Electrician Recruitment 2026 : नागपूर येथे विजतंत्री (Electrician) या पदासाठी भरती | तांत्रिक क्षेत्रात करिअर करू इच्छितणाऱ्या तरुणांसाठी Best संधी

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Electrician Recruitment 2026 : तांत्रिक क्षेत्रात करिअर करू इच्छितणाऱ्या तरुणांसाठी आणि पात्र उमेदवारांसाठी चांगली संधी आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित भरती 2026 नागपूर येथे विजतंत्री (Electrician) या पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. सध्या हाती आलेल्या सूचनेनुसार महापारेषणच्या नागपूर येथे “शिकाऊ उमेदवारांची” भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे.

विनू क्षेत्रांमधील आव्हाने आणि तांत्रिक बाबींची प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी ही भरती प्रक्रिया एक सुवर्णसंधी आहे विशेष म्हणजे ज्या उमेदवारांनी औद्योगिक प्रशासन संस्थेमधून विजतंत्री व्यवसाय यशस्वी पूर्ण केला आहे, अशा हुशार तरुणांना या भरती प्रक्रिये द्वारे कंपनीच्या कार्यप्रणालीचा भाग कोणासाठी एक आमंत्रण देण्यात आले आहे आणि हे यांच्यासाठी सुवर्णसंधी आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 43 रिक्त पदांची जागा भरली जाणार असून, शुभेच्छा तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करून घ्या. या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रिया याची माहिती उमेदवारांकडे असणे फायदेशीर ठरते.

Electrician Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित भरती 2026 या संस्थेमधील विजतंत्री (Electrian) पदासाठी आवश्यक असलेले शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे पाहू शकता:

  • उमेदवाराची 10वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
  • राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT), नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून ‘विजतंत्री’ या व्यवसायामधील परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • टिप : या भरतीतील पदांसाठी फक्त दहावी उत्तीर्ण आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये विजतंत्री ही परीक्षा उत्तीर्ण अस असा नियम आहे तर पात्र उमेदवारांनी या भरतीचा अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावा.

Electrician Recruitment 2026: आवश्यक कागदपत्रे – Required Documents

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी या संस्थेमधील शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराकडे खालील कागदपत्राची यादी असणे अर्ज भरण्यासाठी फायदेशीर ठरते.

  • एस.एस.सी. (SSC) आणि आय.टी.आय. (ITI) विजतंत्री सर्व वर्षाच्या किंवा सेमिस्टर च्या उत्तीर्ण असलेल्या गुणपत्रिका असणे आवश्यक आहे.
  • वयाचा पुरावा पाहण्यासाठी जन्म दाखला किंवा शाळा सोडलेला दाखला असणे आवश्यक आहे.
  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आणि आधार कार्ड वरील नाव एस.एस.सी. आणि आय.टी.आय. या गुणपत्रिका वर असणे महत्त्वाचे आहे.
  • जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
  • रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  • नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer)
  • ईडब्ल्यूएस (EWS) प्रमाणपत्र
  • एसईबीसी (SEBC) प्रमाणपत्र

टीप : वरील सर्व आवश्यक कागदपत्रांची मूळ प्रति उमेदवारांकडे असणे गरजेचे असते ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर प्रपत्र-अ सोबत या सर्व कागदपत्रांची छायांकित प्रति पोस्टाद्वारे किंवा स्वतः कार्यालयामध्ये जाऊन जमा करावी लागतात.

Electrician Recruitment 2026 : वयोमर्यादा – Age limit

प्रवर्गवयोमर्यादा
खुला प्रवर्ग (Open)१८ वर्षांपेक्षा कमी नसावे आणि ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
मागासवर्गीय प्रवर्ग १८ वर्षांपेक्षा कमी नसावे आणि ४३ वर्षांपर्यंत (५ वर्षे शिथिल).

Electrician Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

शिकाऊ उमेदवारी (Apprenticeship) पदासाठी दोन टप्प्यांमध्ये असते याची माहिती खालील प्रमाणे आहे.

  • सर्वप्रथम उमेदवारांनी या भरतीचे अधिकृषण स्थळाला ऑनलाईन भेट द्या. https://www.apprenticeshipindia.gov.in
  • ऑनलाइन अर्ज हा 20 जुलै 2026 ते 27 जुलै 2026 या तारखेच्या आत करून घ्या.
  • अर्जामध्येमधील वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि इतर सर्व माहिती अचूक भरा.
  • नमूद केलेली सर्व मूळ प्रमाणपत्र व कागदपत्रे योग्य साइज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
  • अर्ज करत असताना चालू असलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी नोंदवणे गरजेचे आहे.

ऑफलाईन अर्ज प्रक्रिया (Hard Copy Submission)

  • ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर जाहिराती सोबत जोडलेले प्रपत्र-अ पूर्ण भरून घ्या.
  • या प्रपत्र-अ सोबत ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाची प्रत आणि मुद्दा क्रमांक 02 मध्ये नमूद केलेल्या सर्व आवश्यक पत्रांची प्रत जोडणे अनिवार्य आहे.
  • हा पूर्ण जोडलेला कागदपत्रांचा संच आणि पत्र 17 जुलै 2026 रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत खालील पत्त्यावर स्वतः किंवा पोस्ट द्वारे जमा करा.

पत्ता : कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु विभाग, १३२ केव्ही उपकेंद्र, मानकापूर परिसर, कुणाल हॉस्पिटल समोर, कोराडी रोड, मानकापूर, नागपूर – ४४००३०.

टीप : जर अर्ज विहित मुदतीत म्हणजेच तारखेच्या आत प्राप्त झाला नाही तर भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही.

महत्त्वाच्या तारखा :

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात २० जुलै २०२६
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जुलै २०२६ (रात्री ११:५६ पर्यंत)
  • प्रपत्र-अ (हार्ड कॉपी) जमा करण्याची शेवटची तारीख २७ जुलै २०२६ (सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत)
Electrician Recruitment 2026 feature image
Electrician Recruitment 2026

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे या भरतीचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.

तुम्ही येथे “ठाणे महानगरपालिका फायरमन भरती 2026” संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/thane-mahanagarpalika-recruitment-2026-2/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!