Sangli Recruitment 2026:- अंगणवाडी मदतनीस भरती|महिलांसाठी नोकरीची सर्वोत्तम संधी Best मार्गदर्शन

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

सांगली भरती 2026 (Sangli Recruitment 2026) महिलांसाठी नोकरी करण्याची सुवर्ण संधी! पात्र महिलांनी कडून या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने मागवण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागांतर्गत अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. शिक्षणाचे प्रमुख ग्रामीण आणि नागरी भागातील केंद्र म्हणजे अंगणवाडी.

सध्या अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सेविका अशा दोन पदांसाठी वेळोवेळी भरती प्रक्रिया राबविण्यात येते, परंतु सध्या अंगणवाडी मदतनीस या पदासाठी भरती प्रक्रियेत चालू आहे. हे पण फक्त महिलांना रोजगार मिळवून देत नाही तर समाजातील गरीब आणि गरजू लहान मुलांना आहार व आरोग्य सेवा पुरवण्याचे काम करत असते. ही भरती प्रक्रिया सांगली येथे राबविण्यात येत आहे, अर्ज करण्यासाठी लागणारी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा, वेतन अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रिया याचे संपूर्ण मार्गदर्शन खालील लिखामध्ये केले आहे.

शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

अंगणवाडी मदतनीस या पदासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता महिलांकडे असणे अनिवार्य आहे याची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे पाहू शकता:

  • महिला उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी 12वी पर्यंत झाले असणे आवश्यक आहे.
  • उमेदवारी ज्या गावांमध्ये अंगणवाडी आहे तिथली स्थानिक रहिवासी असणे अधिक महत्त्वाचे ठरते. स्थानिक रहिवासी असल्याचा पुरावा पाहण्यासाठी ग्रामपंचायतीचा किंवा संबंधित सक्षम प्राधिकरणाचा रहिवासी दाखला असणे अनिवार्य आहे.
  • महिन्याचे वय 18 ते 35 वर्ष या दरम्यान असणे अनिवार्य आहे.
  • या भरतीचा अर्ज करताना तुम्हाला तुमच्या शैक्षणिक पात्रतेचे मूळ गुणपत्रक आणि प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.

आवश्यक कागदपत्रे – Required Documents

अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज करताना लागणाऱ्या कागदपत्राची यादी खालील प्रमाणे आहे.

  • शाळा सोडल्याचा दाखला ज्यामध्ये उमेदवाराचे जन्मतारीख हे स्पष्ट असे.
  • ४ थी ते १२ वी वर्गाचे सर्व उत्तीर्ण गुणपत्रक
  • रहिवासी दाखला (Domicile Certificate)
  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड
  • वयाचा दाखला पाहण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला असणे अनिवार्य आहे.
  • जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (Income Certificate)
  • महिला विधवा किंवा परित्यक्ता असेल तर त्याबाबतचे शासनमान्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र विहित नमुण्यातील असावे.
  • पासपोर्ट साईज फोटो
  • अंगणवाडी मदतनीस म्हणून पूर्वी काम केले असेल तर अनुभव प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.

अर्ज प्रक्रिया – How to Apply

अंगणवाडी मदतनीस या पदाची भरती प्रक्रिया सांगली येथे होत असून त्याची अर्ज प्रक्रिया आहे पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने राबवण्यात येत आहे. त्याची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे पाहू शकता:

जाहिरात द्वारी अर्ज नमुना मिळवणे :

  • सर्वप्रथम या भरतीच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या sangli.nic.in
  • जाहिरातीमध्ये ‘Notice’ किंवा ‘Recruitment’ विभाग शोधा आणि अंगणवाडी मदतनीस भरती जाहिरात पहा.
  • जाहिराती सोबतच दिलेला अर्जाचा विहित नमुना डाउनलोड करा किंवा त्याची प्रिंट काढून द्या.

अर्ज भरा

  • सर्वप्रथम अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती नाव, पत्ता, शैक्षणिक पात्रता आणि जन्मतारीख अचूक भरा.
  • अर्जावर तुमचा पासपोर्ट साईज फोटो चिटकवा आणि स्वाक्षरी स्पष्ट दिसेल अशी करा.
  • नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्र स्पष्ट दिसतील अशी सर्व कागदपत्रांच्या छायाप्रती अर्जासोबत जोडा. सर्वात महत्त्वाचे सर्व छायाप्रती अर्जदाराची स्वाक्षरी असणे अनिवार्य आहे.
  • अर्ज भरून झाल्यानंतर सर्व कागदपत्रांची संचिका जोडा.
  • अर्ज आणि कागदपत्रे तुमच्या संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये जाऊन प्रत्यक्ष जमा करून घ्या.
  • कर्ज जमा केल्यानंतर तुम्हाला त्या कार्यालयामधून पोहोच पावती लक्ष करून घ्या.

कामे:-

  • अंगणवाडी मधील मुलांची काळजी घेणे आणि त्यांच्या दैनंदिन उपक्रमांत त्यांची मदत करून देणे.
  • अंगणवाडी सेविकांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी मधील व्यवस्थापनात मदत करणे.
  • अंगणवाडी परिसरामधील स्वच्छता राखणे आणि केंद्रातील शैक्षणिक साहित्यावर लक्ष ठेवणे.
  • अंगणवाडी सेविकेला आरोग्य आणि पोषण विषयक सर्वेक्षणात मदत करणे.

मानधन : – Sangli Recruitment 2026

  • सरकारी नियमानुसार अंगणवाडी मदतनीस या पदासाठी दरमहा 8500 ते 9000 या दरम्यान देण्यात येते.
  • मानधन केंद्र आणि राज्य सरकार यांच्या हिस्सा प्रमाणानुसार ठरविण्यात येते.
  • अंगणवाडी मदतनीस या पदाचे मानधन हे महिनेच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होते, यामुळे आधार कार्ड बँक खात्या सोबत लिंग असणे बंधनकारक आहे.
Sangli Recruitment 2026 feature image
Sangli Recruitment 2026

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : ही माहिती विविध अधिकृत स्रोत व उपलब्ध अधिसूचनांच्या आधारे तयार करण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. भरतीच्या नियम, पात्रता, तारखा किंवा इतर बाबींमध्ये बदल होऊ शकतात. अंतिम व अधिकृत माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. totalnaukri.com केवळ माहिती देणारे व्यासपीठ आहे.

तुम्ही येथे “अंगणवाडी मदतनीस भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/anganwadi-helper-recruitment-2026/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!