शिपाई भरती 2026 (Peon Recruitment 2026) या पदाचा अर्ज करण्यासाठी तुमची १० वी झालेली असणे गरजेचे आहे. अनेक तरुणांचा असा गैरसमज आहे की शिपाई भरतीसाठी पदवी पूर्ण असावी लागते, परंतु या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार हा १० वी उत्तीर्ण असावा लागतो. आणि शासकीय कार्यालय न्यायालय महानगरपालिका आणि विद्यापीठे यासारख्या विभागामध्ये शिपाई हे पद अत्यंत महत्त्वाचे असते. तुम्हाला जर कमी शिक्षणामध्ये सरकारी क्षेत्रात तुमचे करिअर घडवायचे असेल, चांगला पगार हवा असेल तर ही भरती तुमच्यासाठीच आहे.
शिपाई भरती 2026 या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, अभ्यासक्रम, परीक्षा, कामाचे स्वरूप, पगार आणि निवड प्रक्रिया त्याची सर्व माहिती खालील लेखकांमध्ये सविस्तर दिली आहे.
शिपाई म्हणजे कोण?
शिपाई म्हणजे शासकीय कार्यालयामध्ये दररोज कामकाजात मदत करणारे आणि कार्यालयामधील व्यवस्था सुरळीत ठेवणारे शिपाई हे चतुर्थ श्रेणी कर्मचारी असतात.
- कामे : कार्यालयामधून फाईल्स, पत्रव्यवहार किंवा महत्त्वाचे कागदपत्रे स्थलांतर करणे म्हणजे एक विभागामधून दुसऱ्या विभागामध्ये पोहोचवणे.
- कार्यालया मधील अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयीन कामामध्ये लागेल तशी मदत करून देणे.
- कार्यालयामध्ये व्यवस्था राखणे म्हणजे कार्यालयाची स्वच्छता, बैठकांसाठी आवश्यक ते गोष्टी (पाणी किंवा चहा पाण्याची सोय) करणे.
- कार्यालयाच्या कामानुसार बँक, पोस्ट ऑफिस किंवा इतर सरकारी कार्यालयांमध्ये जाऊन कागदपत्रे जमा करणे किंवा कार्यालयामध्ये देणे.
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
शिपाई भरती 2026 (Peon Recruitment 2026) या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आणि नियम खालील प्रमाणे सविस्तर दिली आहेत.
- या पदाचा अर्थ करण्यासाठी उमेदवार कमीत कमी १० वी उत्तीर्ण असावा.
- काही ठिकाणी म्हणजेच शासकीय किंवा खाजगी विभागांमध्ये उमेदवारा हा १२ वी उत्तीर्ण असेल तर प्राधान्य दिले जाते.
- या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराला मराठी भाषेचे उत्तम ज्ञान असायला हवे मराठी भाषा बोलता लिहिता आणि वाचता यावी- बंधन कारक आहे.
वयोमर्यादा (Age limit)
शिपाई भरती 2026 (Peon Recruitment 2026) पदासाठी अर्ज करणारे उमेदवार खालील दिलेल्या वयोगटातील असावेत.
| किमान वय | १८ वर्षे |
| कमाल वय (खुला प्रवर्ग) | ३८ वर्षे |
| आरक्षित प्रवर्ग | सवलत दिलेली नाही |
निवड प्रक्रिया
शिपाई भरती 2026 (Peon Recruitment 2026) या पदाची निवड प्रक्रिया ही पाच टप्प्यांमध्ये होते. या पाच टप्प्यांमध्ये विभागानुसार थोडेफार बदल होण्याची शक्यता आहे. सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.
ऑनलाइन/ऑफलाइन अर्ज : या भरतीच्या अधिकृत संकेतस्थळावर या पदाची जाहिरात प्रसिद्ध होते, उमेदवाराला तारखेच्या आत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरून घ्यावा लागतो. maharashtra.gov.in
लेखी परीक्षा (असेल तर) : काही विभागांमध्ये उमेदवारांची निवड करताना MCQ स्वरूपाची लेखी परीक्षा घेण्यात येते आणि काही ठिकाणी डायरेक्ट १० वीच्या गुणावर निवड प्रक्रिया होते.
मुलाखत : न्यायालय किंवा काही विशिष्ट विभागांमध्ये शिपाई निवडण्यासाठी उमेदवाराची तोंडी परीक्षा किंवा मुलाखत घेऊन निवड केली जाते.
कागदपत्र पडताळणी : लेखी परीक्षा किंवा मुलाखत मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना त्यांची शैक्षणिक पात्रतेचे वयाचे कागदपत्रे सादर करावी लागतात. (१० विजून पत्रिका आणि रहिवासी दाखला)
अंतिम निवड यादी : सर्व परीक्षा पूर्ण झाल्यानंतर कुणाच्या आणि आरक्षण नियमाच्या आधारे मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट जाहीर केली जाते.
अभ्यासक्रम (Syllabus)
शिपाई भरती 2026 (Peon Recruitment 2026) या पदासाठी तुमची निवड होण्यासाठी खालील अभ्यासक्रम दिला आहे.
- मराठी (व्याकरण, शब्दांचे अर्थ, समानार्थी व विरुद्धार्थी शब्द, वाक्यप्रचार आणि म्हणी)
- सामान्य ज्ञान (इतिहास, भूगोल, नागरीशास्त्र आणि इतर सर्वसाधारण माहितीवर आधारित)
- चालू घडामोडी (राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अलिकडच्या काळातील महत्त्वाच्या घडामोडी व घडलेले प्रसंग)
- अंकगणित (साधी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, टक्केवारी आणि इतर प्राथमिक स्तरावरील गणितीय प्रश्न)
- बुद्धिमत्ता चाचणी (आकलन क्षमता आणि तर्कशक्ती तपासण्यासाठी सोपे बुद्धिमत्तेचे प्रश्न)
पगार
शिपाई भरती 2026 (Peon Recruitment 2026) या पदासाठी पगार किती असतो आणि भत्ते त्याची सर्व माहिती खालील लेखांमध्ये दिली आहे.
- अंदाजे मासिक वेतन १५,००० ते २५,००० + प्रतिमहिना
- महागाई भत्ता (Dearness Allowance) वाढत्या महागाईनुसार भट्ट्यात वेळवेळी वाढ करण्यात येते.
- घरभाडे भत्ता (House Rent Allowance) विभागानुसार घर भाडे भत्ता देण्यात येतो.
- इतर शासकीय लाभ वैद्यकीय सुविधा, प्रवास भत्ता आणि नियमानुसार मिळणारे निवृत्ती वेतन देण्यात येते.
आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
शिपाई भरती 2026 (Peon Recruitment 2026) या पदांमध्ये यश मिळवण्यासाठी उमेदवाराकडे खालील दिलेले असणे अनिवार्य आहे.
- आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र
- १० वी चे गुणपत्रक आणि बोर्ड सर्टिफिकेट (प्रमाणपत्र)
- १२ वी चे गुणपत्रक आणि बोर्ड सर्टिफिकेट (प्रमाणपत्र)
- रहिवासी दाखला (Domicile Certificate)
- जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
- नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer)
- पासपोर्ट साईज फोटो
- चालू असलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी
शिपाई पदाचे फायदे
शिपाई भरती 2026 (Peon Recruitment 2026) पदाचे मुख्य फायदे खालीलप्रमाणे आहेत :
- कमी शिक्षणामध्ये सरकारी क्षेत्रांमध्ये नोकरी मिळते आणि शासकीय सेवेत काम करण्याची संधी मिळते.
- ७ व्या वेतन दर महा निश्चित आणि वेळेवर पगार दिला जातो.
- मूळ पगारा सोबतच इतर गोष्टींचाही खर्च भागतो जसे महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), वैद्यकीय खर्च आणि इतर शासकीय योजनांचे लाभ देखील मिळतात.
- या पदावर काम करत असताना सेवाकाळ पूर्ण झाल्यानंतर किंवा विभागीय परीक्षा दिल्यानंतर वरिष्ठ पद मिळवता येते.
- खाजगी नोकऱ्यांमध्ये शासकीय सुट्ट्यांचा लाभ जास्त प्रमाणात मिळत नाही या तुलनेत सरकारी नोकऱ्यांमध्ये शासकीय सुट्ट्यांचा लाभ मिळतो आणि सरकारी नोकरीमध्ये कामाचे तास ठरवलेले असतात.

शेवटची सूचना (Disclaimer) : सध्या शिपाई पदासाठी कोणतीही एकत्रित राज्यस्तरीय भरती जाहीर झालेली नाही. विविध विभाग, न्यायालये, विद्यापीठे, महापालिका आणि शासकीय कार्यालयांमार्फत वेळोवेळी शिपाई भरती जाहीर केली जाते. या लेखातील माहिती मार्गदर्शनासाठी असून भरतीनुसार पात्रता, वयोमर्यादा, पगार आणि निवड प्रक्रिया बदलू शकते. नवीन भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर सविस्तर माहिती तपासणे आवश्यक आहे. येत्या काही महिन्यांत विविध विभागांमध्ये शिपाई पदांची भरती जाहीर होण्याची शक्यता आहे.
तुम्ही येथे “पोस्ट ऑफिस 2026″ या पदाची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/gramin-dak-sevak/