MHDC Recruitment 2026 : महाराष्ट्र गृहनिर्माण विकास मंडळामध्ये भरती |सरकारी नोकरीची Best संधी

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

MHDC Recruitment 2026 : सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणारा तरुणांसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास मंडळ द्वारे विविध तांत्रिक, प्रशासकीय आणि लेखन विषयक पदांसाठी भरती प्रक्रिया प्रसिद्ध झाली आहे. महामंडळाचे महत्त्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी अनेक प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणण्यासाठी ही भरती प्रक्रिया सुरू केली असून, पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आली आहेत.

महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ या भरती प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने गृहनिर्माण व नागरी मान काम क्षेत्रातील अनुभवी सेवानिवृत्ती अधिकारी तसेच खाजगी क्षेत्रातील पात्र उमेदवार या भरतीचा अर्ज करू शकता. या भरतीची निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे. या भरतीची निवड प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा आणि मानधन याची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे आहे.

MHDC Recruitment 2026 : पात्रता- Eligibility

  • तांत्रिक पदे (उदा. संचालक (तांत्रिक), कार्यकारी/उप/कनिष्ठ अभियंता) : संबंधित शाखे मधील पदवी किंवा पदवी का असणे अनिवार्य आहे. या पदासाठी प्राधान्य एमई/एमटेक पदवी धारकांना देण्यात येईल. सोबतच गृहनिर्माण व नागरी बांधकाम क्षेत्रातील कामाचा प्रत्यक्ष अनुभव असणे अनिवार्य आहे.
  • नगररचनाकार व वास्तुविशारद : शहरी नियोजन किंवा वास्तुशास्त्र विषयांमधील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणे अनिवार्य आहे.
  • लेखा व वित्त पदे (उदा. संचालक (लेखा व वित्त), लेखाधिकारी : या पदासाठी वाणिज्य शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पद किंवा CA Inter / ICWA Inter / MBA असणे अनिवार्य आहे.
  • प्रशासकीय पदे (उदा. सहाय्यक/कनिष्ठ अधिकारी) : या पदासाठी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणे अनिवार्य आहे. प्रशासन, जमीन विभाग किंवा मंत्रालयात सेवेतील कामाचा अनुभव असणे फायदेशीर ठरू शकतो.
  • लिपिक टंकलेखक : या पदासाठी पदवी कोणत्याही शाखेतील असणे अनिवार्य आहे सोबतच मराठी आणि इंग्रजी टंकलेखन प्रमाणपत्र आणि MS-CIT आणि Tally-ERP चे ज्ञान असणे अनिवार्य आहे.
  • शिपाई पदासाठी उमेदवारांची फक्त 10 वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

आवश्यक कागदपत्रांची यादी

महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ या भरतीचा अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्राची यादी खालील प्रमाणे आहे.

  • अर्ज हा विहित नमुन्यातील पूर्ण भरलेला स्व हस्ताक्षरात असणे अनिवार्य आहे.
  • पासपोर्ट साईज फोटो अर्जावर चिटकवणे आवश्यक आहे.
  • शैक्षणिक प्रमाणपत्र : , १२ वी, पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका असणे अनिवार्य आहे.
  • संबंधित पदासाठी आवश्यक असलेले अनुभवाची मूळ प्रमाणपत्रे आणि त्यांची स्व साक्षांकित कृती असणे महत्त्वाचे आहे.
  • वय पुराव्यासाठी शाळा सोडण्याचा दाखला किंवा जन्म दाखला असणे अनिवार्य आहे.

सेवानिवृत्ती अधिकाऱ्यांसाठी :

  • सेवानिवृत्तीच्या कार्यालयीन आदेशाची छायांकित प्रत असणे महत्त्वाचे आहेत.
  • संबंधित कार्यालयाचे वेतन प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
  • पोलीस स्टेशन पत्र हे पत्र निवड प्रक्रियेच्या वेळी सादर करणे आवश्यक असते.
  • इतर प्रमाणपत्र : MS-CIT प्रमाणपत्र, संगणक टंकलेखन प्रमाणपत्र, व्यावसायिक नोंदणी प्रमाणपत्र

अर्ज प्रक्रिया – How to Apply

महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ या भरतीचा अर्ज करण्यासाठी कर्जत प्रक्रिया खालील प्रमाणे देण्यात आली आहे.

  • सर्वप्रथम या भरतीच्या अधिकृत जाहिरातीमधील अर्जाचा नमुना पूर्णपणे भरा.
  • या भरतीचा अर्ज हा उमेदवाराने स्वतःच्या हस्ताक्षरात भरणे अनिवार्य आहे.
  • अर्जासोबत शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका, अनुभव प्रमाणपत्र, वय पुरावा आणि सेवानिवृत्ती अधिकारासाठी आवश्यक असलेली अतिरिक्त प्रमाणपत्र त्यांच्या छायाप्रती जोडणे अनिवार्य आहे.
  • या भरतीची अधिकृत वेबसाईट : https://mahahousing.mahaonline.gov.in/
  • अर्जावर अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो चिटकवणे गरजेचे आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : ​प्रति,
मा. व्यवस्थापकीय संचालक तथा मु. का. अ.,
महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ,
३ रा मजला, साखर भवन, रामनाथ गोयंका मार्ग,
नरीमन पॉईंट, मुंबई – ४०००२१.

महत्त्वाचा टप्पा : पात्र असलेल्या उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे करण्यात येते. मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी अर्जासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांची मूळ कागदपत्रे सोबत ठेवणे बंधनकारक आहे. अर्जासोबत तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी चालू असलेला आणि अचूक लिहा, करण पुढील माहिती तुम्हाला तुमच्या इमेल द्वारे कळवली जाईल.

टिप : अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरातीमधील नियम, अटी व आवश्यक कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.

पदांची यादी

  • संचालक (तांत्रिक)
  • ​कार्यकारी अभियंता (स्थापत्य)
  • ​उपअभियंता (स्थापत्य)
  • ​कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • ​कनिष्ठ अभियंता (विद्युत)
  • ​सहाय्यक नगररचनाकार (Assistant Town Planner)
  • ​वास्तुविशारद (Architect)
  • ​आरेखक (Draftsman)
  • ​सहाय्यक / कनिष्ठ अधिकारी (प्रशासन/जमिन)
  • ​कनिष्ठ अधिकारी (जमिन) / नायब तहसीलदार
  • ​संचालक (लेखा व वित्त)
  • ​लेखाधिकारी
  • ​सहाय्यक विपणन अधिकारी
  • ​लिपिक टंकलेखक (Clerk cum Typist)
  • ​शिपाई
MHDC Recruitment 2026 feature image
MHDC Recruitment 2026

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखामध्ये दिलेली माहिती केवळ उमेदवारांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. भरतीसंदर्भातील पदसंख्या, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, शुल्क, महत्त्वाच्या तारखा किंवा इतर कोणत्याही बाबतीत अंतिम निर्णय अधिकृत जाहिरात व संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसारच ग्राह्य धरावा. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना (Notification) काळजीपूर्वक वाचावी. या लेखातील माहितीमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात.

तुम्ही येथे “संरक्षण मंत्र्यालयाच्या आमर्ड व्हीकल्स निगम भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/avnl-recruitment-2026/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!