Panjab National Bank Recruitment 2026 :- पंजाब नॅशनल बँक येथे एकूण जागा 545 आणि महाराष्ट्र मध्ये मराठी भाषेसाठी 67 जागा निघाल्या आहेत. सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या आणि पात्र उमेदवारांसाठी पंजाब नेशनल बँक मोठ्या प्रमाणामध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. पंजाब नॅशनल बँक 2026 मध्ये लोकल बँक ऑफिसर या पदासाठी भरती प्रक्रिया राबवत आहे.
राष्ट्रीयकृत बँकेमध्ये अधिकारी पदावर काम करण्याची संधी तरुणांना ही बँक उपलब्ध करून देत आहे.विशेषतः महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी स्थानिक भाषेच्या प्रवीण्यासह 69 जागा उपलब्ध आहेत यामुळे मराठी भाषकांसाठी अत्यंत महत्त्वाची भरती प्रक्रिया ठरू शकते. या भरतीचा अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रिया याची संपूर्ण माहिती खालील लेखामध्ये दिली आहे.
महत्त्वाच्या तारखा : 1. ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख २० जुलै २०२६
2. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ ऑगस्ट २०२६
3. परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख ९ ऑगस्ट २०२६
4. ऑनलाइन लिखित परीक्षा (संभाव्य) ऑगस्ट / सप्टेंबर २०२६
Panjab National Bank Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification
पंजाब नॅशनल बँक मध्ये लोकल बँक ऑफिसर या पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे:
- शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयांमध्ये (Arts, Commerce, Science, Engineering) पदवी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
- बँकिंग क्षेत्रामध्ये एक वर्षाचा अनुभव असणे अनिवार्य आहे.
- या पदासाठी अर्ज करत असताना संबंधित राज्यातील स्थानिक भाषेचे (महाराष्ट्रासाठी मराठी) ज्ञान असणे गरजेचे आहे. (स्थानिक भाषा बोलता लिहिता आणि वाचता येणे अनिवार्य आहे)
Panjab National Bank Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents
या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे खालील आवश्यक कागदपत्राची यादी असणे गरजेचे आहे.
- पदवी च्या पूर्ण वर्षातील गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे असणे अनिवार्य आहे आणि सोबतच पदवी प्रमाणपत्र (Degree Certificate)
- ज्या बँकेमध्ये तुम्ही एक वर्ष काम केले आहे त्याचे अधिकृत प्रमाणपत्र आणि नियुक्ती पत्र म्हणजेच कामाचा अनुभव असलेले प्रमाणपत्र (Experience Certificate)
- ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक चालते.
- वयाचा पुरावा पाहण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला.
- जातीचा दाखला (Caste Certificate)
- तुम्ही ज्या ठिकाणी अर्ज केला आहे त्या ठिकाणची स्थानिक भाषा तपासण्यासाठी दहावी किंवा बारावीच्या गुणपत्रिकेत ती भाषा असणे अनिवार्य आहे.
- पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
Panjab National Bank Recruitment 2026 : वयोमर्यादा – Age limit
| तपशील | वयोमर्यादा |
| किमान वय | 20 वर्षे |
| कमाल वय | 28 वर्षे |
| वयोमर्यादेची मुख्य अट | उमेदवार विहित केलेल्या तारखेनुसार २० ते २८ वयोगटातील असावा. |
| वयात सवलत | नियमांनुसार राखीव प्रवर्गातील (SC/ST/OBC/PWD इ.) उमेदवारांना शासकीय नियमावलीनुसार कमाल वयोमर्यादेत सवलत लागू राहील. |
अर्ज प्रक्रिया – How to Apply
पंजाब नॅशनल बँक येथे लोकल बँक ऑफिसर या पदासाठी भरतीचा अर्ज करण्याची प्रक्रिया खालील लेखामध्ये आहे.
- सर्वात आधी पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या pnbindia.in
- यानंतर मुख्य पानावर गेल्यानंतर ‘Recruitment’ किंवा ‘Careers’ या पैकी कोणत्याही एका पर्यायावर क्लिक करा.
- तिथे तुम्हाला ‘Recruitment of Local Bank Officer 2026’ या जाहिरातीची लिंक दिसेल त्याला क्लिक करा.
- यानंतर तुमची वैयक्तिक माहिती (नाव पत्ता मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी), भरून नोंदणी करा.
- नोंदणी केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड आणि यूजर आयडी मेल याचा वापर करून लॉगिन करा.
- त्यामधील तुमची शैक्षणिक माहिती, वैयक्तिक माहिती, कामाचा अनुभव आणि इतर आवश्यक माहिती अचूक पद्धतीने भरा.
- नमूद केलेली सर्व कागदपत्र पासपोर्ट साईज फोटो, स्वाक्षरी, डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा आणि इतर सर्व आवश्यक कागदपत्रे योग्य साइज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
- अर्ज शुल्क तुमच्या प्रवर्गानुसार ऑनलाईन पद्धतीने भरून घ्या, अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज पूर्ण मानला जात नाही.
- अर्ज सबमिट करण्यास सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करून घ्या. कारण अर्ज एकदा सबमिट केल्यानंतर माहिती दुरुस्त करता येणार नाही.
- माहिती अचूक असल्याची खात्री झाल्यानंतर अर्ज सबमिट करा. अर्ज यशस्वीरीत्या सबमिट झाल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट काढून जपून ठेव.
मानधन Salary
| तपशील | विवरण |
| पदाचे नाव | लोकल बँक ऑफिसर (LBO) – ज्युनिअर मॅनेजमेंट ग्रेड स्केल-I (JMGS-I) |
| वेतनश्रेणी (Pay Scaleवेतनश्रेणी (Pay Scale) | 48,480 – 87,290 |
| सुरुवातीचा मूळ पगार (Basic Pay) | 48,480 / per day |
| प्रमुख भत्ते (Allowances) | महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), शहर भरपाई भत्ता (CCA) इ. |
| इतर लाभ | वैद्यकीय भत्ता, प्रवास भत्ता आणि बँकेच्या नियमांनुसार मिळणारे इतर लाभ व सवलती |

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखामध्ये दिलेली पंजाब नॅशनल बँक (PNB) भरती 2026 संबंधी माहिती ही अधिकृत भरती अधिसूचना व उपलब्ध सार्वजनिक माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून पात्रता, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा व इतर अटींची खात्री करून घ्यावी. भरती प्रक्रियेत होणाऱ्या कोणत्याही बदलांसाठी संबंधित बँकेची अधिकृत सूचना अंतिम व ग्राह्य राहील. या लेखाचा उद्देश केवळ माहिती देणे हा असून, कोणत्याही प्रकारची कायदेशीर किंवा अधिकृत हमी दिली जात नाही.
तुम्ही येथे “बँक ऑफ इंडिया भरती 2026” याची संपूर्ण माहिती पाहू शकता https://totalnaukri.com/union-bank-of-india-recruitment-2026/