Thane Mahanagarpalika Recruitment 2026:- ठाणे महानगरपालिकेमध्ये अग्निशमन दलालमधील भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. तरुणांसाठी आणि पात्र उमेदवारांसाठी सुवर्णसंधी चालून येत आहे. 2026 या वर्षामध्ये फायरमन पदासाठी उत्सुक असलेल्या उमेदवारांसाठी आणि पात्र उमेदवारांसाठी या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अग्निशमन दलातील फायरमन पदासाठी महत्त्वाच्या तीन गोष्टी म्हणजे धाडस, शिस्त आणि तत्परता या तीन गोष्टींचा संगम झाला तर या पदासाठी निवड होण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही.
फक्त नोकरी मिळवणे नव्हे तर शारीरिक आणि बौद्धिक कसोटी पार करून या प्रतिष्ठित दलात स्थान मिळवण्यासाठी आत्तापासूनच तयारीला लागणे योग्य ठरेल. मित्रांनो सध्याच्या काळामध्ये सरकारी नोकरी मिळवणे अत्यंत कठीण झाली आहे, यासाठी रेगुलर अभ्यास शारीरिक अभ्यास असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला या भरतीचा अर्ज करायचा असेल तर लागणारी शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा आणि मानधन याची संपूर्ण माहिती खालील लिखामध्ये पाहू शकता:
महत्त्वाच्या तारखा :
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख १७ जुलै २०२६
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० जुलै २०२६ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत)
अर्जामध्ये सुधारणा (Edit) करण्यासाठीची मुदत २४ जुलै २०२६ ते ३० जुलै २०२६
Thane Mahanagarpalika Recruitment 2026: शैक्षणिक पात्रता
ठाणे महानगरपालिका मधील फायरमन या पदासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे पाहू शकतात:
- उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी 10 वी किंवा 12 वी संपूर्ण झालेली असणे अनिवार्य आहे.
- अग्निशमन प्रशिक्षण प्रमाणपत्र हे महाराष्ट्र शासनाच्या किंवा केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त अग्निशमन प्रशिक्षण केंद्रांमधून प्राप्ती केलेले असणे आवश्यक असते, हे शिक्षण किंवा प्रमाणपत्र उमेदवाराकडे असेल तर त्यांना विशेष प्राधान्य दिले जाऊ शकते.
- अनेक वेळा अग्निशामक दलातील वाहने चालवावी लागतात तर यासाठी उमेदवाराकडे हेवी मोटर व्हेईकल चालवण्याच्या वैद्य परवाना म्हणजेच लायसन्स असणे महत्त्वाची पात्रता मानली जाते.
टीप : भरती प्रक्रियेच्या जाहिरातीनुसार शैक्षणिक पात्रते मध्ये थोडेफार बदल होऊ शकतात. यामुळे जेव्हा अधिकृत जाहिरात प्रसिद्धी होईल तेव्हा शिक्षणिक पात्रता तपासणी गरजेचे आहे.
Thane Mahanagarpalika Recruitment 2026: वयोमर्यादा
ठाणे महानगरपालिका फायरमन पदासाठी साधारण खालील वयोमर्यादा लागू असू शकते.
| प्रवर्ग (Category) | वयोमर्यादा |
| खुला प्रवर्ग (Open) | १८ वर्षे – ३० वर्षे |
| मागासवर्गीय (SC/ST/OBC/VJNT) | १८ वर्षे – ३५ वर्षे |
| प्राविण्यप्राप्त खेळाडू | १८ वर्षे – ३५ वर्षे |
| माजी सैनिक | १८ वर्षे – ३५ वर्षे + सेवा कालावधी |
| भूकंपग्रस्त/प्रकल्पग्रस्त | १८ वर्षे – ३५ वर्षे |
वेतन
ठाणे महानगरपालिका फायरमन पदासाठी खालील प्रमाणे अंदाजे वेतन देण्यात आले आहेत:
| तपशील | माहिती |
| वेतन स्तर (Pay Level) | पे-मॅट्रिक्स लेव्हल ३ (Level-3) |
| मूळ वेतन श्रेणी (Pay Scale) | 21,700 – 69,100 |
| मिळणारे भत्ते | महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), इतर भत्ते |
| अंदाजित सुरुवातीचा पगार | 25,000 – 32,000 |
Thane Mahanagarpalika Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply
ठाणे महानगरपालिका फायरमन भरती साठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने आहे. त्याची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे पाहू शकता:
- सर्वात आधी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या thanecity.gov.in
- यानंतर भरती या विभागावर क्लिक करा आणि अधिकृत जाहिरातीमधील शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नियम व अटी काळजीपूर्वक वाचा.
- अप्लाय ऑनलाईन या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन नोंदणी करावी लागेल. तुमची नोंदणी करण्यासाठी चालू असलेला ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर तिथे टाका.
- नोंदणी केल्यानंतर युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल याचा वापर करून लॉगिन करून घ्या.
- लॉगिन केल्यानंतर अर्जामधील तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाची माहिती अचूकपणे भरा.
- नमूद केलेली सर्व कागदपत्रे पासपोर्ट साईज फोटो, स्वाक्षरी, शैक्षणिक गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे, जातीचा दाखला आणि इतर आवश्यक कागदपत्रे योग्य साईजमध्ये स्कॅन करून अपलोड करा.
- माहिती भरून झाल्यानंतर अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने नेट बँकिंग किंवा डेबिट कार्ड वापर करून शुल्क भरू शकता.
- शुल्क भरल्यानंतर शुल्क भरल्याची पावती आणि अर्जाची प्रिंट आउट काढून ठेवा, अर्जाची प्रिंट आउट हे अर्ज सबमिट केल्यानंतर काढा.
- अर्ज संपूर्ण भरून झाल्यानंतर अनुष्का भरून झाल्यानंतर अर्जामधील वरील माहिती अचूक असल्याची खात्री करून घ्या कारण माहिती एकदा सबमिट झाल्यानंतर दुरुस्त करता येत नाही. माहितीमध्ये त्रुटी आढळून आल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.
- माहिती पाहून झाल्यानंतर अर्ज सबमिट करा अर्ज सबमिट यशस्वी झाल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट काढून ठेवा.
टीप : तांत्रिक अडचणी येऊ नयेत यासाठी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करून घ्या.

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : ठाणे महानगरपालिका फायरमन भरती 2026 साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, शारीरिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज करण्याची अंतिम तारीख, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, परीक्षा किंवा मैदानी चाचणीचे निकष यांची खात्री करूनच अर्ज सादर करावा. अर्जामध्ये चुकीची किंवा अपूर्ण माहिती भरल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो. अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध होणाऱ्या सूचना आणि अद्यतनांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. कोणत्याही अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत जाहिरातीतील माहितीलाच प्राधान्य द्यावे.
तुम्ही येथे “कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/cci-recruitment-2026/