National Informatics Centre Recruitment 2026 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आणि उच्चशिक्षित तरुणांसाठी नोकरीची संधी. राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राने देशभरातील उच्च शिक्षित असणाऱ्या तरुणांसाठी ‘सायंटिफिक/टेक्निकल असिस्टंट-ए’ या ग्रुप-बी (नॉन-गॅझेटेड) येथे पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 376 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि डेटा सायन्स या क्षेत्रांतील तरुणांना सरकारी क्षेत्रात करिअर घडवण्याची सर्वात मोठी संधी निर्माण झाली आहे.
या भरती प्रक्रियेतील निवड होण्यासाठी कुठल्याही प्रकारची लेखी परीक्षा घेण्यात येणार नाही, तर उमेदवारांनी निवड ही वैध ‘गेट’ (GATE २०२४/२०२५/२०२६) स्कोअरच्या आधारे करण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेचा अर्ज हा 30 सप्टेंबर 2026 या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने करणे बंधनकारक आहे. इच्छुक को पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करावा. या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील संपूर्ण लेख वाचणे आवश्यक आहे.
- महत्त्वाच्या तारखा:
- ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: १ सप्टेंबर २०२६ (सकाळी १०:०० वाजता)
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० सप्टेंबर २०२६ (संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंत)
- पात्रतेसाठीची कट-ऑफ तारीख: ३० सप्टेंबर २०२६
National Informatics Centre Recruitment 2026 : पदाची माहिती
| पदाचे नाव | एकूण रिक्त जागा |
| सायंटिफिक/टेक्निकल असिस्टंट-ए | 300 |
| सायंटिफिक/टेक्निकल असिस्टंट-ए | 26 |
| सायंटिफिक/टेक्निकल असिस्टंट-ए | 50 |
| एकूण | 376 |
National Informatics Centre Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification
एनआयसी (NIC) भरती २०२६ या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. याची माहिती खालीलप्रमाणे आहे.
- उमेदवाराकडे खालीलपैकी कोणते एका क्षेत्रांमध्ये किंवा त्यांच्या संमिश्रणामध्ये M.Sc. / MS / MCA / B.E. / B.Tech. पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- कॉम्प्युटर सायन्स (Computer Science)
- कॉम्प्युटर आणि नेटवर्किंग सुरक्षा (Computer and Networking Security)
- सॉफ्टवेअर सिस्टीम (Software System)
- माहिती तंत्रज्ञान (Information Technology)
- इन्फॉर्मेटिक्स (Informatics)
- इलेक्ट्रॉनिक्स (Electronics), इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन (Electronics and Communication), किंवा इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन (Electronics & Telecommunication)
- उमेदवारांना अर्ज करण्यासाठी संबंधित विषयांमध्ये GATE या परीक्षेमध्ये वैद्य स्कोर असणे बंधनकारक आहे.
- कॉम्प्युटर सायन्सेस अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी CS पेपर कोड
- इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगसाठी EC पेपर कोड
- डेटा सायन्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी DA पेपर कोड
- या भरतीतील पदासाठी कुठल्याही प्रकारचा अनुभव असणे आवश्यक नाही.
National Informatics Centre Recruitment 2026 : वयोमर्यादा – Age limit
| वर्गवारी | वयोमर्यादा (वर्षे) |
| UR / EWS | ३० वर्षे |
| SC / ST | ३५ वर्षे |
| OBC (NCL) | ३३ वर्षे |
| PwBD (दिव्यांग) | ४० वर्षे |
| सेवेतील उमेदवार (Service Candidates) | वर्गानुसार ३५ ते ४० वर्षे |
| माजी सैनिक (Ex-Servicemen) | शासन नियमानुसार |
National Informatics Centre Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents
एनआयसी (NIC) भरती २०२६ या भरतीचा पडताळणीच्या वेळी आणि ऑनलाईन अर्ज करताना आवश्यक असणारी कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत:
- ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.
- वयाचा पुरावा पाहण्यासाठी जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला असणे आवश्यक आहे.
- मॅट्रिक्युलेशन आणि सीनियर सेकेंडरी (१० वी आणि १२ वी) प्रमाणपत्र व गुणपत्रिका
- संबंधित शाखेची पदवी (M.Sc./MS/MCA/B.E./B.Tech.) उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि सर्व सेमिस्टरच्या गुणपत्रिका
- युनिव्हर्सिटीच्या रजिस्ट्रारचे CGPA ते टक्केवारी रूपांतरण प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
- GATE स्कोअर कार्ड
National Informatics Centre Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply
एनआयसी (NIC) भरती २०२६ या भरतीची अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाइन असून, याची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे आहे.
- उमेदवाराने सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळावर जाऊन स्वतःची नोंदणी करणे अनिवार्य आहे.
- नोंदणी करण्यासाठी वैयक्तिक माहिती (नाव, पत्ता आणि जन्मतारीख) भरावी लागते.
- अर्जामधील सर्व वैयक्तिक माहिती, शैक्षणिक अहर्ता आणि इतर आवश्यक माहिती अचूक आणि काळजीपूर्वक भरा.
- नमूद केलेली सर्व कागदपत्रे योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
- अर्ज शुल्क असेल तर ऑनलाईन पद्धतीने भरून घ्या. अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज संपूर्ण मानला जाणार नाही.
- अर्ज यशस्वी रित्या सबमिट झाल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट करून जतन करून ठेवा.
| Official website | येथे क्लिक करा |
| Online apply | येथे क्लिक करा |
| Notification PDF | येथे क्लिक करा |
NIC भरती 2026 – FAQ प्रश्न व उत्तरे
- NIC भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
NIC भरती 2026 मध्ये एकूण 376 जागा आहेत. - NIC भरती 2026 मध्ये कोणत्या पदांसाठी भरती आहे?
या भरतीमध्ये विविध तांत्रिक आणि इतर संबंधित पदांचा समावेश आहे. पदनिहाय माहिती अधिकृत जाहिरातीत दिली आहे. - NIC भरती 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. संबंधित पदासाठी आवश्यक असलेली पदवी किंवा तांत्रिक पात्रता असणे आवश्यक आहे. - NIC भरती 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?
वयोमर्यादा पदानुसार वेगवेगळी असू शकते. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयाची सवलत मिळते. - NIC भरती 2026 साठी अर्ज कसा करायचा?
उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो. - NIC भरती 2026 ची निवड प्रक्रिया काय आहे?
निवड प्रक्रिया पदानुसार वेगळी असू शकते. परीक्षा, मुलाखत किंवा इतर निवड पद्धतींचा समावेश असू शकतो. - NIC भरती 2026 साठी अर्ज शुल्क किती आहे?
अर्ज शुल्क प्रवर्ग आणि पदानुसार वेगवेगळे असू शकते. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात तपासावी. - NIC भरती 2026 साठी कोण अर्ज करू शकतो?
अधिकृत जाहिरातीत दिलेली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर अटी पूर्ण करणारे उमेदवार अर्ज करू शकतात. - NIC भरती 2026 मध्ये पगार किती मिळतो?
पदानुसार वेतनश्रेणी वेगवेगळी असते. अचूक वेतनाची माहिती संबंधित अधिकृत जाहिरातीत दिलेली असते. - NIC भरती 2026 ची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज प्रक्रिया, तारखा आणि इतर माहिती NIC/MeitY च्या अधिकृत संकेतस्थळावर तपासता येते.

महत्वाची सूचना : ही माहिती उमेदवारांच्या माहितीसाठी देण्यात आली आहे. NIC भरती 2026 मधील पदसंख्या, पात्रता, वयोमर्यादा, वेतन, अर्ज शुल्क, परीक्षा पद्धती व तारखांमध्ये अधिकृत सूचनेनुसार बदल होऊ शकतो. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात व अधिकृत वेबसाइट तपासूनच अर्ज करावा. दिलेल्या माहितीतील कोणत्याही त्रुटीसाठी आमची जबाबदारी राहणार नाही.
तुम्ही येथे “IBPS RRB भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/ibps-rrb-recruitment-2026/