची संपूर्ण माहिती तुम्हाला खालील प्रमाण आहे.
- सर्वप्रथम पात्र उमेदवारांनी या भरतीच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देणे आवश्यक आहे.
- यानंतर नोंदणी करण्यासाठी वैयक्तिक माहिती देऊन नोंदणी करा.
- नोंदणी केल्यानंतर तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल त्याचा वापर करून तुम्ही लॉगिन करून घ्या.
- कर्जत मध्ये स्वतःची माहिती, शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक माहिती अचूक आणि काळजीपूर्वक भरा.
- नमूद केलेली सर्व कागदपत्रे फोटो, स्वाक्षरी आणि इतर आवश्यक कागदपत्रे योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
- अर्ज शुल्क हे ऑनलाईन पद्धतीने डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा युपीआय द्वारे भरू शकता.
- अर्ज यशस्वीरित्या सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट काढून जपून ठेवा.
| Official website | येथे क्लिक करा |
| Online apply | येथे क्लिक करा |
| Notification PDF | येथे क्लिक करा |
IBPS RRB Recruitment 2026 : परीक्षा स्वरूप
- ऑफिस असिस्टंट (मल्टिपर्पज) आणि ऑफिसर स्केल-I (पूर्व परीक्षा):
- ही परीक्षा ऑनलाइन स्वरूपाची असते.
- यात रिझनिंग (Reasoning) आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी/क्वांटिटेटिव्ह ऑप्टिट्यूड (Quantitative Aptitude) या विषयांवर एकूण ८० गुणांचे प्रश्न विचारले जातात.
- परीक्षा सोडवण्यासाठी एकूण ४५ मिनिटांचा कालावधी दिला जातो.
- मुख्य परीक्षा (Main Examination – Office Assistant & Officer Scale-I):
- पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी मुख्य परीक्षा घेतली जाते.
- यामध्ये रिझनिंग, कॉम्प्युटर नॉलेज, जनरल अवेअरनेस, इंग्लिश/हिंदी लँग्वेज आणि क्वांटिटेटिव्ह ऑप्टिट्यूड या विषयांवर प्रश्न विचारले जातात.
- एकूण २०० गुणांची ही परीक्षा असते.
- ऑफिसर स्केल-II आणि स्केल-III (सिंगल परीक्षा):
- या पदांसाठी पूर्व परीक्षा नसून थेट एकच मुख्य परीक्षा (Single Level Online Examination) घेतली जाते.
- यामध्ये व्यावसायिक ज्ञानासह (Professional Knowledge) इतर महत्त्वाच्या विषयांचा समावेश असतो.
- मुलाखत (Interview):
- केवळ ऑफिसर स्केल-I, II आणि III पदांसाठी मुख्य परीक्षेनंतर मुलाखत घेतली जाते.
- ऑफिस असिस्टंट पदासाठी कोणतीही मुलाखत घेतली जात नाही, त्यांची निवड केवळ मुख्य परीक्षेच्या गुणांवर होते.
IBPS RRB भरती 2026 – FAQ
- IBPS RRB भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
IBPS RRB भरती 2026 मध्ये एकूण 13,706 जागा आहेत. - IBPS RRB भरती 2026 मध्ये कोणती पदे आहेत?
या भरतीमध्ये Office Assistant (Multipurpose), Officer Scale-I, Officer Scale-II आणि Officer Scale-III यांसारख्या पदांचा समावेश आहे. - IBPS RRB भरती 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. सामान्यतः संबंधित पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक असते. - IBPS RRB भरती 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?
वयोमर्यादा पदानुसार वेगवेगळी आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयामध्ये सवलत मिळते. - IBPS RRB भरती 2026 साठी अर्ज कसा करायचा?
उमेदवारांनी IBPS च्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करायचा आहे. - IBPS RRB भरती 2026 ची निवड प्रक्रिया काय आहे?
पदानुसार पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा टप्प्यांद्वारे निवड प्रक्रिया केली जाते. - IBPS RRB भरती 2026 साठी अर्ज शुल्क किती आहे?
अर्ज शुल्क उमेदवाराच्या प्रवर्गानुसार आणि पदानुसार वेगवेगळे असू शकते. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात तपासावी. - IBPS RRB भरती 2026 मध्ये मराठी भाषेचा पर्याय आहे का?
होय, संबंधित राज्यासाठी उपलब्ध असलेल्या प्रादेशिक भाषांमध्ये मराठी भाषेचा पर्याय असू शकतो. - IBPS RRB भरती 2026 साठी परीक्षा ऑनलाइन होणार आहे का?
होय, IBPS RRB परीक्षा ऑनलाइन पद्धतीने (Computer Based Test) घेतली जाते. - IBPS RRB भरती 2026 ची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
भरतीची अधिकृत जाहिरात, अर्जाची तारीख, परीक्षा वेळापत्रक आणि इतर माहिती IBPS च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होते.

महत्वाची सूचना : ही माहिती उमेदवारांच्या माहितीसाठी देण्यात आली आहे. IBPS RRB भरती 2026 मधील पदांची संख्या, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, परीक्षा पद्धती, तारखा व इतर नियमांमध्ये अधिकृत सूचनेनुसार बदल होऊ शकतो. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी IBPS ची अधिकृत जाहिरात व अधिकृत वेबसाइट तपासूनच अर्ज करावा. दिलेल्या माहितीतील कोणत्याही त्रुटीसाठी आमची जबाबदारी राहणार नाही.
तुम्ही येथे बॅक ऑफ इंडिया 2026 या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/bank-of-india-recruitment-2026/