महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती (Maharashtra State Co-operative Bank 2026) सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! Best मार्गदर्शन

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती (Maharashtra State Co-operative Bank 2026) पदवी झालेल्या उमेदवारांसाठी बँकिंग क्षेत्रात नोकरीची संधी आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मध्ये १३९ जागांसाठी भरती जाहीर झालेली असून, त्यामधील पदे जूनियर ऑफिसर, असोसिएट, टायपिस्ट आणि ड्रायव्हर या विविध पदांसाठी बँकिंग क्षेत्रांमध्ये भरती निघाली आहे. जर तुम्हाला क्षेत्रांमध्ये काम करायचे आहे, करिअर घडवायचे आहे किंवा तुमची पदवी पूर्ण झालेली आहे तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे.

सर तुम्हाला या पदासाठी अर्ज करायचा असेल, तर या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, निवड प्रक्रिया, पदांसाठी अंदाजे वेतन, निवड प्रक्रिया आणि वयोमर्यादा याची सर्व माहिती खालील प्रमाणे सविस्तर दिली आहे.

कामे

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती (Maharashtra State Co-operative Bank 2026) या भरती अंतर्गत निघाल्या पदांसाठी कामे खालील प्रमाणे दिली आहे:

ट्रेनी ज्युनियर ऑफिसर (Trainee Junior Officer)

  • ट्रेनिंग ज्युनियर ऑफिसर हे पद अधिकारी श्रेणीतील पद आहे. कर्जत प्रक्रिया बँक ऑपरेशन्स, खात्यांचे व्यवस्थापन, ग्राहकांना बँकिंग सेवा पुरवणे आणि बँकेच्या दैनंदिन कामकाजावर पाहणी करणे हे काम ट्रेनिंग जूनियर ऑफिसर यांचे असते.
  • बँकेच्या धोरणांची अंमलबजावणी करणे आणि आर्थिक अहवाल तयार करणे, आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना गरजेनुसार कामकाजामध्ये हातभार लावणे.

ट्रेनी असोसिएट (Trainee Associate)

  • हे पण प्रामुख्याने क्लर्कल स्वरूपाचे काम असते. ग्राहकांचे खाते उघडणे, नोंद करणे, चेक प्रक्रिया, रोख रक्कम हाताळणे आणि बँकेचे सॉफ्टवेअर मध्ये एन्ट्री करून देणे एक काम ट्रेनिंग असोसिएट चे असते.
  • ट्रेनी असोसिएट ची जबाबदारी दैनंदिन बँक व्यवहाराचे रेकॉर्ड मेंटेन करणे आणि व्यवस्थापनाला सहकार्य करणे .

ट्रेनी टायपिस्ट (Trainee Typist)

  • ट्रेनी टायपिस्ट हे पद असोसिएट ग्रेड मध्ये येते. दस्तऐवज परिपत्रके पत्रे आणि अहवाल टायपिंग करणे हे ग्रेनी टायपिस्ट चे प्रमुख काम असते.
  • ट्रेनी टाइपिस्ट ची जबाबदारी संगणकावरील कामांमध्ये मदत करणे आणि कार्यालयांमधील प्रशासकीय कामांसाठी गरज असणारी टायपिंग करणे.

ट्रेनी ड्रायव्हर (Trainee Driver)

  • या पदाचे काम बँकेचे अधिकृत वाहने चालवणे हे असते.
  • बँक मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या कामासाठी पोहोचवणे आणि वाहनांची देखभाल करणे.

टीप : यामधील सर्व पदे ट्रेनिंग स्वरूपाचे आहेत, यामुळे सुरुवातीच्या काळात प्रशिक्षण द्वारे कामकाजाची सविस्तर माहिती देण्यात येईल.

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती (Maharashtra State Co-operative Bank 2026) या पदाची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे दिली आहे:

  • ट्रेनी ज्युनियर ऑफिसर साठी : कोणत्याही शाखेतील पदवी ५०% कोण असावेत आणि बँकिंग क्षेत्रामध्ये कमीत कमी २ वर्षाचा अनुभव असावा.
  • ट्रेनी असोसिएट साठी : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यालयातून पदवी आणि ५०% गुण असावेत.
  • ट्रेनी टायपिस्ट पदासाठी : कोणत्याही शाखेतील पदवी, मराठी ३० इंग्रजी ३० – ४० टायपिंग प्रमाणपत्र
  • ट्रेनी ड्रायव्हर पदासाठी : १० वी उत्तीर्ण आणि वाहन चालक परवाना.

वरील सर्व पदांसाठी मराठी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य आहे आणि १० वी मध्ये मराठी विषय असणे अनिवार्य आहे. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती (Maharashtra State Co-operative Bank 2026) या पदासाठी उमेदवाराकडे खालील दिलेली सर्व कागदपत्रे असणे अनिवार्य आहे.

  • पासपोर्ट साईज फोटो
  • पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने केलेली स्वाक्षरी.
  • ​डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा (Left Thumb Impression)

निवड झाल्यानंतर लागणारी कागदपत्रे

  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र आणि पासपोर्ट – कोणतेही एक
  • वयाचा पुरावा पाहण्यासाठी जन्मदाखला किंवा १० वीची बोर्ड प्रमाणपत्र
  • सर्व वर्षाच्या पदवी गुणपत्रिका
  • डोमिसाईल प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  • मराठी भाषेचा पुरावा
  • अनुभवाचे प्रमाणपत्र (Experience Certificate)
  • टायपिंग प्रमाणपत्र (मराठी 30 इंग्रजी 40)
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • फी पावती
  • ऑनलाईन अर्जाची प्रिंट

वरील सर्व कागदपत्र मूळ असावी लागतात आणि काही प्रती साक्षांकित करून सोबत ठेवणे फायदेशीर ठरेल.

वेतन

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती (Maharashtra State Co-operative Bank 2026) या भरती अंतर्गत विविध पदांसाठी खालील प्रमाणे वेतन अंदाजे दिले आहे.

पदाचे नावप्रशिक्षण काळातीलप्रशिक्षणानंतरचे मासिक वेतन (अंदाजे)
ट्रेनी ज्युनियर ऑफिसर३०,००० ५२,१००
ट्रेनी असोसिएट२५,००० ३४,४००
ट्रेनी टायपिस्ट२५,०००३४,४००
ट्रेनी ड्रायव्हर२२,००० २७,७००

अर्ज प्रक्रिया (How to Apply)

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती (Maharashtra State Co-operative Bank 2026) या भरती मधील पदांसाठी अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन असून याची सर्व माहिती खालील प्रमाणे सविस्तर दिली आहे.

  • सर्वप्रथम या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्या msc.bank.in/career
  • मुख्य पानावर Apply Online या पर्यायावर क्लिक करा.
  • नवीन वापर करता म्हणून Click here for New Registration या पर्यायावर क्लिक करा
  • या नंतर तुमची वैयक्तिक माहिती (तुमचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी) भरा. आणि नोंदणी करून घ्या.
  • नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला युजर आणि पासवर्ड त्याद्वारे लॉगिन करा.
  • यानंतर वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाचा तपशील अचूक भरा. माहिती चुकीची असल्यास अर्ज स्वीकारला जाऊ शकत नाही.
  • नमूद केलेली सर्व कागदपत्रे योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करून द्या.
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी अर्जाची शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरून घ्या.
  • शुल्क भरल्यानंतर त्याची पावती जतन करून ठेवा.
  • सर्व माहिती पुन्हा एकदा तपासा आणि सबमिट या बटनवर क्लिक करा.
  • सर्वात महत्त्वाचे अर्जाची प्रिंट काढून तुमच्याजवळ ठेवा निवड झाल्यानंतर हे प्रिंट कामाला येऊ शकते.
  • महत्त्वाची सूचना : जुलै २०२६ या तारखेचे आज तुमचा अर्ज भरा.

महत्त्वाची सूचना (Disclaimer): येथे दिलेली माहिती केवळ उमेदवारांच्या माहितीसाठी आणि मार्गदर्शनासाठी आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या (MSC Bank) भरती प्रक्रियेतील रिक्त पदांची संख्या, अटी, शर्ती, परीक्षा पद्धत आणि इतर नियमांमध्ये बँकेच्या अधिकृत धोरणानुसार बदल होऊ शकतो. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर (msc.bank.in) उपलब्ध असलेल्या मूळ जाहिरातीचे सविस्तर वाचन करावे. या माहितीच्या आधारे घेतलेल्या निर्णयामुळे होणाऱ्या कोणत्याही परिणामांसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही.

तुम्ही येथे” रेल्वे अप्रेंटिस भरती 2026” याची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/secr-recruitment-2026/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!