Solapur Mahanagarpalika Recruitment 2026:- जुलै 2026 मध्ये सोलापूर येथे विविध तांत्रिक आणि प्रशासकीय पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांनासाठी आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे. सोलापूर महानगरपालिका भरती यामध्ये पुढील प्रमाणे पदे आहेत : सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता आणि लिपिक.
सोलापूर महानगरपालिका या भरती चा अर्थ करण्याची अंतिम तारीखे 17 जुलै, 2026 रात्री 5:00 वाजेपर्यंत असून पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा. खालील लेखामध्ये भरतीचा अर्ज कसा भरावा अर्ज साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि वेतन याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या तारखा : अर्ज प्रक्रिया सुरू: १५ जुलै २०२६
अर्ज करण्याची अंतिम मुदत: १७ जुलै २०२६ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
मुलाखतीची तारीख: २१ जुलै २०२६ सकाळी ११:०० वाजता.
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
- सहाय्यक अभियंता (Assistant Engineer) या पदासाठी शैक्षणिक पात्रता : या पदासाठी कमीत कमी तीन वर्षाचा नियमित सेवेचा अनुभव असणे अनिवार्य असतो.
- कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) या पदासाठी संबंधित शाखेमधील पदवी असणे अनिवार्य असते.
- सहाय्यक कनिष्ठ अभियंता (Assistant Junior Engineer) या पदासाठी संबंधित शाखेतील पदवीका असणे आवश्यक असते.
- लिपिक (Clerk) पदासाठी कोणतेही शाखेमधील पदवी आणि सोबतच टायपिंग परीक्षा उत्तीर्ण आणि MS-CIT प्रमाणपत्र असणे अनिवार्य असते.
आवश्यक कागदपत्रे – Required Documents
या भरतीचा अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे देण्यात आली आहे.
- सेवा निवृत्ती आदेश म्हणजेच सक्षम प्राधिकरणाने दिलेले निवृत्तीचे अधिकृत पत्र.
- पेन्शन पेमेंट ऑर्डर ची प्रत असणे महत्त्वाचे आहे.
- संबंधित पदांसाठी आवश्यक असलेल्या पदवी किंवा पदवीकेची (Degree/Diploma) प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका असणे अनिवार्य आहे.
- अनुभव प्रमाणपत्र (Experience Certificate) काही पदांसाठी अनिवार्य असतो.
- ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड असणे गरजेचे आहे.
- वैद्यकीय प्रमाणपत्र (Medical Fitness Certificate)
- पासपोर्ट साईज फोटो
- ऑनलाइन पद्धतीने भरलेल्या अर्जाची प्रिंट आउट.
अर्ज प्रक्रिया – How to Apply
या भरतीची अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑफलाइन असून त्याची संपूर्ण मार्गदर्शन खालील प्रमाणे आहे.
- सर्वप्रथम या महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या solapurcorporation.gov.in
- भरती किंवा Recruitment या विभागामध्ये जुलै 2026 ची संबंधित जाहिरात डाऊनलोड करून घ्या.
- डाउनलोड केल्यानंतर जाहिरातीच्या शेवटी दिलेल्या अर्जाचा नमुना दिसेल तो डाऊनलोड करून घ्या.
- कर्जत मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती नाव, पत्ता, निवृत्तीचा दिनांक आणि मागील सेवेचा तपशील सर्व माहिती अचूक पद्धतीने भरा.
- अरे सागर तुमचा पासपोर्ट साईज फोटो चिटकवणे अनिवार्य आहे.
- अर्जामध्ये नमूद केलेली सर्व कागदपत्रे स्पष्ट स्वरूपात दिसतील असे जोडा.
- अर्जावर आणि सर्व कागदपत्रावर तुमची स्वयंसाक्षांकित स्वाक्षरी करा.
- अर्ज संपूर्ण भरून झाल्यानंतर सर्व माहिती अचूक असल्याची खात्री पटवा.
- अर्ज आणि जोडलेली सर्व कागदपत्रे एक लिफाफा मध्ये ठेवा.
- हा लिफाफा 17 जुलै 2026 रोजी सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापना विभागामध्ये प्रत्यक्ष जाऊन किंवा टपालाद्वारे जमा करा.
- रजे जमा केल्यानंतर शक्य असल्यास त्याची पोत पावती किंवा जमा केल्याचा पुरावा सोबत ठेवा, कारण भविष्यामध्ये अडचण आल्यानंतर तो वापरता येऊ शकतो.
मानधन – Solapur Mahanagarpalika Recruitment
| पदाचे नाव | मासिक मानधन (अंदाजे) |
| सहाय्यक अभियंता (Assistant Engineer) | 30,000 – 35,000 |
| कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) | 25,000 – 30,000 |
| सहाय्यक कनिष्ठ अभियंता (Assistant Junior Engineer) | 20,000 – 25,000 |
| लिपिक संवर्ग (वरिष्ठ/कनिष्ठ श्रेणी लिपिक) | 15,000 – 20,000 |
कामे व जबाबदारी
सहाय्यक अभियंता : कामाचे पर्यवेक्षण करणे विकास कामांचे नियोजन करणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना तांत्रिक सल्ला देणे हे सहाय्यक अभियंता या पदाचे काम असते.
कनिष्ठ अभियंता : दैनंदिन अहवाल तयार करणे प्रत्यक्ष जाऊन कार्यस्थळावर देखरेख करणे आणि मोजमाप दररोज पुस्तिका लिहिणे हे कनिष्ठ अभियंता या पदाचे काम असते.
सहाय्यक कनिष्ठ अभियंता : कनिष्ठ अभियंता ला मदत करणे, तांत्रिक फाईलची जुळवाजुळव करणे किंवा फाइल्स ची माहिती ठेवणे आणि डेटा संकलित करणे हे सहाय्यक निष्ठ अभियंता यांचे काम असते.
लिपिक : कार्यालयामधील दैनंदिन फाईलची नोंदणी, पत्रव्यवहार रेकॉर्ड चेतन आणि वरिष्ठ लिपिकांना मदत करणे.

महत्त्वाची सूचना (Disclaimer): अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात (Official Notification) काळजीपूर्वक वाचावी. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, आवश्यक कागदपत्रे, अर्जाची अंतिम तारीख आणि निवड प्रक्रिया यांची खात्री करूनच अर्ज सादर करावा. अपूर्ण किंवा चुकीची माहिती असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. या माहितीमुळे होणाऱ्या कुठल्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.
तुम्ही येथे “RPF कॉन्स्टेबल भरती 2026” याची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/rpf-constable-recruitment-2026/